मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेडिओवर वाजणा-या सगळ्या सरकारी जाहिराती त्यातल्या त्या बाईच्या अती वाईट आवाजामुळे वैताग आणतात. उदा. "बाबा तुम्ही तर आदिमानव नाही होऊ शकत ना?", "हो हो सांग ना काय पाहीलस....", "नाही बाबा तुम्ही खुप भलं काम...", "तुमच्या निढळाच्या घामाच्या कमाईचा...." इ.

लक्सची नवी असीन ला घेऊन केलेली जाहिरात कसली सुंदर आहे! ते जिंगलच आवडतं मला.. सोन्याहून सोनसळी (ऐश्वर्या), कळीहून कोमल आहे(कतरिना), सोन्याहून तेजस्वी (असीन).
पॅराशूट वाले फार प्रॅक्टिकल जाहिराती करायला जातात पण स्क्रिप्ट मध्ये मार खातात.
"केसांची शाईनच सांगते आहे की असाईनमेंट झालीच नसेल" कोणत्याही साईटवर काम असेल तरी ४ लोकात असं कोणतीच स्त्री बॉस म्हणणार नाही. Uhoh
मी कल्पना केली, की माझा आनंदी हसरा चेहरा पाहून माझा बॉस म्हणतोय, "इतका उत्साह दिसतोय चेहर्‍यावर म्हणजे अजून कामाला हात लावला नाहीस!" Biggrin

मला volkswagen ची अ‍ॅड आवडते..त्यानी बनवलेली कार जाणार म्हणून रडत असतात...आणि शेवटी Take care of it म्हणत एक माणूस तिच्यामागपर्यंत धावत जातो Happy

हो पाहिली मी पण ती अ‍ॅड. Happy 'लाल हिट' च्या रेडियोवर येतात त्या अ‍ॅडस मस्त आहेत - घरातली झुरळं आपापसात बोलत असतात त्यावर आहेत.

मला लेटेस्ट कोकची अ‍ॅड, पॅराशुटची बढते रहना, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनची १०० वर्षांची अ‍ॅड खुप आवडली. Happy

सुपिरियाच्या जाहिरातीतला 'तो' उतरन (कलर्स) चा नायक आहे. ही जाहिरात बघूनच बहुतेक त्याच्या नायिकेने(इच्छा) लग्नात ऐन मुहूर्ताच्या क्षणी माघार घेऊन मैत्रीन तपस्याला सात फेरे घ्यायला लावले. तिला तोंडभर घुंघटही घ्यायला लावला म्हणजे नाकही सुरक्षित!

क्याडबरीची एक जाहिरात आवडते...... तो चिकना पण खडूस बॉस असिस्टन्ट मिस ला कामाचे विचारतो, शेवटी ड्रॉवरमधिल चेक बद्दल सान्गतो, ड्रोवरमधे क्याडबरीचा बॉक्स अस्तो, तर तो बॉस मला आवडला नाही, पण ती मिस, तिचे हावभाव्/अ‍ॅक्टीन्ग अप्रतिम आहे, दिसतेही सुन्दर! Happy

क्याडबरीचीच ती दुसरी जाहिरात, दरवाजाच्या बेल वाजवुन सतावत होतो सान्गणारी नाही आवडली!

जुगल हंसराज म्हणजे मासुम मधला लकडी की काठी गाण्यातला लहान मुलगा ना?
(दिस्तो चान्गला, पण जाहिरातीच्या स्क्रिप्ट मधली भुमिका "खडूस वर्कोहोलिक बॉसची" आहे)

कोणी एअरफोनची जाहीरात बघीतली का? त्यामधे कॅडबरी शुभारंभची स्टोरी continue केलेय. बसस्टॉप वरचे टिनेजर कपल बसमधे प्रवास करताना दाखवलेत.
cheers.gif

ती मुलगी अजून पण एका जाहीरातीत आलीये...ती येणार लवकरच मोठ्या पडद्यावर...फिचर्स छान आहेत तिचे..पण फारच नाकात आणि विचित्र बोलते काहीतरी

आशू Proud

स्वप्ना मला नाही आवडली... उगाचच ह्रितीक कसा चुकीची अ‍ॅड दाखवतो.. हा सांगण्याचा प्रयत्न आहे त्या अ‍ॅड मध्ये.... अमिर खान अशी अ‍ॅड करेल असा नव्हता वाटल मला.... असो Lol

मला नाही वाटत त्यात खास ह्रतीकविरुध्द असं काही आहे. सर्वसामान्य बाईक्सच्या अ‍ॅड्स स्पीड, हवासे बाते करना अश्या टाईप्स असतात. ही जबाबदार अ‍ॅड वाटली. ती पाहून १००० मधल्या एकाला भान आलं तरी खूप आहे.

आमिरची महिंद्रा बाईकची अ‍ॅड जबरदस्त आहे. 'इस विज्ञापन कॉ गई हर चीज आप कर सकते है' - ही कंसेप्टच भारी आहे.
आमिर त्याच्या अ‍ॅड्सवरही किती मेहनत घेतो, हे पुन्हा सिद्ध झाले.

आमीरची बाईकची अ‍ॅड मस्तच आहे.
एक पापडाच्या मसाल्याची अ‍ॅड आहे.. "आखिर क्या है आसान? "ला तो छोटा मुलगा उत्तर देतो "पापड बनाना तो आसान है" यावर त्या बायका जे "हॅ...???!!!" असे ओरडतात ते मला जबरी रियल वाटते. Rofl

मी सोडून सगळ्यांना आवडली वाट्त ती अ‍ॅड... Lol

ते काय आहे अशे नुसते उपदेश ऐकायला जडच जात मला .... म्हणून may b Proud

adore.gif पोरगी घरातून पळून चाललेय, तर तिच्या बापाने काय केलं पाहीजे? Angry '

शुभ काम करने जा रही हो, बेटा कुछ मिठा खालो'.........का तर म्हणे शुभारंभ...

कै च्या कै बनवतात कॅडबरी वाले

Pages