परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुढ्ढा मिल गयाची हिरोईन -
बुढ्ढा मिल गयाची हिरोईन - अर्चना (आडनाव बहुतेक जोगळेकर - चुभूद्याघ्या).
काय्तरी काय... जोगळेकरांची अर्चना तेव्हा जन्मली तरी होती का???
खामोशी (जुना) मध्ये "हम थे
खामोशी (जुना) मध्ये "हम थे जिनके सहारे, वो हुए ना हमारे" गाणारी नटी कोण
हम थे जिनके सहारे
वोह हुये ना हमारे
डुबी जब दिलकी नैया
सामने थे किनारे
हे गाणे सफर मधले आहे रे बाबा............... शर्मिला टागोर आहे या गाण्यात..
तुला बहुतेक
हमने देखी है उन आंखोकी महकती खुशबु
हात से छुके इसे रिश्तोंका इल्जाम न दो
सिर्फ एहसास है ये रुह से मेहसुस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
हे म्हणायचेय का>??
http://www.imdb.com/title/tt0
http://www.imdb.com/title/tt0244443/fullcredits#cast (बुढ्ढा मिल गया)...
http://www.youtube.com/watch?v=PY0sed3qo50
कोणीतरी अर्चना होती खरी...
हे गाणे सफर मधले आहे रे
हे गाणे सफर मधले आहे रे बाबा............... शर्मिला टागोर आहे या गाण्यात..>>>>येस्स्स हेच, सॉरी चुकीची मिस्टेक.
पण, चित्रपटात हे गाणे शर्मिला टागोरवर चित्रित नाही आहे.
"हम थे जिनके सहारे" आणि "हमने देखी है उन आखों कि..." दोन्ही गाणी अत्यंत आवडीची
हम थे जिनके, सफर मधले असले
हम थे जिनके, सफर मधले असले तरी शर्मिलाच्या तोंडी नाही. दुसरीच कुणीतरी रेडीओवर गाताना दाखवलीय.
बुढ्ढा मिल गया मधली अर्चनाच. भली भली सी एक सूरत हे आशाचे अप्रतिम गाणे तिला मिळाले होते.
ओय बुढ्ढो लंबो लंबो या लताच्या गाण्यावर तिने नाच केला होता. रातकली इक ख्वाब मे आयी, हे किशोरचे गाणे तिला उद्देशून होते आणि आयो कहासे घनश्याम मधल्या काहि ओळी तिने मन्ना डे बरोबर गायल्या होत्या.
तरी तिची पाटी कोरीच....
आयो कहासे घनश्याम >>>> हे
आयो कहासे घनश्याम >>>> हे गाणे जबरदस्त आहे
स्वप्ना_राज | 22 October,
स्वप्ना_राज | 22 October, 2010 - 05:10
देख कबीरा रोया मध्ये आपली शुभा खोटेही होती ना? छान दिसायची तेव्हा. मी तिला 'जबान संभालके' ह्या सिरियलमध्ये प्रथम पाहिली होती. देख कबीरा रोया मध्ये तिला पाहून उडालेच.
>> उड्शील नाहीतर काय
देख कबीरा रोया १९५७ चा त्यात शुभा खोटे होती.
'जबान संभालके' १९९५ ची सिरियल त्यात भावना बलसावर होती.
http://www.gomolo.in/gallery/photos/photo.aspx?aid=17309&pid=302726
स्वप्ना_राज | 22 October,
स्वप्ना_राज | 22 October, 2010 - 05:23
काल रात्री पुरानी जिन्स थोडं ऐकलं. काल शम्मी कपूरचा वाढदिवस म्हणून त्याची सगळी गाणी लावली होती. आरजे अनमोलने एक आठवण सांगितली. शम्मी कपूर अशोककुमारचे अछूत कन्या सारखे पिक्चर्स पाहून त्याचा सॉलिड फॅन होता पण आपल्या कारकीर्दीत त्याला त्यांच्याबरोबर काम करायची कधी संधीच मिळाली नाही.
शम्मी कपुर सही माणुस आहे. मी त्याला भेटलेलो. १९९५ मध्ये विजय मुखी यांच्याकडे तो upcoming 2k problems, internet यावर guest lecture द्यायचा. माझे काका मिठीबाई मध्ये असताना (१९६० मध्ये) त्याने मिठीबाइत math चा lecturer म्हणुन पण कामे केली आहेत.
स्वप्ना, <देख कबीरा रोया
स्वप्ना,
<देख कबीरा रोया मध्ये आपली शुभा खोटेही होती ना? >
शुभा खोटे मलाही नेहेमीच 'आपली' वाटते.
निरागस, भाबडा आणि गोंधळलेला चेहेरा. मेह्मूद आणि शुभा खोटे ही एक धमाल जोडी होती.
सिमिलर फेसेस मधे हे उदाहरण
सिमिलर फेसेस मधे हे उदाहरण झाले का ?
प्रेमकैदीचा हिरो(!) , हरिश, तो एकदम श्रीदेवी सारखा दिसायचा,' श्रीदेवा ' हे त्याच्या गोड भक्तांनी प्रेमानी दिलेलं नाव !:फिदी:
http://exdesi.com/showthread.php?51849-ExD-XMR-Prem-Qaidi-%281991%29-1GB...
ए नाही गं. श्रीदेवी ला रडु
ए नाही गं. श्रीदेवी ला रडु येईल
मला अजुन २ साम्ये आढळलीत - ती सिंदुरा होती ना एका मालिकेतली, ती जराजरा अँजलीना जोली सारखी वाटते मला (डोळे सोडले तर). आणि किशोरी शहाणे थोडीथोडी jennifer aniston सारखी?
आणि हो, जुम्मालीना, दडस आता कधीही विसरणार नाही मामी
मला अजुन २ साम्ये आढळलीत - ती
मला अजुन २ साम्ये आढळलीत - ती सिंदुरा होती ना एका मालिकेतली, ती जराजरा अँजलीना जोली सारखी वाटते मला (डोळे सोडले तर). आणि किशोरी शहाणे थोडीथोडी jennifer aniston सारखी?
<<
मला ह्रितिक ची बायको सुझॅन थोडी ब्रिटनी सारखी वाटते
ती सिंदुरा होती ना एका
ती सिंदुरा होती ना एका मालिकेतली, ती जराजरा अँजलीना जोली सारखी वाटते मला (डोळे सोडले तर). आणि किशोरी शहाणे थोडीथोडी jennifer aniston सारखी? >>
राजश्री नाही का आठवत कोंणाला. ती विचित्र नाकातला आवाज काढून बोलायची. ती पण डोक्यावर घरटी करुन हिंडायची.
ही (वरच्या फोटोतली. राजश्री
ही (वरच्या फोटोतली. राजश्री नव्हे) संजय खान ची मुलगी ना? तो फिरोज खान लुक आहे चेहर्यात. हृतिक आजकाल आनंदी कपडे का घालतो?
ती जराजरा अँजलीना जोली सारखी
ती जराजरा अँजलीना जोली सारखी वाटते मला (डोळे सोडले तर)
>> काहीतरी आणि अँजलीनाच्या ओठांचे काय?, आणि फिगर चे जाउ दे एक वेळ.
जया भादुरी सिलसिला मधे कसली
जया भादुरी सिलसिला मधे कसली भद्दड दिसलीये. रेखापुढे तर अगदीच बोगस.
जया भादुरी ओवररेटेड आहे
जया भादुरी ओवररेटेड आहे बेफिकिर.
राजश्री नाही का आठवत कोंणाला.
राजश्री नाही का आठवत कोंणाला.
ती एकदम तिच्या वडलांची कॉपी होती. जरा पुरूषी चेहरा असला तरी एवढी काही वाईट नव्हती. ब-यापैकी ग्रेस होती तिच्यात. आणि डान्सर तर ती होतीच. तिचा पहिला चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' मध्ये तिने चांगले नाच केलेत. विशेष म्हणजे ती संध्यासारखी वी शांताराम प्रॉडक्शनमध्ये अडकली नाही. तिने बाहेरचेही बरेच चित्रपट केले. नंतर चित्रपट अर्धवट टाकुन लग्न करुन अमेरिकेत पळाली
अराऊंड थ वर्ल्ड इन ८ डॉलर्स मध्ये ती राजकपुरबरोबर होती. राजबरोबर त्याच्या नाती शोभतील अशा ब-याच झाल्या की....
अमा, ओवररेटेड हा शब्द जयाबाबत अंडररेटेड आहे. त्यापेक्षा भारी शब्द नाही म्हणुन तो वापरायचा. मी भरपुर वाचले तिच्या अभिनयाबद्दल, पण तिचे ते कृत्रिम हसु पाहिले की होत्या नव्हत्या अभिनयाकडे लक्षच जायचे नाही... इतके भयानक तर चित्रपटातले विलनही हसत नाहीत.
साधना तिचे ते कृत्रिम हसु
साधना
तिचे ते कृत्रिम हसु पाहिले की होत्या नव्हत्या अभिनयाकडे लक्षच जायचे नाही
>>>>>>> अगदी अगदी. आणि अचानक पोटात मुरडा उठल्यासारखी चेहेरा वेडावाकडा सुध्दा करायची बोलताना. नसता त्रास. तो कृत्रिम हसण्याचा वारसा त्यांच्या थोर सुनबाई आता पुढे नेत आहेत.
एवढ्या चर्चेनंतरही नजरेतून
एवढ्या चर्चेनंतरही नजरेतून सुटलेल्या काही नायिका:
नरगिस, स्मिता पाटील, पद्मिनी कोल्हापुरे, नीतु सिंग, सारिका, डिंपल कपाडिया, अमृता सिंग, फरिदा जलाल.
नजरेतून सुटलेल्या काही
नजरेतून सुटलेल्या काही नायिका:
नरगिस, स्मिता पाटील, पद्मिनी कोल्हापुरे, नीतु सिंग, सारिका, डिंपल कपाडिया, अमृता सिंग, फरिदा जलाल.>.
यातील काही आता नुस्त्याच सुट्लेल्या आहेत.
रच्याकने, सुनिल दत्त साधनाचा
रच्याकने, सुनिल दत्त साधनाचा " मेरा साया " ऑनलाईन उपलब्ध आहे क कुठे ? असेल तर प्लीज मला लिंक द्या !
नरगिस, स्मिता पाटील, पद्मिनी
नरगिस, स्मिता पाटील, पद्मिनी कोल्हापुरे, नीतु सिंग, सारिका, डिंपल कपाडिया, अमृता सिंग, फरिदा जलाल.>.यातील काही आता नुस्त्याच सुट्लेल्या आहेत.<<<<<<अमा, लिश्ट थोडी वाढवतो, शबाना आझमी, मीनाक्षी शेषाद्री, नीलम मेहरा, सुजाता मेहता.मौशमी चटर्जी
जुन आठवतील तशी भर घालत राहीन लिश्टीत.
राजश्रीने सादर केलेली उत्तम
राजश्रीने सादर केलेली उत्तम नृत्ये.
बसंत है आया रंगीला (आशा - स्त्री / शकुंतला )
गीत गाया पत्थरोने ( किशोरी अमोणकर - गीत गाया पत्थरोने )
कल नही पाये जिया, मोरे पिया तूम बीन ( लता, चित्रपट आठवला कि लिहितो )
नरगिस जरी थोराड असली तरी खूपच
नरगिस जरी थोराड असली तरी खूपच ग्रेसफुल दिसायची. पण तिचा पदर नेमून दिलेलं काम नेहेमी अर्धवट करायचा (राजकपूर च्या कृपेमुळे). लहानपणी ते बघून मला नेहेमी वाटत रहायचं की ही बया तो जरा वर का खेचत नाही?
जुन आठवतील तशी भर घालत राहीन
जुन आठवतील तशी भर घालत राहीन लिश्टीत.>>>सिंपल कापडिया (चित्रपटः अनुरोध, लूटमार, जमाने को दिखाना है, शाका, मनपसंद).
फार कमी चित्रपटात दिसली, पण गाणी मात्र मस्तच मिळालीत.
आते जाते खुबसुरत आवारा सडको पे.
मेरे दिल ने तडप के जब नाम तेरा पुकारा
अगं बाई मयके तु जाऊ नको
जब छाए मेरा जादू कोई बच ना पाए
परी हो आसमानी तुम मगर तुमको तो पाना है (सोबत पद्मिनी कोल्हापुरे. चित्रपटः जमाने को दिखाना है)
शीतल हाउ कॅन यू फरगेट शीतल?
शीतल हाउ कॅन यू फरगेट शीतल?
सिम्पल नुकतीच वारली. ईश्वर
सिम्पल नुकतीच वारली. ईश्वर तिच्या आत्म्यास सदगती देवो.
शीतल कोण हो मामी?
सिम्पल नुकतीच वारली >>>>>
सिम्पल नुकतीच वारली >>>>>
शीतल अति भयानक स्त्री. सत्यम
शीतल अति भयानक स्त्री. सत्यम शिवम सुन्दरम मध्ये शशिकपुरच्या मागे लागत असे ती.
तिने म्हणे एक सिनेमा पूर्ण पणे प्रोड्यूस केला होता सबकुछ तीच.
आता दीवार येणार आहे तो बघायला टळते. शुभरात्री.
Pages