मायबोली ऑल टाईम्स टॉप टेन
तसं पाहिलं तर निवडक दहा ची सोय ईथल्या मायबाप सरकारने अलिकडेच करून दिली आहे. पण मा.बो. करांच्या अथांग प्रतीभेला निवडक दहा मध्ये न्याय देणं मुष्कीलच आहे. वास्तविक आजकाल कुठल्याही प्रकारचा न्याय करणं/देणं/मान्य करणं मुष्कीलच आहे हे येथील विविध ताज्या बा.फ. वरून चक्कर मारली तरी सहज लक्षात येईल. प्रतीभा आणी प्रतिमा सब्जेक्टीव (सापेक्ष) असल्याने कुठल्याही मूल्यांकनात वा मानांकनात त्याची मोजदाद करणे कठीण काम आहे.
पण, माझ्या ईथल्या आठ वर्षाच्या वावरात (मा.बो ची दुसरी पिढी?) ईथल्या काही गोष्टी, घटना, लिखाणे वगैरे मात्र अशा कुठल्याही मानांकनाच्या पलिकडे किंव्वा ऑल टाईम फेवरेट म्हणूयात, अशा आहेत. त्या गोष्टी अन त्या मागचे कारण मला वाटले तसे:
(कृ. यात कुणालाही वैयक्तीक दुखवायचा वा कलाकृतीवर टीका करायचा हेतू नाही. तेव्हा चू.भू.दे.घे.)
१. आईने अकबरी: मा.बो. च्या ईतीहासातील मला वाटतं हा अढळ ध्रुव तारा आहे. का ते स्पष्टीकरण देत बसत नाही- काही गोष्टी निव्वळ स्विकारून आनंद घ्यायचा असतो. ही त्यापैकीच एक.
२. "रथचक्र" नावाची बेटीची कविता: जाणिवा अन नेणीवा यांचा एक थेट मुक्काम. कविता-मानसोपचाराची गरज वगैरे बद्दल कळकळ असणार्यांनी आधी ही कविता वाचून यावे- गृहपाठ म्हणून! त्यापूढे जावून ज्यांना कवितेची डीगरी घ्यायची आहे त्यांच्यासाठी "कवितेचे यंत्र" वगैरे बनवल्याचे स्मरते आहे.
३. साहित्यीक सांडपाणी- कुजबूजः मला वाटतं आजही ही कुजबूज कॉपी पेस्ट करून टाकली तरी नव्या संदर्भात चपखल बसेल.
४. लग्नात वाकून नमस्कार करणे/कुंकू लावणे ई. वरील वादः मा.बो. च्या ईतीहासातील ही एक v and c (views and comments) ची बखर म्हणावी लागेल. ज्यांनी ही वाचली नाही त्यांना मा.बो. करांच्या प्रतिभे बद्दल जराही समज नाही. दिल्ली गये और ताजमहाल नही देखा? मला खात्री आहे या वादात भाग घेतलेल्या दोन्ही पक्षातील लोकांनी प्रसंगी (वेळ आली की) वाकून नमस्कार केले असतील. 
५. झेन कथा: हा प्रकार महान होता, यात गूढ, विनोद, करूणा, शौर्य, वीर, असे एक ना अनेक रस एकवटलेले असत अन या कथेच्या तळाशी पोहचू पाहणारे मा.बो. कर (माझ्यासकट) दर वेळी बुडायला लागले की कथेचा नायक "कथेचा सारांश असा ईतका साधा सोपा आहे" म्हणून शेवटचे छद्मी हास्य करत असे. आमचे दुर्दैव, त्या काळी वैभव जोशी यांची "प्रत्त्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे कुठे आहे"? ही कविता प्रकाशीत झाली नव्हती. 
६. मी आणि माझा बॉसः ही लेखमालिका तशी छोटी होती पण बर्याच ईतर कारणाने ती मोठी झाली. 
७. अतृप्त आत्म्यांची डायरी: अतृप्त असले म्हणून काय झाले त्या आत्म्यांनाही भावना असतात अन ते आपल्याशी संवाद साधतात हे या डायरीतून थेट समोर आले. मला वाटतं डायरीतील बर्याच अतृप्त आत्म्यांची लग्ने लागल्यावर शेवटी बिचारे संसारात पडल्याने डायरी लिहायला त्यांना वेळ झाला नाही, परिणामी डायरी बंद झाली. 
८. ज्योतिष, भविष्य, हस्तसामुद्रीक वगैरे चा बा.फ.: ईथे विचारलेले गेलेल काही प्रश्ण फार महान होते.
९. देव म्हणजे काय?: मला वाटतं सुनामी आल्यानंतर (२००४) या प्रश्णाला जे तोंड फुटलं ते २००८ पर्यंत उघडं होतं. खरं सांगतो ईथल्या काही (म्हणजे साधारण ५००) पोष्टी वाचल्या असत्या तर संत, महंत, विचारवंत यांपेक्षाही दोन पाऊले पुढे असलेले काही मा.बो. कर यांच्या अगाध शब्दचातुर्याला अंत नाही हे लक्षात आले असते. शेवटी ईथल्या सरकारने कुलूप लावून हे तोंड बंद केलं. पण देव म्हणजे काय? तो आहे का? या प्रश्णाचं उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे- मधूनच कुणाला तरी लहर येते अन "ये रे माझ्या मागल्या".....
१०. कोणाशी तरी बोलायचय हा बा.फ.: डु. आयडी, खॠ आयडी, खोटी आयडी काहीही का असेना, या ना त्या मार्गाने आयुष्यातील कुटील जटील अशा प्रश्णांना अधिकृतपणे करू दिलेली वाट- सासू सून वाद, गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड वगैरे समस्या, पती पत्नी समस्या, झालच तर अमेरीकेत राहून भारताची ईमेज खराब करणारे भारतीय वगैरे वगैरे अशा सर्व बोचर्या प्रश्णांना फुटलेली वाचा अन त्याला तितक्याच ऊत्साहाने ऊत्तरे देणारे मा.बो. कर- त्यातूनही अमेरीकेतला "अ" काढला की झक्की अन रॉबीनहूड हजर.
काळाच्या ओघात मा.बो. चे रंगरूप बदललं, अगदी मॉड्स जावून व्यवस्थापक आले, रोमन जावून देवनागरी आलं, मायबोली श्रवणीय झाली, पण काही गोष्टी तशाच आहेत. "जुन्या हितगुजवर" ही लिंक ईथे ठेवून जणू ऑल टाईम्स क्लासिक चित्रपटांसारखा एक खजिना जतन करून ठेवला गेला आहे- अलीबाबाची गुहा म्हणा हवं तर. तुम्ही फक्त "खुल जा सिम सिम" म्हणायची खोटी आहे.
-----------------------------------------------------------------------------------
बाकी आमच्या काळी ईथे केल्या गेलेल्या प्रेम कविता काय स्पेशल होत्या- हाय, ऊफ्फ, खल्लास, वगैरे... क्वालिटी पण आणि क्वांटीटी पण.
आताच्या पिढीची तेव्हडी ईंटेंसीटी राहिली नाही वाटतं- कुठलीच गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत! 
तुमचीही मा.बो. ऑल टाईम्स टॉप टेन असेल तर लिहा. बघुया आपले किती तारे जुळतायत.
सर्वात लोकप्रिय असावा असे
सर्वात लोकप्रिय असावा असे दिसते तो 'आईने अकबरी' बाफ सापडत नाही आणि टोटल लागत नाहीत.
तसेच शिक्षकांच्या लकबीचा एक बाफ आढळत नाही तोही उल्लेखनीय होता .
आईने अकबरीमुळे खुद्द सन्तुने
आईने अकबरीमुळे खुद्द सन्तुने भांडता भांडता कपाळाला हात लावला होता
बापुंचा
बापुंचा बीबी
http://www.maayboli.com/hitguj/messages/103384/121799.html
त्या भूमिकाताईंचे सगळेच बीबी
त्या भूमिकाताईंचे सगळेच बीबी महान होते.
जावाकसम आहे का कोणाकडे? टाका ना परत.
बेटीची यशोधरा कविता आणि त्या
बेटीची यशोधरा कविता आणि त्या अनुशंगाने गौतमाचे त्यावर उत्तर याअर्थीची प्रसादची कविता अजूनही लक्षात आहे.
योग्,आईने अकबरीवाल्यांचेच 'माझ्यात दडलेले लहान मूल' वरचे तारे विसरलास का?
त्याची सगळीकडचेच तारे तेवढेच
त्याची सगळीकडचेच तारे तेवढेच दैदिप्यमान आहेत.
गिरी >>त्या अनुशंगाने गौतमाचे
गिरी
>>त्या अनुशंगाने गौतमाचे त्यावर उत्तर याअर्थीची प्रसादची कविता अजूनही लक्षात आहे.
प्रसाद नव्हे रे पेशवा.
नाही नाही प्रसादचीच होति...
नाही नाही प्रसादचीच होति... अज्जुका, अधिक माहीती द्यावी!
पेश्व्याच्या कविता पूर्ण वाचायला खूप उशीरा सुरवा केली...
'माझ्यात दडलेले लहान मूल' हा
'माझ्यात दडलेले लहान मूल' हा महान विनोद दुसर्या कुणाचातरी आहे.
मला पण प्रसादचीच होती असं
मला पण प्रसादचीच होती असं आठवतंय.
पेशवा कुणालाही आवडणार नाहीत अश्या कविता लिहायचा तेव्हा. ज्या माझ्यासारख्या मोजक्या लोकांनाच आवडायच्या ( मग मी ग्रेट हे तुम्हाला कळणार तरी कसं!)
नाही. 'शांततेचं व्याकरण' ही
नाही. 'शांततेचं व्याकरण' ही पेशव्याचीच कविता होती.
आईने अकबरी महान प्रकरण होते.
आईने अकबरी महान प्रकरण होते.
आणि ४-५ वर्षापुर्वीचा V & C वरील सर्व विषय्.(का वाद).
मला पुर्वीचे हितगुज भारी वाटायचे(उगाच...)
हो हो, मला पण काहीकाही चर्चा
हो हो, मला पण काहीकाही चर्चा अजुनही कुठेही आठवल्या तरी प्रचंड हसु येते. त्या अशा-
आईने-अकबरी,
माझ्यातले मुल,
गिरीराजला न समजलेले गाणे 'बहारे हीजडा',
मराठी लोकांचे हिंदी मधील' आ मेरे अंगपर'.
सर्वात आवडलेल्या कविता - बेटी ची 'यशोधरा' व पेशव्याचे 'शिवाजीराजे व शंभुराजे' ह्यांच्यावर लिहिलेली एक कविता (म्हणजे शिवरायांचा मृत्यु झाला तेव्हा शंभुराजे काय म्हणाले असतील ह्या अर्थाची). पेशवे ह्यांची तेवढी एकच कविता मला समजली आहे आजपर्यंत आणि थेट भिडली. बेटीची यशोधारा ची पहिली ओळ वाचली तेव्हा माझ्या अंगावर काटा आला होता.. कोठीकरांच्या वास्तववादी पण आवडल्या होत्या.
ललीत मधे - बेटीचेच तिच्या कुत्राबद्दल लिहिलेले.
विनोदी - दाद ह्यांचे बहुतेक सर्वच
कथा - ह्या मात्र खुप जणांच्या आवडतात. विशाल , कौतुक , नीधप, स्वाती ची 'उत्तर', बेफीकीर. ट्युलीप की कोणीतरी हिप्नॉटीझम वर एक लिहिली होती पुर्वी, ती पण जबरदस्त होती. रचना, संघमित्रा सुरेख लिहितात (कुठे गायब झाल्यात ). चाफा च्या भयकथा.
चर्चा/वाद - एक 'स' पासुन आयडी होता बहुतेक. त्या मुलीने सासु-सासर्यांना कामाला जुंपणे कसे योग्य आहे ते असे काही लिहिले होते की कितीतरी जणांनी आपलेच केस उपटले होते रागानी.
बेटी चे हे लिखाण/कविता कुठे
बेटी चे हे लिखाण/कविता कुठे सापडेल ? सगळे इतके कौतुक करत आहेत म्हणुन खुप शोधले पण सापडलेच नाही. कोणाकडे लिन्क असल्यास द्या प्लीज.
हे सगळ वाचायला आवडेल, कोणाकडे
हे सगळ वाचायला आवडेल, कोणाकडे लिन्क असल्यास द्या ना प्लीज
बेटीच्या सगळ्याच कविता
बेटीच्या सगळ्याच कविता जबरदस्त असत्. शब्दांवर जबर्दस्त प्रभुत्व आणि अर्थांचे अनेक पदर असणार्या कविता ... तिला बी ने विचारलेले प्रश्न जबरी असत! या प्रकरणावर हह ने लिहीलेले कुज्बूज तर महान होते.
आशिष चासकर च्या v&c वरच्या पोस्ट !
काम झाले, पोस्ट उडवली डेलिया,
काम झाले, पोस्ट उडवली
डेलिया, बरोबर
काय कळले नाही हो लिंबुटिंबु.
काय कळले नाही हो लिंबुटिंबु. जिवंत ह्या अर्थी वापरायचे होते मला.
मला पक्के आठवत नाही पण शिवाजी
मला पक्के आठवत नाही पण शिवाजी महाराजांच्या मृत्यु नंतर संभाजीराजांचा मृत्यु झाला असे वाटते. म्हण्जे जेव्हा शिवरायांचा मृत्यु झाला तेव्हा संभाजीराजे (हयात) जीवंतच होते फक्त शिवरायांच्या मृत्यु च्या वेळी ते त्यांच्या बरोबर नव्हते, बरोबर ना लिंबु . इथले तज्ञ सांगतीलच.
ऑल टाईम ग्रेट अर्थातच आईने
ऑल टाईम ग्रेट अर्थातच आईने अकबरी.
एखाद्या दिवाणखान्यात मंदिर का मशीद हा वाद चालला असावा, वातावरण अगदी गरम व्हावे, लोक हमरी तुमरीवर यावेत आणी अशातच तेथे एखादे सहा महिन्याचे गोड बाळ रांगत रांगत यावे आणी त्याने वारा तोडावा,
अचानक झालेल्या त्या निरागस विनोदाने सारेजण प्रसन्न खळखळून हसावेत आणी नंतर वाद घालायची इच्छाही राहू नये असे काहिसे.
लिंबुटिंबु, डेलिया, शेम ऑन
लिंबुटिंबु, डेलिया, शेम ऑन मी ... असे कसे काय वाटले मला, ते मलाच कळत नाहिये.
.. बदल केलाय.
निरागस बाळ!!!!! हा विनोद पण
निरागस बाळ!!!!!
हा विनोद पण तेवढाच महान आहे विकु!!
काय मस्त वर्णन केलेय विकु,
काय मस्त वर्णन केलेय विकु, आवडले एकदम!!!
>>निरागस बाळ!!!!! हा विनोद पण
>>निरागस बाळ!!!!!
हा विनोद पण तेवढाच महान आहे विकु!!
मंडळी, सबूरीने घ्या.. ऊगाच वैयक्तीक वाद ऊद्भवायला नकोत
अरे पण ते आईने अकबरी काय होतं
अरे पण ते आईने अकबरी काय होतं हे आम्हा नव्या लोकाना सांगाल की नाही?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?#POST1052310
.
.
लिंका द्या हो योग साहेब. हे
लिंका द्या हो योग साहेब. हे म्हणजे उगा चॉकलेट दाखवायचं अन स्वतःच खाऊन लोकांना टुकटुक करायचं प्रकरण लावलंय तुम्ही
आईने अकबरी --- जबरदस्त पंच
आईने अकबरी --- जबरदस्त पंच होता. तेवढा जबरी दणका अजून दुसरीकडे कुठे नाही जाणवला.

स्त्रियांवरील जाचक बंधने, सौभाग्यचिन्हे इ. इ. आणि अनिरुद्ध बापू ही दोन चर्चासत्रे तुफान रंगली होती. दोन्ही बाजूचे लोक हिरिरीने भांडत होते...अम्म्म नाही चर्चा करत होते. वाचक म्हणून फार आव्हानात्मक काम होतं.
अमानवीय आणि मराठी लोकांचे हिंदी हा माझा ऑल टाईम फेव्हरिट विनोदी भाग.
बाकीचे लेखन - काही आवडते तर काही एकदम नावडते लेखक आहेतच.
Pages