निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप।
त्याच्या कुशीत सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप॥
या ओळींचा पुरेपुर अर्थ समजला तो दिनेशदांसोबत भटकताना. ऑगस्ट महिन्यात दिनेशदा भारतभेटीला आले होते तेंव्हा त्यांच्यासोबत राणीच्या बागेतील काहि दुर्मिळ वृक्षांची/फुलांची/वेलींना जाणुन घेण्याचे भाग्य लाभले. प्रत्यक्षातील आमची हि पहिलीच भेट (माबोकरांच्या भाषेत "नॅनो गटग" :)) आणि पहिल्याच भेटीत त्यांचे यासर्वबाबतीतील अफाट ज्ञान जाणवले (अर्थात माबोवरच्या त्यांच्या रंगिबेरंगी पानामधुन बर्याच जणांना ते आधीच माहित असेल). आमच्या या नॅनो गटगमध्ये बर्याच दुर्मिळ आणि अपरिचित (अर्थात मला :)) वृक्षांची नावे, त्यांचा बहरण्याचा कालावधी, मुंवई/महाराष्ट्रात इतरत्र कुठे आढळतील, त्यांचे औषधी/घरगुती उपयोग यांसहित माहिती मिळाली.
कैलासपती, गोरखचिंच, गायत्री, कलाबाश, विषवल्ली, कनकचंपा, नागचाफ़ा, मणीमोहर, सुवर्णपत्र, कॅशिया, कोको, अत्यंत दुर्मिळ अशी "उर्वशी", बेल, कृष्णवड, नोनी यांची सुरेख माहिती दिनेशदांकडे होती. (यातील काहि झाडांची नावे तर दोन आठवड्याच्या आतच माझ्या विस्मृतीत गेली :(). पण इतक्या वर्षानंतरही त्यांना एकुण एक झाडांची नावे व इतर माहिती आहे. त्यांचे या विषयावर ज्ञान इतके आहे कि अगदी चालत्या गाडीतुनही त्यांनी जर एखादे झाड पाहिले तरी पटकन त्याचे नाव सांगतील.
कृष्णवडाबद्दल एक सुरेख कथा दिनेशदांनी सांगितली कि, कृष्णाला दहीलोणी देण्याकरीताच निसर्गाने याचा आकार द्रोणासारखा केला आहे. सामान्यांना मात्र प्रथमदर्शनी हे किड लागलेली पाने वाटतील पण नैसर्गिकरीत्याच याची रचना द्रोणासारखी आहे.
त्यांच्या बिझी श्येडुलमधुन वेळ काढुन हा खजिना आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल दिनेशदा यांचे खुप खुप आभार. आता ओढ लागली आहे ती या वृक्षांच्या फुलण्याच्या कालावधीची (फेब्रुवारी-मार्च दरम्यान) :-).
असा हा आमचा निसर्गाच्या सानिध्यातला "नॅनो गटग" गिरगाव चौपाटी येथील "न्युयॉर्कर" मध्ये "फलाफल, छोले भटुरे" आणि चौपाटीवरची प्रसिद्ध कुल्फ़ी खाऊन संपन्न झाला.
योगेश, प्रचि सुरेख आहे
योगेश, प्रचि सुरेख आहे नेहमीप्रमाणे... दिनेशदांकडुन विसरलेल्यांची नावे माहित करुन प्रचिंत टाका जमेल तसं...
वा मस्त
वा मस्त
मस्तच.. दिनेश तुम्ही नावे
मस्तच.. दिनेश तुम्ही नावे लिहा आता
फुले फुलण्याच्या दिवसात एकदा फेरी मारायलाच हवी तीही सोबतीला दिनेशना घेऊनच...
कोकोचे झाडही आहे राणीबागेत मला माहितच नव्हते...
नॅनो गटग... मस्तच रे..
नॅनो गटग... मस्तच रे.. योग्या..
आपण भेटल्यावर कश्याचे फोटू काढू.. ह्याचा विचार करतो आहे
चिमुरीला अनुमोदन.. कृष्णवडाचा फोटो अन माहिती खरोखरच सुरेख... खूप आवडली.. हि मालिका.
योगेश लाजवतोस रे अगदी. यांची
योगेश लाजवतोस रे अगदी.
यांची खरी नावे, आणि काही माहिती लिहितो, रात्री.
प्रचि १२ मधे खोडावरच फुलं आली
प्रचि १२ मधे खोडावरच फुलं आली आहेत का?
सुरेख
सुरेख
प्रचि १२ मधे खोडावरच फुलं आली
प्रचि १२ मधे खोडावरच फुलं आली आहेत का?>>>>होय, चिमुरी :), मी पण पहिल्यांदाच पाहिलं
मस्तच रे .. किती खोडकर आहेत
मस्तच रे .. किती खोडकर आहेत ती फुले
दिनेशदा अन योगेश खरच धन्यवाद.
योगेश पुन्हा ह्या फोटोंना वॉटरमार्क नाही.. उचलेगिरीसाठी पुन्हा एकदा बळी पडायचा विचार दिसतोय.
मला पहिल्यांदा वाटलं की एखादी
मला पहिल्यांदा वाटलं की एखादी बारिकशी वेल आहे की काय म्हणुन विचारलं.
छान
छान
प्रचि १६ बिट्टिचे झाड
प्रचि १६ बिट्टिचे झाड आहे.
योगेश सगळेच फोटो छान आहेत.
कुठल्याही झाडाचा फोटो टाकावा त्यावर दिनेशदा येउन त्या झाडाची माहीती देतात. एवढे झाडपाल्यांचे अगाध ज्ञान दिनेशदांना आहे.
किती खोडकर आहेत ती फुले
किती खोडकर आहेत ती फुले
योगेश आणि देनेशजी धन्यावाद
ह्या राणीच्या बागेची सफर घडवल्या बद्दल........
अप्रतिम ! <<यांची खरी नावे,
अप्रतिम !
<<यांची खरी नावे, आणि काही माहिती लिहितो, रात्री.>> आतुरतेने वाट पहातोय. राणीच्या बागेत
अगदी स्वागत कक्षातलाच गोरखचिंचेचा वृक्ष [म्हणजेच "बाओबाब" ना, दिनेशदा ?] आहे ना अजून?
प्रचि १२ भारीच. प्रचि १६ हे
प्रचि १२ भारीच. प्रचि १६ हे बिट्टीचे झाड आहे.
कैलासपतीची माझ्या पहाण्यात वेल नसते तर याचा मोठा वृक्ष असतो. त्याचा खोडाला कवठासारखी फळे येतात व फुले पण येतात. फुलांचा आकार मधे पिंड व वरुन फणा असतो.
http://www.indianaturewatch.net/displayimage.php?id=19965
http://green-source.blogspot.com/2008/02/couraupita-guienensis.html
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरच्या टु व्हीलर पार्कींगमधेच याचा मोठा वृक्ष आहे.
भारतात नोनी मिळते माहितच
भारतात नोनी मिळते माहितच न्हवते. बाकीची नावं सांगितली तर मजा वाटेल ..
हॅट्स ऑफ टू दिनेश दा आणी
हॅट्स ऑफ टू दिनेश दा आणी योगेश तू लक्की आहेस रे तुला दिनेश दांसारख्या जाणकाराबरोबर भटकायला मिळालं..काय काय शिकता आलं.. धन्स रे आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल
नोनी हे असे असते
नोनी हे असे असते ना???
http://en.wikipedia.org/wiki/Morinda_citrifolia
कैलासपतीची माझ्या पहाण्यात
कैलासपतीची माझ्या पहाण्यात वेल नसते तर याचा मोठा वृक्ष असतो
अहो तो वृक्षच आहे मागे. त्याच्या खोडाला ते जटांसारखे जंजाळ असते ना, ज्याला ती शंकराच्या पिंडीसारखी फुले आणि मग ते तोफेच्या गोळ्यासारखे गरगरीत गोल फुटबॉल लागतात ना, त्या जटांना वेली म्हटलंय..
मुंबईत मी खुप ठिकाणी पाहिलेत कैलाशपती. ते तोफेचे गोळे खाली पडुन फुटले की त्यांना भयानक घाणेरडा वास सुटतो असे नंदन कलबागांनी सांगितलेले.
तुमचा नोनीचा फोटो बरोबर आहे. हे नोनीही मी मुंबईत खुप पाहिलेत. फोटोत जरा लांबट दिसताहेत, मी पाहिले ते जरासे वाटोळे होते. त्यांच्यावर असे भाग पाडुन ठिपके असतात म्हणुन तर मराठीत त्याला बारतोंडी म्हणतात. मलाही राणीबागेतले जरा वेगळे वाटले.
तोफेच्या गोळ्यासारखे गरगरीत
तोफेच्या गोळ्यासारखे गरगरीत गोल फुटबॉल लागतात ना>>>
अगदी अगदी.
किती खोडकर आहेत ती फुले
किती खोडकर आहेत ती फुले
कैलासपतीची माझ्या पहाण्यात वेल नसते तर याचा मोठा वृक्ष असतो>>>धन्यवाद कांदापोहे/साधना
दुरुस्ती केली
योगेश सगळेच फोटो छान
योगेश सगळेच फोटो छान आहेत.
योगेश पुन्हा ह्या फोटोंना वॉटरमार्क नाही>>> योगेश विचार कर कारण मागच्या गणपतीच्या फोटो मधे पण नाही आहे वॉटरमार्क.:राग:
योगेश, कैलासपतीच्या फुलाचा
योगेश, कैलासपतीच्या फुलाचा क्लोज-अप का नाही टाकलास. ते फूल, त्याची अंतर्गत रचना खूप सुंदर असते. शिवाय वृक्षावर बर्यापैकी खाली लागलेली असतात ती फुलं.
योगेश, तु सोबत वही नाही
योगेश, तु सोबत वही नाही नेलीस?? मी युनिवर्सिटीतर्फे राणीबाग सहलीला गेलेले तेव्हा सोबत वही नेलेली आणि जमतील तितक्या झाडांच्या पानांचे रफ स्केच करुन नावे लिहिलेली, शिवाय सोबत राणीबागेचा मला जमेल तसा नकाशाही, कुठले झाड कुठे आहे ते लक्षात राहण्यासाठी. आपल्या नशिबी एक्स्पर्ट लोक रोज रोज थोडेच लिहिलेत??????? मग आपल्या चाळणीसारख्या मेमरीवर अवलंबुन राहण्याऐवजी वही बाळगलेली बरी....
पुन्हा एकदा मस्तच फोटोज्
पुन्हा एकदा मस्तच फोटोज् रे...
दिनेशदांच्या ज्ञानसागरात डुबकी मारुन आलास... सही आहे...
कैलासपतीचे फुल शंकराला
कैलासपतीचे फुल शंकराला वाहतात.
हरिहश्वरला पुजेच्या ताटात असतात ही फुल.
खूप छान!!!
खूप छान!!!
कैलासपतीच्या फुलाचा क्लोज-अप
कैलासपतीच्या फुलाचा क्लोज-अप का नाही टाकलास.>>>होय ललिता, पावसामुळे क्लोजअप फोटो घ्यायचा राहिला. बरेच फोटो काढायचे राहिले पावसामुळे.
योगेश पुन्हा ह्या फोटोंना वॉटरमार्क नाही>>>>> अति घाई दुसरे काय??
तु सोबत वही नाही नेलीस?? >>>खरंच विसरलो. STML (शॉर्ट टर्म मेमरी लॉस)
आपल्या चाळणीसारख्या मेमरीवर अवलंबुन राहण्याऐवजी वही बाळगलेली बरी>>>>येस्स्स्स्स
हे कैलासपतीचं फूल :
हे कैलासपतीचं फूल :
प्रिती खुप छान दिसत आहे फुल.
प्रिती खुप छान दिसत आहे फुल. ताटातली फुल मरगळलेलीच असतात जवळ जवळ.
अगदी झाडाच्या बुंध्यापासुन ह्या झाडाला फुले लागतात हेही तितकेच नवल आहे.
Pages