दहा पंधरा वर्ष वेगवेगळ्या प्रसंगाच्या आठवणींसाठी म्हणुन बाटल्या ठेवल्या. त्या माळ्यावर साठविल्या होत्या. नंतर नविन बंगला बाधल्यावर कंपाउंडच्या भिंतीवर लावण्यासाठी त्या सर्व नेल्या. पण त्याआधिच भिंतीचे प्लॆस्टर झाले होते, त्यामुळे त्या तशाच खालच्या कपाटात राहिल्या. भंगारवाल्याच्या एक रुपयाला एक बाटली देण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.
एक दिवस रिकाम्यावेळी मनात आलं बाटली रंगवावी, सहज म्हणुन त्यातल्या ३ बाटल्या गरम पाण्यात भिजत घातल्या. त्यावरचे कागद काढले. कोरड्या केल्या. नंतर पांढरा अॅक्रेलीक रंग बाटलीला दिला. एखाद्या कागदावर नक्षी काढावी त्याप्रमाणे बाटलीवर डायरेक्ट ब्रशने निळ्यारंगाचे डिझाईन काढले. ब्लू पॉटरी प्रमाणे ती बाटली दिसायला लागली. त्याच निळ्या रंगात तिनही बाटल्या रंगविल्या. त्यांचा एक छान ग्रुप तयार झाला. पांढर्या निळ्या खोलीत ठेवल्यावर त्या अधिकच खुलल्या. तेव्हापासुन माझा रोजचाच उद्योग झाला.
फक्त अॅक्रेलिक रंग व ब्रश एव्हड्याच साहित्यात या बाटल्या रंगतात. कधी त्याच्यावर आरश्याचे तुकडे चिटकविले, कधी टिकल्यांनी, जयपुरी स्टोनने डिझाईन केले. अॅक्रेलिक रंग हे धुता येतात, झटपट वाळतात व काचेवर चांगले बसतात. कोणीही हे काम करु शकतं. मेमेंटो म्हणुन देता येतात. थोडीशी कल्पनाशक्ती, थोडे रंग व रिकामी बाटली. अगदी सॉसची सुद्धा चालेल. स्वयंपाक घरात ठेवण्यासाठी तुम्ही तिच्यावर फळा, भाजी चे चित्र काढु शकता. करुन पहा. माझे तर फारच कौतुक झाले, तुमचेही होईल.
तळतिप: (माझी मुलगी वर्षा नायर हिने मला ह्या स्पर्धेमधे मी भाग घेण्यासाठी खुप आग्रह केला, व तिनेच माझ्यासाठी त्यामुळे मायबोलीचा आयडीदेखिल घेतला.)
सगळ्याच कलाकृती फार सुंदर!
सगळ्याच कलाकृती फार सुंदर! काळ्या-पांढर्या बाटल्या प्रचंड आवडल्या.
अप्रतिम आहेत वर्षाचेही
अप्रतिम आहेत वर्षाचेही धन्यवाद.
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
छानच आहेत. काळ्या -
छानच आहेत. काळ्या - पांढर्या आणि मनीप्लँटवाली विशेष आवडली. ते पान अगदी खरं वाटतंय.
अप्रतिम
अप्रतिम
छानच आहेत
छानच आहेत
मला सर्वच आवडल्या. थेट
मला सर्वच आवडल्या. थेट बाटल्यांवर रंगवलेय, हे खासच.
इजिप्त मधे वेगळ्या प्रकारे सजवलेल्या बाटल्या मिळतात. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाची रेती वापरतात. बाटलीच्या आत रेती भरतात. आणि वरून एका काडीने, ती बाटलीच्या कडेला अशी काय बसवतात, कि त्याचे चित्रच तयार होते. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्यातली कला कळत नाही. या बाटल्या बघून त्यांची आठवण आली.
केवढी ती कल्पनाशक्ती. एकदम
केवढी ती कल्पनाशक्ती. एकदम आवडलं.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
मस्तच आहेत ह्या रंगवलेल्या
मस्तच आहेत ह्या रंगवलेल्या बाटल्या
फार सुंदर!!!!! तुमची
फार सुंदर!!!!! तुमची चित्रकला पण सुंदर आहे त्यामुळे बहार!!!
अप्रतिम! सगळ्या बाटल्या
अप्रतिम! सगळ्या बाटल्या प्रचंड आवडल्या. खूप छान कल्पना.
सुरेख. काळ्या-पांढर्या खूप
सुरेख. काळ्या-पांढर्या खूप आवडल्या.
काय एकेक कलाकार आहेत
काय एकेक कलाकार आहेत मायबोलीवर.
सगळ्याच बाटल्या सुंदर.मलाही काळ्या पांढर्या सगळ्यात जास्त आवडल्या.
ते मनीप्लँट मलाही खरंच वाटलं.
खुप सुंदर झाल्यात सगळ्या
खुप सुंदर झाल्यात सगळ्या बाटल्या.
सुरेख!!! मनीप्लांटवाली
सुरेख!!! मनीप्लांटवाली सगळ्यात जास्त आवडली.
होय, मनीप्लांट तर अगदी खर
होय, मनीप्लांट तर अगदी खर वाटतय.
सुरेखच.
सुरेखच.
मी करून बघतेच आता...
मी करून बघतेच आता...
स्नेहा, गणपतीच्या आधी करुन
स्नेहा, गणपतीच्या आधी करुन फोटो टाक इकडे.
छान!
छान!
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम आहेत सगळ्या बाटल्या
अप्रतिम आहेत सगळ्या बाटल्या
जबरदस्त ! मला पण ती
जबरदस्त ! मला पण ती मनीप्लॅन्ट्वाली खूप आवडली !!
जबरदस्त्....सुरेख...
जबरदस्त्....सुरेख...
सुंदर ज्यांना ह्या बाटल्या
सुंदर ज्यांना ह्या बाटल्या भेट म्हणून मिळतील ते किती lucky ! ( माझी चित्रकला अगाध असल्याने स्वतः रंगवणे अशक्य आहे. )
मनीप्लँट, फुलांच्या सगळ्याच, घुंघट घेतलेली बाई ह्या विशेष आवडल्या
अप्रतिम कलाकारी ! खुपच छान
अप्रतिम कलाकारी ! खुपच छान !
दोन नंबर फडताळातल्या बाटल्या , शिवास रिगल ( ?)
वा काय मस्त आहे आयडीया. खुपच
वा काय मस्त आहे आयडीया. खुपच सुंदर दिसताहेत. त्या काळ्या पांढर्या तर अप्रतिम.
आता बाटल्या शोधेनच करायला.
छान आहे आयडीया
छान आहे आयडीया
अप्रतिम
अप्रतिम
Pages