युएस ओपन सिरीज - २०१०

Submitted by Adm on 5 August, 2010 - 12:10

क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्‍या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.

युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.

महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्‍यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स

पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युएस ओपनच्या शेवटच्या दोन दिवशी ग्राउंड पासेस विकतात का ते? विम्बल्डनसारखं बाहेर मोठा स्क्रीन लाऊन मॅच दाखवतात का?

जॉकोविच यांनी पहिला सेट जिंकला पण ते दुसरा हरले आणि तिसर्‍यात एक ब्रेक डाऊन आहेत.
नात्या, सरळ स्टेडियमध्ये जाऊन बघ की.

विम्बल्डनसारखं बाहेर मोठा स्क्रीन लाऊन मॅच दाखवतात का? >>> हो दाखवतात. शिवाय तिथलेच लोक टीव्हीवर जास्त दाखवतात आतल्या स्टेडियममधल्या लोकांपेक्षा Proud ते पासेस लिमिटेड असतात बहुतेक.

शिवाय तिथलेच लोक टीव्हीवर >> तिथलेच म्हणजे कोण? Uhoh

नात्या, सरळ स्टेडियमध्ये जाऊन बघ की. >> डोनेशन्स स्विकारत आहोत.. रच्याक, फार महाग नाहीयेत तिकीटे.. साधारण ११४-११५ पण फारच वर आहेत. तिथुन मुंग्या खेळताहेत असे वाटेल Happy

डबल्सच्या फायनल्सला काळं कुत्र नस्तं. तिकडे सोडता का स्वस्तात असे विचारायला हवे. Happy

यान्कोविच जिंकली कशीबशी..(कशाला??? पुढच्या एक दोन राऊंडमधे हरेलच..)
बगदातीस हरला Sad हा हार्डकोर्ट सिझन चांगला गेला होता म्हणे त्याला..
फिश पाचव्या सेट मधे ४-० आघाडीवर आहे.

हे वाचून मला तुमच्या बद्दल आदर वाटायला लागला होता
>>
महिलांचं टेनिस, आणि तेही चौथ्या फेरीच्या आधी बघणार्‍या सगळ्यांविषयीचा माझा आदर कमी झाला आहे. Proud

गो तैमूरलंग..

फचिन, मारिया-जार्मिला मॅच पाहिलीस की नाही? Proud मी पाहिली.

पराग.. आलो बघ! Happy

फचिन... महिलांच्या चौथ्या फेरीच्या आधीच्या बाबतीत तुला अनुमोदन.. फक्त एक अपवाद.. मरिया शॅरापोव्हा... पुष्कळ वेळा चौथ्या फेरीपर्यंत तिची वाट बघत बसलास तर तिचा खेळ बघायला मिळेल की नाही याची शाश्वती नसते..:)

मीही पहिल्या २ दिवसात अजुन एकही मॅच पाहीली नाही.. नाही म्हटले तरी याहु वर फेडिचा बिटविन द लेग्स शॉट बघीतला.. मस्तच! पण २ आठवड्यापुर्वी फेडी व मार्डी फिशची फायनल बघीतली.. फेडरर जिंकला त्यात पण फेडररचे रिफ्लेक्सेस कमी झाल्यासारखे वाटले Sad

नात्या.. अरे आर्थर अ‍ॅश स्टेडिअम मधे किंवा लुइ आर्मस्ट्राँग स्टेडिअममधे कुठलीही सिट वाइट नाही.. जाउन बघ खरच.. ज्या पद्धतीने ती दोन्ही स्टेडिअम बांधली आहेत त्यामुळे सामना बघताना इंटिमेट वाटते. आतमधे बसुन मॅचेस बघण्यात जी मजा आहे ती बाहेरच्या जंबोट्रॉनवर बघण्यात नाही हे माझे मत! एकंदरीतच फ्लशींग मेडोज चे फेस्टिव्ह वातावरण एंजॉय करण्यासारखे असते. मी जर न्यु यॉर्क न्यु जर्सी एरियात राहत असलो असतो तर दर वर्षी यु एस ओपनला गेलो असतो. शिवाय अजुन किती दिवस फेडिचा टॉप फॉर्म मधला खेळ बघायला मिळेल तेही माहीत नाही त्यामुळे जोपर्यंत तो खेळत आहे तोपर्यंत याची देही याची डोळा त्याचा खेळ बघण्याची सुवर्णसंधी सोडु नकोस!

सिंड्रेला.. स्टॅन स्मिथ(१९७१ यु एस ओपन विनर व १९७२ विंबल्डन विनर्)ची रॅकेट माझ्याकडे पण आहे.. त्या वुडन रॅकेटची(हो! त्या वेळेला वुडन रॅकेटच वापरत!) गंमत म्हणजे माझ्या मोठ्या भावाने १९७८ ला माझ्या आइबरोबर माझ्यासाठी ती रॅकेट पाठ्वली होती.. रॅकेट्ची लाकडाची फ्रेम वाकडी होउ नये म्हणुन स्क्रुज असलेली रॅकेट फ्रेम प्रोटेक्टर वगैरे लावुन आइने ती आणली. आम्ही आइला घ्यायला सांताक्रुझ एअरपोर्टवर गेलो होतो. त्यावेळेला वरुन काचेच्या मागुन खालच्या मजल्यावरचा सगळा कस्टम लाउंज बघायला मिळायचा. आम्ही वरुन आइला बघीतले व जे खो खो करुन हसत सुटलो की विचारु नका.. कारण माझी आइ नउवारी साडी नेसायची (व अजुनही इतकी वर्षॅ अमेरिकेत राहुन अजुनही ती नउवारीच घालते)व नऊवारी साडी घालुन माझी आइ त्या सगळ्या इमिग्रेशन लाउंजमधे.. खांद्यावर ती टेनीस रॅकॅट लटकवुन इकडे तिकडे फिरत होती.. व वर आम्ही सगळे ते दृष्य बघुन खो खो हसत होतो..:) आजही ती रॅकेट माझ्या घरी तुम्हाला बघायला मिळेल!

मुकुंद.. सही Happy

कालचा दिवस किती दमछाकभरा होता !! जोको, शारापोव्हा, नदाल तिनही मॅचेस लई वेळा चालल्या.. !
शिवाय काल हॉटेस्ट डे होता म्हणे. नात्या, युएस ओपनला जाऊन ये नक्की. भारी असतं ते !

लेडिज सिंगल्स मधे कोण जखमी झाले? मी फक्त व्हीलचेअर वरून एक खेळाडू बाहेर नेताना पाहिली. काय झाले तिला?

पेस ड्लोही पहिल्या फेरीतच गारद...
बोपन्ना कुरेशी चक्क १६ वे सीडेड.

बर्डिच तिसर्‍या सेटमध्येही एक ब्रेक डाऊन आहे. लोड्रा विंबल्डनमध्ये चांगला खेळला होता. रॉडिकबरोबर पहिला सेट घेतलेला.
काही तैवानी बाया आहेत अजून.

रॉडीकची मॅच बघताय का कोणी? असा काय खेळतोय तो? जबरदस्ती केल्यासारखा अन अंगात काडीची एनर्जी नसल्यासारखा? माझीच चिडचिड होतेय... Angry

हो बघतोय..
भयंकर टुकार मॅच चालू आहे !!
किमची मॅच ठिक झाली. आमची उडीन हरली. Sad
उद्याच्या मॅचेस चांगल्या होतील...

भूपती-हँतुकोव्हा पेस-ब्लॅक यांची गाठ (मिश्र दुहेरी) दुसर्‍याच फेरीत पडू शकते.
मिश्र दुहेरीतून बोपन्ना बाहेर.
पुरुष दुहेरीत बोपन्ना-कुरेशी,भूपती मिर्नी दुसर्‍या फेरीत.

राग मॅच चांगली झाली की >>>> !!!!
रॅलीज किती बोर होत्या.. ! नुसतं टू अँड फ्रो चालू होतं.. विनर मारायचा प्रयत्न कोणीच करतय असं वाटत नव्हतं.
लाँग रॅलीज entertaining असतात पण कालच्या मॅच मधे अजिबातच तसं वाटत नव्हतं.

विनर मारणे रॉडिकला जमत नव्हते. डावपेच चुकीचे होते म्हणे. टिपसे संधी मिळाली की मारत होता. त्याचे ६०+ विनर आहेत. लाँग रॅलीज करुन रॉडिकला दमवणे म्हणजे सर्विस जोरात येणार नाही अशी त्याची स्ट्रॅटेजी होती, आणि टिप्से चे ५ सेटचे रेकॉर्ड चांगले आहे म्हणे त्यामुळे वेळ पडल्यास तो शेवटपर्यंत टिकला असता.
(साभार- मॅकॅन्रोज Proud )

टिपसे संधी मिळाली की मारत होता >>>> हो..ते आहे..

लाँग रॅलीज करुन रॉडिकला दमवणे म्हणजे सर्विस जोरात येणार नाही अशी त्याची स्ट्रॅटेजी होती >>> हे माहित नव्हतं. Happy

Pages