अप्रसिद्ध गणपती अथवा मंदिरांची माहिती

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 06:50

2010_MB_AprashiddhaGanapati_Mandire.jpg

'गणपती' हे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कित्येकांचे आराध्य दैवत आहे.
महाराष्ट्राला अष्टविनायकांची देणगी मिळाली आहे. शिवाय प्रत्येक शहरातला/गावातला एकतरी प्रसिद्ध गणपती असतोच. पुण्याचा कसबा गणपती, मुंबईतला सिद्धीविनायक, कोल्हापुरातलं बिनखांबी गणेशमंदिर व ओढ्यावरचा गणपती, नाशिकचा नवश्या गणपती. तर हे झाले प्रसिद्ध गणपती. काही निमित्ताने आपले या शहरात जाणे झाले तर आपण या नावाजलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतोच. याखेरीजही अनेक अपरिचित मंदिरं आपल्यापैकी काही जणांना माहीत असतील. आपल्या जन्मगावातले/आपल्या पुर्वजांनी बांधलेले एखादे छोटेसे देऊळ असेल किंवा वाडीतील लोक भक्तीभावाने ज्याला नवस बोलतात असा एखादा कोपर्‍यावरचा गणपती असेल.

चला तर मग आपल्याला माहीत असलेल्या अशाच काही मंदिरांची ओळख या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मायबोलीकर बांधवांना करुन देऊया. तुम्हांला माहीत असलेल्या/तुम्ही भेट दिलेल्या अप्रसिद्ध गणपती अथवा मंदिराची माहिती इथे लिहा. मग ती मंदिरं महाराष्ट्रातील, भारतातील किंवा भारताबाहेरीलसुद्धा चालतील. माहितीबरोबर जास्तीत जास्त ४ छायाचित्रे जोडू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुई येथील एकवीस गणपती मंदिर

पाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या "पुई" या गावी आहे "एकवीस गणपती मंदिर". येथे महाराष्ट्रातील विविध गणपतींचे एकत्र दर्शन घेता येते.
जवळच सिद्धेश्वर येथे तलावाकाठी असलेले शंकराचे पुरातन मंदिरही बघण्यासारखे आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन जवळच असल्याने एका दिवसात व्यवस्थित पाहुन होते.

स्वयंभू गणेश,

औदूंबरला मुख्य मंदिराजवळच हे स्वयंभू गणपतीच मंदिर आहे.
माहिती अशी की या झाडाच्या खोडातच गणपतीने आकार घेतला. तिथल्या गावकर्यान्नी मग शेंदुर लावून यास रूप दिल आणि तिथेच एक छोटास मंदिर बांधल..

राजगडाच्या सुवेळा माचीवरची गणेशाची मुर्ती,
माचीचे बांधकाम उभे रहात नव्हते म्हणुन ह्या गणेशाची तिथे स्थापना केल्याचे संगितले जाते.
Rajgad_4_259.jpg

हा रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा[ हो तेच ते ८९ च्या महापुरात वाहुन गेलेले गाव] येथील सिध्दलक्ष्मी महागणपती

ganapati 1.JPG

हा देवळाच्या आतला फोटो

ganapati.JPG

आणि ही त्याच गणपतीची देवळात ठेवलेली चांदीची [बहुदा] प्रतिकृती.

ganapati 2.JPG

हिम्स, माझ्याकडे आहे रे तो फोटो आणि तो मी टाकणार आहे.
सध्या घरचे नेट गंडल्यामुळे अपलोड करणे नाहि जमत आहे. Sad

Reddi.jpg

सिंधुदुर्ग जिल्यामधील रेडी येथील श्री गणेश.
अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उचीची मुर्ती आणी तिला शोभेल अश्याच आकाराचा ऊंदीर.
मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे.
तिथे लिहलेल्या माहितीनुसार - ती मुर्ती याच ठिकाणी जमिनीखाली होत. एका खाणकामगाराच्या स्व्प्न्दात येऊन गणेशाने त्यास दृषटांत दिला, त्या नुसार गावकर्‍यांच्या मदतीने तेथे खोदकाम केल्यावर प्रथम गणेशाची मुर्ती आणी नंतर मुषक सापडला.
मुर्तीला रंगकाम केल्यामुळे मुळे पाषाणातील रूप नाहिसे झाले आहे.

पावस येथील आवळी गणेश
रत्नागिरी जिल्ह्यातील "पावस" येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मठातील हा गणेश.
आवळ्याच्या झाडावर प्रकटलेल्या प्रतिमेवरून "आवळी गणेश" हे नाव.

नाणेघाट येथील गुहेतील श्री गणेश

प्राचीन नाणेघाट येथील प्रसिध्द रांजणासमोर असलेल्या गुहेतील हा श्री गणेश.

शिवथरघळ येथील श्री गणेश
श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या निसर्गरम्य शिवथरघळ जवळील हा श्री गणेश.

धन्स जुई Happy

कोरीगडावरचा गणपती मी पोस्ट करणारच होतो>>>>सचिन, राजगडावरच्या तुझ्या गणेशाच्या फोटोवरूनच सुचलं रे Happy

नांदगाव येथील सिद्धिविनायक

अलिबागहुन मुरूड-जंजिर्‍याला जाताना काशिद गावाच्या पुढे असलेले हे नांदगाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील सिद्धिविनायक गणेशाच्या मंदिरामुळे. अतिशय सुंदर आणि शांत असे हे मंदिर आवर्जुन बघण्यासारखे आहे.
(मूर्तीचे फोटो काढण्यास परवानगी नसल्याने फक्त मंदिराचा फोटो डकवत आहे. :))