उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks गं ज्ञाती (अरे तुरे करुना ?)
मी
ह्या वेळी मुंबइ मधे गेले ना की उर्जिताजैन चे products आणिन.
बघुया कसे आहेत ते.

इथे लिहावे की नाही या संभ्रमात आहे पण तरीही लिहितो.
पिंपल्स वर एक उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना आपली उशी धुतलेल्या टर्किश टॉवेल मध्ये गुंडाळणे. पण टॉवेल रोज धुतलेलाच असावा. त्यासाठी चार पाच टॉवेल एकदम खरेदी करून ठेवता येतील. मग रोज धुवावे लागणार नाहीत. एका मोठ्या र्टॉवेल चे दोन तुकडे करूनही वापरता येतील. अभ्रा टर्किश टॉवेल इतका अ‍ॅब्सॉर्बंट नसतो. शिवाय टर्किश टॉवेल ने exfoliation ही होते. दिवसातले आठ तास आपला चेहरा उशीच्या संपर्कात असतो, तीच तेलकट असेल तर काय उपयोग ?
( अप्रस्तूत असेल तर उडवेन )
हेमाशेपो.

टर्कीश असेल अभ्रा (की आभ्रा की आणखी काही?) तर चालेल .. मला वाटतंय टर्कीश ला महत्व असावं ..

विकु, असं केल्याने काय फायदा होतो ती सांगा की समजावून!

मिने, अभ्रा कि आभ्रा पैकी अभ्रा बरोबर आहे असं तुला वाटतं कि टर्किश अभ्रा नसलेला चालेल असं तुला वाटतं? Proud

अभ्रा टर्किश टॉवेल इतका अ‍ॅब्सॉर्बंट नसतो. शिवाय टर्किश टॉवेल ने exfoliation ही होते. <<
हे लिहिलंय की विकुंनी.
मला वाटतं पिंपल्स नसलेल्या चेहर्‍यासाठी हे ठिक आहे. पण पिंपल्स असलेल्या चेहर्‍यासाठी हा उपाय घातक आहे विकु.
पिंपल्स असतील तर स्क्रब पण करत नाहीत चेहरा. केवळ पिंपल्सचा भाग सोडून साफ करतात. पिंपल्स असतील तर तोंड धुतल्यावरही चेहरा खसाखसा घासू नये कारण एक पिंपल फुटून त्याचा संसर्ग बाकी त्वचेला होऊ शकतो. पिंपल्स वाढतात त्याने.

हेमाशेपो.

हे कशाला?? माहिती देत राहावी की, वापरणारे वापरतील, ज्यांना जमणार नाही ते इतरांना सांगु शकतील.कुठेतरी काहीतरी उपयोग होईलच की..... Happy

चेहेर्‍याला ग्लो येण्या करीता एक उपाय
पुदीन्याची पाने धुवुन वाटावी आणी ती चेहेर्‍याला लावावी.
असं म्हनतात की जर ऑरेंज किंवा मोसंबी ज्युस ( पण साखरे शीवाय किंवा खुप कमी साखर घ्यावी )
जर रोज घेतल तर चेहेर्‍याला चांगली चमक येते. मी हे करुन बघीतल आहे आणि १५ दिवसात फरक पडला.

मला चेहर्‍यावर खूप घाम येतो, आंघोळ झाल्यावर तर खूपच जास्त येतो. पावडर लावता येत नाही आणि नाही लावली तर चेहरा अगदी चिकट्ट दिसतो. 'अतिघाम' ह्या समस्येवर काही उपाय आहेत का?

मंजूडीच्या समस्येमध्येच अजून एक जोड, कोणतंही क्रिम / मॉइश्चरायझर लावलं तर जास्त घाम येतो. अगदी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावल्यावरही. आत्तापर्यंत ७-८ प्रकारची सनस्क्रीन लोशन्स / सनब्लॉक लोशन्स वापरलीत, पण ते लावल्यावर इतका घाम येतो आणि चिकचिक होते की त्यापेक्षा चेहेरा कळवंडला तरी हरकत नाही असं वाटायला लागतं.
यावर उपाय?

मंजू / अल्पना,
घरातून बाहेर निघताना कोरफडीची जेल मिळते तिचा एक हलकासा थर लावून बाहेर पडायचं. म्हणजे त्वचा काळवंडणार नाही. किंवा चांगल्या दर्जाचे टोनर आणून ते लावायचे. ते द्रवस्वरुपातच असते त्यामुळे जास्त चिकचिकाट होत नाही. नंतर घाम आला तर पुसत राहायचा आणि मग कामाच्या ठिकाणी पोचलो की चेहरा पुन्हा स्वच्छ धुवून मग जो काही मेकअप करायचा तो करायचा. (मला हाच प्रश्न असल्याने मी कायम ऑफिसात पोचूनच चेहर्‍याला बाकी गोष्टी लावते.)

हो श्र, सध्या तरी हेच करतेय मी. पण घामाची अक्षरशः आंघोळ होतेय... त्यातून ही मुंबईची दमट हवा..

टोनर कुठल्या स्पेसिफिक ब्रँडचा असेल तर सांग ना..

लोटस हर्बल्स - रोझटोन (हा भारतात मिळणार्‍यांपैकी मला सर्वांत जास्त भावलेला)
लोरीयाल - व्हाईट परफेक्ट
टोनर लावले की चेहरा बर्‍यापैकी तकतकीत दिसतो.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं - सकाळी आवरताना आंघोळ हा शेवटचा आयटम ठेवू नये. कारण मग आपण लगेच ऑफिसात घालायचे कडक इस्त्रीचे कपडे चढवून बाहेर पडतो. आणि त्यामुळे जास्त घाम येतो. आधी आंघोळ आटोपून घ्यावी. मग चक्क पाच मिनिटे जरा शांत बसावे. मग बाकीचे आवरून बाहेर पडावे. मध्ये पुरेसा वेळ जातो, घाम आपोआप कमी येईल. (सिंगापुरामुळे पहिल्यांदाच इतक्या दमट वातावरणात राहायला लागले. पुण्यातल्या बर्‍यापैकी कोरड्या हवेतही मला घाम यायचा. इथे आल्यावर तर हैराण झाले. त्यावरून सुचलेले हे उपाय आहेत.)

माझ्या गालावर सध्या लाल व गुलाबीसर रगाचे ठीपके येत आहेत. तीन चार महिने झालेत. पिप्लस नाही आहेत. ह्या ठीफक्याना काय म्हणतात आणि त्यावर उपाय काय आहे? माझी त्वचा कोरडी आहे.

धन्यवाद

>>कोणतंही क्रिम / मॉइश्चरायझर लावलं तर जास्त घाम येतो.

मी गेल्या एक-दोन महिन्यापासून सनस्क्रीन लावायला सुरुवात केली आहे पण त्यामुळे घाम तर येतोच आणि त्वचा काळवंडल्यासारखी दिसते. सनस्क्रीनसारखं काम करणारं पण त्वचेवर अपाय न करणारं आयुर्वेदात काही आहे का? वर कोरफड जेलचा उल्लेख आहे. हे सनस्क्रीन म्हणून काम करतं का?

माझ्या नवर्‍याच्या गालावर स्किन काळपट होते आहे. ( साधारण इंडिया मधे ते वांग येणे म्हणतात ना , अगदी तसे नाही पण त्या सारखे).
ईथे डर्मि डॉ. ने सांगितले की एशिअन मधे असे बरेच वेळा दिसते पण उपाय नाही, हॅरिडिटि असेल. ( ईथले डॉ जितके चांगले तेतकेच मुर्ख...असो)

त्यावर काही रामबाण आणि घरी करता येण्यासारखा उपाय सुचवा प्लिज.

एकदा कोणि तरी हेअर डाय ची अ‍ॅलर्जी असेल म्हणाले, म्हंटल काही काय? तर म्हणे हो अग अलिकडे तिशिच्या आत केस पिकतात कि..... अस्सा राग पण आला आणि वाईट पण वाटले.........सो पॉईंट ईज त्याचे केस अजुन काळे आहेत Happy आणि डाय वगैरे नाही वापरत.

लालु
अग मला घरगुती उपाय हवा आहे. आणि ते साईट वर दिसते त्या प्रमाणे नाहि नुसती काळपट झाली आहे स्किन.

हॅरिडिटि असेल>>>>> हे शक्य आहे, सासुबाईंना होते, पण आता नाही.
पण काही उपाय असेलच ना?

एका मैत्रिणीने ( ती स्किन मधे बरेच काही करत होति , एका डर्मी कडे. पण आता ईथे नाही आहे ) सांगितले होते की ह्युस्टन मधे आल्यावर उन्हामुळे झाले असणार.

घरगुती काही उपाय आहे का?

.......
लाजुन आणि फेशिया, हा साबण कोठे मिळतो ?

रिमझिम,

http://sscpl.tradeindia.com/Exporters_Suppliers/Exporter23488.417913/Laz...

इथे फोन नं दिलेला आहे कंपनीने. तिथे फोन करुन तू रहातेस तिथलं जवळचं दुकान किंवा एजंट विचारुन घे. एजंट घरपोच सामान देतात आणून. माझ्या ऑफिसमध्ये रेग्युलर लाझुर (नितळ उजळपणासाठी) व अझार्डियन (अँटी पोल्युशन) वापरणार्‍या १०-१५ जणी आहेत त्यामुळे परिसरातली एजंट माझ्या ऑफिसमधेच सामान आणून देऊ लागली आहे आता. पुर्वी मी स्वतः विकत आणून द्यायचे त्या बायकांना, पण भलतंच वाढू लागल्याने मी सुद्धा कंपनीच्या ऑफिसमध्ये फोन करुन एजंट मागवली.

माझ्या गालावर सध्या लाल व गुलाबीसर रगाचे ठीपके येत आहेत.

रोज डास चावताहेत का? मुंबईत असाल तर ही शक्यता आहे भरपुर. माझ्याही तोंडावर असले ठिपके भरपुर येतात आणि जातात...

वर कोरफड जेलचा उल्लेख आहे. हे सनस्क्रीन म्हणून काम करतं का?

हो. उर्जिता जैनच्या कोरफड जेलवर तरी उल्लेख आहे सनस्क्रीन म्हणूनही काम करतं म्हणुन. एकदा वापरुन बघ.

माझी त्वचा तेलकट असल्याने मला कधीच कुठलेही क्रिम/मॉ. वगैरे वापरता आले नाही, लावले की लगेच चेहरा काळपट आणि घामाघुम.. त्यामुळे लावायचे असेल तर ऑफिसात आल्यावर निवांतपणे लावते Happy पण कोरफड जेलने अजिबात घामाघुम व्हायला होत नाही. चांगली चोळुन लावली की चेह-यावर मागमुसही राहात नाही तिचा...

Pages

Back to top