Submitted by भूत on 27 August, 2010 - 03:58
तिची साधीशी कविता
माझा अर्थाचा गोंधळ
काळेसावळे ते ढग
तिचा सखा घननीळ |
तिची साधीशी कविता
शोध अंतरीचा घेई
खोल विरहाचे दु:ख
अलगद वर येई |
तिची साधीशी कविता
म्हणे'तुझी माझी भेट
आज वसंत बहर
पुढे वैशाखाची वाट |
तिची साधीशी कविता
थोडे डोळे पाणावती
दोन मोतियांचे अश्रु
तिच्या गाली ओघळती |
तिची साधीशी कविता
माझ्या गळा एक मिठी
शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !!
गुलमोहर:
शेअर करा
पुढे भावनांचा गोन्धळ झाला
पुढे भावनांचा गोन्धळ झाला शब्दच सुचत नाहीयेत .........म्हणुन ...........अपुर्ण .....
|| अन्तरस्थीतीचीये खुणा | अन्तरनिष्ठची जाणती||
(डिस्क्लेमर : सदर कविता मला माबोवरील एक साधीशी कविता वाचताना सुचली ...जर तुम्हाला ती कविता ओळखता आली असेल तर तिकडे थोडेफार श्रेय जाते ... मी त्या पॅटर्न मधे लिहिणार होतो पण ह्या प्यॅटर्न मध्ये सुचत गेली...असो )
प्रगो अपुर्ण म्हण्जे अजुन
प्रगो अपुर्ण म्हण्जे अजुन लिहिणारेस तू??????
(No subject)
आता ओळखा बरे, "ती कोण"?????
आता ओळखा बरे, "ती कोण"?????
छान ह्म्म्म कोण ती
छान
ह्म्म्म कोण ती
छान आहे, अपुर्ण का ठेवली?
छान आहे, अपुर्ण का ठेवली? पुर्ण कर की..
काहीच्या काही होऊ शकत नाही.
काहीच्या काही होऊ शकत नाही. खूप छान कवीता आहे.
ह बांना अनुमोदन. खरच रे काढ
ह बांना अनुमोदन. खरच रे काढ का.का.क मधून. कविता छानच आहे
कविता आवडली पण अपूर्ण नाही
कविता आवडली पण अपूर्ण नाही वाटली. छान!
छान कविता प्रगो.... आवडली.
छान कविता प्रगो.... आवडली.
अपूर्ण नाही वाटत..शेवटच्या
अपूर्ण नाही वाटत..शेवटच्या दोन ओळींनी मस्त सम साधलीय...
आणि आता तो रिमार्क काढला तर चालेल्....पुन्हा सुचले तर लिहिता येईलच की
एक आगाऊ वाचक
छान आहे!!!
छान आहे!!!
प्रो म्हणता येईल कवितेपेक्षा,
प्रो म्हणता येईल कवितेपेक्षा, पण छान फिल पकडलाय, मस्त!
(मूळात ज्या कवितेवरून हे सुचलंय त्या कवियीत्रींना ती कविताच टाईमपास वाटतेय, पण ही आवडेल अशी आशा! :स्मित:)
"शब्द विरुनिया गेले अर्थ एक
"शब्द विरुनिया गेले
अर्थ एक दोघा ओठी !! "
..... छानच
अपूर्ण नाही वाटली ... हाच शेवट परिणामकारक आहे
प्रसाद गोडबोले, तुम्ही कुठे
प्रसाद गोडबोले,
तुम्ही कुठे भेटाल?
मी (अगदी क्षणभरच, पुढची ओळ वाचायच्या उत्सुकतेमुळे, पण) रडलो ही कविता वाचून! अप्रतिम!
'आय अॅम ऑनेस्टली सेयिंग, अप्रतिम!'
-'बेफिकीर'!
आवडली कविता.
आवडली कविता.