वाचूच न शकलेली पुस्तकं

Submitted by हर्ट on 6 November, 2008 - 22:25

वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!

पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.

मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात चीनने सात सॅटेलाईट्स पृथ्वी पासून सगळ्यात दूर पाठवलेले असतात, शेवटी अमेरिकेच्या इंटिलीजन्स एजन्सीचा सर्व्हर हॅक करायला फायर वॉल वर अटॅक होतो त्याची लाईव्ह कॉमेंटरी तिथला आयटी हेड करत असतो, इंटिलीजन्स एजन्सीच्या डायरेकटर्स ना. प्रत्यक्ष युद्धात एक एक तटबंदी तोडून गनिम आत शिरत आहेत त्याप्रमाणे आता पहिली फायर वॉल crack केलीय, दुसरी वर हल्ला सुरू आहे. आता त्यात बरेच आत शिरलेत, पाच मिनिटाच्या वर टिकणार नाही वगैरे वगैरे.. फारच बाष्कळ होते. >> मानव, हे वर्णन जॉन ग्रिशमच्या गोष्टीचं वाटत नाही. त्याच्या गोष्टी वकिलांच्या अवतीभवती गुंफलेल्या असतात.

त्यात आजीला उद्देशून चेटकीण शब्द वापरलाय. चांगली चेटकीण >>> चांगल्या चेटकीला भारा भागवतांनी नेटकी असा शब्द वापरलाय. Happy

वाचूच शकत नव्हते तरीही पुर्ण केलेलं चालेल का, तर कोसला. अजिबात न आवडलेलं, बास आता इथे थांबुया. तरी लोकांना का आवडलं असेल विचार करत पुर्ण वाचलं आणि जाम पश्चाताप झाला, का वाचलं.>>+१११११११११११११११
मीपण कॉलेजमधे असताना वाचलेले

मामी त्या थीम व्यतिरिक्तही पुस्तकं लिहिली त्याने नंतर.
उदा. A painted house, Bleachers.
मी वर जे सांगितलंय ते ही त्याचच आहे.
बहुतेक The Broker.

Pages