Submitted by भाऊ नमसकर on 6 September, 2010 - 01:06
आ वासून समोरच नव्हतं ठाकून उभं
कसलंच कपाळाचं कामही साधं आज
आयतंच त्यांचं फावणार आता आहे
धरून फेर, मिरवायला नित्याचा नाच
आठवणीना या नव्हतं गोंजारलं मी कधी
झिडकारलं नाही पण दटावलं अधी मधी
सोबत त्यांची बरी, तरी भिती दाटते उरीं
नेतील त्याच वळणावर, मिटवून सारी दूरी
मित्र जिथले सोडले, पुसल्याही खाणाखुणा
नका म्हटलं नेऊं तिथं, करूनही मला पाहुणा
विसरलो तिला, तर म्हणे पोकळ हा बहाणा
आयुष्याच्या शून्यातून होणारच कसा तू उणा !
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
क्या बात है...!
क्या बात है...!
वाह.....!!!!!!!
वाह.....!!!!!!!
"आयुष्याच्या शून्यातून होणारच
"आयुष्याच्या शून्यातून होणारच कसा तू उणा !"
मस्तच
लाजवाब!
लाजवाब!
मस्त
मस्त
आयुष्याच्या शून्यातून होणारच
आयुष्याच्या शून्यातून होणारच कसा तू उणा ! >>>
व्वा भाऊ !
सहमत आहे भाऊ
सहमत आहे भाऊ
छान.......................
छान....................... अप्रतिम भाऊ!
लाजवाब!
लाजवाब!
मनपूर्वक आभार.
मनपूर्वक आभार.
सुंदर !!!
सुंदर !!!
गिरीशजी, धन्यवाद.
गिरीशजी, धन्यवाद.