युएस ओपन सिरीज - २०१०

Submitted by Adm on 5 August, 2010 - 12:10

क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्‍या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.

युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.

महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्‍यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स

पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy

सगळी सिरिज इथे फॉलो करता येईल.

कोणी बरे प्लेयर्स आले तर यंदा न्यु हेवन मध्ये होणार्‍या पायलट पेन स्पर्धेला जायचा विचार आहे.

ही युएस ओपन सिरीज, ग्रँड-स्लॅम पैकी आहे? यात मार्डी फिश ला प्रथम मानांकन आहे आणि फेडी-नदाल कुठे दिसतच नाहीयेत?

पराग भाउ, बरय ना. मारीयाच येवढ प्रेम का बर? स्मित
बायकांच्यात कोण जिंकेल ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही, स्मित
एका वर्षी ४ ग्रँड स्लॅमला आठ फायनालिस्ट होत्या.

मारियाचा यंदाचा ड्रेस कसा आहे ? Wink

आज पहिला दिवस. आज फेडरर आणि व्हीनसच्या मॅचेस आहेत ना ?

एका वर्षी ४ ग्रँड स्लॅमला आठ फायनालिस्ट होत्या >>> नवलच की. एके वर्षी सात होत्या. कारण एकीने आजारपणामुळे सामना सोडून दिला.

गो नादाल !!! गो फेडी !!!

आज पहिला दिवस. आज फेडरर आणि व्हीनसच्या मॅचेस आहेत ना ? >>>> हो संध्याकाळचं सेशन. त्यामुळे सर्व इच्छुकांनी लाभ घ्यावा.. Happy

काल 'एमी'च्यावेळी Lindt चॉकलेट्सची जाहिरात दाखवली त्यात फेडी होता. (काय दिवस आलेत.)
गो फेडी!

ठोसरबाई पहिला सेट हरल्यात.

ठोसरबाई तिसरा सेट भारी खेळल्या..
व्हिनसताई जिंकल्या इकदाच्या !! पाहिला सेट उगाच ताणला..
सोड्या पहिलाच राऊंड ५ सेटर म्हणे...

ओपनिंग नाईट सेरेमनी मधे मार्टीना छान बोलली. Happy

फेडीच्या मॅचला दुसर्‍या सेटमध्ये जरा मजा आली. ढांगेतला शॉटपण होता काल. Happy कोच बदलला आहे(पॉल अ‍ॅनाकोन) , जरा आळशीपणा कमी केलाय. Proud

हेवीट गेला ते बरच झालं की.. उगीच माज आहे त्याला... पहिले दोन सेट तो मॅथ्यूज भारी खेळला एकदम.. नंतरचे सेट बघितले नाही मी..

व्हिनसची मॅच बघितली.. पहिल्या सेटच्या मध्यात खूप अनफोर्स्ड एरर्स केल्या..६-१ असा घ्यायचे चान्सेस होते. तो ६-४ घेतला.
फेडीच्या मॅचचा पहिला सेट बघितला. >>जरा आळशीपणा कमी केलाय.>> वाटलं मला पण! Wink

आज वॉझ्नियाकी आणि नदाल!!

काल व्हीनसच्या मॅचवर कोण किती सेटमध्ये किती वेळात जिंकणार असे रॅफल होते. माझ्या नवर्‍याचा गेस क्लोझेस्ट आला. त्याला स्टॅन स्मिथची सही असलेली प्रोफेशनल रॅकेट आणि एक चेंडु मिळाला. त्याने व्हीनस आणि फेडीच्या दोन्ही मॅचेस लाइव्ह बघितल्या :एक जळफळाट तडफडाट झालेली अन्यायग्रस्त बाहुली:

पराग, लालू माझे ओपन पुस्तक वाचणे अजुन चालुच आहे. पुस्तक छानच आहे.

टेनिस चॅनलवर एक एपिसोड बघितला 'अगासी - बिटवीन द फाइन लाइन्स'. पुस्तक वाचत असतांना बघितला म्हणुन जास्तच आवडला. कोणी पाहिला का?

फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही.
असो, हा धागा मी नक्कीच एन्जोय करणार. Tx. पराग. Happy

सुमंगल,

<<<< फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही. >>>> हे वाचून मला तुमच्या बद्दल आदर वाटायला लागला होता पण <<<<< मला पिट सम्प्रस पण नव्हता आवडत. >>>> हे वाचून तो वाटेनासा झाला.

Proud

सिंडी सहिये.. नितेशला काँग्रॅट्स सांग. Happy

<<<< फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही. >>>> हे वाचून मला तुमच्या बद्दल आदर वाटायला लागला होता >>>>> हे वाचल्यावर माझा पग्याविषयी असला-नसला सगळा आदर नाहीसा झाला Proud

नाही ना वाटत, मग काय!! मला सरिना पण नव्हती आवडत पण आता आवडते. पण पिट अजुनही नाही आवडत. सॉरी पराग.... आणि हो, सगळ्यात आवडता अँद्रे आगासी.

सुमंगल , काळजी करू नका..मला पण फेडरर आणि सँप्रस नाही आवडत आणि सगळ्यात आवडता खेळाडू आगासी.
गतविजेता डेल पोत्रो दुखापतग्रस्त ना? यंदाची एकही ग्रँड स्लॅम नाही खेळला तो.
राफा करिअर स्लॅम करणार का?
लेडिजमधे माझा पाठिंबा किम क्लिज्स्टर्सला.

Pages