अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>>>> प्रत्येक पक्षाला असं वाटत होतं की दुसरा पक्ष काहीतरी करेल. कुणीतरी काहीतरी करेल मग आपण काहीतरी करु<<< जाम हसलो Lol

काल सर्वांच्या मनात, दंगल होईल का अशी धाकधुक होती. सर्व पक्षकारांचे समाधान होईल, असे निर्णय देताना, न्यायाधिशांचा कस लागत असतो. आता तरी हा वाद संपावा, असेच सर्वसामान्याना वाटते, कारण दंगलीत तेच होरपळून निघतात.
पण हा वाद असा मिटलेला, राजकिय पक्षाना परवडणारा नाही, आणि त्याचा भविष्यात इश्यू केला जाण्याची दाट शक्यता आहे.

बाकि कलमाडी वर कुठलीही कार्यवाही व्हायची शक्यता नाही.

चांगला धागा आगाऊ!

वर्षू.नील - ते देशाबद्दल बाहेर बोलतात वगैरे लिहीलेले आहे ते कॉमनवेल्थ बद्दल ना? या निकालाच्या बाबतीत कोणी तसे बोलेल असे वाटत नाही.

आणखी एक - याबाबतीत निकाल दिल्यानंतर त्याव्रर प्रतिक्रिया देताना लोकांनी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे (न्यायालयाचा अपमान होउ नये म्हणून) ते कोणीतरी जाणकारांनी सांगितले तर लोक चुकीच्या पोस्ट टाकणार नाहीत. त्याबाबतीत लिंबूचा मुद्दा योग्य आहे.

कलमाडीवरचा एक जोक-
अयोध्येचा निकाल लागल्यावर सरकार तिथे मंदिर-मशिद दोन्हीचे कंत्राट कलमाडीच्या कमिटिला द्यायची घोषणा करते........ दोन्हीही पक्ष तात्काळ आपला दावा मागे घेतात Proud

हे महत्वाचे आहे. एकदा आपण राज्यघटना स्वीकारली, तर न्यायालयाचा मान ठेवावाच लागतो. त्यावर मायबोलीवर काही पोस्ट या पुर्वी पण आल्या आहेत. अशा शब्दांनी मायबोलीला त्रास होऊ शकतो.
न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी, योग्य त्या प्रक्रियेचाचा अवलंब केला पाहिजे.

निकाल देताना समतोल राखला गेला हे अभिनंदनिय.
न्याय व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. आता कोणी अपील करेल न करेल हा सगळा पुढचा प्रश्न पण काल सगळ्यांनी सामजस्याने शांतता राखली हे कुठेतरी समाज सुधारणेच प्रतिक. कारण सामान्य माणुस ह्या राजकारण्यांच्या दुटप्पी वर्तनाला कंटाळला आहे. बाकी आपल्या सारख्यांना निकालापेक्षा जास्त चिंता असते ती परिणामांची कारण वादळ ठराविक काळानंतर शमतात पण त्यामुळे होरपळलेली मने, दुभंगलेल्या भिंती परत एकसंध व्हायला कित्येक वर्ष जावी लागतात किंबहुना तेढ वाढतच जाते.
आता या निकालाचा आदर सगळ्यांनीच राखला पाहिजे.

कॉमनवेल्थ गेम्स आणि निकालाची सांगड घातल्याचे प्रतिसादात वाचले म्हणून हे व्यंगचित्र इथे देत आहे....कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत...

ayodhya.jpg

काल न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल आणि त्यानंतर राजकीय पक्ष, मिडीया आणि इतर सर्वांनीच दाखवलेली संयमी भूमिका हे खरेच अभिनंदनीय. सकारात्मक बदल होतोय हे चांगलेच आहे.
पण एकच शंका मनात आहे की इथे सर्वोच्च न्यायालयात अपील करायला वाव होता. पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होईल आणि तो अंतीम निर्णय काहीही असला तरी न्यायालयाच्या निकालाचा आदर दाखवणारी ही संयमी भूमिका तेव्हाही तशीच टिकेल का?

वर्षू व लाजो तुम्हाला आपल्या देशातील घडामोडींची लाज का वाट्ते? तुम्ही त्यांना अनुक्रमे तिआन्मान स्क्वेअर चे उठाव का दाबले?, इराक मधील तुरुंगातील कैदींवरील अत्याचार( अबू घरेब)/रेशीअल अब्यूजवर तितकेच टोकदार प्रश्न विचारू शकता की नाही? आपलंच नाणं खोटे वगैरे विधाने अतिशय विनोदी आहेत. वी आर अ फंक्षनिंग डेमोक्रसी अँड अ व्हायब्रंट इकॉनमी.

निकाल मॅच्यूरिटीने दिला आहे. याबद्दल न्यायव्यवस्थेचे अभिनंदन. इतके मोठे जनतेच्या भावनांशी निगडित इश्यूज क्विड प्रो क्वो तत्त्वावर सोड्वणे अवघड आहे. दोन्ही बाजूंनी संयम पाळला आहेत. कोठे ही हिंसा झाली नाही. हे ग्रेट नाही का!

मयूरेश मुद्याला हात घातलास............. निकाल काहीही लागला तरी कोणता तरी एक पक्ष सर्वोच्च न्ययलयात जाणार याची सर्व पक्षांना कल्पना होतीच्...त्यामुळे आताचा "दाखवलेला संयम" किती खरा हा प्रश्नच आहे.........उद्या सर्वोच्च न्ययालयात हा निकाल लागला तर मग येणारी प्रतिक्रिया (कोणत्याही बाजुने) ही खरीखुरी असेल असे वाटते.

वी आर अ फंक्षनिंग डेमोक्रसी अँड अ व्हायब्रंट इकॉनमी.
>>> अगदी खरय.
.........उद्या सर्वोच्च न्ययालयात हा निकाल लागला तर मग येणारी प्रतिक्रिया (कोणत्याही बाजुने) ही खरीखुरी असेल असे वाटते.>> थोडी भीती सगळ्यांच्याच मनात असणार, कारण काही विघ्नसंतुष्ट लोकांना कालाच्या शांततेने पोटात दुखलेच असेल्.पण रंगीत तालीम तरी चांगली झाली हेही नसे थोडके.

एकदा आपण राज्यघटना स्वीकारली, तर न्यायालयाचा मान ठेवावाच लागतो.
न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी, योग्य त्या प्रक्रियेचाचा अवलंब केला पाहिजे.
--- १९८४ च्या भोपाळ वायू कांडाचा निकाल २०१० मधे लागला, निकाल लागल्यावर काही दिवसांतच सर्व आरोपी जामिनावर सुटले. आता २५ वर्षे वरच्या हाय-कोर्टात लढाई... सुप्रिम कोर्टातील मुख्य न्यायाधिश ज्यांनी आरोपींवरिल गंभीर कलमे शिथील केली तेच नंतर शेकडो कोटीं रुपयांच्या भोपाळ ट्रस्टचे सर्वेसर्वा होतात. देशांत दुसरा कुणीच लायक माणुस मिळाला नाही? conflict of interest अजुन काय हवे?

१९८४ च्या शिख हत्या कांडात ३००० लोक मारले गेले... पुन्हा न्यायालयाने कुणासही शिक्षा केली नाही.

संजय दत्त... न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा दिल्यावरही बाहेर रहातो... त्या गंभीर आरोपा खाली सामान्य असता तर सुटलाही नसता. मुंबईच्या अनुभवी पोलिस आयुक्तांनी छाती ठोकपणे सांगितले होते अशा गंभीर कलमांखाली सुटका केवळ अशक्य गोष्ट... पण घडले वेगळेच.

न्याया समोर सर्व लोक सारखे समान नसतांत.... काही जास्तच समान असतांत.

मला वाटते न्यायालयाच्या निकालांवर टिपणी किंवा नापसंती दर्शवता येते... वरिल सर्व खटल्यात अपराधिंना शिक्षा झाली असती तर माझा आदर दुणावला असता.

सर्वोच्च न्ययलयात जाणार याची सर्व पक्षांना कल्पना होतीच्...
---- सर्वोच्च न्यायालयाच्या बाता केवळ लोकांना दाखवण्यासाठी, त्यांना जातो आहे हे भासवायचे आहे... गेल्याने खुप काही फरक पडतो आहे कां? निकालास अजुन २५ वर्षे लागतील...

अश्विनीमामी, तसे नाही आता मागे मुंबईत जो दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पुर्ण वेळ आम्ही तिकडे टिव्ही वर सगळे बघत होतो. कसे बघे इकडुन तिकडुन पळतायत, ढिसाळ करभार चाललाय हे सगळ्या जगाने पाहिले. ते हल्ल्याबद्दल सहानुभुती दाखवतात पण आपल्याच नागरीकांच्या कितीतरी चुका दिसत होत्या प्रत्याक्षात तेव्हा खरच तोंड अगदी लपवावेसे वाटते.परत या गोष्टी असतातच ना की हा मागील काही वर्षातला चौथा पाचवा हल्ला आहे. तरी आमची सुरक्षाव्यवस्था अशीच वगैरे वगैरे.

>>>> कसे बघे इकडुन तिकडुन पळतायत, Lol
अहो, पण बन्दुकीच्या गोळ्ञा झाडल्या जात अस्ताना, एखाद दोन गोळ्या आपल्या शरिरातही घूसू शकतील हे माहित अस्तानाही, तिथे काय घडतय हे बघायला इकडून तिकडून धावपळ करणार्‍या बघ्यान्च्या उत्सुकतेची अन धाडसाचे तरी कौतुक करावे की नाही या परदेश्यान्नी? औषधाला तरी सापडतील का असे बघे तिथे?
अन जर सापडणार अस्तील तर इकडच्यान्बद्दलच नाके का मुरडावित त्यान्नी?
ते याला "बघे" वगैरे म्हणत अस्तील, मला मात्र यात भारतियान्च्यातील अन्गभूत "सोशल अवेअरनेस" दिस्तो Proud
शेवटी काये की कुणी कोणच्या रन्गाच्या काचेतून बघायचे अन काय ठरवायचे हे जो तो ठरवणार!
मला तर बोवा, घोर काळा अन्धार देखिल "ब्राईट्ट" दिस्तो!

सर्व पक्षांनी व जनतेने दाखविलेल्या संयमामुळे राष्ट्रीय एकात्मतेला जरा तरी उमलण्याचा चान्स आहे असे वाट्ते. बाकी प्रतिसाद ह्या बाफचा विषय नसल्याने संपादित केले आहे.

अरे आता पुन्हा दंगलीवर नका नेवू ही चर्चा..

कोर्टाने ऐतीहासिक निर्णय दिला आहे (बर्‍याच अंगांनी) त्याचे स्वागत! आता सर्व हेवेदावे विसरून निव्वळ भारताचे हित लक्षात घेवून अन पुढील पिढीसाठी एक चांगला आदर्श घालून देण्याची कोर्टाने ऊपलब्ध करून दिलेली संधी आपण किती सक्षमपणे वापरतो हे अधिक महत्वाचे. नाहीतर आहेच पुन्हा ये रे माझ्या मागल्या - "मंदीर नव्हे भव्य दीव्य मंदीर वही बनायेंगे" वगैरे घोषणा.. आणि मग पुन्हा भावनिक अन राजकीय अहमाहीका.

अर्थातच सुप्रिम कोर्टात जाण्याचा अधिकार अन संधी सर्व दावेदार पक्षांना खुली आहेच पण उच्च न्यायालयाने दिलेला निकाल एका वेगळ्या सर्वसमावेशक समाजहित दृष्टिकोनातून दिलेला आहे हे या दावेदारांन्ना ऊमगले तर अजून २० वर्षे न थांबता अत्ताच या संधीचा सुंदर ऊपयोग करून धार्मिक तिढा कामी करण्यात पुढचे पाऊल ऊचलता येईल.

ईतीहासकार अमित गुहा म्हणतात- बरे आहे जाऊदे सर्वोच्च न्यायालयात- अजून २० वर्षे लागतील- निदान तोपर्यंत तरी यांन्ना (दावेदारांन्ना) मॅचुरीटी येईल या शक्यतेला वाव आहे Happy
______________________________________________
श्रीरामांचे आणि भारताचे अभिनंदन!

कसे बघे इकडुन तिकडुन पळतायत, ढिसाळ करभार चाललाय हे सगळ्या जगाने पाहिले.
--- सुरक्षा रक्षक कसे, किती आणि कुठल्या मार्गाने येत आहे ह्याचे live telecast दाखवले गेले होते. सॅटेलाईट फोन द्वारे अतिरेक्यांना त्यांचे मार्गदर्शक बाहेरची खडान-खडा माहिती तत्परतेने पुरवित होते.

मुर्खपणाचे हद्द, कॅमेरांना दुर करण्याचा निर्णय घेण्यास किती बहुमुल्य वेळ दवडला? दिल्ली वरुन येणार्‍या कमांडोंना विमान तयार नव्हते...

पहिले काही तास कुणाचेच परिस्थितीवर नियंत्रण नव्हते... हाच काळ महत्वाचा असतो आता हा भोंगळ आणि ढिसाळ कारभार नाही कां?

उदय, न्यायालयाचे जे निर्णय मान्य नसतील, त्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करता येते. अगदी न्यायाधिश बदलण्याची देखील मागणी करता येते. न्यायालयास साधे पत्र लिहिले तरी त्याची दखल घेतली जाते. पण त्यासाठी आपल्या भावना, योग्य त्या ठिकाणी पोहोचवल्या पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी, जर काहि लेखन केले, तर त्याविरुद्ध न्यायालय कार्यवाही करु शकते.
मायबोली या संकेतस्थळाला असा त्रास होऊ नये, अशी इच्छा आहे, एवढेच.

कालचा ऐतिहासिक निर्णय ऐकून खरंच हुश्श झाले! आपणच आपल्या सर्वांचं अभिनंदन करुयात! आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी, न्यूज चॅनल्सनी, वर्तमानपत्रांनी आणि सर्वसामान्य जनतेने जो संयम दाखवला आहे त्याबद्दल! आशा करुयात की आता तरी अयोध्यावासी जनतेला सर्वसामान्य जीवन जगता येईल. ह्या प्रकरणाशी संबंधित सर्वच पक्ष व जनता शांतपणे आणि सामंजस्याने, जीवितहानी - वित्तहानी न करता पुढील पावले कायद्याच्या चौकटीत व कायद्याचा सन्मान राखून उचलतील.

मला तरी निकाल स्वागतार्ह वाटतोय. अमुक शतके किंवा हजारो वर्षांपूर्वी काय आणि कसे घडले यावरून आज अनेक निरपराध बळी जाण्यापेक्षा १/३ जमीनीवर मशिद असणं, मंदिराला लागून मशिद असणं हे सगळं परवडेल...
प्रतिक्रिया आली नाही यात सांमजस्यापेक्षा दगल करून आपणच मरतो हे शहाणपण जास्त जाणवले.
निकालाला उशीर झाला हे एकाअर्थी बरेच झाले असेही मला वाटले.

खरंच सगळी कटुता विसरून जाऊन आपल्या देशाच्या प्रगतीबद्द्ल विचार केला पाहिजे.
याक्षणी मला हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला आठवली:

मुसलमान और हिंदू हैं दो, एक मगर उनका प्याला,
एक मगर उनका मदिरालय, एक मगर उनकी हाला,
दोनों रहते साथ न जब तक, मंदिर-मस्जिद में जाते,
बैर बढ़ाते मंदिर-मस्जिद, मेल कराती मधुशाला।"

निर्णयाचे स्वागत !!!

आता कोणाच्याही घरात घुसा ....थोडे वर्श तिथे रहा .... मग ...जर त्या घर मालकाने घरावर हक्क सांगितला तर कोर्टात जा .... १/३ घर तुम्हाला !!!

हाकानाका !!!

मलाही निर्णय आवडला. निर्णय ऐकुन अगदी हुश्श्य झाले.....

आता कोणाच्याही घरात घुसा ....थोडे वर्श तिथे रहा .... मग ...जर त्या घर मालकाने घरावर हक्क सांगितला तर कोर्टात जा .... १/३ घर तुम्हाला !!!

या गोष्टीला शतके उलटुन गेली. आता वाद करुन काय उपयोग?
घरमालकाला आपल्या घरात घुसायचे धाडस कोणी करु शकणार नाही इतके ताकदवान व्हायला कोणी बंदी केली होती का???

कालच्या पेपरात वाचले, चीनने आयपॉडवाले की कोण त्याना अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचे त्यांच्या नकाशात दाखवायला परवानगी दिली. आता कुठल्या कोर्टात जाणार???? हा प्रकार तर वर उल्लेखलेल्या घर-घुसखोरीपेक्षाही भयानक आहे.

>>> आता कोणाच्याही घरात घुसा ....थोडे वर्श तिथे रहा .... मग ...जर त्या घर मालकाने घरावर हक्क सांगितला तर कोर्टात जा .... १/३ घर तुम्हाला !!! <<<< LOL
अहो पण भाडेनियन्त्रण का कुठल्याश्श्या कायद्या अन्तर्गत तर आख्ख घरच शेकड्यानी भाडेकरू बळकावुन बसलेत त्यापुढे हा निकाल म्हणजे काहीच नाही, निदान दोन तृतियान्श तरी तुमच्या पदरात टाकलय ना? Wink

लाजो,प्रिया धन्स!!
मी काल पोस्टले होते ,'मलाही आनंद झाला निकाल वाचून.नंतर उगीच एक (कु)शंका चुकचुकली रे मनात
असं तर झालं नसेल ना.. कॉमन वेल्थ गेम्स च्या इतक्या प्रचंड भानगडी चालल्यात पण,विपक्षी पार्टी (पहिल्यांदा) मूग गिळून गप्प बसलीये.हे जरा अविश्वसनीय वाटत नाही?? का त्यांना काँग्रेस ने प्रॉमिस केले असेल कि या प्रकरणावर तुम्ही गप्प बसा ,याच्या बदली बाबरी चा निकाल तुमच्याकडून लावतो..
oops!! u scratch my back and I scratch yours,''
पॉलिटिक्स मधे आतून आतून काय काय बार्गेन होत असेल देवाला च माहित
@ अश्विनी.. आपल्या देशात चाललेल्या घडामोडींबद्दल नव्हे तर उघड उघड चाललेल्या भ्रष्टाचाराचे चर्चे जेंव्हा इतर दुनियेच्या चव्हाट्यावर पोचतात तेंव्हा त्याबद्दल लाज वाटणारच..
आणी तिएन्मन स्क्वेअर वर जे घडले त्याबाबत चीनी लोकांना मुळीच वाटत नाही कि काही चुकीचं घडलय म्हणून.. moreover they are asking about the incidents happening in India now.. and you want me to ask them sabout something happend in their country 21 years back??

on the same lines-Do Indians feel ashamed of the situation of Indians in Kashmir?? No!! because we Indians feel कि आपली गवर्नमेन्ट जे करतीये काश्मिर मधे ते ठीकच करतीये..
एव्हढच म्हणणय कि दुसर्‍याचे दोष शोधतांना आपले दोष कमी होत नाहीत..

any ways.. हा तर १० वर्षांनी लागलेला हाय कोर्ट चा निर्णय आहे.. सुप्रीम कोर्टाच्या निकालासाठी अजून १०,१५ वर्षं थांबा .. मग बघू या काय होतं ते!!

@ साधना
अगं यू एन च्या मॅप मधे काश्मिर ,भारतात दाखवतच नाहीत.. तरी आपण आपल्या नकाशांमधे दाखवतो ना कि काश्मिर आपलय म्हणून..
हा पण तसलाच प्रकार आहे..

Pages