ओरिगामी ही एक जपानी कला!! कागदापासून वेगवेगळे आकार तयार करणारी. अगदी साध्या बोटी पासून अगदी कठीण अशा ड्रॅगनपर्यंत सगळेच आकार बनवता येतात ओरिगामीने. जपानी मुलांना अगदी दोन वर्षांपासूनच कागद कसा नीट दुमडायचा याची ओळख करून दिली जाते. शाळेतही ओरिगामी हा विषय शिकवला जातो. कधी कधी तर मला वाटतं जपान्यांच्या नीटनेटकेपणामागे आणि काटेकोरपणामध्ये या ओरिगामी शिक्षणाचा फार सहभाग असावा.ओरिगामीमध्ये प्रत्येक घडी अगदी काटेकोर असली तरच शेवटचा आकार आपल्या मनाजोगता येतो.असेही म्हटले जाते कि ओरिगामीमुळे गणिती संकल्पना डोक्यात खूप पक्क्या बसतात. अर्थात ही ऐकीव माहिती आहे.
एवढं असूनही मी कधी ओरिगामी शिकायच्या फंदात पडले नव्हते. नाही म्हणायला एक दोन पुस्तके आणून सुरुवातीची फुलं , बोट असं काहीबाही करून बघितलं पण तेवढच. अलीकडे अचानक मला वाटलं की ओरिगामीमध्ये गणपती तयार करता येत असेल का? आंतरजालावर शोधून बघितलं पण फारसं काही सापडलं नाही. भारताच्या ओरिगामी मित्र वेबसाईटवर गणपती केला आहे अस कळलं पण तो कसा करायचा ते मात्र मिळालं नाही. मग हिरमुसले होऊन ती गोष्ट तशीच राहिली. आपणच प्रयत्न करून बघू असंही वाटलं, पण कसा जमणार म्हणून सोडून दिलं. तरी बहुधा मनाने सोडला नसावा हा विचार. कारण फावल्या वेळात ओरिगामीच्या वेगवेगळ्या घड्या पहात होते. त्यानंतर परत एकदा असंच कागद हातात घेऊन ,बघुया जमतंय का काही असा विचार करत, करून बघायला लागले आणि काय आश्चर्य! चक्क गणपतीचा आकार जमतोय असा वाटलं. मग थोडं अजून शोध घेऊन कागदाला वळण कसं द्यायचं ते शोधलं आणि त्यामुळे गणपतीची सोंडही छान तयार झाली. मग बरेच कागद वापरून, पुन्हा पुन्हा करून एक पद्धत नक्की केली. आता तयार झालेला गणपती बघून आनंद अगदी गगनात मावत नव्हता. अगदी कुणाला सांगू आणि कुणाला नको असं झालं. मी इथे ब्लॉगवर लिहिणार तेवढ्यात इथे मायबोलीवर गणेशोत्सवाची तयारी दिसली. तुम्हा सगळ्यांसमोर ओरिगामी गणपती करायची पद्धत आणायला यापेक्षा योग्य संधी कुठली असणार? बहुधा म्हणूनच गणपती बाप्पा अगदी योग्यवेळी कागदातून अवतरले असावेत.
चला तर मग. एक कागद , कात्री आणि गोंद घेऊन बसा माझ्या बरोबर.
१. लागणारे साहित्य
२. तुमचं काम करायला एक चांगली जागा , टेबल ठरवा. कागद मार्बल पेपर (घोटीव कागद ) किंवा त्याप्रकारचा घ्या. फक्त फार जाड नको आणि अगदी पातळ सहज फाटणारा नको.
३. कागदाची दोन टोके अशा प्रकारे जुळवा.
४. मध्यभागी कर्णावर (digonal) एक घडी घालून घ्या.
६. मग एक बाजू कर्णावर जोडली जाईल अशी दुमडा.
८ मग परत एकदा नवीन तयार झालेली बाजू कर्णावर दुमडा.
९. दुसरी बाजूपण याच पद्धतीने दुमडा.
१०. तुम्हाला अशाप्रकारचा कोनाकृती आकार झालेला दिसला पाहिजे.
११. त्या कोनाचं टोक घेऊन विरुद्ध बाजूला टेकवा.
१३.त्यानंतर या अर्ध्या भागाला परत एकदा दाखवल्याप्रमाणे दुमडा.
१४.हा वर आलेला छोटा भाग उलटया बाजूने परत एकदा दुमडा.
१५.या घडया उलगडल्यावर असे दिसले पाहिजे.
१६.मग पहिली घडी अशी दिसली पाहिजे.
१७.ही पहिली घडी तिथे कात्रीने दाखवल्याप्रमाणे कापा. दोन्ही बाजूला असे कापून घ्या.
१८.कापलेला भाग उघडून एक छोटीशी घडी घालून दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या.
१९.दोन्ही बाजूला सारखेच दुमडून घ्या. हा होईल गणपतीच्या कानाचा भाग.
२०.या कानाचे खालचे कोपरे किंचितसे दुमडा म्हणजे मग समोरून छान कानाचा आकार येईल.<
२१.आता समोरुन बघितल्यावर गणपतीसारखा दिसायला लागलाय ना?
२२.परत एकदा मागच्या बाजूने सोंडेचा भाग असा घडी करा.
२३ व २४. त्यावर उरलेला सोंडेचा भागही तशाच पद्धतीने घडी घालत रहा.
२५.शेवटी असं झिगझॅग दिसलं पाहिजे.
२६.हे असं स्प्रिंग सारखं वाटलं पाहिजे. मग हा सोंडेचा भाग छान दिसतो.
२७. हे झिगझॅग उघडा पण सगळ्यात पहिली घडी (२२ मध्ये घातलेली ) मात्र उघडू नका हं. उघडल्यावर असा दिसतं. पुढच्या पायऱ्या करायच्या नसतील तर इथेच थांबून सुद्धा चालेल. हाही आकार गणपतीसारखा दिसतोच आहे. डोळे काढल्यावर आणि दात लावल्यावर अगदी छान गणपती दिसतो. पण वक्रतुंड गणेश हवा असेल तर मात्र पुढच्या पायऱ्यांकडे वळाच.
२८.या पुढच्या घड्या थोड्या कठीण आहेत. कागद अशाप्रकारे मध्यावर दुमडून घ्या.
२९.सोंडेसाठी आपण आधीच पाडलेल्या आडव्या घड्या परत एकदा दाबून नीट दिसतील अशा करून घ्या.
३०.आता दाखवल्याप्रमाणे प्रत्येक आडव्या घडीसाठी एक तिरकी घडी करा. ही तिरकी घडी करताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जितकी जास्त तिरकी तितकी जास्त वळलेली सोंड. म्हणून कमी तिरक्या करा. घडी करताना त्रिकोणाचे शीर कागदाच्या उघड्या बाजूकडे ठेवा. हे उलटे केलेत तर सोंड बाहेर वळण्या ऐवजी आतल्या बाजूला वळेल.
३१.उघडल्यावर असं दिसलं पाहिजे. ही खूपच महत्वाची पायरी आहे.
३२.त्या घडया अशा त्रिकोणाकार दिसल्या तरच पुढच्या घड्या घालता येतील.
३३.आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या आणि तिरप्या रेघेवर असं दुमडा. त्यामुळे तिरकी घडी वर येऊन आडवी घडी त्या तिरक्या घडीच्या खाली झाकली जाईल.
३४.वरच्या पायरीमध्ये सांगितल्याप्रमाणे अजून तीन आडव्या घडयांसाठी करा.
३५.शेवटच्या घडीत मात्र अगदी टोक दिसू नये म्हणून थोडं टोक मागच्या बाजूला दुमडून घ्या. आणि शेवटची घडी अशी त्या मध्यकर्णावरच आतल्या बाजूला वळवा.
३६. आता तुमच्या घडया अशा दिसू लागल्या असतील.
३७. मधली कर्णावरची घडी उघडल्यावर छानसा गणेशाकार दिसू लागला असेल नाही? त्याचा वरचा डोक्याचा टोकदार भाग मागच्या बाजूला दुमडून टाका आणि मग गणपतीचा चेहरा बघा किती छान दिसतोय ते.
३८.त्याला सुंदरसे डोळे काढा. गंध काढा. अरे हो दात राहिलाय ना अजून!
३९.आता एक पांढरा २ सेमी x २ सेमीचा तुकडा घ्या.
४०. त्याचा परत ३ ते ७ पायऱ्या वापरून एक कोन करा.
४१. तो मध्यावर दुमडून टाका आणि मग हा चिमुकला कोन दाताच्या जागी गोंदाने चिकटवून टाका.
४२ व ४३ . आता या गणपतीचे काय करणार बरं? बघा, तुम्हाला याचं पॉपअप ग्रीटिंग कार्ड करता येईल.
४४. मी हा गणेश असा सोनेरी कागदावर चिकटवून भिंतीवरच लावलाय.
काय मग आता शिकवणार ना हा गणपती आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आजूबाजूच्या बच्चे कंपनीला? तुम्हाला आणि इतरांनाही आवडला तर मला येऊन सांगायला विसरू मात्र नका.
अरे वा. भारीच केलाय की गणपती.
अरे वा. भारीच केलाय की गणपती.
संयोजकांपैकी कुणाची 'कला' ही?
टण्या, संयोजक नाही, सावली
टण्या,
संयोजक नाही, सावली यांनी केले आहे ते...
मस्तच!!!!
मस्तच!!!!
बापरे, सावली, अशक्य आहेस
बापरे, सावली, अशक्य आहेस _/\_
करताना प्रचंड पेशन्स थेवून करणं आणि त्या इतक्या स्टेप्समध्ये आमच्यासमोर आणणं सोप्प नाही. धन्यवाद.
वा! मस्तच आहे. मुलांना आवडेल
वा! मस्तच आहे. मुलांना आवडेल करायला.
खंग्री! ओरिगामी संरचना
खंग्री! ओरिगामी संरचना निर्माण करणे हे मला फारच अवघड वाटते. तुम्हाला सहीच जमले आहे.
मी इंदूताई टिळकांची संरचना वापरून गणपती तयार करतो. ती संरचनासुद्धा सुरेख आहे.
काय सही आहे सावली तुस्सी
काय सही आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावली तुस्सी ग्रेट हो
सावली... खरंच अशक्य आहेस तु
सावली... खरंच अशक्य आहेस तु
जबरी झालंय
एक नंबर... सर नुसते सांगताय
एक नंबर...
सर नुसते सांगताय काय.. फोटो सकट कृती टाका लवकर..
काय भारी! सावली, मस्त गं.
काय भारी! सावली, मस्त गं.
क्या बात है रे.....!! मस्तच
क्या बात है रे.....!! मस्तच झालाय गणेशा....नक्की करुन बघेन.
उत्तम, सावली. ओरिगामी च्या
उत्तम, सावली. ओरिगामी च्या अनेक कलाकृति बघितल्या आहेत. पण गणपति कधीच नव्हता बघितला. हा बहुदा पहिलाच प्रयत्न असावा.
स्वप्नाली- _/\_ ग्रेट आहेस
स्वप्नाली- _/\_ ग्रेट आहेस तू.
तुझ्या उत्साहातला १ % मला मिळाला तर काय छान होईल.
ग्रेट
ग्रेट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे. मी ओरिगामीचे गुलाबं
मस्त आहे. मी ओरिगामीचे गुलाबं वगैरे बनवली आहेत. झब्बू देवु का?
सायली, बाकी सगळ जमल पण ते
सायली, बाकी सगळ जमल पण ते तिरक्या घड्यांपाशी गाडी अडली
असो माझा सरळ सोंडेचा गणपती पण मस्त झाला तुझ्या कृपेने.
सावली..... भन्नाट!! Hats off
सावली..... भन्नाट!! Hats off to you![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद
छान वाटलं सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टण्या,योगेश२४ ,सायो ,लालू,अरभाट ,लाजो, मंजिरी, हिम्सकूल,आशूडी,जयवी,दिनेशदा, रैना , वर्षा_म, मनःस्विनी, गुब्बी, मंजुडी सगळ्यांचे आभार.
सायो, इथे खुप स्टेप दिसताहेत ना, करायला घेतल्यावर जास्त वाटत नाहीत बघ.
अरभाट, तुम्हाला दुसरी पद्धत माहित असेल तर कृपया द्याना मायबोलीवर.
दिनेशदा, मी वर म्हटल्याप्रमाणे ओरिगामी मित्र या ग्रुप ने गणपती बनवला आहे असे कळलं. पण त्याची कृती इ. काहिच मिळत नाही. त्यामुळे हा अगदी पहिलाच प्रयत्न नसावा.
मनःस्विनी, झब्बु दिलास तरी चालेल. आणि कृती माहिती असतील तर कृती सकट पोस्ट केलं तस मस्तच.
गुब्बी , अरे वा तु प्रयत्न करुन बघितलास पण. छान. हो त्या तिरक्या घड्या कठिण आहेत. मला सुद्धा बराच वेळ लागला होता, अजुनही जरा लागतोच. पण त्या सोडुन बाकिच्या स्टेप सोप्या आहेत अगदि.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हो माझा आयडी सावली , सायली नव्हे
मी अशा प्रकारच्या फक्त तिरक्या घड्यांचा व्हिडियो इ. असेल तर शोधेन आणि टाकेन लिंक. मग त्या करणं सोप होईल.
ओरीगामी गणेश सगळ्यांनाच करता यावा अस वाटतय म्हणुन सगलेच जण प्रयत्न करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह! स्टेप बाय स्टेप सांगायचे
वाह! स्टेप बाय स्टेप सांगायचे कष्ट अधिक आहेत!!
मस्तच
सावली धन्स (सॉरी सायली ओघाने
सावली धन्स (सॉरी सायली ओघाने आल तोंडात)
मी तिरक्या घड्यांचा प्रयत्न पण केला आता बर्यापैकी आल्या. पण लेक (वय वर्षे ११) जास्त चांगल करते माझ्यापेक्षा. आतापर्यंत ३ बाप्पा केले वेगवेगळ्या रंगांचे आणि भिंतीवर विराजमान पण झालेत.
मी फोटो टाकेन... ते स्टेप
मी फोटो टाकेन... ते स्टेप लिहिणे कष्ट ज्यास्त आहेत. प्रय्त्न करते.
छान ! करणे अन त्याच्या इतक्या
छान ! करणे अन त्याच्या इतक्या सविस्तर स्टेप्स लिहिणे, खुप कौशल्याचे काम ! मस्त! सावली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे बाबापण एक वेगळा गणपती करतात. नंतर फोटो टाकते त्याचा .
धन्स आरती. नक्की टाक फोटो.
धन्स आरती. नक्की टाक फोटो. आणि करायची पद्धत पण टाक ना.
मनस्विनी नक्की टाक फोटो.
गुब्बी हो ग मुलांना छान जमतात असल्या गोष्टी.
इथे एक लिंक आहे पेपर कर्व्ह कसा करायचा याबाबत. गणेश करताना सुद्धा असेच फोल्ड वापरले आहेत.
http://www.youtube.com/watch?v=FSuYfujNqJE&NR=1&feature=fvwp
वा मस्त आहे हे.. करून बघायला
वा मस्त आहे हे.. करून बघायला हवं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान केला आहेस गणपती बाप्पा
छान केला आहेस गणपती बाप्पा सावली! तुझ्या चिकाटीला आणि मेहनतीला __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावली, ग्रेट आहेस. खूप सुंदर
सावली, ग्रेट आहेस. खूप सुंदर कलाकृती !
सावली आत्ता पाहिले.सुंदर आहे
सावली आत्ता पाहिले.सुंदर आहे गणपती.रैना ला अनुमोदन.तुझ्या उत्साहातला १% मिळाला तरी खूप आहे!!
जबरदस्त एकदम !
जबरदस्त एकदम !
ज ब री!! अशक्य झालाय
ज ब री!! अशक्य झालाय बाप्पा!!
सावली, अफाट चिकाटी आणि अचूकता आहे कामात!
माझ्या मुलाला ओरिगामी क्राफ्ट्स करायला आवडतात. त्याला दाखवते हे, तो आणि मी मिळून नक्की करून बघणार
मनु, तुझ्या झब्बूची वाट बघतेय.
मी इंदूताई टिळकांची संरचना वापरून गणपती तयार करतो.>> आरभाट, तुम्ही ही शक्य असल्यास झब्बू द्या की. अर्थात सावलीला चालणार असेल तरच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
Pages