Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'मिले सुर मेरा तुम्हारा'
'मिले सुर मेरा तुम्हारा' मधे,
" सुर का दरिया बहके सागर में मिले
बादलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले "
यातील बादलाँ दा रूप मला बदला दारु असे ऐकू यायचे, हे लोक दारु का बदलायला सांगतात हेच समजायचे नाही.. नंतर तर बदला दारु लेके असेही ऐकू येऊ लागले..
ठकू, लै भारी !
ठकू, लै भारी !

ठकु, सेम पिंच हो.
ठकु, सेम पिंच हो.
गणेशोत्सवाच्या हार्दिक
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना...........!!!!
सध्या एफ्.एम. वर गिरनार चहाची एक अॅड लागते.
गिरनार ओ ओ गिरनार,
तु सुबाह की ताजगी है, तुही दिन का है सुरूर
होठोंसे छुलू कुछ तो जिलू, तुझको मांगे जिया
ना पिया तो क्या जिया...........
मस्त हरिहरनसारख्या आवाजातले हे गाणे छान वाटायचे ऐकायला.
त्यातले "गिरनार गिरनार" च्या ऐवजी जवळजवळ महिनाभर मी ते "देरेना ओ ओ देरेना" असे ऐकत होतो......... आणि माझा समज झाला होता की हे इतके छान चालितले गाणे नक्किच एखाद्या सिरियलचे असणार......... आणि सिरियलचे नाव पण गाण्यात होतेच....
"ना पिया तो क्या जिया"
अॅड मध्ये पिया (चहा पिणे) या अर्थाने होते आणि मी पिया म्हणजे हिंदीतला पिया समजत होतो.... (स्वप्नाचे लेख जास्त वाचल्याचा हा साईड ईफेक्ट आहे :हाहा:). म्हणुन मला वाटले की असेल "ना पिया तो क्या जिया" नावाची सिरियल.
काही दिवसांपुर्वी "गिरनार" ऐकु आले आणि गैरसमज दुर झाला.....
माझ्या भाच्याने (वय वर्ष १०)
माझ्या भाच्याने (वय वर्ष १०) केलेले गाणे......... आभास हा छळतो तुला छळतो मला...... ह्याऐवजी परिक्षाजवळ आल्यावर..........
अभ्यास हा छळतो मला छळतो तुला (त्याच्या आईला)......
ते नवं कुठलं गाणं आहे - ओ
ते नवं कुठलं गाणं आहे - ओ धन्नो, ओ धन्नो असं काहीतरी. त्यात एक बाई मध्येच "people on the floor" अ॑सं म्हणते तेव्हा ती डान्स फ्लोअरवर असलेल्या जनतेबद्दल बोलते बहुतेक. पण मला दर वेळेला जमिनीवर पडलेले लोक डो़ळ्यांसमोर येतात
स्वप्ना, हल्ली गाण्यात बायका
स्वप्ना, हल्ली गाण्यात बायका काहीही बोलतत. एका गाण्यात तर एक बाई चक्क, व्हॉल्यूम कम कर, असे दरडावते !!
हुश्श ! आहे बाई ! मायबोली
हुश्श ! आहे बाई ! मायबोली चालू आहे ! गेले काही दिवस " चित्रपट " इतका थंड पडला होता की मला वाटायला लागलं होतं की मायबोली ला काही प्रॉब्लेम झालाय आणि नव्या पोस्ट्स मला दिसत नाहियेत.
>>एका गाण्यात तर एक बाई चक्क,
>>एका गाण्यात तर एक बाई चक्क, व्हॉल्यूम कम कर, असे दरडावते
हो, दिनेशदा, तिला डॅडी/पप्पा ला जागं करायचं नसतं. बाकीचं गाणं ऐकता तो डॅडी झोपला तेच बरं आहे असं मला वाटलं. उठला असता तर लेकीचे प्रताप पाहून त्याला जगातून उठावं लागलं असतं.
कुठलं हे महान गाणं स्वप्ना ?
कुठलं हे महान गाणं स्वप्ना ?
व्हॉल्युम कम कर पप्पा/अब्बा
व्हॉल्युम कम कर पप्पा/अब्बा जग जायेगा......
काल बायको 'क्ष'व्यांदा
काल बायको 'क्ष'व्यांदा 'मैप्याकि' पहात होती. 'कबूतर जा' गाणे चालू असताना अचानक तिला हा साक्षात्कार झाला की- 'उनको अपने साथ ही लाना, दिल ही नही लगता' ही ओळ ती इतकी वर्षे, 'उनको अपने साथ हिलाना..'
अशी ऐकत होती आणि कबूतर असे कसे काय 'हलवणार' या विचारात होती
बरोबर भुंगा. >>उनको अपने साथ
बरोबर भुंगा.
>>उनको अपने साथ हिलाना
आगावा, कोपरापासून.........
आगावा,
कोपरापासून.........
'उनको अपने साथ
'उनको अपने साथ हिलाना..'>>>
आगाऊ,
एक सांगू का??? मी ही बरीच वर्षे ते असंच ऐकत होते.
ती अभिषेक आणि ऐश्वर्याची लक्स साबणाची अॅड आहे. ते गाणं मला असं ऐकू येतं
"हूरहूर सोलकढी मोहमयी प्रिय माझी.........."
सोलकढी ऐवजी नक्की काय शब्द आहे???
निंबुडा तू अशक्य आहेस ते
निंबुडा तू अशक्य आहेस ते हूरहूर सोलकढी नसून सोन्याहून तेजस्वी असे आहे बहुतेक
कालच fm rainbow वर प्यार हुवा इकरार हुवा हे मनाडे आणि लताच गाणं लागलं होतं माझ्या ३ वर्षाच्या मुलाला ते " हा गुवा है हागुवा है " असं ऐकू आलं ...
ते "सोन्याहुन सोनसळी, लडीवाळ
ते "सोन्याहुन सोनसळी, लडीवाळ प्रिया माझी...." अस आहे.
एक खुप जुन गाणं आहे 'झोपल्या राघु मैना, गळ्यात घालुनी गळा....'
माझा भाऊ लहानपणी ते गाणं अस म्हणायचा 'भोकण्या राघु मैना......'
(विदर्भातला शब्द आहे, कळेल बहुतेक)
स्वप्ना_तुषार, तुम्ही म्हणताय
स्वप्ना_तुषार,
तुम्ही म्हणताय ती आसीन ची नवी जाहीरात आहे. त्याचे 'सोन्याहून तेजस्वी' हे व्यवस्थित ऐकू येते. ते सोनसळी आहे हे स्निग्धाचं बरोबर वाट्टंय!
" हा गुवा है हागुवा है " >>>
विषय खरतर गाण्यांचा आहे तरी
विषय खरतर गाण्यांचा आहे तरी एक गंमत सांगते
मागच्या आठवड्यात आम्ही लक्ष्मी नारायण चौकातुन जात होतो, आबा बागुलाचं मोठ्ठ पोस्टर पाहुन माझ्या (वय पावणे ३) मुलीने विचारलं 'आई तो कोण आहे?' मी सहज नावं सांगितलं, त्यांच नाव आबा बागुल.
घरी आल्यावर खेळत खेळत ती काय पुटपुटते म्हणून जरा नीट ऐकलं तर....
'आबा गुल.....आबा गुल.....'
निंबे, ते 'सोन्याहून सोनसळी'
निंबे, ते 'सोन्याहून सोनसळी' असे काय तरी आहे,
सोलकढी वाचून अभिषेक पापलेट तोडतोय आणि अॅशला, 'अगं,वाटीत जरा सोलकढी घाल' असे सांगतोय हे चित्र डोळ्यापुढे आले
मला वाटतं ते "सोन्याहुन
मला वाटतं ते "सोन्याहुन सोनसळी" आहे. आगाऊ, पापलेट, सोलकढी
कशाला आठवण करून दिलीत हो?
'गजिनी' चित्रपटातील 'गुझारिश'
'गजिनी' चित्रपटातील 'गुझारिश' या गाण्यात 'मोती होंगे मोती राहोंमे" ही ओळ मला "बोटी होंगे बोटी राहोंमे$$" अशी ऐकू यायचं.
अरे, पापलेट काय बोटी काय शिव
अरे,
पापलेट काय बोटी काय

शिव शिव
अहो तुम्ही परबेसाइ आहा
अहो तुम्ही परबेसाइ आहा
आज ते टशन मधले 'फलक तक चल' हे
आज ते टशन मधले 'फलक तक चल' हे गाणं ऐकत होते तर त्यात मध्ये जे एक कडवं आहे ते मला कायम असं ऐकू येतं...
'सूरज को हुई हरारत
रातों को करे शरारत
बैठा है खिडकी मे तेरे..'
हा हरारत शब्द बरोबर आहे का?? कि काही वेगळा शब्द आहे?
अर्थ काय नक्की?
शुर आम्ही सरदार आम्हाला काय
शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती
पण मला मिळाले घर दार आम्हाला काय कुणाची भिती
असे एकु यायचे
हा हरारत शब्द बरोबर आहे का??
हा हरारत शब्द बरोबर आहे का?? कि काही वेगळा शब्द आहे? अ ओ, आता काय करायचं अर्थ काय नक्की?
====
हरारत म्हणजे अंग तापणे, अंगातली गर्मी, शरीरातिल उष्णता.
उर्दूत तापासारखं वाटणं ह्याला "हरारत सी महसूस हो रही है" म्हणतात.
हरारत म्हणजे अंग तापणे,
हरारत म्हणजे अंग तापणे, अंगातली गर्मी, शरीरातिल उष्णता.
उर्दूत तापासारखं वाटणं ह्याला "हरारत सी महसूस हो रही है" म्हणतात. >>>
नवीनच शब्द कळला.
धन्स, अक्षरी
तु जा दुर येथे उठु दे
तु जा दुर येथे उठु दे शहारा..
) .. पण वाटले असेल काही तरी संदर्भ.. ह्या सौमित्राचं काही सांगता नाही येत(बघ माझी आठवन येते का?
)...
सांजगारवा ऐकताना ही ओळ नेहमी खटकायची.. काय तरी लोचा आहे.. प्रियकर थंडीत एकटाच कुडकुडतोय आणि प्रेयसीला आत घरात जा म्हणतोय असाच सीन डोळ्यासमोर यायचा(प्रियकर म्हणजे सुनिल बर्वे आणि प्रेयसी स्मिता बन्सल, गारवा चे डायहार्ड फॅन हो
पण परवा लिरीक्स वाचले हो नेटवर.. "तुझा दुर येथे उठु दे शहारा".. हां...
मिलिंद इंगळेने तु आणि जा मधे थोडासा पॉज घेतल्याने हा गोंधळ उडाला. :-p
सर जो तेरा चकराए हे गाणं माझा
सर जो तेरा चकराए हे गाणं माझा ३ वर्षाचा मुलगा असं म्हणतो..
सुन सुन सुन अरे बाबा सुन इस चंपीके बडे बडे गुन
लाख दुखोकी एक दवा है क्यु ना आये प्यारे...काहे घबराये..
Pages