शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ११

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:55

मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - प्रार्थनास्थळ

कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.

2010_MBZabbu-Prarthana-Sthale-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा आडो. मी वाटच बघत होते कोणी ओळखतय का याची!.
नाहितर इथे खरखर जाऊन असा फोटो घ्यायच आमचं कुठचं नशीब Proud

बांधकामात पोर्तुगीज छाप आणि अतिशय स्वच्छ ही खासियत गोयंच्या देवळांची... अगदी शांतादुर्गासारखे गजबजलेले देवस्थानही स्वच्छ असते बर्‍यापैकी. Happy
फार हात राखून झब्बू द्यायला लागतोय त्यामुळे काही कमाल देवळं इथे टाकता येत नाहीयेत.. Happy

हे अजून एक कोकणातल्या आडगावचे देऊळ
vafoli.jpg

शिरोड्याचा वेतोबा आहे का? टाका तो जरा. केळ्याच्या घडांनी सजवलेला असेल तर अजूनच मस्त! Happy

हा आमचा झब्बू.. अंबडपाल, कुडाळ येथील एका देवळाच्या दिपमाळेसून देऊळ... Happy
ambadpal-(3).jpg

Pages