टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ५ - vijuvini

Submitted by संयोजक on 15 September, 2010 - 13:47

घरगुती आकर्षक कुंडी
TT_vijuvini_KundiBase_BatliTop.jpg

साहित्य - कोल्ड ड्रिंक ची मोठी बाटली (कोका-कोला,स्प्राईट), कात्री, माती, गांडूळ खत (उपलब्ध असल्यास) , भाजीची देठे, नारळाची शेंडी, पाणी, आवडीचे रोप / बिया

कृती -
१) बाटली मध्य भागाच्या थोड्या वरच्या बाजूस कापून बाटलीचे २ भाग करावे.

२) बेस वाल्या बाटली मध्ये विटेचा अथवा खापराचा तुकडा किवा २-३ दगड आणि बाटलीचे बुच घालावे व बाटली पाण्याने भरावी.

३) बाटलीच्या तोंडात नारळाची शेंडी अगर मॉस घालून त्यावर गांडूळ खत आणि माती अर्ध्या भागापर्यंत भरावी.मग, त्यावर भाजीच्या कड्या घालाव्यात. बाटलीमध्ये १/२ ते १ इंच जागा मोकळी सोडावी. मग, त्यात कुठलेही शोभेचे झाड, मनी प्लांट किवा आवडत्या रोपाच्या बिया (लसणाची पाकळी,अबोली,क्रोटन,लिली च्या बिया ) लावाव्या व पाणी घालावे. आता, बाटलीच्या तोंडाची बाजू अगोदर पाणी भरून ठेवलेल्या बाटलीच्या बेस मध्ये ठेवावे.

४) ८ दिवसांनी भाजीची देठे (कोथिंबीर, पालेभाजी, फळांची साले ) बारीक चिरून २ चमचे घालावे व बेस मधील पाणी बदलावे.

अशा रीतीने पर्यावरणाला पोषक, दिसायला सुबक व प्रदूषण टाळण्यास हातभार लावणारी अशी ही सुंदर,सुटसुटीत घरगुती कुंडी तय्यार !!!

TT_vijuvini_Tayar_Kundi.jpgफायदे -
१) रोज झाडाला पाणी घालावे लागत नाही.
२) सुशोभीकरणासाठी कुठेही सोयीस्कर रीत्या होल मध्ये किवा डायनिंग टेबल वर हलवता येते.
३) ह्या बाटलीला सोनेरी कागद लाऊन शोभिवंत रिबन बांधून प्रेझेंट द्यावयास सुंदर वस्तू तयार होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर कल्पना..... खुप जणांना हौस म्हणुन काहितरी उगवुन पाहायचे असते, त्यांच्यासाठी चांगली सोय आहे. यात थोडी कोथिंबीर, थोडीशी मेथी, पालक, आले, लसुण इ. लावता येतील.

ह्या बाटल्या मला घरात ठेवायला आवडत नाही, मी फेकुन देते, त्यांचा उपयोग होईल आता..

मस्तच Happy
मी पण हे करणार आता
(शिन्च्या प्लॅस्टिकच्या ढिगभर बाटल्यान्च करायचे काय हा प्रश्न होताच.
भन्गारवाले घेत नाहीत अन कचर्‍यात टाकवत नाहीत Proud
तेलाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यान्पेक्षा रोपे तयार करायला हा उपाय चान्गला वाटतो, आईला सान्गितला पाहिजे)

छान कल्पना आहे Happy
जोराच्या वार्‍याने कलंडणार तर नाही ना? कारण बेस पेक्षा वरच्या भागाचे वजन जास्त असेल.

मस्त Happy

सर्वान्च्या प्रतिक्रीयान्बद्दल धन्यवाद !!!
अमि,
काळजी नसावी, बाटली पडणार नाही. मी माझी बाटली मधील झाडे गच्ची मध्येच ठेवली आहेत. आपण बेस मध्ये जी दगड घालतो त्यामुळे बाटलीला जड पणा येतो.
आता च माझ्या बाटली मध्ये आल्याचे रोप सुंदर उगवल्याचे दिसले. तुम्ही पण लावून बघा. Happy

अरे, मस्त आहे आयडिया, टाकाऊतून टिकाऊ, पर्यावरण संवर्धन आणि सुशोभिकरण सगळंच एकत्र जमून आलं आहे! सलाईनच्या रिकाम्या बाटल्यांमध्येही अशी रोपे लावता येतात असे मध्यंतरी कोठेतरी वाचले होते.

मी हि मागील वर्षी २०१५ च्या गणपती उत्सवासाठी प्लास्टिक च्या बाटल्या वापरूनच एक डेकोरेशन बनवले होतो .
त्यातीलच काही फोटो .....

img_1473.jpgimg_1479.jpgimg_1485.jpg

धन्स साधना.

विश्या, खुप छान डेकोरेशन. एक सजेशन आहे की ते कंपनीचे लेबल्स काढले असतेत तर आणखी छान दिसले असते.