मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - प्रार्थनास्थळ
कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.
सुनिधी, धन्यवाद... कोकण
सुनिधी, धन्यवाद... कोकण बघितलं नाही म्हणजे कमाल आहे... आता पुढची ट्रीप नक्की कोकणात करा.
हे गुहागरचे 'श्री दुर्गादेवी देवस्थान'. काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार केलाय. आमची कुलदेवी. माझं अतिशय आवडतं मंदिर. (जुनं मंदिर अजून जास्त आवडायचं )
सॅम, ह्याला गुलाबी रंग दिलाय?
सॅम, ह्याला गुलाबी रंग दिलाय? किती सुंदर दिसतय. गुहागरच व्याडेश्वराचं मंदिर पाहिलय पण हे नाही पाहिलं.
सॅम, दोनचार आहेत अजून. सुनिधी
सॅम, दोनचार आहेत अजून.
सुनिधी अवश्य जा कोकणात. या देवळांशिवाय बरीच देवळे आहेत गोव्यात. (ब्रम्हकरमळीचे ब्रम्हमंदिर, पणजीचे महालक्ष्मी मंदिर, पर्वरीचे पुंडलिक मंदिर, साखळी (सांकलेम) चे प्रति पंढरपूर, दत्तमंदिर, फोंड्याचे बालाजी मंदिर .. )
हे आहे थायलंड मधील एक बुद्धमंदिर. बराच जूना फोटो आहे. स्कॅन केलाय
सॅम, आमचं कुलदैवत व्याडेश्वर.
सॅम, आमचं कुलदैवत व्याडेश्वर. तिथे ७ वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा ह्याच मंदिरात राहिलो होतो.
सॅम आणि दिनेशदा, मस्त फोटो.
सॅम, गुहागरला माझी आत्या
सॅम, गुहागरला माझी आत्या असते. (जिने माझे नाव ठेवले, ती) पण अजून जाणे झाले नाही. ते इथे बघितले.
मेढ्यातले साळगांवकराचे गणपति मंदिर पण नाही बघितले अजून (तिथेच आमचे घर होते.) तेही इथेच दिसले.
हे जून्या गोव्यातले चर्च.
हे जून्या गोव्यातले चर्च. सेंट झेवियर चे शव जिथे ठेवलेय, त्याच्यासमोर आहे हे. एका बाजूचा मनोरा, आता कोसळला आहे.
सॅम सही माहिती आणि
सॅम सही माहिती आणि फोटोज.
पाळंदे, कस्ले खास आह! मी डॅलसचे बॅप्स देऊळ बघितले आहे.
खूप नवनवीन देवळे कळलीत.
अमृता धन्यू.
अमृता, हे दुर्गादेवीचं मंदिर
अमृता, हे दुर्गादेवीचं मंदिर जास्त कोणाला माहिती नाही. गावापासून थोडंस लांब आहे. त्यामुळे गर्दी कमी (म्हणून तर मला आवडतं!)
दिनेशदा, एकामागोमाग दोन फोटो टाकले की तुम्ही!!!
हे हेदवीचे गणेश मंदिर. अतिशय प्रेक्षणीय परिसर. इथे जाणारा रस्ता देखील सुंदर आहे.
सॅम, मला वाटलं नाही कुणाच्या
सॅम, मला वाटलं नाही कुणाच्या लक्षात येणार. सगळे फोटो उत्तम, अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे.
किती बघायचं राहुनच गेले....
टोरोंटो, कॅनडा येथिल स्वामी
टोरोंटो, कॅनडा येथिल स्वामी नारायण मंदीर
अंबोली येथील हिरण्यकेशीचे
अंबोली येथील हिरण्यकेशीचे देऊळ. देवळातच या नदीचा उगम होतो. (जाळीच्या मागे )
लोणार येथील उल्कापाताने तयार
लोणार येथील उल्कापाताने तयार झालेल्या विवरात बरीच प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील थोडी अजूनही वापरत आहेत. त्यातलेच हे एक. दुपारी एकट्याने तिथे गेलो होतो. अतिशय भयाण वातावरण .. ते गोलाकार तळे ... चारी बाजूंनी वरती आलेली जमीन.. तिथे अस्तित्व होतं फक्त माझं आणि काळ्या तोंडाच्या वानरांच!!
BAPS म्हणजे काय? ह्युस्टन ला
BAPS म्हणजे काय? ह्युस्टन ला पण झालंय २००४ पासून स्वामी नारायण मंदिर .. अबब! काय ती भव्यता आणि श्रीमंती ..
खरचं ती अमेरिकेतील मंदिरं
खरचं ती अमेरिकेतील मंदिरं किती भव्य आणि सुंदर आहेत!
मी जरा थांबतो आता... नाहितर संयोजक रागावतील
अमृता शांतादुर्गेचा फोटो
अमृता शांतादुर्गेचा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. कित्येक वर्षांनी बघितले.
मागच्या दोन पानांवर एकदम युरोप व्हर्सेस कोकण अशी जुगलबंदी चालु आहे असं वाटलं!!
सॅम सुंदर फोटो आहेत सगळे.
दिनेशदा तांबडी सुर्ला बद्दल अनेक आभार. तो तिथला परिसर खरोखरच काळ काही शतके मागेच थांबल्यासारखा वाटतो. मी गेले होते पावसाळ्यात. तेव्हा तिथल्या निरव शांततेत झर्याची खळखळ अप्रतिम वाटत होती. अगदी परत येऊच नये अस वाटलं होतं.
हिरण्यकेशी इतक खराब का दिसतय?? आणि कसल्या रंगात रंगवलय ते. अरेरे. मी अनेक वर्षांपुर्वी जे पाहिलेलं आठवतय ते झाडांच्या गर्दित लपलेलं होत. हि असली जाळीबिळी नव्हती. त्या गुहेतही जाता यायचं, मी आणि बाबा गेलेलो थोडसं.
सॅम, येऊ दे. इथे फोटोंचं
सॅम, येऊ दे. इथे फोटोंचं लिमिटेशन नाहीये.
सॅम/दिनेशदा सुसाट कलेक्शन आहे तुमच्याकडे देवळांचं. सॅम युरोपातली चर्चेस भारी आहेत तुमच्याकडे व दिनेशदा तुमची मास्टरी कोकणात दिसतेय. भन्नाट आहेत फोटो.
अहिल्याबाई होळकरांचे महेश्वर
अहिल्याबाई होळकरांचे महेश्वर
महाबलीपुरमचं समुद्राकाठचं
महाबलीपुरमचं समुद्राकाठचं मंदीर. वरच्या पोस्टरमध्ये तेच आहे बहुधा.
कोणार्क मंदिराचा फोटो नाही का
कोणार्क मंदिराचा फोटो नाही का कुणाकडे?
माझ्याकडे इथे नाहीए आता..
खरच सुंदर आहेत हो
खरच सुंदर आहेत हो देवळे.
शांतादुर्गा, मंगेशी, महालसा चे फोटो आहेत माझ्याकडे, पण इथे आधीच आहेत म्हणून नाही टाकले.
सावली, हिरण्यकेशीच्या उगमाकडे आताही जाता येते. पण आता तिथे पक्का रस्ता केलाय. म्हणुन पुर्वीची गंमत नाही.
आणि तामडी सुर्ला तर अजूनही तसेच आहे.
इथेच मायबोलीवर अनेक मदिराचे फोटो पुर्वी झळकले होते. कोणार्क तर होतेच, पण कन्याकुमारीचे देऊळ पण होते. संयोजक बघा तरी ... सापडतील. निदान दुवे तरी द्या ...आणि दुवे घ्या.
बेंगंलुरु मधलं नंदी मंदीर...
बेंगंलुरु मधलं नंदी मंदीर...
सर्वांचे धन्यवाद! आऊटडोअर्स
सर्वांचे धन्यवाद!
आऊटडोअर्स फोटोंना लिमिट नाहिये... पण माझ्यामुळे पुढच्या वेळेस येइल असं वाटलं मला, उगाचच धाग्याचे अपहरण करायला नको न
तरी.. अजुन एक...
सोलापूरचे प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर.
गोरखगडाच्या माथ्यावरचं
गोरखगडाच्या माथ्यावरचं गोरखनाथाचं मंदिर -
(No subject)
हा कसा अजून आला नाही?
हा कसा अजून आला नाही?
भिमाशंकर मंदिर
भिमाशंकर मंदिर
(No subject)
श्री स्वामीनारायण मंदिर,
श्री स्वामीनारायण मंदिर, वलसाड, गुजरात. समुद्रकिनारी आहे हे मंदिर, एकदम सही वाटतं इथे!!
रत्नालयम (बालाजी देवस्थानम),
रत्नालयम (बालाजी देवस्थानम), शामीरपेट, हैदराबाद
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
बॉस्टनजवळ कुठेतरी चालत्या
बॉस्टनजवळ कुठेतरी चालत्या गाडीतून टिपलेलं चर्च
Pages