काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms
आगाऊ..मलाही आनंद झाला निकाल
आगाऊ..मलाही आनंद झाला निकाल वाचून.नंतर उगीच एक (कु)शंका चुकचुकली रे मनात
असं तर झालं नसेल ना.. कॉमन वेल्थ गेम्स च्या इतक्या प्रचंड भानगडी चालल्यात पण,विपक्षी पार्टी (पहिल्यांदा) मूग गिळून गप्प बसलीये.हे जरा अविश्वसनीय वाटत नाही?? का त्यांना काँग्रेस ने प्रॉमिस केले असेल कि या प्रकरणावर तुम्ही गप्प बसा ,याच्या बदली बाबरी चा निकाल तुमच्याकडून लावतो..
oops!! u scratch my back and I scratch yours..
क्या बोल्ता है आगाऊ???
भारताच्या न्यायव्यवस्थेवरचा
भारताच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. अश्या निकालाने भारतातील दोन जातींमधला सलोखा राखण्यास मौलाचा सहभाग आहे ह्या बद्दल खरोखर आभार. भारतातील सर्वात मोठा प्रश्न असेल तो दहशतवाद, आता त्यावरही अशीच एकोप्याने मात करावी एवढीच ईच्छा.
दहशतवादाला.. कुठलाच रंग नसतो.
काल संध्याकाळी रस्ते सुनसान
काल संध्याकाळी रस्ते सुनसान होते. बसेस रिकाम्या होत्या. दंगल होईल काय ही भिती सर्वसामान्यांच्या मनात होती. न्यायालयाच्या आदेशाच पालन करण्याची मानसिकता अद्याप यायची आहे.
हा निकाल येण्यासाठी श्री कल्याणसिंगांना त्या वास्तुच्या संरक्षणाच प्रतिज्ञापत्र द्याव लागल होत कारण काल पर्यत ती वास्तु मशीद होती.
साध्या कारसेवेची मागणी करणार्या कारसेवकांना वादग्रस्त वास्तु सोडुन उर्वरित भाग ज्याला सिताकी रसोई किंवा अन्य नावाने संबोधले जाई या ठिकाणी कारसेवाकरण्यास परवानगी देण्याचा निकाल आधी २ डिसेंबर, मग ५ डिसेंबर, मग ११ डिसेंबर १९९२ ला पुढे ढकलण्यात आला.
यामुळे जमलेले हजारो व्यथीत कारसेवकांनी तो ढाचा तोडला. तो तोडला नसता तर तेथे उत्खनन होऊ शकले नसते व आजचा निकाल ही येऊ शकला नसता.
हा निकाल येण्यासाठी हिंदुंना काही बेकायदेशीर गोष्टी कराव्या लागल्या.
हे आंदोलन जगाच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहावे असे आहे. आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वयंस्फुर्तीने भाग घेतला.
ह्या आंदोलनाने अनेक सरकारे आली आणि पडली देखील. भारतात प्रभावी विरोधी पक्षाची कमतरता होती ती भाजपाच्या रुपाने भरुन निघाली.
माझ्या सारखे या आंदोलनात भाग घेतलेले अनेक कार्यकर्ते काल भेटले. याची देही याची डोळा ते भव्य दिव्य राममंदीर व्हाव अशी आशा प्रत्येकाने व्यक्त केली.
एक पाउल पुढे पडले आहे आता मंदीर दुर नाही. हे सर्व याच साठी की परकियांच्या आक्रमणांच्या खुणा पुसण्यासाठी. हि. हिंदु सर्वसमावेशक संस्कृती जपण्यासाठी.
निकाल लागला. तीन तुकडे
निकाल लागला. तीन तुकडे झाले...
पण हे प्रकरण इथे संपणार नाही......अनफॉर्च्युनेटली... यात काहितरी खटकतय ...
वर्षू नील , बहुदा CWG चा
वर्षू नील , बहुदा CWG चा भोंगळ कारभार अगदी सामान्यव्यक्तिला सुद्धा डोळ्यांनी दिसतो आहे. अन त्यावर उगाच देशांतर्गत वाद वाढवून भारतासारख्या देशाची बदनामी संपुर्ण जगात होईल. तेव्हा त्या वादावर निदान गेम्स होईपर्यंत ती जास्त वादग्रस्त चर्चा टाळण्यासाठी हे सगळं असावं.
oops!! u scratch my back and I scratch yours.. >>> हे जर खरं असेल तर ती खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याच पैश्यांनी आपलाच देश आपल्याच लोकांनी गहाण ठेवला असच म्हणावं लागेल.
>१९९२ पासून आजपर्यंत आपण देश
>१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
हे सर्वात महत्त्वाचं. अभिनंदन खरंच!!! पण हे टिकुन रहाणं आणखी महत्त्वाचं.
समजा शेजारी शेजारी मंदिर-मस्जिद बांधली, तर ते चांगलं का वाईट हे मात्र मला समजत नाही.
चांगली-वाईट दोन्ही उदाहरणं आहेत.
त्याचबरोबर जवळजवळ सर्वच
त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.
---- जनता बंद, दंगे, धोपे, स्फोटे यांना कंटाळलेली आहे, त्यांना या विषयांत रस राहिलेला नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे, कितीही जोराने आरोळी दिली तरी जनता मागे येणारच नाही. हिच वेळ आहे जो काही निकाल आहे त्याचे स्वागत करण्यासाठी व आपण जिंकलो म्हणवुन आपलीच पाठ थोपटण्यासाठी.
काहिंना सर्व काळ मुर्ख बनवता येते, सर्व जनतेला काही काळ मुर्ख बनवता येते पण सर्व जनतेला सर्वकाळ मुर्ख बनवता येत नाही त्याचे प्रत्यंतर.
श्रीरामांचे अभिनंदन - कोर्टाने जन्म झाल्याचे मान्य केले.
नितीनजी निदान आजच्या दिवशीतरी
नितीनजी निदान आजच्या दिवशीतरी कारसेवेचे समर्थन करणे सोडा. जुनी कटुता आणि वैर विसरुन नवी सुरुवात करण्याची संधी आली आहे ती घालवू नका.
वर्षू, कॉमनवेल्थ्मधला भ्रष्टाचार आणि हा वाद यांची तुलनाच होऊ शकत नाही, आणि हे सरकार भ्रष्टाचारात इतके निर्लज्ज आहे की तेवढ्यासाठी असले काही बार्गेन ते करणार नाहीत
सुक्या.. पण पोलिटिकल पार्ट्या
सुक्या.. पण पोलिटिकल पार्ट्या इतक्या समजूतदार पणे वागतील अशी आशा वाटत नाही..अनलेस त्यांना काही गाजरं दाखवून ठेवली असल्यास
देशाच्या बदनामी ची कोणाला पर्वा आहे..संपूर्ण दुनियेसमोर उघडा पडलाय आपला देश.. नाचक्की होतेय सर्वत्र.. बीबीची,सीएनएन ,प्रत्येक विदेशी चॅनल्स चे न्यूज सांगणारे लोकं उपरोधिक शब्दात भारताची न्यूज देतायेत्..अजून किती अपमान होणारे???
आमच्याकडल्या कामवाल्या बायांना सुद्धा इथ्यंभूत कहाणी ,त्यांच्या टीवी वरून समजत आहेत..
अब कौनसी और दुनिया बाकी है सुकी..
ऑलरेडी पितळ उघडं पडलय रे
आणी परदेशात राहात अस्ताना कुणी आपल्याला आपल्या देशाबद्दल असे प्रश्न विचारले कि किती एम्बरेसिन्ग अस्तं काय सांगू.. मान खाली जाते उत्तर देताना
नितीनजी. आगाऊला अनुमोदन.
नितीनजी.
आगाऊला अनुमोदन.
जुनी कटुता विसरा कृपया.
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
---- तसे खरोखरच असेल तर मला अतिशय आनंद होईल. पण मला जनता प्रगल्भ झाली आहे असे अजिबात वाटत नाही. जनता अतोनात कंटाळली होती, आणि सर्व अडकलेल्यांना सन्माननीय तोडगा हवा होता जेणे करुन बाहेर (honourable exit) पडता यावे.
आगाऊला अनुमोदन. नि३ जी .. जान
आगाऊला अनुमोदन. नि३ जी .. जान बचे तो लाखो पाए, अन जान बचाई तो करोडो पाए.. अगदी असा आनंद साजरा करायला हवा आता.
नाही आगावा, हे एव्हढे सुरळीत
नाही आगावा, हे एव्हढे सुरळीत पार पाडण्याएव्हढी प्रगल्भता राजकारण्यांना यायची आहे. यात काहितरी काळेबेरे आहे हे निश्चित..
असो, जे काही शांत व समंजसपणे घडलेय त्यासाठी सरकार अभिनंदनास पात्र आहे ह्यात दुमत नसावे.
आगाऊ, उत्तम लिहिलं आहेस. काल
आगाऊ,
उत्तम लिहिलं आहेस.
काल प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या संयमाचंही कौतुक करायला हवं.
न्यायालयाने अत्यंत समंजस आणि
न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे.>>> अगदी खरं... खरं तर असाच काहीसा निकाल अपेक्षीत होता.. कोणा एकाच्या बाजुने निकाल दिला असता तर कठीण परिस्थिती नक्कीच उद्भवली असती हे सगळ्यांनाच माहीत होतं...
राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश>>>> या निकालातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी..
दहशतवादाला.. कुठलाच रंग नसतो.>>> अनुमोदन.. दहशतवादाचा रंग फक्त लाल...
हा निकाल येण्यासाठी हिंदुंना काही बेकायदेशीर>>> नि३ प्रतिसाद अर्धवट राहिला आहे का?
पण हे प्रकरण इथे संपणार नाही......>>> लाजो अगदी खरं ग..
श्रीरामांचे अभिनंदन - कोर्टाने जन्म झाल्याचे मान्य केले.>>> हे म्हणजे आता श्रीरामांनाही birth certificate मिळाल्यासारखं आहे
काही का असेना, कालचा दिवस मात्र सुरळीत पार पडला...
निकाल आणी त्यावरची संयमीत
निकाल आणी त्यावरची संयमीत प्रतिक्रिया दोन्हीही स्वागतार्ह ...
आपल्यापैकी कोणी यात तज्ञ असल्यास वा या निकालपत्राचा अभ्यास केला असल्यास राम जन्माचे स्थान हेच आहे असे न्यायालयाने कशाच्या आधारे मान्य केले हे सांगू शकेल काय ? कारण रामायण घडले हे न्यायालयात सिद्ध करणेच खूप अवघड आहे असे मला वाटत होते .
पण मला जनता प्रगल्भ झाली आहे
पण मला जनता प्रगल्भ झाली आहे असे अजिबात वाटत नाही. जनता अतोनात कंटाळली होती, आणि सर्व अडकलेल्यांना सन्माननीय तोडगा हवा होता जेणे करुन बाहेर (honourable exit) पडता यावे.>>> अगदी
हे एव्हढे सुरळीत पार पाडण्याएव्हढी प्रगल्भता राजकारण्यांना यायची आहे. यात काहितरी काळेबेरे आहे हे निश्चित..>>> असणारच... पण ह्या बाबतीत जनतेचा रोष ओढवुन घेण्यात आपलं भलं नाहिये हे कदाचीत राजकरण्यांना उमगलं असावं..
आगाउ सगळ्यांच्या मनातले
आगाउ सगळ्यांच्या मनातले बोललात.
ही खालची लिंक फक्त नितीन यांच्यासाठी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms
@नितीन
सगळे शांत आहे ह्याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? तुमच्य प्रतिक्रियेवरुन वाटत नाही तसे.
नितीन, रास्त वास्तव मान्डले
नितीन, रास्त वास्तव मान्डले आहेत तुम्ही
>>>>का त्यांना काँग्रेस ने प्रॉमिस केले असेल कि या प्रकरणावर तुम्ही गप्प बसा ,याच्या बदली बाबरी चा निकाल तुमच्याकडून लावतो..>>> असं झालं असण्याची शक्यता आहे.. शेवटी सामोपचार (??) यालाच म्हणत असतील.. पण फक्त कॉमन वेल्थ गेम्स च्या यशाकरता असं झालेलं नसणार.. एकतर्फी निकालात कोनाचच भलं होणार नाही असं जाणवल्यामुळेच काँग्रेस आणि विरोधी पक्षात सामोपचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही... <<<<<
या सम्पुर्ण मजकुरामधे "न्यायलयाच्या न्याय देण्याच्या कुवतीवरच" अप्रत्यक्षपणे शन्का घेतली जात आहे असे नाही वाटत कुणाला? असे म्हणायचेय का तुम्हाला की "राजकीय पक्षान्नी" न्यायाधीश म्यानेज केले अन तसा तो निकाल दिला गेला? वरल्या मजकुरातून अर्थ तर तसाच ध्वनित होतोय व तो तसा असेल तर न्यायालयाचा अवमान करणारा आहे.
सबब, प्रत्येकानेच, एरवीच्या कम्पुमधल्या बोलबच्चन गप्प्पान्मधला प्रचारात्मक व "शब्दशः काहीही मजकुर" इथे वा कुठेही लिखीत स्वरुपात उतरविताना काळजी घ्यावी असे वाटते!
बाकी तुमचे चालूद्यात
सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रिम
सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रिम कोर्टात अपिल करणार आहे. म्हणजे तीन महीन्यानंतर पुन्हा जैसे थे..!!!
या सम्पुर्ण मजकुरामधे
या सम्पुर्ण मजकुरामधे "न्यायलयाच्या न्याय देण्याच्या कुवतीवरच" अप्रत्यक्षपणे शन्का घेतली जात आहे असे नाही वाटत कुणाला?........ इथे वा कुठेही लिखीत स्वरुपात उतरविताना काळजी घ्यावी असे वाटते! >>> अनुमोदन
आगाऊ, छान लिहिलंयस,
आगाऊ, छान लिहिलंयस, अनेकांच्या मनातलं दोन्ही पार्टी अपील करणारेत म्हणे. ३ महिन्यांची मुदत आहे. ज्यांना निकाल अंशतःजरी खटकतोय त्यांनी जरुर अपील करावे आणि कायद्याकडेच दाद मागावी. कायदा हातात घेऊ नये.
श्रीरामांचे अभिनंदन - कोर्टाने जन्म झाल्याचे मान्य केले. >>>> उदय,
आपल्यापैकी कोणी यात तज्ञ असल्यास वा या निकालपत्राचा अभ्यास केला असल्यास राम जन्माचे स्थान हेच आहे असे न्यायालयाने कशाच्या आधारे मान्य केले हे सांगू शकेल काय ?>>> उत्खनन झाले ना? पण उत्खननात नक्की काय काय आढळले त्याची खरंच उत्सुकता आहे
वर्षू नील अगदी अगदी. काय
वर्षू नील
अगदी अगदी. काय करणार? आपलेच नाणे खोटे म्हणून जास्त काही बोलता येत नाही.
प्रिया
आणी परदेशात राहात अस्ताना
आणी परदेशात राहात अस्ताना कुणी आपल्याला आपल्या देशाबद्दल असे प्रश्न विचारले कि किती एम्बरेसिन्ग अस्तं काय सांगू.. मान खाली जाते उत्तर देताना<<< वर्षूताई... अगदी गं
अजुन डिटेल निकाल कुठे कळाला
अजुन डिटेल निकाल कुठे कळाला आहे.
त्यानंतर अजुन बोलता येइल.
सध्या तरी आगावु म्हणतो तस आपलच अभिनंदन. संयमित प्रतिसाद होता सर्वांचाच.
लिम्ब्याच्या पोष्टीला अनुमोदन. न्यायालयाचा अवमान होतोय अशी थेअरी माडण हे थोडस अडचणीत आणू शकेल.
काळजी घ्यावी.
कालच्या शांततेमागचे खरे कारण
कालच्या शांततेमागचे खरे कारण होते - It was Nobody's business. प्रत्येक पक्षाला असं वाटत होतं की दुसरा पक्ष काहीतरी करेल. कुणीतरी काहीतरी करेल मग आपण काहीतरी करु
माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरच्या एका प्रार्थनास्थळा मागे सध्या कुठलेही बांधकाम होत नसताना आणि नजिकच्या भविष्यकाळात होण्याची शक्यता नसताना (कारण सरकारी जमिन आहे) दोन दिवसांपुर्वीच एक दगडांनी भरलेला ट्र्क अकारण रिकामा करण्यात आलाय. आणि तेही सर्वाच्या देखत. चलता है ....
और चलताही रहेगा !
>>>>> न्यायालयाचा अवमान होतोय
>>>>> न्यायालयाचा अवमान होतोय अशी थेअरी माडण हे थोडस अडचणीत आणू शकेल. <<<<
झकोबा, अडचणीत येईल वा न येईल, पण केवळ मनात आल म्हणून ते जसच्च्यातस्स मान्डल असे होऊ नये, त्या मनातल्या उद्भवलेल्या मजकुरावर साधकबाधक/मागचापुढचा विचार करुन मगच लिहाव, खास करुन "मायबोली" सारख्या साईटवर तर नक्कीच, असनक्कीच,!
नैतर आहेच की आपलं "उचलली जीभ लावली टाळ्याला"
या सम्पुर्ण मजकुरामधे
या सम्पुर्ण मजकुरामधे "न्यायलयाच्या न्याय देण्याच्या कुवतीवरच" अप्रत्यक्षपणे शन्का घेतली जात आहे असे नाही वाटत कुणाला? >>>> अशी शंका घेण्याचे माझे प्रयोजन नव्हते.. पण जर त्यातुन असा अर्थही निघत असेल तर माफ करा.. प्रतिसाद एडिट करत आहे...
दोन दिवसांपुर्वीच एक दगडांनी
दोन दिवसांपुर्वीच एक दगडांनी भरलेला ट्र्क अकारण रिकामा करण्यात आलाय.
---- दगडा - दगडावर लिहीलेले असते (मार) खाणार्याचे नांव. सर्व कोरे करकरीत असतील.
कुणीतरी काहीतरी करेल मग आपण काहीतरी करु
---- नाही पटत... प्रतिक्रिया क्रिया घडायची वाट पहात नाही बसत. सर्व मसाला तयार असेल तर मग दंगल घडण्यास काही कारण लागत नाही.
लिंब्याभाऊ, प्रचंड अनुमोदन!
लिंब्याभाऊ, प्रचंड अनुमोदन!
Pages