'गणपती' हे अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही कित्येकांचे आराध्य दैवत आहे.
महाराष्ट्राला अष्टविनायकांची देणगी मिळाली आहे. शिवाय प्रत्येक शहरातला/गावातला एकतरी प्रसिद्ध गणपती असतोच. पुण्याचा कसबा गणपती, मुंबईतला सिद्धीविनायक, कोल्हापुरातलं बिनखांबी गणेशमंदिर व ओढ्यावरचा गणपती, नाशिकचा नवश्या गणपती. तर हे झाले प्रसिद्ध गणपती. काही निमित्ताने आपले या शहरात जाणे झाले तर आपण या नावाजलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतोच. याखेरीजही अनेक अपरिचित मंदिरं आपल्यापैकी काही जणांना माहीत असतील. आपल्या जन्मगावातले/आपल्या पुर्वजांनी बांधलेले एखादे छोटेसे देऊळ असेल किंवा वाडीतील लोक भक्तीभावाने ज्याला नवस बोलतात असा एखादा कोपर्यावरचा गणपती असेल.
चला तर मग आपल्याला माहीत असलेल्या अशाच काही मंदिरांची ओळख या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मायबोलीकर बांधवांना करुन देऊया. तुम्हांला माहीत असलेल्या/तुम्ही भेट दिलेल्या अप्रसिद्ध गणपती अथवा मंदिराची माहिती इथे लिहा. मग ती मंदिरं महाराष्ट्रातील, भारतातील किंवा भारताबाहेरीलसुद्धा चालतील. माहितीबरोबर जास्तीत जास्त ४ छायाचित्रे जोडू शकता.
पुई येथील एकवीस गणपती
पुई येथील एकवीस गणपती मंदिर
पाली गावातील अष्टविनायकातील एक श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन अवघ्या ३ किमी अंतरावर वसलेल्या "पुई" या गावी आहे "एकवीस गणपती मंदिर". येथे महाराष्ट्रातील विविध गणपतींचे एकत्र दर्शन घेता येते.
जवळच सिद्धेश्वर येथे तलावाकाठी असलेले शंकराचे पुरातन मंदिरही बघण्यासारखे आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिरापासुन जवळच असल्याने एका दिवसात व्यवस्थित पाहुन होते.
स्वयंभू गणेश, औदूंबरला मुख्य
स्वयंभू गणेश,
औदूंबरला मुख्य मंदिराजवळच हे स्वयंभू गणपतीच मंदिर आहे.
माहिती अशी की या झाडाच्या खोडातच गणपतीने आकार घेतला. तिथल्या गावकर्यान्नी मग शेंदुर लावून यास रूप दिल आणि तिथेच एक छोटास मंदिर बांधल..
राजगडाच्या सुवेळा माचीवरची
राजगडाच्या सुवेळा माचीवरची गणेशाची मुर्ती,
माचीचे बांधकाम उभे रहात नव्हते म्हणुन ह्या गणेशाची तिथे स्थापना केल्याचे संगितले जाते.
सचिन, योगेश, स्मिहा- धन्यवाद.
सचिन, योगेश, स्मिहा- धन्यवाद.
मस्त.. योगी.. अरे सहिच रे..
मस्त..
योगी.. अरे सहिच रे.. ते मंदीर नक्कीच बघायला आवडेल..
यो, ५ वर्षापूर्वी त्याच
यो, ५ वर्षापूर्वी त्याच बांधकाम चालु होते आता मंदिर पूर्ण तयार झाले आहे.
हा रायगड जिल्ह्यातील
हा रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा[ हो तेच ते ८९ च्या महापुरात वाहुन गेलेले गाव] येथील सिध्दलक्ष्मी महागणपती
हा देवळाच्या आतला फोटो
आणि ही त्याच गणपतीची देवळात ठेवलेली चांदीची [बहुदा] प्रतिकृती.
यो रॉक्स बोरीवलीतील वझिरा
यो रॉक्स बोरीवलीतील वझिरा नाक्यावरच्या गणपतीचा फोटो टाक ना ईथे.. ते मंदिरदेखील सुंदर आहे...
जुई, मी सुद्धा हेच लिहिणार
जुई, मी सुद्धा हेच लिहिणार होतो
अरे कोणाकडे.. पावसच्या आवळी
अरे कोणाकडे.. पावसच्या आवळी गणेशाचे फोटो नाहीयेत का??? जमल्यास ते टाका की कोणीतरी..
हिम्स, माझ्याकडे आहे रे तो
हिम्स, माझ्याकडे आहे रे तो फोटो आणि तो मी टाकणार आहे.
सध्या घरचे नेट गंडल्यामुळे अपलोड करणे नाहि जमत आहे.
सिंधुदुर्ग जिल्यामधील रेडी
सिंधुदुर्ग जिल्यामधील रेडी येथील श्री गणेश.
अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उचीची मुर्ती आणी तिला शोभेल अश्याच आकाराचा ऊंदीर.
मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे.
तिथे लिहलेल्या माहितीनुसार - ती मुर्ती याच ठिकाणी जमिनीखाली होत. एका खाणकामगाराच्या स्व्प्न्दात येऊन गणेशाने त्यास दृषटांत दिला, त्या नुसार गावकर्यांच्या मदतीने तेथे खोदकाम केल्यावर प्रथम गणेशाची मुर्ती आणी नंतर मुषक सापडला.
मुर्तीला रंगकाम केल्यामुळे मुळे पाषाणातील रूप नाहिसे झाले आहे.
सचिन, मनिषा धन्स
सचिन, मनिषा धन्स
पावस येथील आवळी
पावस येथील आवळी गणेश
रत्नागिरी जिल्ह्यातील "पावस" येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मठातील हा गणेश.
आवळ्याच्या झाडावर प्रकटलेल्या प्रतिमेवरून "आवळी गणेश" हे नाव.
नाणेघाट येथील गुहेतील श्री
नाणेघाट येथील गुहेतील श्री गणेश
प्राचीन नाणेघाट येथील प्रसिध्द रांजणासमोर असलेल्या गुहेतील हा श्री गणेश.
कोराईगडावरच्या गुहेतील श्री
कोराईगडावरच्या गुहेतील श्री गणेश
शिवथरघळ येथील श्री गणेश श्री
शिवथरघळ येथील श्री गणेश
श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या निसर्गरम्य शिवथरघळ जवळील हा श्री गणेश.
दापोली तालुक्यातील आसुद
दापोली तालुक्यातील आसुद गावातील श्री व्याघ्रेश्वर मंदिर परीसरातील हा श्री गणेश
योगेश मस्तच कोरीगडावरचा गणपती
योगेश मस्तच कोरीगडावरचा गणपती मी पोस्ट करणारच होतो
आंजर्ल्याच्या गणपतीचा फोटो
आंजर्ल्याच्या गणपतीचा फोटो द्या ना ईथे...
आंजर्ल्याचा श्री गणेश दापोली
आंजर्ल्याचा श्री गणेश
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील श्री गणेश.
हेदवी येथील श्री दशभुज
हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश
मंदिराबद्दल अधिक माहिती:
http://www.maayboli.com/node/12393
मला वाटलच योगेश तुझ्याकडून
मला वाटलच योगेश तुझ्याकडून फोटो येणार ते...
धन्स जुई कोरीगडावरचा गणपती
धन्स जुई
कोरीगडावरचा गणपती मी पोस्ट करणारच होतो>>>>सचिन, राजगडावरच्या तुझ्या गणेशाच्या फोटोवरूनच सुचलं रे
नांदगाव येथील
नांदगाव येथील सिद्धिविनायक
अलिबागहुन मुरूड-जंजिर्याला जाताना काशिद गावाच्या पुढे असलेले हे नांदगाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील सिद्धिविनायक गणेशाच्या मंदिरामुळे. अतिशय सुंदर आणि शांत असे हे मंदिर आवर्जुन बघण्यासारखे आहे.
(मूर्तीचे फोटो काढण्यास परवानगी नसल्याने फक्त मंदिराचा फोटो डकवत आहे. :))
हरीशश्चंद्र गडावरील
हरीशश्चंद्र गडावरील गणेशगूहेतील गणापती
मस्तच... फोटो बघूनच मन शांत
मस्तच... फोटो बघूनच मन शांत झाले
सचिन धन्यवाद
सचिन धन्यवाद
अंबरनाथ येथील शिवमंदिर
अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरातील बाप्पा
श्री आशापूर सिद्धिविनायक
श्री आशापूर सिद्धिविनायक मंदीर - केळशी