मायबोली ऑल टाईम्स टॉप टेन
तसं पाहिलं तर निवडक दहा ची सोय ईथल्या मायबाप सरकारने अलिकडेच करून दिली आहे. पण मा.बो. करांच्या अथांग प्रतीभेला निवडक दहा मध्ये न्याय देणं मुष्कीलच आहे. वास्तविक आजकाल कुठल्याही प्रकारचा न्याय करणं/देणं/मान्य करणं मुष्कीलच आहे हे येथील विविध ताज्या बा.फ. वरून चक्कर मारली तरी सहज लक्षात येईल. प्रतीभा आणी प्रतिमा सब्जेक्टीव (सापेक्ष) असल्याने कुठल्याही मूल्यांकनात वा मानांकनात त्याची मोजदाद करणे कठीण काम आहे.
पण, माझ्या ईथल्या आठ वर्षाच्या वावरात (मा.बो ची दुसरी पिढी?) ईथल्या काही गोष्टी, घटना, लिखाणे वगैरे मात्र अशा कुठल्याही मानांकनाच्या पलिकडे किंव्वा ऑल टाईम फेवरेट म्हणूयात, अशा आहेत. त्या गोष्टी अन त्या मागचे कारण मला वाटले तसे:
(कृ. यात कुणालाही वैयक्तीक दुखवायचा वा कलाकृतीवर टीका करायचा हेतू नाही. तेव्हा चू.भू.दे.घे.)
१. आईने अकबरी: मा.बो. च्या ईतीहासातील मला वाटतं हा अढळ ध्रुव तारा आहे. का ते स्पष्टीकरण देत बसत नाही- काही गोष्टी निव्वळ स्विकारून आनंद घ्यायचा असतो. ही त्यापैकीच एक.
२. "रथचक्र" नावाची बेटीची कविता: जाणिवा अन नेणीवा यांचा एक थेट मुक्काम. कविता-मानसोपचाराची गरज वगैरे बद्दल कळकळ असणार्यांनी आधी ही कविता वाचून यावे- गृहपाठ म्हणून! त्यापूढे जावून ज्यांना कवितेची डीगरी घ्यायची आहे त्यांच्यासाठी "कवितेचे यंत्र" वगैरे बनवल्याचे स्मरते आहे.
३. साहित्यीक सांडपाणी- कुजबूजः मला वाटतं आजही ही कुजबूज कॉपी पेस्ट करून टाकली तरी नव्या संदर्भात चपखल बसेल.
४. लग्नात वाकून नमस्कार करणे/कुंकू लावणे ई. वरील वादः मा.बो. च्या ईतीहासातील ही एक v and c (views and comments) ची बखर म्हणावी लागेल. ज्यांनी ही वाचली नाही त्यांना मा.बो. करांच्या प्रतिभे बद्दल जराही समज नाही. दिल्ली गये और ताजमहाल नही देखा? मला खात्री आहे या वादात भाग घेतलेल्या दोन्ही पक्षातील लोकांनी प्रसंगी (वेळ आली की) वाकून नमस्कार केले असतील.
५. झेन कथा: हा प्रकार महान होता, यात गूढ, विनोद, करूणा, शौर्य, वीर, असे एक ना अनेक रस एकवटलेले असत अन या कथेच्या तळाशी पोहचू पाहणारे मा.बो. कर (माझ्यासकट) दर वेळी बुडायला लागले की कथेचा नायक "कथेचा सारांश असा ईतका साधा सोपा आहे" म्हणून शेवटचे छद्मी हास्य करत असे. आमचे दुर्दैव, त्या काळी वैभव जोशी यांची "प्रत्त्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे कुठे आहे"? ही कविता प्रकाशीत झाली नव्हती.
६. मी आणि माझा बॉसः ही लेखमालिका तशी छोटी होती पण बर्याच ईतर कारणाने ती मोठी झाली.
७. अतृप्त आत्म्यांची डायरी: अतृप्त असले म्हणून काय झाले त्या आत्म्यांनाही भावना असतात अन ते आपल्याशी संवाद साधतात हे या डायरीतून थेट समोर आले. मला वाटतं डायरीतील बर्याच अतृप्त आत्म्यांची लग्ने लागल्यावर शेवटी बिचारे संसारात पडल्याने डायरी लिहायला त्यांना वेळ झाला नाही, परिणामी डायरी बंद झाली.
८. ज्योतिष, भविष्य, हस्तसामुद्रीक वगैरे चा बा.फ.: ईथे विचारलेले गेलेल काही प्रश्ण फार महान होते.
९. देव म्हणजे काय?: मला वाटतं सुनामी आल्यानंतर (२००४) या प्रश्णाला जे तोंड फुटलं ते २००८ पर्यंत उघडं होतं. खरं सांगतो ईथल्या काही (म्हणजे साधारण ५००) पोष्टी वाचल्या असत्या तर संत, महंत, विचारवंत यांपेक्षाही दोन पाऊले पुढे असलेले काही मा.बो. कर यांच्या अगाध शब्दचातुर्याला अंत नाही हे लक्षात आले असते. शेवटी ईथल्या सरकारने कुलूप लावून हे तोंड बंद केलं. पण देव म्हणजे काय? तो आहे का? या प्रश्णाचं उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे- मधूनच कुणाला तरी लहर येते अन "ये रे माझ्या मागल्या".....
१०. कोणाशी तरी बोलायचय हा बा.फ.: डु. आयडी, खॠ आयडी, खोटी आयडी काहीही का असेना, या ना त्या मार्गाने आयुष्यातील कुटील जटील अशा प्रश्णांना अधिकृतपणे करू दिलेली वाट- सासू सून वाद, गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड वगैरे समस्या, पती पत्नी समस्या, झालच तर अमेरीकेत राहून भारताची ईमेज खराब करणारे भारतीय वगैरे वगैरे अशा सर्व बोचर्या प्रश्णांना फुटलेली वाचा अन त्याला तितक्याच ऊत्साहाने ऊत्तरे देणारे मा.बो. कर- त्यातूनही अमेरीकेतला "अ" काढला की झक्की अन रॉबीनहूड हजर.
काळाच्या ओघात मा.बो. चे रंगरूप बदललं, अगदी मॉड्स जावून व्यवस्थापक आले, रोमन जावून देवनागरी आलं, मायबोली श्रवणीय झाली, पण काही गोष्टी तशाच आहेत. "जुन्या हितगुजवर" ही लिंक ईथे ठेवून जणू ऑल टाईम्स क्लासिक चित्रपटांसारखा एक खजिना जतन करून ठेवला गेला आहे- अलीबाबाची गुहा म्हणा हवं तर. तुम्ही फक्त "खुल जा सिम सिम" म्हणायची खोटी आहे.
-----------------------------------------------------------------------------------
बाकी आमच्या काळी ईथे केल्या गेलेल्या प्रेम कविता काय स्पेशल होत्या- हाय, ऊफ्फ, खल्लास, वगैरे... क्वालिटी पण आणि क्वांटीटी पण.
आताच्या पिढीची तेव्हडी ईंटेंसीटी राहिली नाही वाटतं- कुठलीच गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत!
तुमचीही मा.बो. ऑल टाईम्स टॉप टेन असेल तर लिहा. बघुया आपले किती तारे जुळतायत.
योग.. लिंकापण द्यायच्यास ना
योग.. लिंकापण द्यायच्यास ना सगळ्याच्या... म्हणजे ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना वाचायला मिळाले असते..
होहो लिंक्स पायजेल योग पण
होहो लिंक्स पायजेल योग
पण ऑलटाईम ग्रेट पोस्टी स्लार्टीच्याच. निर्वीवाद !!!
हिम्सकूल ला अनुमोदन. लिंक
हिम्सकूल ला अनुमोदन. लिंक द्या
आईने अकबरी: मा.बो. च्या
आईने अकबरी: मा.बो. च्या ईतीहासातील मला वाटतं हा अढळ ध्रुव तारा आहे. >>> अगदी अगदी...
फ, क्ष, दामले वाद जा आणि ख
फ, क्ष, दामले वाद
जा आणि ख वाद
भुमिका आणि जगबुडी
बापुंचा बीबी.. माझा ऑल टाईम
बापुंचा बीबी.. माझा ऑल टाईम फेव...
मायबोलीचा शोधही तेव्हाच लागलेला.. V&C नुसतं वाचयला पण धमाल यायची.. अब वो बात नही रही!
अजुनही खुप कंटाळा आला असेल तर जुने हितगुजावर जाउन काहीतरी वाचते.. मज्जा!
झक्कींच्या उपहासात्मक
झक्कींच्या उपहासात्मक पोष्टीसुध्दा मायबोलीचे रेटींग बर्याचदा वाढवत असाव्यात.
कुजबुजचे सर्व अंक सुध्दा इतर मायबोली वाचायला motivate करतात.
जबरदस्तच. या सगळ्याच्या लिंक
जबरदस्तच. या सगळ्याच्या लिंक दिल्या तर गाडी डिरेल होणार नाही. आजही त्या गोष्टीचा आस्वाद घेता येईल.
>>योग.. लिंकापण द्यायच्यास ना
>>योग.. लिंकापण द्यायच्यास ना सगळ्याच्या... म्हणजे ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना वाचायला मिळाले असते..
शोधूदेत ना जरा (शोधा म्हणजे सापडेल).. :). पण सर्व लिंक्स शोधून देणं मला तरी शक्य नाहीये..
जुन्या माबोवर My Crushes हा
जुन्या माबोवर My Crushes हा बीबी होता, आजकाल दुसरा कोणी चालू केला असेल तर माहित नाही, पण त्या काळी (४-५ वर्षापुर्वी) ओसंडून वाहत होता ...
६ आणि ७ आठवत नाहीये. जरा क्लू
६ आणि ७ आठवत नाहीये. जरा क्लू द्या की
बाकी पोस्ट मस्त!
नीधप, ६. आणि my crushes जवळ
नीधप,
६. आणि my crushes जवळ जवळ सारखच आहे. (मला वाटतं बॉस जर्मन होता.. );)
७. ला क्ल्यू कशाला पाहीजे? एक वडाच्या झाडावर अन पिंपळाच्या झाडावर... सर्व आत्मे, गणगोत होते त्यात- भूत, हडळ, शाकीण वगैरे...
माझा मेमरी लॉसच झालाय बहुतेक
माझा मेमरी लॉसच झालाय बहुतेक म्हणजे.
किंवा मग मी अधून मधून ४-६ महिने गायब असायचे त्या काळातलं असेल कारण एवढं सांगूनही आठवत नाहीये.
माझा मेमरी लॉसच झालाय बहुतेक
माझा मेमरी लॉसच झालाय बहुतेक म्हणजे.
किंवा मग मी अधून मधून ४-६ महिने गायब असायचे त्या काळातलं असेल कारण एवढं सांगूनही आठवत नाहीये.
हा हा.. खूप सही!! आईने अकबरी
हा हा.. खूप सही!!


आईने अकबरी तर खरंच ऑल टाईम बेस्ट आहे !
बाकी श्रीनीच्या झेन कथा, चाफाच्या गूढकथा, नंदिनी-चाफा-च्यायला यांचा इब्लिसपणा, कोतबो, व्ही&सी, क्रशेसचा बीबी... सगळंच सही!!
बेटीच्या कविता मात्र फार कमी आठवत आहेत..
९ वाचून मी लिटरली पळून जायचे!
एव्हरग्रीन आणि ऑलटाईमबेस्टचाच
एव्हरग्रीन आणि ऑलटाईमबेस्टचाच विषय असेल, तर बेफिकीर यात हवेतच. ही'ज् सोऽऽऽऽ स्वीट !!
बेफिकीर .. माझ्यापण लिस्ट
बेफिकीर .. माझ्यापण लिस्ट मध्ये ....
योग मलापण बरेच सापडले नाहीत... तर लिंकापण द्या...
नीरजा, अग श्र लिहायची
नीरजा,
अग श्र लिहायची आत्म्यांच्या डायरीज, म हा न प्राकर होता..अशक्य हहपुवा !!
योग,
अभ्यास कमी पडतोय, मुद्दा क्र. ६ मधला बॉस जर्मन नव्हता.
बॉस वेगळा आणि 'जर्मन माणुस' वेगळा होता ना ?
अजुन एक दंगा झालेला बीबी:
श्रीनि ने सुरु केलेला 'सौंदर्य स्पर्धा बीबी'
अरे लिंक्स टाका की कोणीतरी
अरे लिंक्स टाका की कोणीतरी
ओह हा... आठवलं आत्म्यांच्या
ओह हा... आठवलं आत्म्यांच्या डायर्या... करेक्ट!! कंप्लिट हहपुवा होतं ते!!
पण ६ नंबर काही आठवेना.
सौंदर्य स्पर्धा बिबि पण आठवत नाहीये.
जावाकसम आणि मिंग्रजीचे बोल कौतुके आठवतंय का?
<<बापुंचा बीबी.. माझा ऑल टाईम
<<बापुंचा बीबी.. माझा ऑल टाईम फेव.<<>>
मस्तच होता तो बीबी. कसला पेटला होता. मी पुर्ण वाचुन काढला. केव्हढे नॉलेज वाढले ते वाचुन. मला माहितच नव्हते काही त्या बापुंबद्दल.
>>योग, अभ्यास कमी पडतोय,
>>योग,
अभ्यास कमी पडतोय, मुद्दा क्र. ६ मधला बॉस जर्मन नव्हता.
बॉस वेगळा आणि 'जर्मन माणुस' वेगळा होता ना ?
DJ,
आठवत नाही.. (हा पूर्ण लेख निव्वळ जे लक्षात होतं/राहिलं त्यावर.. अभ्यास वगैरे नाही.)
सौंदर्य स्पर्धा बा.फ. भारीच होता..
मस्त
मस्त
आईने अकबरी ऐकल्यासारखं वाटतय
आईने अकबरी
ऐकल्यासारखं वाटतय कुठेतरी 
हळदीकुंकू आणि दारू पण v&c मध्येच झालं होतं ना..
उजळणी बद्दल धन्यवाद. या ही
उजळणी बद्दल धन्यवाद.
या ही गोष्टींआधी (जेंव्हा डु. आयडी नॉर्म होता) तेंव्हाचे महाभारत महान होते.
दुवे पण द्या ना राव
दुवे पण द्या ना राव
खरय योग, आपल्या काळी ते खूप
खरय योग, आपल्या काळी ते खूप भारी होत,
, हल्लीच्या सारखी अनुल्लेखाच्या बाधेने दुषित झालेली पाप्याची पितरे नसायची तेव्हा!
जे काय असेल ते रोखठोक जिथल्यातिथे एकेकट्याने आमनेसामने असायचे!
शिवाय तेव्हा एखाद्या विषयाला/आयडीला फॉलो करता यायच किन्वा हात धूवून पाठी लागता यायच
जौदे, गेले ते दिवस!
वर उल्लेख केलेल्यापैकी, 'आईने
वर उल्लेख केलेल्यापैकी, 'आईने अकबरी' आणि ' जगबुडी'तले 'किरिमीजि रंगाचे पेय' इ.इ. प्रकार सर्वात महान होते
मी माबो जॉईन केल्यापासूनचे काही महान बीबी म्हणजे -'चुकीची ऐकू आलेली गाणी', 'वेंधळेपणा', 'गोटॉल' इ
माझ्या दृष्टीने ऑलटाईम्स टॉप
माझ्या दृष्टीने ऑलटाईम्स टॉप टेन मधे कुठलाच बाफ नाही. प्रत्येक बाफचा स्वतःचा गाजायचा एक काळ असतो. नंतर त्याकडे कुणी ढुंकूनही पहात नाही.
टेन्शन कमी करणारे किंवा घालवणारे बाफ वेंधळेपणा, लहानपणीचे नसते उद्योग वगैरे हलके फुलके बाफ.
चिंगी, मी सुद्धा मायबोलीवर बापुंच्या बाफमुळेच आले, पण एक बापुभक्त म्हणून
आहेत तिथे माझ्या मिंग्लिशमधल्या पोस्ट्स. मला तेव्हा मराठी टाईप करताच येत नव्हतं. तो बाफ शांत झाल्यावर, आपल्यालाही मराठी टाईप नक्की करता येईल या विचाराने थोडा प्रयत्न केला आणि जमलं.
>>योग.. लिंकापण द्यायच्यास ना
>>योग.. लिंकापण द्यायच्यास ना सगळ्याच्या... म्हणजे ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना वाचायला मिळाले असते..
मी आतापर्यंत फक्त हितगुजवरील गुलमोहरच वाचल आहे.. आता बाकीच वाचता येइल..
शोधूदेत ना जरा (शोधा म्हणजे सापडेल).>>>> सही.. त्यानिमित्ताने जुनी मायबोली पण पाहिली जाइल..
बाकी तुमच्या लेखाने मात वाचण्याची उत्सुकता वाढवली आहे...
Pages