रंगपंचमी सोलमधली

Submitted by आऊटडोअर्स on 25 October, 2010 - 00:57

अबेडेकर व गुणेश यांच्या रंगीबेरंगी फोटोंवरून प्रेरणा घेऊन दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधल्या ऑटमचे काही फोटो इथे टाकण्याची धिटाई करतेय.

हे फोटो सोल ग्रँड पार्कमधील
प्रचि #१
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #२
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #३
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #४
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #५
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #६
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #७
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #८
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #९
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #१०
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #११
From Autumn in Seoul Grand Park

ऑटम हा ऋतू प्रचंड आवडत असल्याने मागच्या विकेंडला कोरियातीलच चुन्चॉन प्रोव्हिन्समधील 'नामी रिपब्लिक' या आयलंडला भेट दिली. त्यातील काही फोटोज इथे टाकतेय.

निकॉन एसएलआर घेऊन ३-४ वर्ष झाली खरंतर, पण फोटोग्राफी सिरियसली नव्हती घेतली आत्तापर्यंत. माझी फोटोग्राफी गुरू 'सावली' हिचे लेख वाचल्यावर आता हळूहळू सुधारणा करतेय. तुम्हां सगळ्यांना फोटो आवडले तर त्याचं क्रेडीट फक्त आणि फक्त 'सावली'लाच.

नामी रिपब्लिक
प्रचि #१२
From Autumn in Nami Island

प्रचि #१३
From Autumn in Nami Island

प्रचि #१४
From Autumn in Nami Island

प्रचि #१५
From Autumn in Nami Island

प्रचि#१६
From Autumn in Nami Island

प्रचि #१७
From Autumn in Nami Island

प्रचि #१८
From Autumn in Nami Island

प्रचि #१९
From Autumn in Nami Island

प्रचि #२०
From Autumn in Nami Island

प्रचि #२१
From Autumn in Nami Island

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आडो, अशी धिटाई परत परत करत जा हो. आम्हाला आवडेल खुप. कोरीया खुपच सुंदर आहे, आम्हालाही दर्शन घडू दे, त्या सौंदर्याचे.

कातील, भन्नाट, खल्लास...
डोळ्यांचे पारणे फेडलेस बघ... मस्तच.

अबबबब किती ते रंग म्हणायचे!!!!!! आणि हे एवढे सुरेख फोटो टाकायला धिटाई का म्हणुन करावी लागली? बिनधास टाका की फोटो. Happy

मी थोडंस रुक्ष लिहू का ?
थंडीची सुरवात झाली, किंवा तिची चाहूल लागली, कि या वर्गातील झाडे, विचार करतात कि पानांचा या दिवसात उपयोग नाही. सूर्यप्रकाश नसणार, त्यामूळे प्रकाशसंस्लेषण करता येणार नाही. शिवाय पाने झाडावर राहिली तर त्यातून कमी असलेल्या पाण्याचा साठा, बाष्पीभवनाने उडून जाणार.
मग झाड काय करते, तर पानातले हरितद्रव्य काढून घेते. पान लाल दिसू लागते. पण त्यातली उरलीसुरली पोषक द्रव्ये काढून घेते. पान पिवळे दिसू लागते.
मग उरला सुरला ओलावा काढून घेते. पान सोनेरी तपकिरी होते. मग पानाच्या देठाचा बंध खिळखिळा केला जातो, आणि एखाद्या झुळीकीबरोबर आपलेच पान वार्‍यावर सोडून दिले जाते.
आणि आपण म्हणतो, रंगपंचमी आली.

मला ती चारोळी आठवली (बापरे, आता मला कविता आठवायला लागल्या !!, सानीकडून डोके ठिकाणावर आहे का, ते तपासून घ्यावे लागेल.)

पान हळून गळताना
आवाज होत नाहि...

सॉरी आडो.. विषयांतर केले.

Pages