परवा नुकतेच टीव्हीवर राजेश खन्नाचे गाणे पहात होतो. आणि माझी कन्या ई.... करून किंचाळली. मी दचकून तिच्याकडे पाहीले तर म्हणाली काय बाबा काय पहाताय? हा काय हिरो आहे? मी खरं तर चिडलो होतो. अरे एके काळी 'आराधना' पहाण्यासाठी आम्ही ब्लॅक ची तिकिटे काढली होती. शर्मिलेच्या जागी गल्लीतील लोकल शर्मिलाला पाहत गाणी गुणगुणली होती त्याचा असा हा उपमर्द?? पण नव्या पिढीला काय सांगणार...
.... नाही. मी अशी प्रतिक्रिया अजिबात दिली नाही. खरं तर कन्येच्या प्रतिक्रीयेवर मी अंतर्मुख झालो. आणि विचार करू लागलो.
आजच्या काळातील ते पिक्चर्स खरोखर आता अगदी बेंगरूळ वाटतात्.विशविशीत कथा --- बेतलेल्या, ४०-४२ मधील हिरोइन्स (बल्जिंग अॅन्ड बल्की पण) यांना आपण कसं सोसलं याचे आच्शर्य वाटले
त्यानंतर अमर,अकबर,अॅन्थनी मधील ब्लड ट्रान्स्फर सीन तिघांचे रक्तगट एकच.. अगदी कॉर्पोरशन च्या नळाप्रमाणे रक्त देतात यावेळी आपली सायन्टीफिक साइट कुठे होती हा प्रश पडला.
केवळ माँकी कसम म्हणुन ऐनवेळी मध्यंतरापुर्वी ठोकरणारा विशविशीत नायक आणि तिच्या लग्नानंतर फकाफका सिगारेटी ओढून किंवा नशा करून विरह गीते गाणारे हिरो याना आपण मानले याचीच कीव आली.
तर कघी कधी आर्ट फिल्म पहाताना पुढचा डायलॉग आपणच बोलावा अशी ऊबळ येण्याएवढे स्लो डायलॉग्ज.. आठवा... 'अनुभव' संजीवकुमार...
कधीही धूर न येणारा पाईप तोंडात ठेवून, गाउन मधील बाप ... पुढे त्याचा डायलॉग काय असणार हे तुम्ही ओळखला असणारच... हो तोच तो... खानदानकी.....
आणखी एक ... त्याकाळी राज ठाकरे असता तर.....????
मॉ मुझे तेरे हातका गाजर का हलवा .. पराठे.. राजने त्याना नक्किच हिंदी वाल्याना वडा पाव आणि पाव भाजी खायला लावली असती. राज तू पहले आना था.
आणखी एक मोठा जोक.. राजेंद्रकुमार नावाचा एक महा बोर 'नट" २५ सिल्व्हर ज्युबिल्या करुन गेला आणि जॉय मुखर्जी नावाचा एक जोकर हिरो म्हणून कार्यरत होता आणि त्याला सार्या छान छान नायिका होत्या. जल् गये उस्ताद..
काही असो या पिक्चर्सनी आमच्या पिढीला स्वप्ने दिलीत आणि मनोरंजन देखील... अजुनही ती गाणी... ते शब्द आठवतात हे त्या कवींचे आणि संगीतकारांचे काँट्रीब्यूशन ...
दिलने फिर याद किया....
७०-८० च्या दशकातील सिनेमे आणि मला आलेले हसु
Submitted by सुनिल जोग on 10 October, 2010 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"तूम अपना रंजो गम, अपनी
"तूम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो (शगुन)" आणि "देख लो आज हमको जी भर के (बाजार) दोन्ही गाणी आवडीची :).
हा कुमार साहू म्हणजे 'हरे राम
हा कुमार साहू म्हणजे 'हरे राम हरे कृष्ण" मध्ये देवआनंद आणि झीनतचा बाप दाखवलाय तोच ना?
>>देव आनंदला कोणी शेतक-याचा रोल दिला असता तर तो कसा दिसला असता देव जाणे
त्याने पेरणी करताना केसाची झुलपं उडवली असती आणि कापणी करताना शेताच्या एका टोकापासून सुरुवात करून तिरपं तिरपं चालत diagonally दुसर्या टोकापर्यंत पूर्ण केली असती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निरुपा रॉय "रानी रूपमती" का असल्या कुठल्यातरी पिक्चरमध्ये नायिका होती. मी तिला कायम नवर्याच्या मागे काबाडकष्ट करून मुलांना वाढवणार्या आलूके पराठे, गाजरका हलवा टाईप आईच्या रोलमधे पाहिलेलं. तिला भरजरी कपड्यात पाहून भोवळ आली![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्याने पेरणी करताना केसाची
त्याने पेरणी करताना केसाची झुलपं उडवली असती आणि कापणी करताना शेताच्या एका टोकापासून सुरुवात करून तिरपं तिरपं चालत diagonally दुसर्या टोकापर्यंत पूर्ण केली असती![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>>>>> देवा(आनंदा) रे ! दृश्य डोळ्यापुढे आणून अशक्य हसले मी .....
स्वप्ना, कोकीलाबेन मेहता
स्वप्ना, कोकीलाबेन मेहता यांना कमी लेखू नका बरं. त्या काळात तमाम ऐतिहासिक आणि पौराणिक नायिका त्यांनी रंगवल्या होत्या. जे घर त्यानी भाड्याने घेतले, त्या घरावर जून्या भाडेकरुच्या नावाची पाटी तशीच राहिली होती. शिवाय त्या काळात सिनेमातील बाईला कुणी घर भाड्याने दिलेही नसते.
मग तेच नाव त्यांना चिकटले.. आणि ते नाव म्हणजे निरुपा रॉय.
ढलती जाये रात, सुनलो दिलकी बात
शम्मा परवाने का ना, होगा फिर साथ
हे आशा रफी चे गाणे, तिच्यावर चित्रीत झालेय !!
संध्या, उर्फ विजया देशमुख वर
संध्या, उर्फ विजया देशमुख वर मी आधीही लिहिलय. तिला करावा लागलेला भयानक मेकप. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन रेकून बोलावे लागलेले संवाद, मानेचा टाका ढीला झाल्यागत हलवावी लागलेली मान, सगळे मान्य केले तरी तिचे नृत्यकौशल्य वादातीत होते. कथ्थक, भरतनाट्यम, ओडीसी, मणिपुरी असे सर्व प्रकार तिने लिलया पेलले.
नवरंग मधली, जमुना (मोहिनी नाही) हि तिला रंगवायला मिळालेली एकमेव नैसर्गिक शैलीतली भुमिका !!
>>स्वप्ना, कोकीलाबेन मेहता
>>स्वप्ना, कोकीलाबेन मेहता यांना कमी लेखू नका बरं
अरे देवा! हे नॅशनल इन्टीग्रेशन. गुजराती बाईला बंगाली नावाने संबोधणे.
दिनेशदा, ह्या माहितीबद्द्ल शतशः आभार.
निरुपा रॉय भलेही आई म्हणुन
निरुपा रॉय भलेही आई म्हणुन फेमस झाली असेल. पण ती नायिका म्हणुन कार्यरत होती तेव्हा खुप सुंदर दिसायची. शिवाय सोज्वळही.
मी तिच्याबद्दल वाचलेले की तिचा नवरा इंडस्ट्रीमध्ये काम शोधत होता तेव्हा ही त्याच्याबरोबरच असायची, कोणीतरी त्याला सल्ला दिला की तुला काम कधी मिळेल ते सांगता येणार नाही, पण बायकोसाठी प्रयत्न केलेस तर तिला मात्र काम चटकन मिळेल. त्याने तिच्यासाठी प्रयत्न केला, ती हिरोईन झाली आणि तो तिचा सेक्रेटरी (मला अकेले हम अकेले तुम चित्रपट आठवला. त्यातल्या हिरोलाही अशी अॅडजस्ट्मेंट करता आली असती की...)
त्यातल्या हिरोलाही अशी
त्यातल्या हिरोलाही अशी अॅडजस्ट्मेंट करता आली असती की...
हो. पण मग आपण एका चांगल्या पिक्चरला मुकलो असतो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संध्या आणि आपली रंजना यांच
संध्या आणि आपली रंजना यांच काहीतरी नातं होतं ना? की दोघी केवळ आडनाव भगिनी होत्या? काय गुणी होती रंजना! किती वाईट गोष्टी घडल्या तिच्या बिचारीच्या बाबतीत.....
संध्या म्हणजे रंजनाची मावशी
संध्या म्हणजे रंजनाची मावशी (वत्सला देशमुखची बहिण) इये मराठीचिये नगरी सिनेमात. संध्याच्या लहानपणीची भुमिका तिने केली होती.
कृष्णा कशी रे लागली, रक्ताची धार, तुझिया बोटाला, हे सूमन कल्याणपूरचे गाणे, तिच्यावर चित्रीत झालेय.
अच्छा. हे गाणं छानच आहे. मला
अच्छा. हे गाणं छानच आहे. मला खूप आवडायची रंजना. आणि संध्या केवळ पिंजरा मध्ये आवडली. पिंजराची सगळीच स्टारकास्ट एकदम चपखल होती. त्यात संध्याच्या तमाशाची मालकिण वत्सला देखमुखच आहेत ना?
आणि संध्या केवळ पिंजरा मध्ये
आणि संध्या केवळ पिंजरा मध्ये आवडली
माय गॉड. मला संध्या पिंजरामधल्या लावण्यांमध्ये अजिबात आवडली नाही. लावण्या सोडुन बाकीचे काम मात्र तिने खरेच चांगले केलेय. तिने क्लासिकल नाचाचे शिक्षण घेतले असेल पण लावण्यामधले नृत्य बरेचसे पारंपारिक आहे. त्याचा खास असा बाज सोडुन काही वेगळा नृत्यप्रकार केला तर तो डोळ्यांना खटकतो.
रंजना अभिनयात नंबर एक होती. तिचा शेवट खुप वाईट झाला.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्याने पेरणी करताना केसाची
त्याने पेरणी करताना केसाची झुलपं उडवली असती आणि कापणी करताना शेताच्या एका टोकापासून सुरुवात करून तिरपं तिरपं चालत diagonally दुसर्या टोकापर्यंत पूर्ण केली असती >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी दुर्देवाने संध्याला प्रथम
मी दुर्देवाने संध्याला प्रथम दो आंखे बारह हाथमध्ये पाहिली आणि मग तिला कुठल्याही पिक्चरमध्ये पहायची अजिबात इच्छा झाली नाही
राजश्रीची आई जयश्रीसुध्दा नायिकेचे रोलस करायची ना?
त्याने पेरणी करताना केसाची
त्याने पेरणी करताना केसाची झुलपं उडवली असती आणि कापणी करताना शेताच्या एका टोकापासून सुरुवात करून तिरपं तिरपं चालत diagonally दुसर्या टोकापर्यंत पूर्ण केली असती >>> हो आणि मध्येच हॅट नाहीतर ओढणी तोंडावर पांघरून घेतली असती. : )
राजश्रीची आई जयश्रीसुध्दा
राजश्रीची आई जयश्रीसुध्दा नायिकेचे रोलस करायची ना?
हो. आणि ती खुप यशस्वी आणि लोकप्रिय नायिका होती. परछाई या चित्रपटात ती, संध्या आणि व्ही. शांताराम तिघेही होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(रच्याकने, तरूण मंडळींसाठी माहिती - व्ही. शांतारामाने या दोघींशीही लग्न केले होते. शिवाय त्याची याआधीचीही एक बायको होती. एका कार्यक्रमात संध्या आणि पहिली बायको (बहुतेक विमला हे नाव होते, मला आठवत नाही आता) दोघींनाही शेजारी शेजारी बसलेले पाहिलेय.)
डॉ कोटणीस की अमर कहानी मधे,
डॉ कोटणीस की अमर कहानी मधे, जयश्रीने डॉक्टरांच्या चिनी नायिकेची भुमिका केली होती.
वत्सला देशमुख, बापुंच्या बहुतेक सिनेमात होतीच.
पहिल्या पत्नीचे नाव विमलाबाईच. त्यापण कलाकार होत्या. त्यांनी स्वतःचे केस वापरुन, भरतकामाने शांतारामबापूंचे पोर्ट्रेट केले होते.
त्या काळात मराठ्यात सर्रास दोन तीन बायका करण्याची पद्धत होती. त्यावेळी द्वीभार्याप्रतिबंधक कायदा नव्हता. पुढे तो कायदा झाल्यावर जयराम आणि जयमाला शिलेदारांनी, (तेव्हाच्या प्रमिला जाधव) त्या कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या संस्थानात लग्न केले होते. पेंढारकरांच्या पण तीन बायका होत्या.
रंजना अपघातानंतर अपंग झाली होती, पण त्यातून जिद्दीने उठून एका नाटकात तिने भुमिका केली होती. ती सगळी भुमिका ती व्हीलचेअर वर बसून करत असे.
रंजना अपघातानंतर अपंग झाली
रंजना अपघातानंतर अपंग झाली होती>>>
हा अपघात होण्याआधी अशोक सराफ आणि रंजना यांचं लग्न होणार होतं असं मी ऐकलं आहे. पण अपघातात अधू झाल्यानंतर अशोक आणि निवेदीताचं जुळलं म्हणे! खरंय का हे??
तशी ती खुप समजूतदार होती. आणि
तशी ती खुप समजूतदार होती. आणि त्या अपघातानंतर ती बरेच महिने अंथरुणाला खिळून होती. त्या अवस्थेत देखील तिने दूरदर्शनवर मुलाखत दिली होती. पण तिने कधी असा उल्लेख केल्याचे मला आठवत नाही. त्या काळात नाना पाटेकर ने मात्र, खुप धीर दिला, असे ती आवर्जून सांगत असे.
पेंढारकरांच्या पण तीन बायका
पेंढारकरांच्या पण तीन बायका होत्या.
पेंढारकरांबद्दल प्रभाकर पेंढारकरांचा लेख वाचला त्यात हा उल्लेख मी वाचलेला. भालजींना मी कायम नव्वदीचे, वाकलेले म्हातारे पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व असेच पाहिलेले, त्यामुळे अशा गृहस्थाने तिनतिन बायका केल्या हे वाचुन गंमत आणि आश्चर्य दोन्ही वाटलेले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तशी ती खुप समजूतदार होती.
ह्म्म.. खरेच ती समजुतदार होती. अशोक सराफला उमेदवारीच्या दिवसात तिचा खुप उपयोग झाला पण त्याने नंतर कधीही साधा तिचा उल्लेख केला नाही. अगदी टिवीवर त्याच्या चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हाही तो रंजना हे नाव टाळतो. मला त्याच्या बाबतीत ही गोष्ट खुपच खटकते. आता या वयात जर त्याने कधी चुकुन तिच्या मदतीचा उल्लेख केला, त्याबद्दल आभार मानले तर त्याच्या संसारात काही भुकंप होणार नाही.
रंजनाने अपघातानंतर तरी कधी उल्लेख केला नाही पण एका मुलाखतीत तिने नाव न घेता, 'आधी खुप जवळ असलेली माणसे, दुर जाताना निदान शेवटचे भेटुन, सांगुन गेली असती तर बरे वाटले असते' अशा अर्थाचे उद्गार काढलेले.
निवेदिता जोशीनी तरी त्या
निवेदिता जोशीनी तरी त्या म्हसोबाला काय निवडलं काय माहित, आयब्रो पेन्सिल ने मिशी रंगवायचा मधे ९०' च्या काळातल्या चित्रपटां मधे.. कसला हॉरिबल चॉइस ..वयानी पण बराच मोठा असेल ना![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मला प्रियांका चोप्रात कधी कधी
मला प्रियांका चोप्रात कधी कधी संध्याचा भास होतो का कोण जाणे..
हे हे हे, मला पण होईल अता
हे हे हे, मला पण होईल अता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला प्रियांका चोप्रात कधी कधी
मला प्रियांका चोप्रात कधी कधी संध्याचा भास होतो का कोण जाणे..
>>
त्यांच्या चेहेरेपट्टीत साम्य आहे. दोघी आपला dialog टाकायला अधीर वाटतात.
संध्याचा 'थरथराट' सोडला तर ती अभिनय / न्रुत्य चांगले करायची.
स्वप्ना_राज त्या भावना/शुभा गोंधळाबद्दल माफ करा.
"कभी तनहाईयोमे.." माझे आवडते गाणे, त्याचा musician किन्वा song writer कोण तरी एक मराठी माणुस होता for a change.
मीना कुमारी चे " नर्म होठोसे कियि बात किसे पेश करु... " असे काहिसे गाणे होते तो movie विसरले.
मीनाकुमारीचे गाणे - नर्म
मीनाकुमारीचे गाणे - नर्म होटोंमें दबी बात किसे पेश करुं - चित्रपट "गझल" - हिरो सुनिल दत्त.
"कभी तनहाईयोमे.." माझे आवडते
"कभी तनहाईयोमे.." माझे आवडते गाणे, त्याचा musician किन्वा song writer कोण तरी एक मराठी माणुस होता for a change.
<< स्नेहल भाटकर , बहुदा रमेश भाटकरचे वडिल.
peacelily, दीपांजली, आपले
peacelily, दीपांजली, आपले आभार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याने पेरणी करताना केसाची
त्याने पेरणी करताना केसाची झुलपं उडवली असती आणि कापणी करताना शेताच्या एका टोकापासून सुरुवात करून तिरपं तिरपं चालत diagonally दुसर्या टोकापर्यंत पूर्ण केली असती >>> हो आणि मध्येच हॅट नाहीतर ओढणी तोंडावर पांघरून घेतली असती.<<<<<<<
दया करा...:हहगलो:
निवेदिता जोशीनी तरी त्या
निवेदिता जोशीनी तरी त्या म्हसोबाला काय निवडलं काय माहित![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निवेदिताला त्याच्यापेक्षा चांगला नवरा नक्कीच भेटला असता पण त्याला निवेदितासारखी बायको भेटली असती की नाही देव जाणे
स्नेहल भाटकर, रमेशचे वडील.
स्नेहल भाटकर, रमेशचे वडील. खरे तर रमेश ला पण गाण्याचे अंग आहे.
Pages