वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!
पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.
मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.
माझं
माझं मृत्यंजय बद्दल असे झाले होते.. तसेच वपुंची पुस्तके एकेकाळी खुप आवडायची. आता नाही.. असो..
पण ते अर्धा दिवस रजा टाकुन पुस्तके मागवणे म्हणजे काय हे मात्र झेपलं नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुस्तकांच
पुस्तकांचे प्रदर्शन भरले होते आणि श्रिनीनी मला सांगितले की त्यानी तिथे तेरुओ पाहिले आहे. मग मी भाच्याला तो पत्ता देऊन त्याला ते पुस्तकं लगेच आणायला/पाठवायला सांगितलं. यासाठी त्याला अर्धा दिवस रजा काढावी लागली.
तेरुओ जर मी २१/२२ वर्षाच्या वयात वाचलं असतं तर मला ते नक्की भावलं असतं.
नाहीत का
नाहीत का कुणी इथं लिहिणार..
एलिझाबेथ
एलिझाबेथ गिल्बर्टचं 'ईट, प्रे, लव्ह' काही मी वाचू शकले नाही. बरंच ऐकलं होतं पुस्तकाबद्दल म्हणून अपेक्षा होती पण पकड घेईना, मग सोडून दिलं. अशी आहेत अजून काही. ती पुन्हा कधी वाचायला घेतली तर पूर्ण वाचावी वाटतीलही.
मी
मी मायबोलीवरच बहूचर्चित नातीचरामी अर्धवट सोडलं होतं.. !
एकतर बराच वेळ कळतच नव्हत काय चाल्लय.. काही काही रेफरन्स जुन्या हितगुजवरचा बीबी वाचून आल्यावर कळले..
तरीही अजिबात पकड न घेतल्याने सोडून दिलं..
तसच मीना प्रभूंचं ग्रीकांजली पण सोडलं अर्धवट.. त्याही पुस्तकानी पकड घेतली नाही विषेश...
द
द इनहेरिटन्स ऑफ लॉस.. किरण देसाईचे बुकर पारितोषिक विजेते पुस्तक..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
रसच येईना.. २०-३० पानात सोडून दिले..असेलही चांगले..
दुसरं म्हणजे माझाच आळस नडलेले पुस्तक.. शांताराम..
का माहीत नाही.. अर्धंच सोडलं.. मात्र परत आणून नक्कीच वाचणार..
मी
मी मायबोलीवरच बहूचर्चित नातीचरामी अर्धवट सोडलं होतं.. >> मी सुध्दा , पण इकडची चर्चा वाचून तसच पुर्ण केलं ...
****************************
...... तो कट्टयावर बसतो , घुमतो , शीळ वाजवतो !
११, १२, f.y, s.y.,
११, १२, f.y, s.y., t.y. अर्थशास्त्राचे पुस्तक... वाचुच शकलो नाही
काही केल्या डोक्यात जात नव्हते.
तरी बरे दोन तीन वर्षाना एक प्रश्न हमखास असायचा, अर्थशास्त्र म्हणजे काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बारावीत पेपरच्या शेवटच्या पानावर, पेपर तपासणार्या शिक्षकांना चिठ्ठी लिहीली होती पास करा म्हणून, त्यांनी देखील ४१ मार्क देवुन पास केले :), म्हणून आज ह्या ईथे
मधे hull चे नवे कोरे Options, Futures & Other Derivatives मागवले, प्रस्तावणे चे एक पान वाचुन झाली, पुढे काही नाही.
मी अरुंधती
मी अरुंधती रॉयचं god of small things मोजुन आठ पानं वाचली आणि सोडुन दिलं. एक असच सोडुन दिलेलं Life of Pi. माझ्या तेव्हाच्या PM ने जोरदार रेकमंड केल्यावर खास विकत घेऊन आले आणि अर्धवटच सोडलं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बारावीत
बारावीत पेपरच्या शेवटच्या पानावर, पेपर तपासणार्या शिक्षकांना चिठ्ठी लिहीली होती पास करा म्हणून, त्यांनी देखील ४१ मार्क देवुन पास केले >>> बरेचदा असे ऐकले होते, आज ऐक बहाद्दर आपल्यातलाच निघाला. माणसा अर्थशास्त्र फॉर डमीज घेऊन वाच बर आता.
युलीसिसच्या बाबतीत माझेही असे झाले, आणले सुरु केले मध्येच शांताराम घेतले त्यामूळे ते लायब्ररीत वापस करावे लागले. पण ते मी परत वाचनार आहे.
नाहीत का कुणी इथं लिहिणार.. >>
बी, ह्या बीबीचे नाव तू माझे वाचायचे फसलेले प्रयोग असे टाक मग लोक लिहीतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरेचदा असे
बरेचदा असे ऐकले होते>>>>
कॉमर्सच्या विद्यार्थांबरोबर चर्चा करा, अजुन बरेच काही ऐकायला मिळेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी शोभा डे
मी शोभा डे ची ३ वेगवेगळी पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला होता ३ वेगवेगळ्या वेळी.. एक दोन बहिणींची कादंबरी होती (जिची टीव्ही सीरीयल झाली होती), 'स्पीडपोस्ट' आणि 'स्पाऊज'- शेवटची दोन तर बेस्टसेलर आहेत! पण मी ठरवून प्रयत्न करूनही ही पूर्ण नाही करू शकले.
शोभा डेचे फॅन्स मला हाणतील.. पण ती जे तिच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करते ते मला अजिबात आवडत नाही. 'स्पीडपोस्ट'मध्ये तिने स्वतःच्या पहिल्या दोन मुलांना वेळ दिला नाही, अशी कबूली दिलीये- खासकरून तिच्या मुलीला.. पण नुस्ती कबूली! त्याबद्दल काही खेद नाही, की अपराधीपणा नाही.. तसंच दिलीप डेच्या मुलांना 'मी लगेच आपलंसं करायच्या भानगडीत पडले नाही, मी माझ्याच कोशात असायचे'.. हे सांगणं मला कबूलीपेक्षाही थोडं निर्लज्जपणाचं वाटतं! तरी हे पुस्तक मी बरंच वाचलं. 'स्पाऊज'तर १०-१५ पानं वाचून अक्षरशः सोडून दिलं! अगदीच वरवरचं वाटलं मला ते.
लोकांची मतं भिन्न असू शकतील. मी एखादा शब्द जास्तीचा बोलले असेन तर सॉरी.. पण शोभा डेच्या पुस्तकांपेक्षा तिचे कॉलम कैक पटींनी चांगले असतात, असं माझं मत.
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
दोन
दोन बहिणींची कादंबरी होती (जिची टीव्ही सीरीयल झाली होती), >> हे कुठलं ??
****************************
...... तो कट्टयावर बसतो , घुमतो , शीळ वाजवतो !
पूनम,
पूनम, स्पीडपोष्ट हे पुस्तकं आत्मचरित्रात्मक आहे. त्यामुळे तिथे प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा. त्यामुळे लेखिकेला असे सर्व काही धीटपणे सांगता आले हे जास्त कौतुकास्पद आहे.
मायकेल क्रिचटनचं जोनाथन मी वाचलं मी मग लगेचं त्यांच Illusion वाचायला घेतलं. मला ते पुस्तकं, त्याची शैली, कथेचा प्रवाह आवडला नाही. मी ते पुस्तक वाचूच नाही शकलो.
बी, धीटपणा
बी, धीटपणा आणि प्रामाणिकपणा हवाच, पण 'मुलांकडे लक्ष नाही देऊ शकले..' यापुढे 'द्यायला हवे होते..' हे शब्दही नाहीयेत. कबूली दिली की संपला का विषय? आजही आपलं काही चुकलं असं तिला वाटत नाही?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
असो. प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा आणि आवडीचा फरक आहे. नवीन वाद नको![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीपुर्झा, नाव आठवत नाहीये, नाहीतर लिहिलं असतं ना!
(सिस्टर्स किंवा तत्सम आहे, असं वाटतंय)
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
अगं वाद
अगं वाद नाही करत आहे. खरं तर या बातमी फलकाचा आणखी एक उद्देश म्हणजे एखाद्या पुस्तकाबद्दल वाचकाचा जर चुकीचा समज झाला असे वाटतं असेल तो समज दुर करणे. याला वाद नाही म्हणता येणार.
आता शोभा ताईंना अजूनही मुलांकडे लक्ष द्यायला हवे असे वाटतं नसेल तर फक्त वाचकांच्या भावना जपण्यासाठी तसे लिहिणे म्हणजे आपण लेखिका आहोत याशी प्रतारणा करणेच नाही का?
हो शोभा डे
हो शोभा डे चे Spouse मी पण वाचले आहे.. बराच (नीट कसे लिहावे) गोश्ती मनाला पटत नाहीत्..वर लेखीका त्या इतक्या ठामपणे माडतात की मला कधी कधी माझेच विचार चूकीचे आहेत की काय असे वाटते.
बी, तु जर
बी, तु जर इल्युजन्स आणि जोनाथन लिविन्गस्टन सीगल बद्दल बोलत असशील तर ती दोन्ही पुस्तके रिचर्ड बाखची आहेत.. मायकेल क्रिख्टनची नाहीत..
सिन्ड्रेला, मी पण गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्स सोडून दिलं आणि लाइफ ऑफ पै च्या वाटेला गेलोच नाही..
बीएसके, शांताराम सोडून नको देउ.. its worth reading!!! आणि माणसा जॉन हलचे ते डेरिव्हेटेव्ह्जवरचे पुस्तक म्हणजे त्या विषयामधली गीता आहे..
मी वाचूच न शकलेले पुस्तक म्हणजे 'Finnegans Wake'.. पहिल्या १० पानातच समजलं की एक अक्षर देखील समजलं नाहिये
दुसरं म्हणजे वेटिन्ग फॉर गोदो.. ह्याची पहिली १०-२० पानं वाचल्यावर मी आणि माझ्या रूममेटने एकाड एक पान वाचत १०-२० पानं वाचली.. तरी काही समजलं नाही ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टण्या हो
टण्या हो रे बाखची आहेत ही दोन्ही पुस्तकं. खूप दिवस झालेत हा लेखक आणि त्यांचे नवे साहित्य वाचले नाही.
God of Small Things हे पुस्तकं नक्कीच छान आहे पण मीही हे पुस्तकं वाचून खाली ठेवले होते. कारण मला त्या पुस्तकातील ईंग्रजी भाषा पेलली नाही. मग मी अपर्ण वेलणकरांचा याच पुस्तकाचा अनुवाद वाचला. तोही मला झेपला नाही. अनुवादीत पुस्तकं मला आणखीनच किचकट वाटले समजायला. पण माझा एक रूममेट तो कुठल्याही पुस्तकाचा हसतखेळत फडशा पाडतो. तेंव्हा मात्र मला खूप कॉम्प्लेक्स यायचा.
At last Shrugged, Fountain Head ही ईयान रँडंची पुस्तकही मी वाचू नाही शकलो.
At last shrugged
At last shrugged
बी, ते Atlas Shrugged.. तरीच तू न वाचता खाली ठेवलेस
(आणि Fountain Head असे दोन सुटे शब्द नसुन तो एकच शब्द आहे पुस्तकाच्या शीर्षकात The Fountainhead )
मला वाटलचं
मला वाटलचं मी काहीतरी चुक करत आहे पुस्तकाचे नाव लिहिताना. क्षमस्व! पण ही दोन्ही पुस्तकं खूप सुरेख आहेत असे अनेकांकडून ऐकलं आहे. माझा आळस आणि अकलेची उणिव म्हणून मला दोन्ही पुस्तकं न वाचताचं खाली ठेवावी लागली.
अकलेची
अकलेची उणीव वगैरे काय नसते रे बी.. एखाद्याला वांग्याची भाजी आवडत नाही, दुसर्या कुणाला प्रचंड आवडते तसा प्रकार आहे हा.. मी वर उल्लेख केलेली पुस्तक/नाटक, हे अजरामर म्हणुन प्रसिद्ध आहेत. मला दोन्हीमधला अक्षरशः एकही शब्द कळला नाही. मराठीमधल्याच अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबर्या किंवा १-२ फार प्रसिद्ध लेखक मला कधीच आवडले नाहीत. पण ह्याचा अर्थ मी मूर्ख आहे किंवा खूप उच्च अभिरुचीचा आहे असा होत नाही तसेच ते लेखक भंपक आहेत असेही होत नाही. मागणी-पुरवठ्याचा व्यवहार आहे हा.
वाचू न शकलेल्या पुस्तकांचे दोन प्रकार होतातः
१. थोडे वाचल्यावर कळते की ह्या पुस्तकात आपल्याला रस नाही. वाचण्यात अर्थ नाही.
२. थोडे वाचल्यावर कळते की काहीच कळत नाहिये. उगाच शब्दाला शब्द लावून वाचण्यात अर्थ नाही.
माणसा,
माणसा, अर्थशास्त्राबद्दल सेम पिंच
मला बी.कॉमला कोणा दयाळू पेपर तपासनीसाने ३५ मार्क दिले अर्थशास्त्रात, म्हणून मी इथे लिहू शकतेय..
मराठी सोडून मी इतर भाषांमधली पुस्तकं फारशी एंजॉय करू शकत नाही. गाजलेली अनेक इंग्रजी किंवा हिंदी भाषांमधली पुस्तकं अर्धवट सोडून दिली आहेत. का कोण जाणे, पण त्या गुंतणं जमतच नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
सातवीनंतर
सातवीनंतरच्या उन्हाळी सुट्टीत संपूर्ण ऑलिव्हर ट्विस्ट वाचायला लावलं होतं वडिलांनी. वीरकर डिक्शनरीमधे बर्याच शब्दांचे अर्थ सापडत नसत म्हणून ऑक्स्फर्ड डिक्शनरी पण आणून दिली - त्या डिक्शनरीत दिलेला अर्थ परत वीरकर मधे पहायला लागायचा. चिकाटीने वाचलं खरं ते पुस्तक, एकेका वाक्याचा अर्थही लागला असेल तेंव्हा कदाचित. पण पूर्ण पुस्तक, त्यातली भाषा, व्यक्तिरेखा सगळं सगळं डोक्यावरून गेलं होतं. अजूनही डिकन्सचं दुसरं कुठलंही पुस्तक हातात धरलेलं नाही.
त्या पुस्तकाबद्दल मी इतकी कटकट केली होती की आठवीच्या दिवाळीच्या सुट्टीत एकही मराठी पुस्तक तर मिळालं नाहीच, उलट तेंव्हा इलस्ट्रेटेड वीकली मधे येणारी आर के नारायण ची कादंबरी वाचायला लागली होती.
पुढे टी व्ही चे सिरियल्स पाहिल्यावर स्वामी अन मालगुडी डेज वगैरे वाचलं होतं.
ऍना कॅरेनिना अनेकदा उचललंय अन ठेवून दिलंय परत. तसंच स्पिनोझा चं एथिक्स अन थोरोचं वॉल्डेन![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तेरुओ मला
तेरुओ मला पण नाही आवडले. दुसरी गोष्ट त्यातल्या त्यात बरी.
असेच मी 'ययाती' कधिच नाही वाचु शकले.
शोभा डे चं
शोभा डे चं एक पुस्तक मी पण असेच ठेउन दिले आहे. "कुठलेतरी" डेज असं नाव आहे का ? इथे आहे, काढुन बघितलं पाहिजे. सुरुवातीला आत्मचरित्रपर आणि बेधडक वाटणारे हे पुस्तक नंतर अमिताभ बच्चन वगैरे पासून सर्वांच्याच कागाळ्या करायला लागतं. एकदम तिडिक आली नी ठेउन दिलं.
ययाती - सेम
ययाती - सेम पिंच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सिंडे, ते
सिंडे,
ते पुस्तक म्हणजे सिलेक्टिव मेमरीज..
तलस्तोय
तलस्तोय वाचताना वही-पेन घेउन बसावे असं ऐकलय.. नवीन पात्राची त्रोटक नोंद/माहिती टिपुन ठेवावी.. असं करत जर तलस्तोय वाचला तर 'त्रास होत नाही' असे म्हणतात.. खरं-खोटं माहिती नाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे वडील
माझे वडील टॉलस्तॉय्च्या लिखाणाचे परमभक्त असल्यामुळे 'अन्ना करनेना, रेझरेक्शन' सारखी पुस्तकं बर्याच लहान वयात हातात पडली. अज्जीबात झेपली नाहीत. अर्धवट सोडली. 'डॉन क्विक्झोट' (मूळ इंग्रजीत) आठवीत अर्धवट वाचलं. मराठी अनुवादाची मात्र पारायणं केली. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' पण कंटाळवाणं झालं. 'कोसला' पण ह्याच लायनीत.(स्वातीनी पाठवलं होतं. थँक्यु स्वाती.
) 'पानीपत' का कोणजाणे पण रटाळ वाटलं होतं २५ वर्षांपूर्वी. म्हणून सोडून द्यावं लागलं. आता वाचून बघायला हवं.
Pages