Submitted by संयोजक on 4 September, 2010 - 01:23
कार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.
६. यात एक व्यक्ती कितीही वेळा मुद्यांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारे कथा लिहू शकते. फक्त ते करताना सलग दोन अगर अधिक प्रतिसाद लिहू नयेत.
७. या कार्यक्रमासाठी दर तीन दिवसांनी मुद्यांचा एक संच दिला जाईल.
८. या कार्यक्रमासाठी विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत लघुकथा लिहु शकता.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑडिट "I understand the
ऑडिट
"I understand the historical and social context of this festival. But I don't understand the symbolism and its need," एला बोलत होती. पहिलीच भारतवारी नेमकी गणेशोत्सवात घडणे म्हणजे 'रोलर कोस्टर व बंजी जम्पिंग' एकत्र करण्यासारखे झाले.
श्रद्धा, भाव हे दुसर्यापर्यंत पोहोचवणे भलतेच अवघड काम असते. शारदा म्हणायचीच, "एकवेळ या मातीचे बी त्या मातीत रूजते, पण वाढलेल्या वृक्षाला 'काही दिवस जरा ते हवामान ट्राय कर बघू' असे म्हटले तर?" तरी आशू या प्रवासाकडे एक 'अॅडव्हेंचर' म्हणूनच बघत होता. गणपतीला अॅडव्हेंचर वगैरे समजून घेणे जड जात होते, पण निदान तो याकडे एक वैतागयुक्त कर्तव्य असे बघत नाही याचे बरे वाटत होते. एलाच्या काही प्रश्नांनी मात्र आशु आणि गणपती दोघांचीही विकेट पडत होती.
आठवड्याभराने एलाने गुगली टाकला, "तू आणि तुझ्या घरचे एवढा रॅशनल विचार करणारे. Then how come you still follow the symbolism? Rajesh is an atheist. Yet, he enjoys the festival. And don't give me the usual historic-socio-cultural reasoning. I don't think it is applicable to Raju. He has a very fine mental filter." आशूचे सर्वच कुटुंब 'यांचं काहीतरी वेगळंच असतं बुवा!' छापाचे असले तरी राजेश (आशुचा भाऊ) मात्र त्यांच्यातही 'तुझे काहीतरी वेगळेच असते बुवा' असा. गणेशोत्सवाच्या विकृतीकरणाबद्दल इतर हळहळ व्यक्त करत असताना राजेश मात्र उत्सव 'एंजॉय' करायचा. मग दहा दिवसांतून एकदा तरी त्याने घरच्यांना 'तुम्ही नैतिक ढुढ्ढाचार्य आहात' असे खिजवणे, त्यावरून घरच्यांनी त्याला प्रत्युत्तर देणे, मग चर्चाजंगी होणे हे ठरलेले. ('निरगुडकरांकडे खडाजंगी होत नाही, चर्चाजंगी होते' इति नातेवाईक.)
गणपती व शारदा दोघांनाही यात मजा यायची. यावर्षी त्यांना 'आउटसायडर'कडून अनपेक्षित मुद्दे अपेक्षित होते. नेमके आज शारदेने उकडीच्या मोदकांचा घाट घातला असल्याने ती बिझी होती. तिच्या अनुपस्थितीत जे होईल ते तिला सांगण्याची जबाबदारी गणपतीवर होती. तो सावरून बसला.
'नेहमीची सांस्कृतिक-ऐतिहासिक कारणे देऊ नकोस' असा pre-emptive strike झाल्यावर आशुने "Let's ask Raju" असा कात्रज करून राजेशला गाठले.
"You are right Ella, in the sense that I do enjoy the festival, but what I really enjoy is the symbolic aspect."
"That's what intrigues me, Raju. Why do you still enjoy the symbolism? Granted it does have enormous significance because not everybody is so rational. So they may deify rationality itself. Isn't that self-contradictory?"
"या सणाचा अर्थ प्रतिकात्मतेत आहे. गणपती बुद्धीदाता वगैरेवर माझा विश्वास नाही. तू म्हणतेस, बहुतेक लोक रॅशनल नसतात. मी समजतो, उलट बहुतेक लोक रॅशनल असतात. त्यामुळेच स्वतःची प्रगल्भता वाढवावी असा विचार करतात. जे लोक असा विचार जाणूनबुजून करतात त्यांना ऋषीमुनी, तत्त्वज्ञ असे म्हणतात. जे अजाणता करतात ते आपण..... सर्वसामान्य. पण असा विचार तर सर्वच करतात, हो की नाही? म्हणजे बहुतेक जण रॅशनल असतातच. पण प्रगल्भता येण्यासाठी काही प्रोसेस आवश्यक आहे. ती प्रोसेस सगळे करतीलच असे नाही. ती प्रत्येकाने करावी यासाठी धार्मिक सिम्बॉलिझम आणला आणि धार्मिक धाक घातला. मी धार्मिक नाही. पण सिम्बॉलिझम ज्या प्रोसेससाठी आणला ती या दहा दिवसात करतो."
"What exactly is this process?" एलाने गणपतीच्या मनातील प्रश्न विचारला.
"धूर्तपणापासून शहाणपणापर्यंतच्या प्रवासाचे ऑडिट. 'किती आहे' हे समजायला धूर्तपणा लागतो, 'काय आहे' समजायला हुशारी लागते, 'कसे आहे' समजायला विद्वत्ता लागते आणि 'का आहे' हे समजायला शहाणपण लागते. आपली परिस्थिती कळायला स्वतःच्या बुद्धीचे ऑडिट करायला पाहिजे. धार्मिक असा, नसा. बरोबर की नाही?"
एलाने मान डोलावली. गणपतीने सोंड हलवली आणि संभाषणाचा 'भाव' शारदेपर्यंत कसा पोहोचवायचा या विचारात गढून गेला.
वा ! अरभाट. सॉलिड आहे.
वा ! अरभाट. सॉलिड आहे.
मस्त रे अरभाट किती, काय,
मस्त रे अरभाट
किती, काय, कसे, का भारीच आवडले.
अरभाट, छान लिहिलीयस
अरभाट, छान लिहिलीयस
मास्तुरे....
मास्तुरे.... ब्रुऽऽऽऽऽऽऽऽऽ..............
अरभाटची बुध्दीमान कथा!
अरभाटची बुध्दीमान कथा!
दंडवत सर!!
दंडवत सर!!
गणेशोत्सव २०१० अंतर्गत
गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.