काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms
आणि त्याचवेळेस हिंदूनी पैसे
आणि त्याचवेळेस हिंदूनी पैसे देउन जागा देऊन मोठी मशिद बांधावी हे लिहलंय ह्याला अनुल्लेख केला का?>>>>> अनुल्लेख आजिबात नाही, पण हाच तर मुद्दा नाही ना पटला. जागेवर उभ्या असलेली मशिद पाडून त्याच्यावर मंदिर बांधायचं आणि मुसलमानांनी मशिद दुसरीकडे बांधायची? हा कुठला न्याय आहे?
आणि पुरातत्व खात्याला कशा पायी प्रमाण मानायचं? त्यांचे काम पुर्वी इथे काय होतं हे सांगणे आहे, आता कशाला महत्व आहे ह्याचा निर्णय जनतेचा आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणुन कोर्टाचा आहे.
अरे का भांडताय ? निकालाचे
अरे का भांडताय ? निकालाचे अधोरेखीत मुद्दे आलेले आहेत. ते वाचताना दुसरा संदर्भ घेऊन वाचायचे असते. कोणत्याही निकालाचा इतका साधा आणि सोपा अर्थ नसतो. किमानपक्षी आपल्या सारख्या कायद्याचे पुर्ण ज्ञान नसलेल्या ( आपल्या पैकी कोणीही किमान वकील नाही असे मला वाटते. ) हातात निकाल नसताना त्याचे विश्लेषण होण्यापुर्वीच हे कसे काय लिहता ?
लिंबुजी तुम्हाला अनुमोदन. महात्मा गांधीनी असा निर्वाळा दिलेला आहे की किमान ३००० मंदीरे पाडुन तिथे मशिदी उभ्या आहेत व त्या मुसलमानांनी हिंदुंना परत द्याव्यात. एका तेजोमहालाच काय घेऊन बसलात.
मधुकर - अत्यंत अर्वाच्य
मधुकर - अत्यंत अर्वाच्य भाषा.. अशोभनीय आणि विकृत मनोवृत्तीची ... तुमचा तीव्र निषेध.
मधुकर अहो मित्रांशीही बोलताना
मधुकर अहो मित्रांशीही बोलताना लेका वगैरे संबोधन वापरलं जातं. त्यात निषेध करण्यासारखं काय आहे
तुम्हाला सगळीकडेच ब्राह्मण येऊन तुमच्याविरुद्ध कट करत आहेत असं का दिसतं
तुमचा निषेध करणार्यांपैकी सगळे ब्राह्मण आहेत हे छातीठोकपणे कसं म्हणता
खरंच अशी अर्वाच्य भाषा वापरायला नको होतीत. त्याबद्दल निषेध.
एका बाजुने निकाल लावायची
एका बाजुने निकाल लावायची हिम्मत आपल्या न्यायव्यवस्थेत नाहि याचे दुर्देव मानावे का कालच्या निकालाचे सुदैव हा प्रश्न आहे.
गणू. - पूर्ण निकालपत्र खूप
गणू. - पूर्ण निकालपत्र खूप मोठे आहे असे वाचले. पण पेपर्स च्या साईटवर जे थोडक्यात आले आहे त्यावरून असे वाटते की दोन्ही पक्ष तेथे फक्त आपली मालकी आहे हे सिद्ध करू शकले नाहीत. त्या जागेचा दोन्ही धर्माचे लोक बरीच वर्षे वापर करीत होते असे न्यायालयाला वाटले. त्यामुळे संयुक्त मालकी गृहीत धरून असा निकाल दिलेला दिसतो.
अजून काही प्रश्नः
सुप्रीम कोर्टाकडे ज्यांना जायचे आहे त्यांना किती मुदत असते?
आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाणार असे कोणी ठामपणे म्हणाले आहे का?
शाह बानो केस प्रमाणे सरकार काही कायदा करून हा निकाल त्यात override होईल असे काही करू शकते का?
तीन महिने मुदत. सुप्रीम
तीन महिने मुदत.
सुप्रीम कोर्टात जाणार असे दोन्ही बाजू, म्हणाजे सुन्नी वक्फ बोर्ड आणि रामजन्मभूमी न्यास- म्हणाले आहेत.
गणू. - पूर्ण निकालपत्र खूप
गणू. - पूर्ण निकालपत्र खूप मोठे आहे असे वाचले. पण पेपर्स च्या साईटवर जे थोडक्यात आले आहे त्यावरून असे वाटते की दोन्ही पक्ष तेथे फक्त आपली मालकी आहे हे सिद्ध करू शकले नाहीत. त्या जागेचा दोन्ही धर्माचे लोक बरीच वर्षे वापर करीत होते असे न्यायालयाला वाटले. त्यामुळे संयुक्त मालकी गृहीत धरून असा निकाल दिलेला दिसतो.
दोन्ही पक्ष तेथे फक्त आपली मालकी आहे हे सिद्ध करू शकले नाहीत तर अजुन संशोधन करायचे होते. एवढी कसली घाइ होती ? म्हणुनच म्हणले तसे.
किती मागे जावे इतिहासात ? पुरातत्वखात्याने अजुन खणले असते तर डायनासोर चे सांगाडे हि मिळाले असते. कसली कोणाची मालकी आणी कसले काय!
अपील करण्यासाठी मुदत असते, पण
अपील करण्यासाठी मुदत असते, पण ती मुदत एका छोटासा अर्ज केल्यास, सहसा माफ होते. त्यामुळे मुदत संपल्यावरही अपील करता येते.
पण इतक्या मोठ्या निकालपत्रात, अपील करण्याजोगे कुठले मुद्दे आहेत, आणि ते सिद्ध करण्यासाठी काय मुद्दे आहेत, ते बघायला हवे. (कदाचित श्रद्धेच्या आधारावर निर्णय दिला, हा मुद्दा होऊ शकेल)
त्यापुर्वी, या निकालाच्या अंमलबजावणीवर स्टे आणता येईल.
तसेच आधी अपील दाखल करुन घ्यायचे कि नाही, यावर सुप्रीम कोर्ट निकाल देईल, (तो निकाल सहसा लगेच दिला जातो ) आणि तशी परवानगी मिळाली तरच पुढे.
पण आता हे घोंगडे आणखी भिजत ठेवायची काही गरज आहे का ?
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश
१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.>>>
वरची सगळी चर्चा वाचल्यावर मी हे वाक्य बिनशर्त मागे घेतो, आपल्याला अजून खूप मजल मारायची आहे.
इथले विषयाशी संबंध नसलेले
इथले विषयाशी संबंध नसलेले बरेचसे प्रतिसाद काढून टाकण्यात आले आहेत.
सर्व सदस्यांना सूचना: मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे वादविवाद / चर्चा होणे ठिक आहे पण वैयक्तीक पातळीवर असभ्य प्रतिसाद खपवले जाणार नाहीत. त्यामुळे प्रतिसाद देताना काळजी घ्या.
केदार, निकाल हा पूर्णपणे
केदार,
निकाल हा पूर्णपणे वस्तूनिष्ट नाही हे मान्य. तरिही या केस मध्ये जेव्हा फक्त जागेच्या मालकी हक्कासंदर्भात दावा होता त्यात आणखिन काही वेगळा निकाल देता आला असता का? मला तरी तशी शक्यता दिसत नाही. ईतीहासात किती वर्षे मागे जावून हे सिध्ध करणार की ही जमिन कुणाच्या मालकी हक्काची? त्याच अनुशंगाने त्याच ठिकाणी श्रीरामाचा जन्म झाला की नाही वगैरे हे पुराव्यानिशी वगैरे सिध्द करता येणे अवघड आहे.
त्यामूळे एकंदर ईतीहास, सद्य्द्य परिस्थिती, समाजभावना या गोष्टी विचारात घेवून तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने (?) हा निर्णय दिला तर त्याचे स्वागत करायलाच हवे.
यावरून आता चूकीचा पायंडा पडेल वगैरे ई. टीका होत आहेत, होतील, तर निव्वळ प्रतिक्रीया म्हणून त्यांची किम्मत आहे. कारण आपल्या लोकशाहीत प्रत्येकाला मतस्वातंत्र्य दिलेले आहे.
तेव्हा हा निकाल दिशाभूल करणारा नक्कीच नाही ऊलट एक पुरोगामी दिशादर्शक आहे.
आगाऊ, मी व्यथा समजू शकतो.
आगाऊ, मी व्यथा समजू शकतो. वाईट वाटले.
>>१९९२ पासून आजपर्यंत आपण देश
>>१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा..
राम जन्मभूमी किंव्वा मंदीर हा आता राजकीय पाठींबा अन निवाडणूकीचा विषय होवू शकत नाही हे राज्यकर्त्यांना ऊमगले आहे- प्रगल्भता
त्या जागी आता मंदीर बांधले काय किंवा मशीद असली काय, त्याने आपल्या दैनंदीन व्यवहारातील ईतर मुलभूत समस्या सुटणार नाहीत तेव्हा दंगल करून ऊपयोग नाही हे सामान्य माणसाला अन बहुजन समाजाला ऊमगले आहे- प्रगल्भता
या देशातील "अशा" प्रकारच्या समस्या या निव्वळ वस्तुनिष्ट पुराव्यांच्या आधारावर सुटणार नाहीत ही न्यायालयाची भूमिका- प्रगल्भता
निकाल मान्य करून वाद न घालण्याची व कृती करण्याची तयारी- प्रगल्भता ती आता आपण दाखवतो का एव्हडाच प्रश्ण आहे.
आज नाही तर १०-१५ वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय आल्यावर तशी प्रगल्भता "कायद्याने" दाखवावीच लागेल (अर्थात तोपर्यंत संदर्भ आणि परिमाणे बदलली असण्याची शक्यता अधिक आहे).
<<किती मागे जावे इतिहासात ?
<<किती मागे जावे इतिहासात ? पुरातत्वखात्याने अजुन खणले असते तर डायनासोर चे सांगाडे हि मिळाले असते. कसली कोणाची मालकी आणी कसले काय!>>खरंय. सहज मनात आलं, अमेरिकेतील रेड इंडीयन, ऑस्ट्रेलीयातील अॅबओरीजिन्स व भारतीय उपखंडातील मूळचे आदिवासी/वनवासी यांच्यावरच्या मालकीहक्काच्या अघोर अन्यायाच्यामानाने ह्या वादातील मालकीहक्काविषयी कोणत्याही पक्षावर झालेला अन्याय हा क्षुल्लक व नगण्यच म्हणावा लागेल. आपण थोडीशी वास्तववादी भुमिका नाही घेतली, तर खरंच नुसते असले सांगाडे उकरत बसण्यापलिकडे हाताला कांहीच लागणार नाही. आणि, त्यातले कांही सांगाडे तर ह्या वादातल्या सगळ्यांच्याच मानेवर बसण्याचीच शक्यता अधिक !!
आणि त्याचबरोबर सध्या ज्या
आणि त्याचबरोबर सध्या ज्या जमिनी औद्योगिक किंवा धरणांसाठी लाटल्या जातायत, गावंच्या गावं उठवली जातायत. त्यासाठी जनसुनावणी नावाचे फार्स केले जातायत याकडे जास्त लक्ष देण्याची किंवा त्या संदर्भात पेटून उठण्याची गरज आहे.
भाउ छान लिहिले. अहो मुळचे
भाउ छान लिहिले.
अहो मुळचे आदिवासी - घरे गेली, जमिनी गेल्या, ते बिचारे अजुन दारिद्र्यात पडले आहेत.
वरची सगळी चर्चा वाचल्यावर मी हे वाक्य बिनशर्त मागे घेतो, आपल्याला अजून खूप मजल मारायची आहे.
अनुमोदन. अहो या बाफवरच नाहि सर्व बाफवरच. आणी जो सांगतो कि हे सगळे सोडुन द्या - त्यालाच परत शिव्या देतात ही मंडळी.
<<आणि त्याचबरोबर सध्या ज्या
<<आणि त्याचबरोबर सध्या ज्या जमिनी औद्योगिक किंवा धरणांसाठी लाटल्या जातायत, गावंच्या गावं उठवली जातायत. त्यासाठी जनसुनावणी नावाचे फार्स केले जातायत याकडे जास्त लक्ष देण्याची किंवा त्या संदर्भात पेटून उठण्याची गरज आहे.>> मला नम्रपणे व कळकळीने हेच सुचवायचं होतं कीं कालचक्र उलटं फिरवण्याऐवजी इतिहासापासून धडा शिकून तशा चूका वर्तमानात होणार नाहीत याची दक्षता घेणं, हेंच हितावह असावं.
तुमच्याच मुद्द्याला मी फक्त
तुमच्याच मुद्द्याला मी फक्त पुरवणी लावायचा प्रयत्न केलाय. तुमच्यापर्यंत काही वेगळा अर्थ पोचतोय का?
कोर्टाने अतिशय चांगल्या
कोर्टाने अतिशय चांगल्या हेतूने दिलेला पण घातक पायंडा पाडणारा निकाल असे मी याचे वर्णन करेन. हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला आणी निकाल रद्द झाला तर बरे होईल अन्यथा हा केस लॉ होईल. कोर्टाने आपल्या समोरचे पुरावे आणी कायदा यांच्यावर निकाल देणे अपेक्षित असते. तिथे रामाचा जन्म झाला ही लाखो लोकांची श्रद्धा आहे हा निष्कर्श कोर्टाने कशाच्या आधारावर काढला? तसा सर्व्हे केला होता का ? आणी समजा तशी असली तरीही त्या सर्वांचे मत तिथे मंदिर व्हावे अशीच आहे हा निष्कर्श कशावरून काढला? समजा दुसर्या एखाद्या मंदिराच्या व्यवस्थापनाने आम्ही आमच्या मंदिरात दलितांना प्रवेश देणार नाही कारण ती आमची श्रद्धा आहे असा युक्तीवाद केला तर?
मोठ्या उत्साहाने कारसेवेला गेलेल्या उच्चवर्णीय तरूणांपैकी बर्याच लोकांचा गेल्या पंधरा वीस वर्षांतील घटनांमुळे भ्रमनिरास झाला आहे. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण आर्च ने दिलेल्या सुंदर लेखाच्या लिंक मध्ये आहे.
आता भाजप आणी परिवारातील संघटना निकालाची ज्योत गावोगावी नेऊन वातावरण तापविण्याचा प्रयत्न करतील पण people have moved on.
विजयजी, माफ करा मी आपल्या
विजयजी,
माफ करा मी आपल्या मताशी सहमत नाही, मी पण अयोध्या कारसेवेत गेलो होतो, दंगल काय आहे हे चांगलेच अनुभवले आहे. निकालपत्रात सांगीतले आहे मस्जिद, एक मंदीर तोडुन बांधली आहे. अजुन काय पाहीजे. हे पुराव्यावरुनच सांगीतले ना>
वरची सगळी चर्चा वाचल्यावर मी
वरची सगळी चर्चा वाचल्यावर मी हे वाक्य बिनशर्त मागे घेतो, आपल्याला अजून खूप मजल मारायची आहे >>> मला माहित नाही हे तू का लिहलेस कदाचित माझे पोस्टही कारणीभूत असावे. माझी पार्श्वभूमी अशी आहे.
तसेच योग किंवा बुवा मी तसे का लिहले तर ..
१. भारताला महासत्ता वगैरे सोडा एक चांगला देश बनायचे असेल तर दंगली नकोत.
२. परत अपिल करुन २० वर्षे भिजत घोंगडे ठेवले तर परत आपल्यासोबत पुढच्या पिढीला टेन्शन. ते नको आहे.
३. हा मुद्दा कुठे न्यावा ह्याला अंत नाही.
मग जर निकाल २/३ बाजूने लागला तर एकदाचे काय ते सर्वांनी मिळून बाहेरच सोक्षमोक्ष लावावा. नाहीतरी श्रद्धेमुळेच २/३ मंदीर आणि निर्मोहीला मिळाली ना? म्हणून मोठा विचार करुन वफ्फ बोर्डाने द्यावी असे म्हणले. जेणे करुन सांमज्यसाचे उदाहरण ठेवले जाईल. तर आता लगेच कोणी म्हणेल की हिंदूंनी द्यावी, तर मग सरकारने २/३ का दिली हा प्रश्न उरतोच. प्रश्नातून प्रश्न निर्माण नाही का होत?
आपल्या कोणालाही दंगली नकोत त्यामुळे माझी ही भुमीका आहे. उद्या २/३ वर पण लगेच मंदीर बांघता येणार नाही, मग परत तो मुद्दा पोलिटिकली कोणी वापरणार नाही ह्याची ग्यारंटी आहे का? म्हणून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा.
प्रत्येक पोस्ट हिंदू मुस्लीम चष्म्यातून पाहण्यापेक्षा त्यापाठी इतर काही विचार असावा हे पण लक्षात घ्या. काल हे सर्व मांडायची संधी माझ्यावर अतिप्रेम करणार्याने दिलीच नाही.
आपण सर्वजन एकच म्हणत आहोत की दंगली नको, मी थोडा वेगळा विचार करत आहे इतकेच. असो पण हे पटायला हवे असे काही नाही. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते.
राहता राहिला पुरातत्वविभागाचा प्रश्न - उद्या जर काशी मंदीर किंवा जामामशिद ध्वस्त करुन तिथे मंदीर किंवा मशीद बांधली तर कशाचे साहाय्य घ्याल? कृपया रोमचे व तुर्कस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे.
तसेच श्रद्धेने संभाजी ब्रिगेड शिवाजी फक्त आमचा म्हणत आहेत त्यांची श्रद्धा मान्य कराल का?
म्हणून मोठा विचार करुन वफ्फ
म्हणून मोठा विचार करुन वफ्फ बोर्डाने द्यावी असे म्हणले.
मोठा विचार वक्फ बोर्डनेच का करावा? मंदीर समितीने मोठा विचार करून ५० टक्के जमीन वक्फ बोर्डाला दिली तर ? किंवा सर्वांनीच मोठा विचार करून तिथे एक मोफत दवाखाना किंवा शाळा बांधली तर ?
तसेच श्रद्धेने संभाजी ब्रिगेड शिवाजी फक्त आमचा म्हणत आहेत त्यांची श्रद्धा मान्य कराल का?
याचा इथे काय संबंध आहे हे कळले नाही, पण न्यायालयानी आपला निकाल श्रद्धेवर देऊ नये असे मला वाटते.
एखादे अ धर्माचे देवस्थान बांधण्यापूर्वी तिथे ब धर्माचे देवस्थान होते हे किंवा कसे सिद्ध करण्यापुरताच पुरातत्व खात्याचा उपयोग. ते ध्वस्त केले किंवा आधीच पडलेले होते किंवा जुन्या धर्माने विकले किंवा कसे हे पुरातत्व खात्याला ठरवता येणार नाही.
कृपया रोमचे व तुर्कस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे.
हे कशाला? ते आदर्श देश आहेत का?
तिथे १/३ मशीद आणी २/३ मंदीर असेल तर उगाच टेंशन. त्यापेक्षा हे घोंगडे सुप्रीम कोर्टात पन्नास वर्षे भिजलेले बरे.
राजेश्वर , तुम्ही माझ्याशी सहमत नसाल. पण त्यात माफी मागण्यासारखे काहीही नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती.
प्रत्येक पोस्ट हिंदू मुस्लीम
प्रत्येक पोस्ट हिंदू मुस्लीम चष्म्यातून पाहण्यापेक्षा त्यापाठी इतर काही विचार असावा हे पण लक्षात घ्या
सौ चुहे खाके बिल्लि चली हाजको !
हाज म्हणालो म्हणुन रागावु नका. तशी म्हणच आहे. हवे तर स्वतःपुरते काशी असे दुरुस्त करुन घ्या.
तसेच श्रद्धेने संभाजी ब्रिगेड शिवाजी फक्त आमचा म्हणत आहेत त्यांची श्रद्धा मान्य कराल का?
याचा इथे काय संबंध आहे हे कळले नाही
जाउ देत, उद्या इस्त्राइल-पलेस्टाईण वादात देखिल ते हा विषय आणतील
>>>> कोर्टाने आपल्या समोरचे
>>>> कोर्टाने आपल्या समोरचे पुरावे आणी कायदा यांच्यावर निकाल देणे अपेक्षित असते. तिथे रामाचा जन्म झाला ही लाखो लोकांची श्रद्धा आहे हा निष्कर्श कोर्टाने कशाच्या आधारावर काढला? तसा सर्व्हे केला होता का ? आणी समजा तशी असली तरीही त्या सर्वांचे मत तिथे मंदिर व्हावे अशीच आहे हा निष्कर्श कशावरून काढला? समजा दुसर्या एखाद्या मंदिराच्या व्यवस्थापनाने आम्ही आमच्या मंदिरात दलितांना प्रवेश देणार नाही कारण ती आमची श्रद्धा आहे असा युक्तीवाद केला तर?
या प्रश्नांवर हा एक चांगला लेख -
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=126735&boxid=233146916&pgno=4&...
मास्तुरे, लिंकबद्दल
मास्तुरे, लिंकबद्दल धन्यवाद.
<<तुमच्याच मुद्द्याला मी फक्त पुरवणी लावायचा प्रयत्न केलाय. तुमच्यापर्यंत काही वेगळा अर्थ पोचतोय का?>>नीधप, मी फक्त तुमचा मुद्दा हाच माझाही आहे, हे जरा विस्ताराने सांगत होतो.
मास्तुरे, मस्त लेख. अगदी सरळ
मास्तुरे, मस्त लेख. अगदी सरळ भाषेत नेमकं ते लिहीलं आहे.
केदार शेवट्चे वाक्य सोड्ल्यास
केदार शेवट्चे वाक्य सोड्ल्यास उत्तम पोस्ट व अनुमोदन.
निकालाच्या दिवशी हैद्राबादेत सर्व आस्थापने वगैरे लवकर बंद करण्यात आली. शाळा लवकर सोड्ल्या गेल्या. माझ्या ऑफिसच्या बाजूला चौदा शाळा आहेत त्यातील मुलांचा शाळेत येण्याजाण्यातच वेळ गेला.
अगदी कर्फ्यू सद्रयुश्य परिस्थिती होती. एक तारखेला ही अतिशय सावध वातावरण होते. दंगली नकोत हे मुख्य व अनाठाई जीवित हानी नको हे ही. मी स्वतः त्या दिवशी मला टँक बंड मार्गे सिकंदराबादेस जायचे होते तेव्हा जाता जाता एक देवीचे मंदीर( बशीरबाग चौरस्ता) , एक दर्गा( लिबर्टीच्या आधी) , व हुसेन सागर मधील बुद्धाचा पुतळा यांना नमन करून प्रारथना केली होती की कोणतेही लोक स्त्रीया, मुले, पुरुष, पोलीस फोर्स मधील कर्मचारी यांना दंगलीची झळ बसू नये. सकाळी दहा वाजता पाहिले तरअबीद रोड वर अगदी तरूण मुले मुली पोलिस रिक्रूट बुलेट प्रूफ जॅकेट्स घालून उभे होते. त्यांची मला खूप काळजी वाट्ली होती. ह्यांचा आजचा दिवस कसा संपेल कोण जाणे म्हणून. मी श्रद्धाळू धार्मिक आहे हा माझा वीकनेस समजा पण लाइफ इज सो प्रेशस अँड फ्रॅजाइल. वन प्रेयर माइट हेल्प समबडी. येथे शुक्रवारीचे नमाज पण लवकर व शांततेत घेतले गेले व लोक निघून गेले. द्वेष न करता राहणे, शेअर करणे हा एक ऑप्शन आहे
जागतिकीकरणाचा व त्या अनुषंगाने आलेल्या नव्या गोल्स व प्रॉस्पेरिटीचा तसेच इन्स्युलर मेंटालिटीचा हा प्रभाव आहे का कि लोकांना आपले जीवन अधिक सुखकर करायचे आहे. उत्तम नोकर्या, मुलांचे शिक्षण उत्तम जीवनशैली हे लोकांचे ड्रायविन्ग फोर्स झालेले आहेत व सामाजिक बाबी थोड्या मागे जात आहेत वैयक्तिक गोल्स जोपासण्या साठी? गेल्या दहा वरषात तर हे इथे जास्तच जाणवते. लोकली इथे फेसबुकचे
ऑफिस उघड्ले त्याची एक्साइट्मेन्ट होती.
वेस्टरनाइजड मेट्रोज च्या बाहेर पड्ल्यास श्रद्धा हा किती मोठा फोर्स आहे हे नक्की जाणवते.
मीडियाचे काय आज पासूनच इथे फोकस गेम्स वर द्यायला सुरुवात झाली आहे.
मला तर वाट्ते आज गांधीजींच्या आत्म्याला खूप बरे वाट्ले असेल कि देश त्यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने गेला जेव्हा त्याची अगदी निकडीची गरज होती.
काही चुकीचे लिहीले असल्यास संपादित करते.
मास्तुरे, त्या लेखात माझ्या
मास्तुरे,
त्या लेखात माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. शिवाय आईनस्टाईन ने जे म्हणलेच नाही ते त्याच्या तोंडी टाकले आहे. "देव आणी धर्म यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी या बाबतीत लुडबुड करू नये" हे वाक्य फारच आक्षेपार्ह आहे. नास्तिकांनी भारत सोडून जावे का? भारताला इराण, अफगाणीस्तान किंवा पाकिस्तान सरखे theocracy बनवायचे आहे का? वाचताना आपण सामनाचा अग्रलेख वाचतोय असा भास झाला.
आमच्या मिरजेत एक दर्गा आहे. तिथे आधी मंदिर होते अशी काही लोकांची श्रद्धा आहे. ते आता कोर्टात जातील ?
आगावा चागंला धागा , आणि काही
आगावा चागंला धागा , आणि काही अपवाद वगळता चांगली चर्चा घडतेय.
त्याचबरोबर शांतता आणि संयम पाळल्याबद्दल सर्व भारतीयांच अभिनंदन.
Pages