निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप।
त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप॥
या ओळींचा पुरेपुर अर्थ समजला तो दिनेशदांसोबत भटकताना. ऑगस्ट महिन्यात दिनेशदा भारतभेटीला आले होते तेंव्हा त्यांच्यासोबत राणीच्या बागेतील काहि दुर्मिळ वृक्षांची/फुलांची/वेलींना जाणुन घेण्याचे भाग्य लाभले. प्रत्यक्षातील आमची हि पहिलीच भेट (माबोकरांच्या भाषेत "नॅनो गटग" :)) आणि पहिल्याच भेटीत त्यांचे यासर्वबाबतीतील अफाट ज्ञान जाणवले (अर्थात माबोवरच्या त्यांच्या रंगिबेरंगी पानामधुन बर्याच जणांना ते आधीच माहित असेल). आमच्या या नॅनो गटगमध्ये बर्याच दुर्मिळ आणि अपरिचित (अर्थात मला :)) वृक्षांची नावे, त्यांचा बहरण्याचा कालावधी, मुंवई/महाराष्ट्रात इतरत्र कुठे आढळतील, त्यांचे औषधी/घरगुती उपयोग यांसहित माहिती मिळाली.
कैलासपती, गोरखचिंच, गायत्री, कलाबाश, विषवल्ली, कनकचंपा, नागचाफ़ा, मणीमोहर, सुवर्णपत्र, कॅशिया, कोको, अत्यंत दुर्मिळ अशी "उर्वशी", बेल, कृष्णवड, नोनी यांची सुरेख माहिती दिनेशदांकडे होती. (यातील काहि झाडांची नावे तर दोन आठवड्याच्या आतच माझ्या विस्मृतीत गेली :(). पण इतक्या वर्षानंतरही त्यांना एकुण एक झाडांची नावे व इतर माहिती आहे. त्यांचे या विषयावर ज्ञान इतके आहे कि अगदी चालत्या गाडीतुनही त्यांनी जर एखादे झाड पाहिले तरी पटकन त्याचे नाव सांगतील.
कृष्णवडाबद्दल एक सुरेख कथा दिनेशदांनी सांगितली कि, कृष्णाला दहीलोणी देण्याकरीताच निसर्गाने याचा आकार द्रोणासारखा केला आहे. सामान्यांना मात्र प्रथमदर्शनी हे किड लागलेली पाने वाटतील पण नैसर्गिकरीत्याच याची रचना द्रोणासारखी आहे.
त्यांच्या बिझी श्येडुलमधुन वेळ काढुन हा खजिना आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल दिनेशदा यांचे खुप खुप आभार. आता ओढ लागली आहे ती या वृक्षांच्या फुलण्याच्या कालावधीची (फेब्रुवारी-मार्च दरम्यान) :-).
असा हा आमचा निसर्गाच्या सानिध्यातला "नॅनो गटग" गिरगाव चौपाटी येथील "न्युयॉर्कर" मध्ये "फलाफल, छोले भटुरे" आणि चौपाटीवरची प्रसिद्ध कुल्फ़ी खाऊन संपन्न झाला.
मस्तच योग्या... हा माझा
मस्तच योग्या...
हा माझा झब्बू..
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
स्मित एकदम सुंदर.
स्मित एकदम सुंदर.
वा .... आमची पण सहल झाली -
वा .... आमची पण सहल झाली - राणीच्या बागेतल्या दुर्मिळ झाडांची. योगेश, आता तुला फेब्-मार्च मध्ये एक अशी सहल घडवावी लागणार बघ माबोकरांकरता.
प्रचि १६ मध्ये ती 'बिट्टी' आहे का?
अगं जागु, बुंध्यालाच
अगं जागु, बुंध्यालाच पारंब्यासारख्या जटा येतात आणि त्या जटांनाच फुले बिले लागतात. वरती झाड मोकळेच असते.
मस्त ! माहिती आणि फोटोपण !
मस्त ! माहिती आणि फोटोपण ! धन्स योगेश अन दिनेशदा !
कृष्णवडाची कोलकत्यात खुप झाडं पाहिली होती. इथे प्रथमच पाहतेय.
खोडातून येणारी फुलं, माझापण एक झब्बू
कोणीतरी सुरंगीचाही झब्बु टाका
कोणीतरी सुरंगीचाही झब्बु टाका रे.. माझे अगदी लाडके फुल.. तेही असेच खोडातुन येते.
आरती, कसली फुले आहेत ही.. काय गोडुली दिसताहेत
साधना मी एकदाच हे झाड पाहीले
साधना मी एकदाच हे झाड पाहीले आहे. पण पाहीले तेंव्हा खुप वैशिष्यपुर्ण वाटले.
आरती छान आहे तुझा झब्बू.
साधना अग सुरंगिचे झाड मला पण
साधना अग सुरंगिचे झाड मला पण बघायचे आहे. माझ्या लग्नाच्या आधिच माझ्या सासर्यांनी नविन जागा घेतली तेंव्हा आमच्या इथे होत सुरंगिच झाड पण मि पाहिल नव्हत नाहीतर तोडून दिल नसत. पण घनदाट अरण्यामुळे घर बांधण्यासाठी ते तोडाव लागल. आमच्याकडे सुरंगिचे गजरे येतात विकायला पण खुपच कमी असतात. ह्या गजर्यांसाठी मी रविवारी सकाळी लवकर गेले होते बाजारात. मागच्या सिझनला. ह्या फुलांचा अगदी सुकला तरी मस्त वास येत असतो.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!! (खरंतर हे सगळे धन्यवाद दिनेशदांनाच मी फक्त निमित्त).
ललिता, स्मितहास्य, आरती, मस्तच आहे सगळे झब्बु
हाय, सुरंगीचे झाड
हाय, सुरंगीचे झाड तोडले????????????????????????????????????????
योगेश मस्त नेहेमीप्रमाणे
योगेश मस्त नेहेमीप्रमाणे
सर्वच प्रचि मस्त
सर्वच प्रचि मस्त मस्त!
धन्यवाद योगेश, दिनेशदा!
योगेश, नेक्स्ट टाईम नो फर्गेटिंग नोटबुक अॅन्ड नोट्स टेकिंग!
दिनेशदा, ह्या झाडांच्या - फुलांच्या माहितीच्या प्रतीक्षेत!
मला वाटत तो बेल नाहि. आमच्या
मला वाटत तो बेल नाहि. आमच्या दारात बेल आहे.
मयुरा बेलच आहे तो. माझ्याकडे
मयुरा बेलच आहे तो. माझ्याकडे आणि माझ्या माहेरीही आहे. बेलाचे फळही स्पष्ट दिसत आहे फोटोत.
मित्रा.. माझे पोट नाही भरले..
मित्रा.. माझे पोट नाही भरले..
प्र.चि. खुपच छान ....... नोनी
प्र.चि. खुपच छान .......
नोनी पासून एक प्रकारच टॉनिक बनवतात.ते जवळ जवळ सर्व आजारावर गुणकारी आहे.
विशेषता ज्यांना हाडाचे,रक्ताचे व पोटाचे विकार आहेत आशा लोकांसाठी गुणकारी आहे.
आर्युवेदात त्याला खुप महत्व आहे.
आर्युवेदात त्याला खुप महत्व
आर्युवेदात त्याला खुप महत्व आहे.
मी याच्या विरुद्ध माहिती वाचलीय.
मित्रा.. माझे पोट नाही भरले..
नोनी खायचा ऑप्शन आहे.....
नोनीची झाड माझ्या ऑफिसच्या
नोनीची झाड माझ्या ऑफिसच्या एरियात खुप आहेत. हे नोनीच टॉनिक १ वर्षापुर्वी आमच्याइथे खुप प्रसिद्ध झाल होत. पण त्याला एवढा रिसपॉन्स नाही आला नंतर.
अप्रतिम.
अप्रतिम.
सुंदर
सुंदर
व्वा मस्त !
व्वा मस्त !
योगेश धन्स. छान वाटल सगळेच
योगेश
धन्स. छान वाटल सगळेच प्रचि बघून.
मला वाटत प्रचि १२ मध्ये आहे ते कँडल ट्री आहे.
त्याच्या खोडालाच फूले येतात, व ती मेणब्बती प्रमाणे दिसतात . त्यावरूनच त्याचे नाव पडले आहे.
अधिक माहिती दिनेशदा देतीलच.
योग्या छान आहेत रे फोटो .
योग्या छान आहेत रे फोटो . रानीच्या बागेत प्राण्यांन व्यतीरिक्त येवढ काहि असेल वाटल नव्हत.
..
..
मस्त फोटो !
मस्त फोटो !
अरे वा! दिनेशदां बरोबर जायला
अरे वा! दिनेशदां बरोबर जायला पाहिजे एकदा दिनेशदा प्रत्येक माबोकराला एक एक दिवस ठरवुन द्या हो तुमच्या बरोबर नेचर वॉक करायला प्लिज सगळ्या झाडांची नाव द्या तुम्हाला जमेल तेव्हा.
कैलासपती कित्येक वर्षानी पाहिला. अंधेरीला कुठल्याशा फाईव्ह स्टार हॉटेलच्या गेटपाशी होता. तिथन जाताना अगदी वाट बघत असायचे तो थोडासा दिसावा म्हणुन.
जागु हो बिट्टी आम्हीही त्या फुलाला बिट्टी म्हणायचो.
नोनी म्हणजे काय? हे फळ खातात का?
दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे
दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे नावे संपादित केली आहे.
@दिनेशदा, तुमची प्रतिक्रिया दिसत नाहि आहे.
माझे बरेचसे आयूष्य मुंबईत
माझे बरेचसे आयूष्य मुंबईत गेले. लहानपणी इथल्या वनसंपत्तीबद्दल फारशी जाणीव नव्हती. पुढे डॉ. शरदीनी डहाणूकर, श्री.श्रीकांत इंगळहळ्ळीकर, श्री.नंदन कलबाग, प्रा. घाणेकर यांच्यामूळे या सोयऱ्यांची नव्याने ओळख झाली. आता तर त्यांच्या भेटीची कायम आस लागलेली असते.
त्यापैकी बरिचशी दुर्मिळ झाडे, भायखळा इथल्या, राणीच्या बागेतच आहेत. मी मायबोलीवर यासंबंधात लिहायला सुरवात केल्यावर झपाटल्यासारखा, यांचा शोध घेत होतो. त्यासाठी भरपूर प्रवास केला. रुईयाच्या कोपऱ्यावरचे शिरिष (मिल्कसेंटरच्या मागचे) तिथून पुढे गेल्यावर दिसणारी वाकेरी, मुचकुंद, हि झाडे आता नष्ट झाली.
मुंबई विद्यापिठाच्या आवारात पुर्वी असणारे, उर्वशीचे झाड न दिसल्याने मी सैरभैर झालो होतो. कालिनाची
दोन मोठी कदंबांची झाडे नष्ट झाल्याने, मला अपार दु:ख झाले होते. पण हि झाडे नव्या रुपात, नव्या जागी
भेटली.
करमळीवरच्या लेखासाठी, मी पहाटे ५ वाजल्यापासून कोल्हापूरच्या महावीर उद्यानात ठिय्या देऊन बसलो होतो. ती कळी उमलण्याची प्रक्रिया डोळे भरून पहात होतो. मग जरा चहा प्यायला गेल्यावर. तिथे आलेल्या एका प्रेमी युगुलाने, ती कळी कुस्करल्यावर, मला खुप यातना झाल्या होत्या. त्या कुस्करलेल्या फुलाचे वेड्यासारखे फ़ोटो घेत राहिलो, आणि शेवटी ते झाड मला, आमच्या शिवसृष्टी कॉलनीतच सापडले.आणि चक्क त्यावर फूलही होते. त्यावेळी मला झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे कठिण आहे.
६० वर्षांनी एकदाच फुलणारा बांबू मला मुंबईतच दिसला. धारावीच्या उद्यानात, हादगा दिसला, पायमोज्याचे झाड, ब्रम्हदंड, वावळा, हिपण इथेच दिसली. त्या सगळ्यांची इथे थोडक्यात ओळख करुन देतो. अगदी नावपत्त्यासकट. इथे मला बरेच जण असे दिसताहेत, कि ज्यांना या सगळ्याबद्दल आस्था आहे. मला शक्य असेल, तोपर्यंत मी या माझ्या सग्यासोयऱ्यांच्या भेटीगाठी घेतच राहणार आहे, पण त्यांच्या बहरातली रुपं, मात्र तूमच्या डोळ्यांनी पाहणार आहे. त्यांच्याशी नाते जोडा. आणि त्यांचा
वंश वाढो, किमान त्यांची कत्तल न होवो, यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करा.
माझ्याकडे याची प्रकाशचित्रे आहेत, पण ती मूळ आकारात, इतरत्र उपलोड करतो. इथे ओळख अगदी जुजबी करुन देतो. (या सर्वच झाडांच्या बाबतीत मी सविस्तर लिहिलेले आहे. त्याच्या लिंक कुणाला सापडल्या, तरी इथे अवश्य द्या, अशी विनंति करतो.)
या प्रतिक्रिया संदर्भासाठी सेव्ह करुन ठेवा. यात काही सुधारणा हवी असेल तर अवश्य कळवा. यापैकी एखादे झाड नवीन ठिकाणी दिसले तर अवश्य कळवा. (पण एखादे तिथे नसले तर मात्र कळवू नका.)
१) आंबा
मुंबईत मालाडला, (पुर्वेला ) आता जिथे पिरामल हॉस्पिटल आहे, तिथे एकेकाळी आमराई होती. १९७४ सालीच ती तोडण्यात आली. पण हा आंबा मला एकदा अचानक दादर पोष्ट ऑफ़िसजवळ भेटला. तिथे पार्सल शिवणारी लोकं जिथे बसतात, तिथेच हे झाड आहे. मी तिथे पार्सल शिवून घेताना, अचानक जवळच एक आंबा पडला.
आधी मला वाटलं, कि कुणीतरी वरुन फ़ेकला, पण ते आंब्याचे दिवसही नव्हते. त्या पार्सलवाल्यानेच सांगितले कि या आंब्याला वर्षभर आंबे लागत असतात, आणि अधूनमधून असे वरुन बरसत असतात. तो आंबा मला त्याने बक्षीस दिला.
२) आकाशनीम
इंडीयन कॉर्क ट्री नावाने ओळखले जाणारे हे झाड, रुईया कॉलेजच्या मागे आहे (होते.) निशिगंधाच्या फुलांसारखीच दिसणारी, पण जरा लांब देठ असणारी फूले त्याला येतात. हे देठ इतके लांब आणि लवचिक असतात, कि दोरा न वापरता, या फुलांचा गजरा करता येतो. या फुलांना छान सुगंधही येतो.
३) आसूपाल
आसूपालालाच एकेकाळी अशोक म्हणत असत. सरळ वाढणारे असे उंच हे झाड असते. चेंबूरला अनेक बंगल्यांच्या कुंपणालगत हे आहेत. पूर्ण वाढलेल्या आसुपालाला हिरवा फूलोरा येतो, आणि त्याला जांभळासारखी फ़ळे पण येतात. या फळांचा सडा झाडाखाली असतो. मुंबईत या पानांचा एक अभिनव उपयोग करतात. लिचीची फळे या पानांत गुंडाळून मिळतात.
४) बांबू
मुंबई विद्यापिठाच्या आवारात मी बांबूला आलेला फुलोरा बघितला होता. बांबू ६० वर्षात एकदाच फुलतो, आणि मग त्या जातीचे सर्व बांबू मरतात. या फुलोऱ्यात एक प्रकारचे धान्य निघते व त्याचा भात व खीर करतात. या फुलोऱ्यानंतर उंदरांचा सुळसुळाट होतो आणि दुष्काळ पडतो, असा समज आहे. सध्या राणीच्या बागेत. टायगर बांबू, हा हिरवी पिवळी नक्षी असलेला बांबू बघायला मिळेल.
५) बहावा
बेलापुर स्टेशनच्या बाहेर, आणि राणीच्या बागेतही मस्त वाढलेला बहावा आहे. एखाद्या सोनेरी झुंबरासारखा हा फुलोरा दिसतो. याला तपकिरि रंगाच्या उभ्या गोल शेंगा लागतात. आणि त्यातला गर गोड लागतो. (पण तो जपून खावा, कारण तो अतिसारावर औषध म्हणून देतात.) पनवेलला, गार्डन हॉटेलच्या गल्लीत, अक्सिस बॅंकेच्या एटीएम जवळ, एक वेगळ्या प्रकारचा बहावा आहे. खुपच देखणा फुलोरा असतो त्याचा.
६) बकुळ
फ़्लोरा फाऊंटनला, त्या कारंज्यासमोर, गर्दीत एक पुर्ण वाढलेले बकुळीचे झाड आहे. उन्हाळ्यात तिथे
अनपेक्षितपणे, अंगावर बकुळीची फूले पडतात. बकुळीची अगदी ताजी फूले शुभ्र असतात, आणि ती
देठासकट असतात. पण लवकरच ती गळून पडतात. बकुळीची फ़ळे, केशरी रंगांची व करवंदापेक्षा
थोडी मोठी असतात. पिठूळ आणि गोडसर चव असते त्यांची.
७)बंगाली बदाम
लाल आणि पिवळ्या रंगांची फळे शाळेच्या बाहेर नेहमीच विकायला असतात. तशी त्याला तूरट
चव असते. फ़ळे खाऊन तोंड लाल करायचे आणि मग आतली बी फोडून त्यातला बदाम खायचा, हा आमचा उद्योग असायचा. याची झाडे, नेव्ही नगरच्या टि आय एफ आर मधे बरीच आहेत. तिथल्या समुद्री वाऱ्यामुळे ती फ़ार वाढलेली नाहीत, म्हणुन त्याचे बदाम हाताने सहज खुडता येतात.
८) बेल
चेंबूरला नाक्याजवळच्या जैन देरासरच्या कोपऱ्यावर मस्त वाढलेले झाड आहे, तसेच ठाण्याला रेल्वेलाईनच्या लगतच (कळव्याच्या दिशेने) तसेच बोरिवली आणि घाटकोपर स्टेशनजवळ पण ही झाडे आहेत. त्यांना मोठीमोठी बेलफळे लागतात. त्याचा मोरंबा व सरबत करतात. राणीच्या बागेतही नर्सरीजवळ आहे हे झाड.
९) भेरली माड
धारावीच्या निसर्ग उद्यानात मस्त वाढलेले भेरली माड आहेत. त्यांना लाल पिवळ्या रंगाचा मस्त फुलोरा येतो. हा फुलोरा, मीटरभर उंचीच्या भरगच्च माळेच्या रुपात येतो. मग त्याला तशीच लाल रंगाची फळेही लागतात. या फुलोऱ्याच्या दिवसात, हा माड फ़ारच देखणा दिसतो.
१०) बिमली
शालेय जीवनातला, बिमली हा एक न विसरता येण्याजोगा खाऊ होता. तोंडल्यासारख्या आकाराचे पण चमकदार पोपटी रंगाचे हे फ़ळ असते. इतके आंबट असते, कि गोव्यात त्याचा वापर तांब्यापितळेची भांडी घासण्यासाठी करतात. कालिनाला, विद्यापिठापासून सांताक्रुझला जाणाऱ्या रस्त्यावर, एका घराच्या आवारात हे झाड आहे. या झाडाचा फुलोरा, पण खुप देखणा असतो. चमकदार किरमिजी रंगाची हि फुले, खोडालाच लागलेली असतात.
११) ब्रम्हदंड
ब्रम्हदंड किंवा वाघुळफुले असे नाव असणारे हे झाड, पारसी कॉलनीतल्या दुसऱ्या सर्कलजवळ आहे. एखादे वटवाघुळ आत बसू शकेल, एवढे मोठे याचे फूल असते. रंग गडद किरमिजी, आणि वास, कुजलेल्या मांसासारखा. एवढी दुर्गंधी असूनही, हे झाड तिथे टिकलेय हे महत्वाचे. याला दूधीभोपळ्यासारखी फ़ळे लागतात. (जीएंच्या भाषेत दोरीला बांधलेले वरवंटे ) ते डोक्यात पडून लोकांना इजा पण होऊ शकते.
१२)ब्रम्हकमळ
आमच्या ननवीच्या मराठी पाठ्यपुस्तकावर ब्रम्हकमळाचा फ़ोटो होता. त्यादिवसापासून ब्रम्हकमळ मुंबईत खूपच लोकप्रिय आहे. काहि वर्षांपूर्वी आमच्याकडे ज्यावेळी ती फ़ूले फूलली होती, त्यावेळी, किमान शंभर लोक ती बघायला आली होती. पांढरेशुभ्र असे हे फूल, रात्री ८ वाजता उमलते आणि मध्यरात्रीनंतर मावळते, त्याला खास सुगंधही असतो. मुंबईतील जून्या इमारतींच्या बाहेर, याची लागवड दिसेलच. याचा एक गुलाबी प्रकार असतो आणि त्याचा फोटो मी इथेच बघितला होता. पण हे खरे ब्रम्हकमळ नव्हे. खरे ब्रम्हकमळ फ़ारच मोठे असते आणि ते हिमालयाच्या पायथ्याशीच फूलते.
१३) ब्राउनिया
गडद गुलाबी रंगाची फ़ूले येणारे ब्राउनिया, फुले आल्यावर अतीव देखणे दिसते. याचे झाड फार वाढत नाही. याची फुले एखाद्या झुंबराच्या रचनेत येतात. राणीच्या बागेत, पक्ष्यांच्या बंदिस्त पिंजऱ्याबाहेरच्या भिंतीलगत हे झाड आहे.
१४) कॅशिया
कॅशियामधे गुलाबी, गडद गुलाबी, पिवळा आणि पांढरा असे प्रकार असतात. त्यापैकी सर्व प्रकार राणीच्या बागेत अस्वलाच्या पिंजऱ्याबाहेर आहेत. फुलावर नसतानादेखील हे झाड खूप देखणे दिसते. पानांची रचना आणि फ़ांद्यांची ठेवण, दोन्ही मस्त. फुले आल्यावर तर सर्वच झाड फुलांनी भरुन जाते. ही झाडे गोव्याला, पणजीला बाजारपेठेजवळ आणि कोल्हापूरला महावीर उद्यानात पण आहेत.
१५) खुरचाफा
खुरचाफा मधे लाल, पांढरा व पिवळा अश्या मुख्य जाती असल्या तरी त्यात अनेक छटा दिसतात. फुलांच्या पाकळ्यांच्या रचनेचे पण अनेक प्रकार दिसतात. भायखळ्याला रेल्वेलाईनजवळ जे कबरस्थान आहे, तिथे चाफा मस्त फुललेला दिसतो. डेड मॅन्स फ्लॉवर हे आपले नाव सार्थ करत तो तिथल्या कबरींवर फुले वहात असतो.
१६) चंदन
मुंबईत चंदनाचे झाड असू शकते यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण कमला नेहरु पार्कात, म्हातारीच्या बुटाच्या जवळ एक झाड आहे. याची पाने निळसर हिरव्या रंगाची असतात आणि याला लाल रंगांची चार पाकळ्यांची छोटी फुले येतात. याच्या पानाना वा फुलांना फ़ारसा सुगंध नसतो. तो खास सुगंध तयार होण्यासाठी, झाड किमान ६० वर्ष वयाचे असावे लागते.
१७) चंदनवेल
एक हिरव्या पाकळ्यांचे फुल आणि त्यात परत पांढऱ्या पाकळ्यांचे फूल असे याचे स्वरुप. या पांढऱ्या पाकळ्यांची रचना पण दोन प्रतलात, एखाद्या भिरभिऱ्याप्रमाणे असते. जाई जुईच्या कूळातील असली तरी ही वेल या वैशिष्टपूर्ण फूलांमुळे वेगळी दिसते. जून्या सविवालयाच्या समोरच्या बागेतल्या मांडवावर हा वेल होता. आता तो राणीच्या बागेतल्या एका वापरात नसलेल्या पिंजऱ्यावर आहे. तो पिंजरा आता मोडणार आहेत, त्यानंतर या वेलाचे काय होणार ?
१८) चेंडूफळ
कदंबाप्रमाणेच पण पांढरी गोल फुले येणारे हे झाड, एरवी गुलमोहोराच्या झाडासारखेच दिसते. पण याला फूले आली कि याचे सौदर्य खुलते. झाडाच्या अगदी टोकाला हि फूले येतात. ठाणा कोर्टाच्या मुख्य दरवाज्याजवळच हे झाड आहे. घाटकोपरला, स्टेशनला समांतर जो रस्ता आहे, तिथे पण हे झाड होते.
१९) छोटी करमळ
पाचधारी असे पोपटी रंगाचे आंबट फ़ळ शाळेच्या बाहेर विकायला असतेच. यालाच स्टारफ़्रुट पण म्हणतात. याचे झाडही खुप छान दिसते. हि करमळे झाडांच्या खोडालाच लागतात. दादरला रुइया सिग्नल ते पारसी जिमखाना यांच्या मधे जी घरे आहेत. तिथे हे झाड आहे.
२०) चिंच
नवीन झाडे लावतान चिंचेची झाडेच लावावीत असे मला लहानपणी वाटे. मला चिंच अजूनही प्रिय आहे.
कच्ची, गाभूळलेली, पिकलेली, भाजलेली कशीही ती मला आवडते. पिवळा, गुलाबी रंगाचा तो मोहोर (चिंगूर) पण मी आवदीने खातो. ठाण्याला पांचपाखाडी भागात, रस्त्यावरच ही झाडे आहेत. विलायती चिंचेची पण काही झाडे दिसतात. (पांढऱ्या गुलाबी आवरणातल्या काळ्या बिया, आणि गोलगोल वळलेली शेंग.)
अपूर्ण ..
२१) कोको कोको खरे तर दक्षिण
२१) कोको
कोको खरे तर दक्षिण अमेरिकेतील. त्याचा प्रसार आफ़्रिकेत व दक्षिण भारतात पण झालाय. पण चक्क
मुंबईत याचे पूर्ण वाढलेले झाड बघता येते. राणीच्या बाहेत याची दोन झाडे आहेत. त्यापैकी एकाला फळेपण
धरतात.पण ती पूर्ण वाढत नाहीत. याची फुले तर खासच असतात. खोडालाच लागून ती येतात. जेमतेम १
सेमी आकाराची. पांढऱ्याच रंगाची. पण त्यात अतीव कलाकुसर असते.
२२) फ़ालसा
फ़ालसां किंवा त्याचे सरबत जर एकदा प्यायलात तर त्याची चव विसरुच शकत नाही. याचे छोटेसे झुडुप
असते आणि लालपिवळी चार पाकळ्यांची फुले येतात. हे खाड मुंबईजवळ घारापुरी बेटावर बघायला
मिळते.
२३) फ़णस
मुंबईत फ़णसाची झाडे चांगली वाढतात. याचे फूल आवरणात बंद असते. पण फणस धरल्यावर मात्र
ते लपून रहात नाहीत. हिंदु कॉलनीतल्या पै हॉस्पिटलच्या आवारात, मस्त फोफावलेले फ़णसाचे झाड
आहे आणि त्याला भरपुर फणसही लागतात.
२४) फ़िशटेल पाम
धारावीच्या निसर्ग उद्यानात छान वाढलेले, फ़िशटेल पाम आहेत. नावाप्रमाणेच याची पाने माश्यांच्या
शेपटीसारखी असतात.
२५) गायत्री
गायत्रीचे झाड अतीव देखणे, अगदी छोटी छोटी पाने आणि छत्रीसारखा आकार असतो. पाच पाकळ्यांची
सुंदर निळी फूले येतात. ती मग आकाशी रंगाची होतात आणि पांढरी होईन त्या पाकळ्या झाडाखाली
गालिचा अंथरतात. मग याला पिवळी छोटी फ़ळेही लागतात. याचे खोडही मस्त गुळगुळीत असते (पुर्वी
कोर्टातले जज. ऑर्डर ऑर्डर म्हणत जो हातोडा आपटत असत, तो या लाकडांपासून केलेला असे.)
राणीच्या बागेतील, प्रवेशद्वाराजवळच्या एका रस्त्यावर, दोन्ही बाजूंना हि झाडे आहेत. फ़ोर्ट मधल्या
टॅमरिंड लेनमधल्या चर्चच्या आवारात पण ही झाडे आहेत.
२६) गिरिपुष्प
मुंबईच्या बाहेर पडल्यावर कोकणभवनजवळचे जे डोंगर लागतात, त्यावर गिरिपुष्पांची खूप झाडे आहेत.
वसंतात ती नाजूक गुलाबी फुलांनी बहरुन येतात. या झाडालाच उंदीरमारी असे एक नाव आहे.
यापासून उंदीरनाशक औषध करता येते, शेताच्या कुंपणाला ही आवर्जून लावतात.
२७) गोरखचिंच
आफ़्रिकेतले हे अवाढव्य बाओबाब आपल्याकडे पोर्तुगीजांनी आणले. भलामोठा त्रिकोणी बुंधा ही याची
खासियत. (त्यात भरपूर पाणी साठवलेले असते.) याला पाच पाकळ्यांची मस्त मोठी शुभ्र फ़ुले येतात.
त्या फुलांतून एक पुंकेसर खाली येतो आणि त्याला परत लोकरीच्या गोंड्यासारखे फूल येते. (ही फुले
अगदी सकाळीच बघावी लागतात.नंतर ती काळी पडतात.) मग याला भली मोठी लांबट फ़ळे धरतात.
त्याचा गर आंबट असतो. तिखट मिठ लावून तो खाता येतो. अशा तिखट मीठ लावलेल्या बिया मी’
यावेळी मित्रमैत्रिणींना वाटल्या आहेत. राणीच्या बागेच्या प्रवेशदाराशीच आणि वसईच्या किल्ल्यात ही
झाडे आहेत.
२८) गुलाबी
किंग्ज सर्कलजवळच्या कपोल निवासासमोरुन, माटुंगा स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे, तिथे ही
झाडे आहेत. राणीच्या बागेत पण आहेच. पिंपळासारखीच पण तलम अशी पाने असतात याची.
आणि गुलाबी रंगाची नाजूक फूले याला येतात. नंतर आवळ्याच्या आकाराची पण आतून पोकळ
अशी फ़ळे पण लागतात.
२९) हादगा / अगस्ती
हादग्याची फुले पांढरी शुभ्र (क्वचित गुलाबी) असतात. वजनाने भरपुर आणि पाकळ्यांनी गच्च
भरलेली हि फूले पुर्ण उमलत नाहीत. या फुलांची भजी व भाजी पण करतात. याच्या शेंगांचीही
भाजी करतात. धारावीतल्या निसर्ग उद्यानातल्या छोट्या टेकडीवर हे झाड आहे.
३०) जंगली बदाम
दादरला राजा शिवाजी विद्यालयाजवळ जंगली बदामाची झाडे आहेत. याला लाल हिरव्या रंगाचा
फुलोरा येतो. जठराच्या आकाराची फ़ळे लागतात. ती आधी हिरवी मग लालभडक होतात, आणि
उकलतात. पण याची शोभा दुरुनच साजरी. कारण या सगळ्यांनाच भयानक दुर्गंधी येते.
३१) कदंब
राजा शिवाजी विद्यालयाच्या जवळच, कदंबाचे भले मोठे झाड आहे. बहरात तर ते बुंदीच्या लाड्वांनी
भरुन जाते. भाइंदर स्टेशनजवळ, तसेच विधान भवन जवळ पण कदंबांची छान वाढलेली झाडे आहेत.
३२) कैलासपति,
कैलासपति, हे झाड मलेशियाकडून आपल्याकडे आले. गुलाबी ते लाल यांच्या मधल्या दोनतीन छटा
यात दिसतात. राणीच्या बागेत तर ते आहेच पण बाकि ठिकाणी पण दिसते. दादरला प्लाझाजवळून
जिथे टिळक ब्रिज सुरु होतो तिथे पण हे झाड आहे. याची भली मोठी फळे फ़ुटली तर भयानक
दुर्गंधी सुटते. हे झाड फुलावर यायला बरीच वर्षे घेते.
३३) काकड
शेवळांच्या भाजीबरोबर हि आवळ्यासारखी फ़ळे घ्यावी लागतात. त्यामूळे शेवळांची खाज कमी होते.
याचे झाड बोरिवलीच्या नॅशनल पार्कातल्या टेकडीच्या वाटेवर आहे.
३४) काळा कुडा
काळा कुडा हि औषधी वनस्पती आहे. याचे मध्यम उंचीचे झाड असते आणि त्याला पांढरी छोटी फुले
येतात. तसेच याला नेहमी जोड शेंगा लागतात आणि थोड्या वाढल्यावर या शेंगा आपोआप जोडल्या
जातात. मुंबईजवळ घारापुरी बेटावर हे झाड आहे.
३५) कलाबाश
कलाबाशाचे झाड पण आफ़्रिकेतून आले. याची पाने विरळ आणि सुंदर रचनेत असतात. याच्या खोडालाच
फुले लागतात आणि मग फळे तशीच लागतात. आफ़्रिकेत हे फ़ळ अगदी कलिंगडाएवढे मोठे होते. कुठलाही
प्राणी, वा पक्षी हे फळ खात नाही. या भल्या मोठ्या फळाचा उपयोग तिथे पाणी भरुन आणण्यासाठी करतात.
(दुधी भोपळ्याला पण कलाबाश असा शब्द आहे आणि त्याचाही उपयोग आफ़्रिकेत पाणी साठवण्यासाठी
करतात.) राणीच्या बागेत याचे झाड होते पण त्यावर सगळी उकरलेली माती टाकल्याने, ते आता तग धरेल असे वाटत नाही. पण तिथेच एका पारावर हे झाड दिसले. त्यालाही तशीच पण जरा वेगळ्या रंगाची फुले आलेली दिसली. त्यावर आता माझ्या आशा आहेत.
३६) कळलावी
आता गौरी गणपतिच्या पूजेत हि फुले लागणारच. याचा वेल लवचिक आणि हिरवागार असतो. याचे कंद
जमिनीत सुप्तावस्थेत असतात. पावसाने त्याला धुमारे फूटतात. साधारण श्रावण भाद्रपदात याला फुले
धरतात. लाल, पिवळ्या हिरव्या रंगांची हि फुले देखणी असतात. पण ती सगळीच खुडली तर त्यापासून
नवीन कंद कसे तयार होणार ? त्यामुळे जर वाचवता आला, तर हा वेल वाचवायला हवा. बेलापुर स्टेशनबाहेर, याचा
वेल दिसायचा.
३७) कळम
कदंब आणि कळम या दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत.पण कळम जरा दुर्मिळ असल्याने, अनेकांना माहीत नसतो. कळमाची फुले कदंबासारखीच गोल पण आकारने छोटी असतात. तसेच ती संख्येने पण जास्त लागतात. (अनेकांचा कळम हा कुलवृक्ष असतो. लग्नात देवक बसवायला तो लागतो.) याचे झाड राणीच्या बागेत पाणघोडा जिथे ठेवलाय तिथे आहे.
३८) कमळ
आपण ज्याला कमळ म्हणतो त्या बहुदा वॉटर लिलीच असतात. खरे कमळ आकाराने मोठे असते. त्याची मुळे (कमलकाकडी) व बियांच्या लाह्या (मखाणे) खातात. अशी कमळे कळंबोलीहून पनवेल कडे जाताना एक स्मृती उद्यान लागते त्या उद्यानाच्या मागे असणाऱ्या तळ्यात आहेत. पनवेल स्टॅंडच्या जरा आधी, एक मोठे सरोवर लागते, तिथे पण हि कमळे असतात.
३९) कनकचंपा
कनकचंपाचे छोटे झाड असते. त्याला चमकदार रंगाची पिवळी फूले लागतात. पण फुलांपेक्षा देखणी असतात ती याची फळे. एखाद्या कर्णफुलांसारखी हि फळे असतात. लाल कोंदणात सुंदर रचनेत आधी हिरव्या आणि मग काळ्या होणाऱ्या बिया असतात. राणीच्या बागेतील, जलाशयाला लागून, जो आत जाणारा सज्जा आहे, तिथेच हे झाड आहे.
४०) कांचन
कांचनाला बघून अनेकजणांना आपट्याचा भास होतो. पण ही दोन वेगळी झाडे आहेत. कांचनाला हिंदीत कचनार म्हणतात. यात गुलाबी, जांभळा, पांढरा आणि क्वचित दिसणारा पिवळा रंग असतो. याची पाने व शेंगाही खातात. सायनच्या किल्ल्यावर याची झाडे आहेत.
अपूर्ण..
Pages