Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर तसेच विजय, पुजारा, खान, भज्जी, ओझा, श्रीशांत, यष्टीरक्षक/कप्तान धोनी आणि त्यांना साथ देणार्या भारतीय संघातील इतर खेळाडुंचे मन:पुर्वक अभिनंदन !
<<एव्हढेच नाही, तर Border
<<एव्हढेच नाही, तर Border Gavaskar Trophy पुजाराच्या हाती देणे, That's a big gesture. >> खरंय, या गोष्टी छोट्या वाटल्या तरी खूपच महत्वाच्या असतात. साहेबानी कोपर्यात उभ्या असलेल्या लक्ष्मणचा व हजर नसलेल्या ईशांतचा, सपोर्टींग स्टाफचा आवर्जून उल्लेख करणं, धोनीने खेळपट्टी साथ देत नसून गोलंदाजानी केलेल्या मेहेनतीचं कौतुक करणं, यानेच मला वाटतं खरी संस्कृति जपली जाते. नवोदित खेळाडूंवर हे संस्कार करायला साहेब, राहुल, लक्ष्मण इ. मंडळी असावीत हे शुभचिन्ह !
पेंडसे गुरुजींनी मिसळ खाल्ली
पेंडसे गुरुजींनी मिसळ खाल्ली की नाही?
>>> आतापर्यंत सचिन मॅच Finish
>>> आतापर्यंत सचिन मॅच Finish करू शकत नाही म्हणून बोंबलायचे , आता काही तरी याना नवीन शोधावे लागणार ) काय तो बोध घ्यावा .......
२१ वर्षे प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळून सुध्दा सचिनवर अशी टीका करणारे दळभद्री समीक्षक आहेत. सचिनने अनेकवेळा आपल्या बॅटनेच त्यांना योग्य ते उत्तर दिले आहे. तरी यांची टीका चालूच.
भारतीय संघाचे अभिनंदन
भारतीय संघाचे अभिनंदन !!
पन्टरचा हारल्यानंतरचा चेहरा बघायचा राहुन गेला.
अजुन १ टीका बराच वेळ होत आली
अजुन १ टीका बराच वेळ होत आली आहे कि सचिन १ ईनिंग खेळला कि दुसरी ईनिंग हजेरी लाऊन जातो फक्त...आता टीकाकारांची तोंड बंद होतील थोडा वेळ!
पण कधीकधी टीका झाली कि चांगले खेळाडु त्याला तोंडान उत्तर न देता, बॅटीने तडाखा देतात
सचिन यु आर ऑल टाईम बेस्ट, खेळातही आणि आचरणातही
२१ वर्षे प्रामाणिकपणे
२१ वर्षे प्रामाणिकपणे मैदानावर घाम गाळून सुध्दा सचिनवर अशी टीका करणारे दळभद्री समीक्षक आहेत. >> दुर्दैवाने त्यातले अनेक भारतीय /मराठी आहेत.
मान्जरेकर.............
मान्जरेकर.............
ऑसी टेस्ट रँकिंगमधे पाचव्या
ऑसी टेस्ट रँकिंगमधे पाचव्या स्थानी!
गांगुलीने सुरू केलेले कार्य धोनीने पूर्णत्वास नेले.
भारताची रँकिंग पॉईंट्समधली आघाडी पण चांगलीच वाढलीय.
आता ऑसी आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरी जाऊन मारायला हरकत नाही ( वेगवान गोलंदाज मनावर घेतील तर्...इशांत, रुद्रप्रताप, श्रीसंत, नेहरा, पठाण........)
वेगवान गोलंदाज पण जहीर
वेगवान गोलंदाज
पण जहीर श्रीसंत ५ व्या दिवशी वेगवान आणि तिखट मारा केला
या दौर्यातल्या मोहालीतल्या
या दौर्यातल्या मोहालीतल्या पहिल्या कसोटीतल्या पहिल्या डावात सेहवागने ५९ धावा करून एका विक्रमाची बरोबरी केली. तो विक्रम म्हणजे लागोपाठ ११ कसोटी सामन्यात (पहिल्या किंवा दुसर्या डावात) अर्धशतक किंवा त्याहून जास्त धावा करण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. हा विक्रम यापूर्वी व्हिव्हियन रिचर्डस (१९७७ मध्ये) आणि गौतम गंभीरने (२००९-२०१० मध्ये) केला होता. सचिनला हा विक्रम मोडायची संधी आहे. २०१० मध्ये लागोपाठ ९ कसोटी सामन्यात किमान एका डावात अर्धशतक किंवा त्याहून जास्त धावा केलेल्या आहेत (त्यात ६ शतके व ४ अर्धशतके). पुढच्या ३ कसोटीत त्याने किमान एक अर्धशतक प्रत्येक कसोटीत केले तर एक नवीन विक्रम त्याच्या नावावर लागेल.
लागोपाठच्या डावात अर्धशतक किंवा त्याहून जास्त धावा करण्याचा विक्रम तिघांनी केलेला आहे. वेस्ट इंडिजचा ईव्हर्टन वीक्स (१९४८-४९ मध्ये), वेस्ट इंडिजचाच शिवनारायण चंद्रपाल (२००६-०७ मध्ये) आणि झिम्बाब्वेच्या अॅन्डी फ्लॉवरने (२०००-०१ मध्ये) लागोपाठ ७ डावात अर्धशतक किंवा त्याहून जास्त धावा करण्याची कामगिरी केलेली आहे.
(सौजन्य - cricinfo)
कुणाला बघायचं असेल
कुणाला बघायचं असेल तर...
http://www.cricketonlinetv.com/day-5-australia-vs-india-2nd-test-bengalu...
लिन्क बद्दल धन्यवाद परदेसाई.
लिन्क बद्दल धन्यवाद परदेसाई. एक भाग बघितला, अजून बघतो आता.
मागच्या तीन वर्षात सचिन ने नाबाद राहून जिन्कून दिलेली ही तिसरी मॅच. पहिली पाक विरूद्ध दिल्लीला, नंतर इंग्लंड विरूद्ध चेन्नई ला आणि आता ही.
मास्तुरेजी, आंकडेवारीबद्दल
मास्तुरेजी, आंकडेवारीबद्दल धन्यवाद.
सचिन, राहुल, लक्ष्मण, सौरव इ. हल्लीच्या खेळाडूनी नवोदित खेळाडूना दिलेली प्रेरणा व जिंकण्याची जिद्द हा आंकडेवारीत न मोजता येणारा त्यांचा एक महत्वाचा सहभाग आहे. आणि, असंख्य क्रिकेटप्रेमीना त्यानी दिलेला निखळ आनंद तर मोजदाद करण्यापलिकडचा !
कालच लक्ष्मणची एक मुलाखत
कालच लक्ष्मणची एक मुलाखत वाचली. मोहाली टेस्टच्या शेवटच्या दिवशी ड्रेसिंग रुममधे वातावरण कसे होते या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर या टीमच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारे आहे. तो म्हणतो - ' आम्ही अजिबात तणावात नव्हतो, या संघाचे हे वैशिष्ठ्य आहे आणि त्यातही ड्रेसिंग रुममधला सचिनचा वावर हा एक 'कामिंग इन्फ्लूएन्स' असतो.'
सचिन कसोटी फलंदाजांच्या
सचिन कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत शिखरावर! सेहवाग तिसरा लक्ष्मण ८.
पहिल्या दहात एकही ऑसी फलंदाज नाही.
झहीर गोलंदाजांत चौथ्या स्थानी. हरभजन ८.
आपला २-० विजय, पहिलं मानांकन,
आपला २-० विजय, पहिलं मानांकन, साहेब, नवोदीत खेळाडु वगैरे सर्व कौतुकास्पद आहेच पण अनेक चिंता देखिल आहेतः
http://cricket.rediff.com/slide-show/2010/oct/14/slide-show-1-aus-tour-i...
घरच्या विकेट्स वर फ्लॉप ठरलेला भज्जी. निव्वळ त्याच्या फॉर्म चा प्रश्ण वाटत नाहीये- गेले वर्षभरातील कामगिरी अगदीच निराशाजनक आहे.
ईशांत अन श्री ची फ्लॉप गोलंदाजी. ईशांत अन सेहवाग दोघेही तितकेच अनप्रेडीक्टेबल आहेत.
धोणी चा पूर्णपणे ढासळलेला फॉर्म- स्टंप्स च्या मागे अन पुढे ही- साहेबांनी चमत्कार केले नसते तर कॅप्टन म्हणून देखिल ही मालिका गमावली असती हे सत्त्य आहे.
द्रविड चे अपयश
"गंभीर" समस्या
लक्षमण अन पुजाराची एक एक इनींग सोडता मधल्या फळीची पडझड.
पुढील कसोटी मालिकांसाठी या सर्वांवर मुख्यत्वे गोलंदाजीवर ऊपाय शोधायला हवे. पूर्वी जंबो होता म्हणून दुसर्या बाजूने भज्जी ला विकेट मिळत होत्या की काय अशी शंका येत आहे. ओझा तितका भेदक वाटत नाही पण सुधारणेला निश्चीत वाव आहे.
मला वाटतं भज्जी, ईशांत, श्री, गंभीर या कंपनीने जुन्या जाणत्यांशी सल्ला मसलत करावी अन मार्ग शोधावा.
द्रविड ने साहेबांना घरी जेवायचे निमंत्रण दिले तर त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल असे वाटते
>>> मागच्या तीन वर्षात सचिन
>>> मागच्या तीन वर्षात सचिन ने नाबाद राहून जिन्कून दिलेली ही तिसरी मॅच. पहिली पाक विरूद्ध दिल्लीला, नंतर इंग्लंड विरूद्ध चेन्नई ला आणि आता ही.
निदान आता २१ वर्षानंतर तरी "सचिन महत्वाच्या सामन्यात खेळत नाही, सचिन फक्त स्वत:च्या विक्रमांकरता खेळतो, सचिन दुसर्या डावात कायम अपयशी ठरतो" अशांसारखे बाष्कळ आरोप मागे घेतले जातील का?
जाऊ दे हो मास्तुरे...
जाऊ दे हो मास्तुरे... निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणून साहेब पण त्यांना माफ करून टाकतात..
योग तुझा सल्ला द्रविडनी खरच मनावर घ्यायची गरज आहे..
मधल्या फळीत रैनाला अजून संधी
मधल्या फळीत रैनाला अजून संधी मिळाली तर आशा आहे. गंभ्याला मधल्या फळीत खेळवायला पाहिजे.
आत्ता न्युझीलंड आपल्याकडे येणार आहेत. तेव्हा थोडेफार प्रयोग करायला हरकत नाही.
मांजरेकर हाजिर हो.....
मांजरेकर हाजिर हो.....
(मांजरीने डोळे पिवून दूध
(मांजरीने डोळे पिवून दूध प्यायले याचा अर्थ..... या तालावर)
मांजरेकरने डोळे झाकून कॉमेंटरी केली याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांनी पण डोळे बंद केले आहेत..
साहेब काल म्हणले:
मी धावा/विक्रम मोजणं सोडून दिलय, ते काम बाकीच्यांना करू देत.. मी फक्त खेळाचा आनंद घेतोय.
यातले "बाकीचे" कोण हे सूज्ञास सांगणे न लगे..
>>विक्रमादित्य सचिन तेंडुलकर
>>विक्रमादित्य सचिन तेंडुलकर तसेच
महागुरू, विक्रमादित्य ही पदवी सन्नीभाय ला आपल्या मिडीया ने य काळापूर्वीच देवून ठेवलीये.. साहेबांसाठी नविन पदवी कॉईन करायला हवी:
विक्रमशाह, विक्रमराजे, वगैरे वगैरे....
एक पोल घ्या
<<पुढील कसोटी मालिकांसाठी या
<<पुढील कसोटी मालिकांसाठी या सर्वांवर मुख्यत्वे गोलंदाजीवर ऊपाय शोधायला हवे.>>मला वाटतं कीं एक जोरदार शोध मोहिम हाती घेऊन दोन-तीन उदयोन्मुख तेज गोलंदाज व दोन-तीन फिरकी गोलंदाज [त्यांत एक तरी लेग स्पीनर असावा] निवडून त्यांच्यावर आतापासून लक्ष केंद्रीत करणं अत्यावश्यक आहे. यासाठी रणजी स्पर्धेबरोबरच शाळा, कॉलेज व विश्वविद्यायलीन स्पर्धांकडेही लक्ष द्यावं. फलंदाजीतील त्रुटी नवीन दर्जेदार फलंदाजांच्या स्पर्धेमुळे फार चिंताजनक ठरूं नयेत, असं वाटतं. धोणीचं कालचं यष्टीरक्षण बघून त्याला कांही मुलभूत प्रॉब्लेम नसावा असं वाटतं. [टॉस जिंकण्यासाठी हवं तर एखादी सत्यनारायणाची पूजा घालण्यास त्याला सांगावं !]. नव्या व ज्येष्ठ खेळाडूनी मनापासून स्वीकारलेला कप्तान अगदीच अपयशी ठरल्याशिवाय बदलण्याचा विचार न करणंच हिताचं !
[ जाणकाराचा आव आणणं तसं कांही फार कठीण नसतं, हे आता माझ्या लक्षांत यायला लागलं असावं!]
>>द्रविड चे अपयश मला नाही
>>द्रविड चे अपयश
मला नाही वाटत की द्रविड या दौर्यात अपयशी ठरला.... ४ पैकी २ इंनिंग तर तो खुप छान खेळला!
अर्थात त्याच्याकडुन जास्तीच्या अपेक्षा आहेत... पण हे अपयश नक्कीच नाही!
जाणकाराचा आव आणणं तसं कांही
जाणकाराचा आव आणणं तसं कांही फार कठीण नसतं,
मुळीच नाही. स्वानुभव आहे. त्यासाठी विषयाची जाण असण्याची गरज नाही!! खेळण्याचा अनुभव नसल्यास चांगलेच.
जरा दहा बारा "cliche'", दहा बारा, जास्त वापरात नसणारे मोठे इंग्रजी शब्द वगैरे वापरलेत तर एका फटक्यात शरद पवारांचे सल्लागार म्हणून भरभक्कम पगाराची नोकरी मिळेल.
'मंगळवारी संध्याकाळी खेळलेल्या सामन्यात, ३ हून कमी धावांनी मागे असता, उजव्या हाताच्या पिचरसमोर मेट्स नि २० पैकी १२ सामने जिंकले आहेत!"
तसेच
"पाचव्या दिवशी, पूर्वी पन्नास हून कमी विकेट्स घेतलेल्या ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर, मैदानावर अर्धी सावली व अर्धे उन असताना, चाळीस हून कमी शतके केलेल्या फलंदाजांमधे एका पेक्षा जास्त रन्स घेण्यात, द्रवीडची सरासरी ही दुसर्या क्रमांकाची आहे."
अश्याप्रकारचे खरेखोटे आकडे तयार करणे महत्वाचे असते. सखोल अभ्यास केला असल्याचा पुरावाच तो.
pardigm shift, thinking out of box, root cause, mitigation of risk, synergy, confluence, इ. शब्द दहा बारा वर्षांपूर्वी फार महत्वाचे होते. माझी नोकरीची शेवटची दहा वर्षे त्यामुळे फार आनंदात गेली, आता नोकरीची गरज वाटत नाही इतकी. आजकाल कोणत्या शब्दांची चलती आहे ते शोधून काढा नि वापरायला लागा!
नि खराब पिच, वगैरे घासून गुळगुळीत झालेली कारणे न देता, काहीतरी वेगळीच कारणे शोधून काढा.
पूर्वी साहित्याचे यशस्वी टीकाकार होण्यासाठी लोक खालीलप्रमाणे अभिप्राय देतः
"या संवादातच कथेने अत्त्युच्च पातळी गाठली आहे, नि तिथेच कथेचे अपयश आहे!"
क्रिकेटलाहि हाच नियम लागू पडेल.
"या मालिकेतच द्रवीडच्या फलंदाजीने एक अत्युच्च पातळी गाठली आहे, नि तेच त्याच्या फलंदाजीचे अपयश आहे!"
(याचा अर्थ विचारू नका. अर्थ, सत्य, हे paradigm आता शिफ्ट करून, थोडीशी खोटी, गोंधळात पाडणारी वाक्ये लिहिणे, बोलणे हीच नवीन युगाची गरज आहे.)
तुम्हाला सुयश चिंतितो.
जाणकाराचा आव आणणं तसं कांही
जाणकाराचा आव आणणं तसं कांही फार कठीण नसतं, हे आता माझ्या लक्षांत यायला लागलं असावं >> अहो इथे (म्हणजे क्रिकेट मध्ये) सगळेच जाणकार. नाहीतर अतुल वासन गप्पा ठोकत नसता बसला.
पण हे अपयश नक्कीच नाही >> तो फक्त एक इनिंग चांगला खेळला. द्रविड मलाही आवडतो. पण त्याने अजून जोरदार खेळायला पाहिजे. नाहीतर काल मायकल बेव्हन, ब्रॅड हॉग सारखे लोक आता पुजारा परफेक्ट रिप्लेसमेंट आहे, त्याने रिटायर व्हावं असे म्हणाले नसते. (पण मला शिवाची काँमेट जास्त आवडली) द्रविड ने खेळावे पण चार पैकी निदान दोन मोठ्या इनिंग असल्यातर तो संघात राहू शकतो अन्यथा द्रविडला अवघड आहे.
सचिनलाही मध्ये नवीन लोकांनी त्रास दिलाच आहे. त्याने परफॉर्म करुन इतरांना गप्प केले तसे द्रविड ने करायला हवे असे वाटते. अन्यथा एक मोठी इनिंग झाल्यावर सन्मानाने निवृत्ती स्विकारावी.
या संवादातच कथेने अत्त्युच्च पातळी गाठली आहे, नि तिथेच कथेचे अपयश आहे >> काय झक्की बॅडपॅच संपला का. एकदम खणखणीत षटकार. आहात कुठे तुम्ही. पाच दिवस दिसलाच नाहीत.
द्रविडची बॉडी ल्यांगवेजच
द्रविडची बॉडी ल्यांगवेजच मुळात एखाद्या पेन्शनरची आहे. त्याने खरे तर कधीच रिटायर व्हायला हवे होते.शेवर्टी शेवटी नायक म्हणून असह्य झालेल्या दिलिपकुमारची कळा त्याला आली आहे.(द्रविड दिसतोही दिलिप कुमार सारखाच :))
<<तुम्हाला सुयश चिंतितो.>> हे
<<तुम्हाला सुयश चिंतितो.>> हे जर मलाच उद्देशून असेल तर,झक्कीजी, तुम्ही विकतचं श्राद्ध घेताय ! लोकाना बोअर करण्याची माझी प्रचंड कुवत तुम्हाला अजून उमगलेली दिसत नाही !! पण मीही एक्सपर्ट छाप कांही वाक्य योजून ठेवली आहेत.उदा. जर द्रविडसारख्या फलंदाजाच्या [ज्याचा पत्ता साफ पडला आहे ] बॅटला लागून चेंडू स्लीपमधल्या दोन क्षेत्ररक्षकांमधून गेला, तर " Oh ! He edged it and was lucky that it went thru' two slips" म्हणायचं, पण फॉर्मात असलेल्या फलंदाजाच्या बाबतीत मात्र " How beautifully he steered it between the two slips !" असं ओठाचा चंबू करून ओरडायचं !!
अरे लोक्स, शिवा कॉमेंट्री
अरे लोक्स,
शिवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसू शकतो अन मांजरेकर रकाने भरून लिहू शकतो तर कुणालाही क्रिकेट मध्ये समालोचकाचे करीयर करायला वाव आहे- झक्की बघा विचार करा
फिरकी गोलंदाजांसाठी जंबो अन मुरलीधरन मिळून अॅकॅडमी काढणार आहेत असं ऐकलं होतं.. तसं झालं तर लय भारी होईल.
पण तेज गोलंदाजांची वाट मी म्हटलं तसं mrf pace academy मधून मग ipl मग दुखापती मग तंबूत अशी होत असल्याने त्यावर वेगळा ऊपाय करावा लागेल.
लींटा नावाचा महातेजगती गोलंदाज, शेट्टीशेन नावाचा फिरकी गोलंदाज आपल्या मातीत जन्माला येईल असे मला वाटले होते पण चौघांनी नीराशा केली.
Pages