अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

भरतजी,

ही गोष्ट न्यायालयीन प्रक्रिया, कायदा, पुराव्या याच्या पलीकडची आहे हे सगळेच पक्ष मान्य करताना दिसातहेत (काही निकालापूर्वी, काही निकालानंतर!)

आपली ही प्रतिक्रियाच फार बोलकी आहे. राष्ट्र निर्मीती ही देशाच्या भौगोलिक सीमा ठरण्यापुर्वी होत असते. जशी राष्ट्रनिर्मीती ही श्रध्देचा प्रश्न आहे तसाच रामजन्मभुमी हा श्रध्देचा प्रश्न आहे. हि पिढ्यान पिढ्यांची श्रध्दा आहे. ही मोडुन काढण्यासाठीच केवळ मीर बाकीने मंदीर उध्वस्त करुन तिथे मुस्लीम पध्दतीत ग्राह्य नसणारी वास्तु बांधली. यात नमाज पडला जात नव्हता. केवळ दुराग्रह म्हणुन याचा ताबा वफ्फ बोर्ड आपल्याकडे ठेऊ मागत होत.

हा परकियांच्या आक्रमणाचा वारसा संपवणे ही मागणी राष्ट्रीय होती. आजही आम्हाला सर्व जागेचा ताबा सामजस्याने हवा आहे.

>>जशी राष्ट्रनिर्मीती ही श्रध्देचा प्रश्न आहे तसाच रामजन्मभुमी हा श्रध्देचा प्रश्न आहे.
नितीनभाऊ,
हे अगदीच न पटणारं... मूळ गृहीतकच चूकीचं आहे..
राष्ट्र निर्माण होतं म्हणजे नवीन भूमी निर्माण होत नाही, निव्वळ सीमारेषा अन घटना आखली जाते. श्रध्धा अन हक्क यांची कायद्याच्या मार्गाने दर वेळी सांगड घालायला गेलं की हा असा घोळ होतो. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रहीतापूढे कायदा प्रथम अन श्रध्धा नंतर हेच तत्व असायला हवे. आजवर ते तसे न राबवले गेल्यानेच बरेचसे घोळ अन वाद शिल्लक आहेत. अन काही लोक स्वार्थापोटी त्याची जोपासना करत आहेत.
या खटल्यात वाद फक्त जमिन कुणाची एव्हडाच आहे- त्यावर कुठलेही ठोस अनुमान न काढता आल्याने (तसे पुरावे ऊपलब्ध नसल्याने) तीघांना सारखे वाटून दिले आहे. ईतके साधे आहे! ईतर फाटे आता फोडण्याची गरज ही धार्मिक, राजकीय, अन स्वार्थापोटी आहे- ज्यात सगळेच माळेचे मणी सारखे आहेत.
त्यांची कृ. हिंदू वा मुसलमान अशी विभागणी करू नका- जिथून वाद चालू झाला तीथेच पुन्हा जात आहात.
"पुढे चला"...

न्याय हा न्याय असावा. त्याने फक्त सत्य लक्षांत घ्यावे. आणि ते कुणाच्याही पारड्यात असू शकते . सर्वसमावेशक असु शकते ती तडजोड. परिणामांचा विचार करुन दाखवलेल्या समंजसपणाला न्याय कसे म्हणावे ?

त.टी: ह्याला कुणी न्यायालयाचा अवमान वगैरे समजुन भांडवल करु नये. हे फक्त वैयक्तिक मत आहे . तसे असते तर खालच्या न्यायालयातील निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयांत दाद मागण्याची तरतूद घटनेत ठेवलीच गेली नसती.

योग, प्रचंड अनुमोदन!
या निकालाने जे सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे, ते कायम रहावे अशी इच्छा असेल तर, बाकीची जमीनही आम्हाला द्या, ती तुमची कधी नव्हतीच इ.इ. फाटे फोडणे संपले पाहिजे नाहीतर हा प्रश्न पुन्हा जिथून सुरु झाला तिथेच जाउन थांबेल.
हा न्याय आहे का तडजोड की आणि काही या फंदात पडायची सामान्य भारतीय माणसाची आज इच्छा आणि तयारी आहे का? याचा कानोसा घेतला बहुमताने हेच दिसून येईल की लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आणि त्यांना या सगळ्याच प्रकाराचा कंटाळा आला आहे.
अर्थात आमची बाजू संपूर्णपणे बरोबर मानली तरच तो न्याय नाहीतर ती तडजोड असा हेका असेल तर मुद्दाच संपला.

योग, अनुमोदन! जिथे न्यायालये, संबंधित दावेदार व दोन्हींचे समर्थक सामंजस्याने पुढचा मार्ग मोकळा करण्यास जाऊ बघत आहेत तिथे आता हक्क वगैरेच्या चर्चा काय कामाच्या? कोणत्याच पक्षाने आता ह्या निर्णयाचे भांडवल न करता पुढे जाण्याची परिपक्वता दाखवावी. प्रतिक्रियात्मक टिप्पण्या देणे टाळावे. उगाच नसते कलह आता नकोत. खरं सांगायचं तर सर्वसामान्य माणसालाही तिथे राम जन्मला होता अगर नाही, तिथे मशीद होती अगर नाही, त्यावरून कोणी कोणास काय काय केले ह्या सर्वाशी आता देणेघेणे उरलेले नाही. त्यांना फक्त शांततेने जगणे हवे आहे. अशा परिस्थितीत ठिणग्या, जाळ पेटवायचा किंवा इतरांना डिवचायचा कोणीच प्रयत्न करु नये.

न्याय हा न्याय असावा. त्याने फक्त सत्य लक्षांत घ्यावे. आणि ते कुणाच्याही पारड्यात असू शकते . सर्वसमावेशक असु शकते ती तडजोड. परिणामांचा विचार करुन दाखवलेल्या समंजसपणाला न्याय कसे म्हणावे>>
उद्या सत्य समोर आल्याने बाबरी मशिद पाडल्याच्या क्रिमीनल केस मधे अडवाणींना शिक्षा झाली तर तिथेही 'शुद्ध' न्यायच व्हावा की.....

"सर्वसामान्य माणसालाही तिथे राम जन्मला होता अगर नाही, तिथे मशीद होती अगर नाही, त्यावरून कोणी कोणास काय काय केले ह्या सर्वाशी आता देणेघेणे उरलेले नाही"
हो पण सर्वसामान्य माणसाला आवाज नसतो, ज्यांना असतो त्यांच्या तोंडी वेगळेच शब्द असतात. हा वाद चिघळत ठेवण्यात सामान्य भारतीयाला
जराही रस नाही. पण अशा वादावरच ज्यांनी पोसले जायचे अशा (दोन्हीकडच्या) लोकांना मात्र तो संपायला नकोय.
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेउन ना नाचा
करा पदस्थल त्यांचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा
विंदांच्या या ओळी प्रत्येक वेळी आठवतात.

इथे लिहणारे सर्वजण,

कुणालाच काही घेणेदेणे नव्हते तर येव्हड्या मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया कश्या ? अयोध्या वाचल की प्रतिक्रिया द्यायला नको होत्या.

हा न्याय आहे का तडजोड की आणि काही या फंदात पडायची सामान्य भारतीय माणसाची आज इच्छा आणि तयारी आहे का? याचा कानोसा घेतला बहुमताने हेच दिसून येईल की लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आणि त्यांना या सगळ्याच प्रकाराचा कंटाळा आला आहे.
>> moreover अश्विनीमा. ने ,म्हंटल्याप्रमाणे आताची तरुण पिढी स्वत:च्या आयुष्याच दर्जा सुधारण्यामधे जास्त interested आहे. त्या अयोध्यतल्या जागेच्या प्रश्नापेक्षा माझा नवीन फ्लॅट,त्यातले फर्निचर मला जास्त महत्वाचे वाटते.
आमच्या मुलाम्चे शिक्षण ,आमची नोकरी,म्हातारपणी आमचे आर्थिक स्वावलंबन हे आमच्यासाठी जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत्.त्यामुळे >>पण अशा वादावरच ज्यांनी पोसले जायचे अशा (दोन्हीकडच्या) लोकांना मात्र तो संपायला नकोय.>>अशा लोकांना आता फार पाठीराखे मिळणार नाहीत.

कुणालाच काही घेणेदेणे नव्हते तर येव्हड्या मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया कश्या ? >> कारण सरळ आहे लोकांना सगळीकडे शांतता नांदली ,अनुचित प्रकार घडला नाही ह्याचा आनंद व्यक्त करायचा होता.

राष्ट्रहित म्हन्जे नक्की काय अभिप्रेत आहे तुम्हाला योग ?

आगाऊ, आर्क, अकु सगळ्यांची मतं खुप संयत आणि पटणारीच आहेत. पण ते शुद्ध न्याय आणि योगच्या 'राष्ट्रहीतापूढे कायदा प्रथम अन श्रध्धा नंतर हेच तत्व असायला हवे.' , ह्या संदर्भाने काश्मिरात ३७० चं काय करावं हाही प्रश्नच आहे.

बाकी सगळं छान चाल्लय.

>>राष्ट्रहित म्हन्जे नक्की काय अभिप्रेत आहे तुम्हाला योग ?
राष्ट्राचं हीत.
विषय मोठा आहे वेगळा बा.फ. काढावा..

. पण अशा वादावरच ज्यांनी पोसले जायचे अशा (दोन्हीकडच्या) लोकांना मात्र तो संपायला नकोय.
अगदी !
आर्क,
अगदी शंभर टक्के अनुमोदन. या निकालानंतर काहीही दंगा झाला नाही याचा मलाही फार आनंद झाला.

ह्या संदर्भाने काश्मिरात ३७० चं काय करावं हाही प्रश्नच आहे.

हा वेगळ्या बीबी चा विषय होईल.

तिथे खरेच एखादी शाळा, बगिचा ,दवाखाना किंवा स्टेडियम व्हावे असे मला वाटते. तिथे मंदिर बांधले तरीही त्या मंदिरात संगमरवरी खांब, चांदीची घंटा, सोन्याची मूर्ती, सारे काही असेल पण राम नसेल. शबरीची उष्टी बोरे खाणारा, निषादाशी मैत्री करणारा दिलदार राम अडीच एकरच्या तुकड्यासाठी हुज्जत घालेल काय?

Koenraad Elst, David Froवley, Francois Gauthier वगैरे हे हिंदुत्वावादी आणी विहिंप चे समर्थक आहेत. त्यांना इतिहासकार म्हणणे धाडसाचे आहे. त्यांच्याकडून समतोल लिखाणाची अपेक्षा नाही पण त्यांच्याच लेखात.

Instead, they went so far as to deny the well-established fact that the mosque had been built in forcible replacement of a Rama temple.

हे विनोदी वाक्य आहे.

या वाक्यात विनोदी काय आहे?

तुम्हाला हे वाक्य विनोदी वाटत असेल, परंतु ३० सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने बहुमताने हे वाक्य सत्य म्हणून स्वीकारले आहे. तुमचा न्यायालयावरसुद्धा विश्वास नसेल तर मग सोडून द्या.

>>> Koenraad Elst, David Froवley, Francois Gauthier वगैरे हे हिंदुत्वावादी आणी विहिंप चे समर्थक आहेत. त्यांना इतिहासकार म्हणणे धाडसाचे आहे. त्यांच्याकडून समतोल लिखाणाची अपेक्षा नाही पण त्यांच्याच लेखात.

रोमिला थापर, इरफान हबीब वगैरे निधर्मान्धांना इतिहासकार म्हणले तर चालेल ? त्यांच्याकडून नक्कीच समतोल लिखाणाची अपेक्षा असेल.

ही गोष्ट न्यायालयीन प्रक्रिया, कायदा, पुराव्या याच्या पलीकडची आहे हे सगळेच पक्ष मान्य करताना दिसातहेत (काही निकालापूर्वी, काही निकालानंतर!)

>> अनुमोदन भरत.

शबरीची उष्टी बोरे खाणारा, निषादाशी मैत्री करणारा दिलदार राम अडीच एकरच्या तुकड्यासाठी हुज्जत घालेल काय >>>

विषयात गल्लात होते आहे. राम भांडत नाहीये. रामाला काय चाल्ले आहे हे पण माहित नाही / नसावे. Happy पण एखादा व्यक्ती राष्ट्रपुरुष वा देव म्हणून स्विकारला की त्याच्या रिलेटेड असणार्‍या सर्व स्थानांना महत्व प्राप्त होते. अयोध्येत तो जन्मला म्हणून अयोध्येच्या त्या जागेला महत्व आहे, नाही तर लोक जामा मशिद तोडा, तिथे राम जन्मला असे म्हणत फिरले असते. वा उलट म्हणायचे तर हजरतबाल दर्ग्यालाच का महत्व? सोलापुर मधिल वळचणीच्या मशिदीला तेवढे महत्व का प्राप्त नाही? कारण परत तेच स्थान महात्म्य. अन्यथा गंगा प्रत्येकाच्या घरी नळातून येतेच की, मग पूर्ण बुद्धिप्रामाण्यवादी विचार करुन अस्थिविसर्जन तिथे होऊ शकते का? पण करतो का? नाही ना? स्थानमहात्म!!

तस्मात ती जमीन होती तिची वाटनी झाली हे म्हणत आहेत हे काही केल्या पटत नाही, कारण "राम तिथे जन्मला" ही भावना, श्रद्धा कायम आहे व राहणार. भले तुम्ही, इतर, ते आणि काही राम नव्हताच असा आग्रह धरला तरी ते भारतीय लोकांना पटणार नाही, अगदी फ्लॅट मधील व कार चालवणार्‍यांना पण. ते भले दंगे धोपे करत नाहीत पण त्यांचे लक्षच नाही असे म्हणने उचित नाही, मी कधीही दंगली केल्या नाही, पण माझेही लक्ष होते, इथे अनेकजन लिहित आहेत त्यांचेही लक्ष आहेच.

पण अशा वादावरच ज्यांनी पोसले जायचे अशा (दोन्हीकडच्या) लोकांना मात्र तो संपायला नकोय >> एक्सॅटली म्हणून तो वाद संपलेला बरा. भिजत घोंगड नका ठेवू अशी भुमिका मी घेतली आहे. कोणालाही दंगली परत नकोत. पण कोणालतरी त्याग करावा लागणार.

विकुंनी मग हिंदूंनी करावा असे उत्तर दिले होते - पण त्याचे उत्तर मी वर स्थानमहात्म्य मध्ये दिले आहे असे वाटते. काय आहे की बुद्धिजीवी जसे विचार करतात तसे सामान्य जनता करत नाही हे बुद्धिजीवींच्या लक्षात येत नसते. त्यांना (सामान्य) केवळ स्थान महत्वाचे असते. म्हणून दवाखाना, निसर्गोपचार ब्ला ब्ला हे तिथे होऊ शकत नाही.

माझा रोख तो मुद्दा इथेच २०१० मध्ये संपवावा असा आहे, माझी मत तुम्हाला मान्य व्हावीत असे अजिबात नाही. पण तुम्हा पेक्षा वेगळी मत नोंदवली म्हणजे मी अतिरेकी असेही नाही! हे लक्षात घेउन प्रतिक्रिया द्यावी.

तुम्हाला हे वाक्य विनोदी वाटत असेल, परंतु ३० सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने बहुमताने हे वाक्य सत्य म्हणून स्वीकारले आहे.

अजाणतेपणे ( कि जाणून बुजून ?) तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करताय असे नाही वाटत? तिथे असलेले रामाचे मंदिर बळजबरीने पाडून मशीद बांधली असे न्यायालयाने म्हणलेले नाही.

आहे की बुद्धिजीवी जसे विचार करतात तसे सामान्य जनता करत नाही

म्हणजे ? सामान्य जनता बावळट असते की काय ? सामान्य जनतेला दोन वेळच्या भाकरीची पडलेली असते. अशा प्रश्नांवर भांडून देशाचा वेळ वाया घालवतात ते "गर्व से कहो" किंवा "इस्लाम खतरेमे" वालेच.

पण एखादा व्यक्ती राष्ट्रपुरुष वा देव म्हणून स्विकारला की त्याच्या रिलेटेड असणार्‍या सर्व स्थानांना महत्व प्राप्त होते.
कुणी स्विकारले ? कधी ? कोणत्या वटहुकुमाद्वारे ?

कारण "राम तिथे जन्मला" ही भावना, श्रद्धा कायम आहे व राहणार.

कुणाची ? आणी काही मोजक्या लोकांच्या श्रद्धेवरून न्यायलये निर्णय द्यायला लागली तर देश सतराव्या शतकात जाईल.

खर्‍या रामभक्तांना या धुमाळीत काडीचाही रस नाही.

म्हणजे ? सामान्य जनता बावळट असते की काय >>> चला मग हॉस्पीटल, एअरपोर्ट, बसस्टॅन्ड, बगीचा असे बांधन्यासाठी सत्याग्रह करु. बघुया किती जन ऐकतात ते.
ते वाक्य विषय-जागा ह्याशी निगडीत आहे. आउट ऑफ काँटेक्स्ट घेतले तर अजून मजेशीर अर्थ मी पण काढू शकतो. कारण त्याचा अगदी पुढे "स्थान महत्वाचे" हे वाक्य पण आहे. Wink

सामान्य जनतेला दोन वेळच्या भाकरीची पडलेली असते >>> विचार केला तर अतिशय भलामन करणारे वाक्य आहे. जसे "इस्लाम खतरेमे" किंवा "गर्व से क"हो मध्ये आर्त पुकारा आहे तसाच स्वतःला वेगळे समजणार्‍या लोकांची ही एक आर्त हाक आहे. खरे तर भाकरी प्रत्येकाला मिळते. कष्ट करणे किंवा न करणे ही प्रत्येकाची वैयक्तीक चॉईस असते. कष्ट करणारा नेहमी पुढेच जातो.

हा विषय इथे अवांतर आहे, वाटल्यास ह्यावर दुसरीकडे ही हाक पण कशी भावनीक आहे ह्या बद्दल बोलू.

बाकी माझ वैयक्तीक म्हणाल तर मंदीर असो की नसो की फरक पैंदा? असो. आज मंदीर नाही तर मग काय राम जन्मलाच नाही?

राष्ट्रपुरुष वा देव म्हणून स्विकारला की त्याच्या रिलेटेड असणार्‍या सर्व स्थानांना महत्व प्राप्त होते.
कुणी स्विकारले ? कधी ? कोणत्या वटहुकुमाद्वारे ? >>>

राम हा बहुतांश हिंदूंचा देव आहे हे कदाचित आपल्यास ज्ञात नसावे वा ज्ञात असल्यासही मान्य करायचे नसावे.

कधी ? >>> अनेक शतकांपासून.
राम हा देव आहे, राहणार. त्याला वटहुकूम लागत नाही.

कारण "राम तिथे जन्मला" ही भावना, श्रद्धा कायम आहे व राहणार.
कुणाची ? >>> लोकांचीच. Happy

परत गल्लत होते आहे. पोलिटिकली वापर करुन घेणे हा मुद्दा एक क्षण बाजूला ठेवा अन विचार करा. तिथे जमलेले सर्वच लोक (काही लाख) अतिरेकी होते का? ज्यात स्त्रिया वृद्ध सर्व होते. शिक्षित/ अशिक्षित वगैरे. सर्व तिथे भाजपा मुळे गेले नाहीत तर श्रद्धे मुळे ( सामान्य लोकांच्या) गेले.

तुम्ही त्यांचा पोलिटिकली वापर केला म्हणा, आक्षेप नाही कारण तसेच झाले, पण लोकांची श्रद्धा नाही असे नका म्हणू. हजारो वर्षे आता राम अयोध्येत जन्मला असा प्रचार झाला हे म्हणा, चालेल पण आता लोक राम अयोध्येत जन्मला हेच माणून चालतात.

थोडक्यात रुट कॉजचा विचार करा. गर्व से कहो लोकांना का आवडले? तुम्हीच वर म्हणाला सामान्य जनता बावळट नसते. तर लाखो लोक बावळट होते का?

असो राम आहे की नाही, देव असतो वा नसतो, तिथेच जन्मला का? ह्या चर्चेत मला स्वारस्य नाही.

विकू,
हा प्रश्न आज/भाजप निर्माण झाल्यावर झालाय असं वाटतय का तुम्हाला?

अयोध्येमधेच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी मंदिर पाडून मशिदी बांधल्या गेल्या हे सत्य आहे.
अगदी काशीविश्वेशराचं देऊळ पाडून तिथं ग्यानवापी मशीद उभारली - हेही मुस्लिम राजदरबारातल्या नोंदीमधे (मसिरी आलमगीरी?) आहे. काशीला गेलात तर नंदीचं तोंड कुठे आहे ते ही पहा (नंदी मशिदीकडे तोंड करून कसा बुवा उभारला असेल?)
(आता ती राणीची कथा देऊ नका प्लीज!)

अयोध्येचच उदाहरण द्यायचं झालं तर हनुमानगढी वरून झालेले स्वातंत्र्यपूर्व दंगेही तुम्हाला माहित असतीलच.

आम्ही काही आज त्या करता पुन्हा मारामार्‍या करा , असं म्हणत नाहीये, पण इतिहास पूर्वग्रहाशिवाय तुम्हीही बघत नाहीये.
जसे तुम्हाला हिंदुत्त्ववाद्यांचे विचार एकांगी वाटतात, तितकेच 'सो कॉल्ड सेक्युलर' लोकांचे विचारही एकांगी नाहीत ना ते तपासून पहा.
सेक्युलर असणं म्हणजे अल्पसंख्य गटाच्या बाजूचं असणं असं नसावं!

जसे तुम्हाला हिंदुत्त्ववाद्यांचे विचार एकांगी वाटतात, तितकेच 'सो कॉल्ड सेक्युलर' लोकांचे विचारही एकांगी नाहीत ना ते तपासून पहा.
सेक्युलर असणं म्हणजे अल्पसंख्य गटाच्या बाजूचं असणं असं नसावं!<<<<<<<<<<<<<<<<<< यु सेड इट नानबा

काय आहे की बुद्धिजीवी जसे विचार करतात तसे सामान्य जनता करत नाही हे बुद्धिजीवींच्या लक्षात येत नसते. त्यांना (सामान्य) केवळ स्थान महत्वाचे असते. म्हणून दवाखाना, निसर्गोपचार ब्ला ब्ला हे तिथे होऊ शकत नाही.
>> मी सामान्य आहे, मला स्थान महत्वाचे आहे पण अयोध्येतले /मंदीरांचे नाही. माझ्या फ्लॅटचे. जिथे पाणी टंचाइ जाणवत नाही , झोपडपट्टी नाही असा area हवा मला.हिंदुंविषयी प्रेम असेल तर विहिपवाल्यांनी माझ्यासारख्या सर्व हिंदुना प्रभातरोडवर फ्लॅट घेउन द्यावा.सामान्यांच्या नावाखाली तुमचा agenda खपऊ नका.

.हिंदुंविषयी प्रेम असेल तर विहिपवाल्यांनी माझ्यासारख्या सर्व हिंदुना प्रभातरोडवर फ्लॅट घेउन द्यावा
>> सॉरी आर्क - पण पाणी, ईलेक्ट्रिसिटी, शिक्षण आणि आरोग्य हे म्हणालात तर समजू शकते.

सामान्यांच्या नावाखाली तुमचा agenda खपऊ नका.

>> एक्स्युज मी, तुम्ही एक जन आहात. लाखो नाही. कृपया स्वतःला सर्वांसोबत मोजू नका. प्लॅट घ्या, आरामात राहा. खरेतर आपण इथे वाचून उगाच त्रास करुन घेत आहात.

आणि हा माझा अंजेडा आहे हे कोणी सांगीतले तुम्हाला?? आपण वर लिहलेले वाचलेले दिसत नाही. मला स्वत:ला तिथे मंदीर झाले काय न झाले काय ह्याच्याशी घेणेदेणे नाही. पण मी वैयक्तीक मत आणि इतरांचे मत हा फरक करत असतो. फक्त इथेच २०१० मध्ये काय तो निकाल लावावा.

तुमचा अंजेडा काय आहे तो माहित नाही पण एक सामान्य भारतीय म्हणून मला पुढे ह्याच विषयावर दंगा, निकाल अन त्यामुळे सामान्य भारतीयांमध्ये टेन्शन असे काही नको आहे. मी शेअर मार्केट मध्ये थोडेफार काम करतो, निदान १०० मेल माझ्यासारख्या अतिसामान्य ट्रेडरला आल्या की काय रे काय होईल? मला हे टेन्शन नको आहे. हेच त्या दिवशी काम करणार्‍यांबाबतीत पण असेल.

हिंदुंविषयी प्रेम असेल तर विहिपवाल्यांनी माझ्यासारख्या सर्व हिंदुना प्रभातरोडवर फ्लॅट घेउन द्यावा.सामान्यांच्या नावाखाली >> प्लिज मांईड युवर लँग्वेज!

माझे प्रेम कोणा विषयी असावे हे ठरविन्याचा अधिकार तुम्हास कोणी दिला?

कृपया वैयक्तीक शेरेबाजी नको. मी इथे व्यक्ती आहे, क्कुठल्याही संघटनेचा पुरस्कर्ता नाही. निदान ह्या बाफवर तर नाहीच नाही. माझी इतर मत कृपया मध्ये आणू नयेत हे मी आधीही लिहले आहे. मी फक्त एक भारतीय म्हणून ह्या इश्यु कडे पाहत आहे. तुमचे व माझे मत वेगळे असू शकते. प्लिज रिस्पेक्ट आदर्स व्हियू. दॅट इज ह्युमन ट्रेट!!

झोपडपट्टी नाही असा area हवा मला >>> हे अत्यंत निषेधार्य वाक्य आहे. झोपडपट्टीत पण माणसेच राहतात. आणि ती सामान्य असतात. आणि आपण मला सामान्यांबद्दल सांगताय!!

>>>>> तिथे मंदिर बांधले तरीही त्या मंदिरात संगमरवरी खांब, चांदीची घंटा, सोन्याची मूर्ती, सारे काही असेल पण राम नसेल. शबरीची उष्टी बोरे खाणारा, निषादाशी मैत्री करणारा दिलदार राम अडीच एकरच्या तुकड्यासाठी हुज्जत घालेल काय? <<<<<
प्रचण्ड हसलो या वाक्यावर Happy अहो विकु, ते हिन्दुत्ववादी नुस्त्या रामाला वेठीला धरतात असा बर्‍याच जणान्चा आक्षेप आहे, पण तुम्ही तर रामाबरोबर शबरी, निषाद इत्यादीन्नाही वेठीला धरले की! Proud
नशिब आमचे की अजुन वाली-सुग्रिव उदाहरणात सुग्रिवाचीच बाजू का घेतली रामाने असे म्हणणारे इथे उगवले नाहीयेत Lol
बाकि, या मजकुरावरुन तुम्ही "रामाचे" अस्तित्व आज २०१० मधेही मान्य करता आहात, त्याला काय वाटत असेल्/नसेल याची काळजी वहातात हे समजुन बरे वाटले Wink

केदार अनुमोदन.(आजकाल आपली मते जुळून यायचा योग वारंवार यायला लागलाय!)
न्यायालयाच्या निर्णयाने न्याय/कायदा या बाबतीत चुकीचा पायंडा पडला असेल(तो जमिनीच्या मालकीचा सामान्य वाद होता असे मानले तर), पण स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक स्वागतार्ह सौहार्दपर्व सुरू होण्याची वाट खुली झाली हे नक्कीच.
हे काही लेख
http://www.indianexpress.com/news/from-somnath-to-ayodhya/691692/
No less a person than Dr Babasaheb Ambedkar, in his book Pakistan or The Partition of India, has written about Mahmood Ghazni’s repeated attacks on the Shiva temple in Somnath. Quoting Al’Utbi, an Arab historian, Ambedkar writes: “He (Mahmood Ghazni) demolished idol temples and established Islam. He then returned home and promulgated accounts of the victories obtained for Islam...and vowed that every year he would undertake a jihad against Hind.”

The sagas of Somnath and Ayodhya are interlinked in many instructive ways. If the decks are now cleared for the reconstruction of the Ayodhya temple by a judicial verdict, the Somnath temple was rebuilt after Independence as per a decision taken by Jawaharlal Nehru’s cabinet. It was inaugurated in 1951 by Dr Rajendra Prasad, India’s first President. Notably, Gandhiji had blessed the reconstruction of Somnath, which was a pet project of Sardar Vallabhbhai Patel. : सुधींद्र कुलकर्णी

http://www.indianexpress.com/news/a-time-to-let-history-go/691695/
तवलीन सिंघ

http://www.indianexpress.com/news/insaf-ka-mandir/691694/:मेघनाद देसाई

http://www.indianexpress.com/news/the-india-verdict/691395/ :शेखर गुप्ता

ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. जे दोघांनाही मानत नाहीत, त्यांच्यासाठी पण 'तिथे' एक शिलालेख ठेवण्यापुरती जागा द्यावी, किंवा मानवमंदिर बनवावे.

Pages