क्षणांचं खरंच या लक्षणच खोटं
ओढ किनार्याची कसली नाही
किनार अस्तित्वाच्या असली तरी
त्याचीही याना क्षिती नाही
पुढच्याच्या हातात सोपवून सारं
व्हायचं माहित पटकन पसार
तरी पण
त्यातला एखादा असतोही उत्कट
उजळून टाकतो आयुष्यच सारं
अन बेसावधही असतो क्षण एखादा
उधळून टाकायला नीटनेटकं सारं
सारवलेल्या कोर्या जिंदगीवर
पेरतच जातात हे रांगोळीचे कण
साकारतंय त्यातून चित्र कसं
पहायला याना फुरसद नाही
बघेल पुढचा काय ते म्हणत
शेवटच्या क्षणावर सोपवतात सारं
आणि मरणाच्या उंबरठ्यावरच्या
जिंदगीच्या कुठल्यातरी
अडखळतो शेवटचा तो क्षण
घेऊन मग क्षणभंगुरतेचा झाडू
होतो पुसूनच सारं टाकायला आतूर
क्षणाना आधीच्या निदान असते
पुढच्या तरी क्षणाची आस
याच्या वाट्याला याच असूयेचा घास
क्षीण श्वासाचं संगीत क्षणात होतं बंद
संगीत खुर्चीतून करत याला बाद
वेगाच्या बेहोषीतल्या इतर क्षणाना
नकोच मग असते असली ही ब्याद.
क्षणिक
Submitted by भाऊ नमसकर on 6 September, 2010 - 00:45
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा वा! जो भी है बस यही इक
अरे वा वा!
जो भी है बस यही इक पल है!
मस्तच हो भाऊ
मस्तच हो भाऊ
वेगवेगळे क्षण चांगले टिपलेत.
वेगवेगळे क्षण चांगले टिपलेत.
क्षीण श्वासाचं संगीत क्षणात
क्षीण श्वासाचं संगीत क्षणात होतं बंद
अतिशय अर्थपूर्ण आणि जोडीने लयबद्धही...अप्रतिम!
भाऊ, सुरेखच उतरली आहे. आवडली.
भाऊ, सुरेखच उतरली आहे. आवडली.
मस्त आहे हो भाऊ
मस्त आहे हो भाऊ
खूप वेगळी णि खूप छान आहे
खूप वेगळी णि खूप छान आहे कविता..
घेऊन मग क्षणभंगुरतेचा
घेऊन मग क्षणभंगुरतेचा झाडू
होतो पुसूनच सारं टाकायला आतूर
क्या बात है भाऊ.. मस्त टिपलाय.
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.
कनसेप्ट आवडला भाऊ... गुड वन !
कनसेप्ट आवडला भाऊ... गुड वन !
गिरीशजी, तुमचं "गुड वन"
गिरीशजी, तुमचं "गुड वन" माझ्यासाठी "बेस्ट वन"च कीं ! धन्यवाद.
मस्तच हो
मस्तच हो