का अजून वर्तमान...

Submitted by अ. अ. जोशी on 7 October, 2010 - 13:32

का अजून वर्तमान जातसे जळून..?
एकदा तुझाच भूतकाळ बघ वळून

नेहमीच जिंकणार तूच शर्यतीत
आपल्याच सावली पुढे-पुढे पळून

वेदने! नको करूस आणखी उशीर...
ये अशी मिठीत; वेळ जायची टळून...

द्या, हजार घाव काळजावरी खुशाल...!
एकदाच, पण बघा स्वतःसही छळून

काय राहिले तुझे अजून काळजात ?
जातसे अजून जीव आतला गळून...

द्या महत्त्व ज्या क्षणांस द्यायचे तिथेच...
वेळ टाळली कि फायदा नसे कळून

एवढे कधी महत्त्व मी दिले कुणास..?
आसवे तिची उगाच जायची ढळून....

जेवढी नसेल वाट काढली मळून
तेवढा विचार 'अजय' काढतो दळून

गुलमोहर: 

द्या, हजार घाव काळजावरी खुशाल...!
एकदाच, पण बघा स्वतःसही छळून

मस्त शेर आणि चांगली गझल!

-'बेफिकीर'!

सुंदर गझल.....
पळून्,छळून खूप आवडले...

जेवढी नसेल वाट काढली मळून
तेवढा 'अजय' विचार काढतो दळून... मक्त्यात असा बदल केल्यास जास्त लयीत व्हावे... चुभुद्याघ्या. Happy

नेहमीच जिंकणार तूच शर्यतीत
आपल्याच सावली पुढे-पुढे पळून

अजयजी वाह....

<<<का अजून वर्तमान जातसे जळून..?
एकदा तुझाच भूतकाळ बघ वळून

नेहमीच जिंकणार तूच शर्यतीत
आपल्याच सावली पुढे-पुढे पळून >>>>

मस्तच अजयजी.......

द्या, हजार घाव काळजावरी खुशाल...!
एकदाच, पण बघा स्वतःसही छळून

जेवढी नसेल वाट काढली मळून
तेवढा विचार 'अजय' काढतो दळून

जबरदस्त आवडले अजयजी.............