Submitted by मराठी शब्द on 15 September, 2010 - 10:43
पहील्यांदाच काव्य लिहीले आहे. सांभाळुन घ्या.
रक्तवर्णी पानझडी
दिल्या मी तुला ग
दूर तेथे शीळ घाली
राघू तो हिरवा ग
धूर-दुलई पांघरली
सरीतेच्या पाण्यानं
ती आली झूळकन
चमकती मासोळी ग
शांततेची नीरवता
ऐकलीस का ग
भूलून त्यास येई
ससूला बाहेर ग
भूंगा काळा कडक
त्यामागे मधूभक्षी ग
त्याच्याकडे चावी तर
माशी करे चोरी ग
किती सांगू अन कसे
माझे असे वर्णन
मी तुझ्या भोवतीचा
निसर्ग असा आहे ग
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने
पहिल्या प्रयत्नाच्या मानाने खूपच चांगली.
पुलेशू.
@गंगाधर मुटे - तुमच्या कडून
@गंगाधर मुटे - तुमच्या कडून पावती मिळाली! धन्य झालो.