प्रयत्न केलाय. बघा जमलंय का?????
रोजच्या प्रमाणेच रश्मी स्टेशनवर उतरली आणि ticket window पाशी राहूलची वाट बघत उभी राहिली. "शी बाबा, हा माणूस वेळेवर येईल तर शप्पथ!" ती मनाशी चरफडत म्हणाली. तशी लग्नाला ३ वर्षे होऊन गेलेली. लव्हमॅरेज म्ह्टल्यावर लग्नाअगोदरही भेटीगाठी होतच होत्या. पण ही उशीरा येण्याची सवय काही सुटली नव्हती त्याची. ह्याची खरंतर तिला सवय व्हायला हवी होती पण म्हणतात ना मन वेडं असतं, उगाच आशा लावून असतं की एकदा तरी तो मी यायच्या अगोदर माझी वाट पहात उभा असेल, एक ना दोन. अशा विचारांनी मनात फेर धरला असतानाच तो आला. मग नेहेमीप्रमाणे तिचं रागावणं, त्याचं explanation देणं वगैरे प्रकार झाले. थोडंफार सामान खरेदी करुन त्याने तिला घरी सोडलं आणि म्हणाला, " तू जा वर मला बाहेर थोडं काम आहे, आम्ही सगळे मित्र भेटणारोत आत्ता. थोड्यावेळाने येतो मग."
दार उघडून रश्मी आत आली. घर पसरलेलं होतंच. वैतागून तिने हातातल्या पिशव्या आदळल्या खाली. "एक दिवस जरी पसारा घातला नाही तर ह्याला जेवण गोड लागत नाही." स्वतःशीच पुटपुटत तिने आवराआवरी सुरु केली. सगळं आवरुन झाल्यावर मस्तपैकी वॉश घेतला. गरमागरम चहाचा घोट घेत थोडा पेपर चाळला. त्याच त्याच बातम्या वाचून तसाही कंटाळाच आलेला तिला. मग टि.व्ही. ऑन केला. प्रशांत दामले कुठची तरी रेसिपी दाखवत होता ती बघत रश्मी वेळ काढत होती. नाहीतरी ती आज थालीपिठंच करणार होती त्यामुळे स्वयंपाकाची तशी काही घाई नव्हती.
दिवेलागणीच्या वेळेस रश्मी उठली. टि.व्ही.कडे बघत बघत दिवा उचलला आणि काय झाले कळलेच नाही, पण दिवा हातातून खाली पडला. रश्मीच्या काळजात धस्स झाले. अगदी नव्या युगात जन्माला आली असली तरी कुठेतरी ह्या गोष्टींनी ती विचलीत व्हायचीच. दुसर्याच क्षणी तिने मनातला विचार झटकून टाकला आणि दिवा लावून ती आपल्या कामाला लागली.
आठ वाजून गेलेले. रश्मी राहूलला फोन लावत होती. बेल वाजून वाजून बंद व्हायची पण राहूल काही फोन उचलत नव्हता. परत रश्मीची चिडचिड सुरु. "खिशात मोबाईल असतो तरी उचलायचे कष्ट घेणार नाही." ८.३० झाले ९.०० वाजून गेले, रश्मी फोन करतच होती. आतातर फोन ही लागेना. आता मात्र रश्मीच्या काळजाचा ठोका चुकला. वैतागाची जागा भितीने घेतली. "का बरं हा फोन उचलत नाहीये. नेहमी निदान दोन शब्द बोलतो किंवा कट तरी करतो. आज ते ही नाहीये. कुठे असेल हा? त्याला काही झालं तर नसेल ना? देवा काय करु????" नुसतेच प्रश्न ज्यांची उत्तरं नाहीत असे. अचानक रश्मीला तो मगाचा दिवा पडल्याचा प्रसंग आठवला. मटकन खालीच बसली ती. डोळे भरुन आले. "देवा, माझ्या राहूलला काही झालेलं नसू दे. तो सुखरुप असू दे." सतत देवाचा धावा करत राहिली ती. तिला आठवलं की ज्यांना तो भेटणार होता त्यांचे फोन नं तिला ताईकडे मिळतील कारण ताईसुध्दा त्यांच्याच ग्रुपमधली होती. लगोलग तिला फोन लावून तिने एकदोघांचे नंबर घेतले. पण जो जो भेटायचा तो म्हणायचा,"हा काय मी आत्ताच घरी येतोय. इतका वेळ आम्ही बरोबरच होतो." रश्मी सतत गॅलरीतच उभी होती. प्रत्येक येणार्या जाणार्या बाईककडे बघत. राहूल असेल ह्या आशेने. डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. थालीपिठाची भाजणी तशीच पडून होती. स्वयंपाकघरात पायही टाकला नव्हता तिने. हातात फोन घेऊन नुसत्या येरझार्या चालू होत्या तिच्या. इतक्यात त्याच्या मित्राचा फोन आला की तू काळजी करु नकोस, मी बघतो बाहेर जाउन त्याला कुठे आहे तो, हे तो म्हणतोय न म्हणतोय तोच तिला राहूल दिसला गेटमधून आत येताना. नेहेमीसारखाच शांत, सावकाशपणे बाईक पार्क करत होता. जिवात जीव आला तिच्या. पटकन आत जाऊन देवाला नमस्कार केला. अश्रूंनी भिजलेल्या चेहेर्यावर आता एक छानसं हसू फुललं होतं. रडवेलं हसू तिच्या चेहेर्याला अगदीच खुलून दिसत होतं.
समाप्त.
जमलंय की
जमलंय की गं........... छानच आहे.
रश्मीला सांग, राहूलची चांगली झाडंपट्टी काढ. कुठे होता म्हणावं दोन तास????
मस्त!!
शॉर्ट आणि स्वीट!!
छान
जमलंय हं!!!
राहुल ला सांग असंच वागत जा म्हणुन
नाहीतरी बायकोला त्रास देण्यात जो आनंद आहे तो कश्यातच नाही
छान जमली
छान जमली आहे. कथा.
छानच!
छानच!
> अगदी नव्या युगात जन्माला आली असली तरी कुठेतरी ह्या गोष्टींनी ती विचलीत व्हायचीच....
होते कधि कधि असे !
अग,मस्तच
अग,मस्तच जमलं की...
शेवटी खरंच पाणी आलं डोळ्यात.
अनघा
जमेश !
जम गया मोना, छान लिहीलेयस. फक्त आता एक कर त्या (तथाकथित) राहुलची हजेरी घे पाहु चांगलीच.
अरे
वा!
तुला पण लिहिण्याचा किडा चाव्या तर.
लिहित रहा. अजुन छान लिहिशील.
BTW
अमोलच्या सवयी माझ्यासारख्याच आहेत तर
बरोबरच आहे आम्ही एकाच राशीची माणस
घालमेल.....
बायकांच्या मनाची घालमेल या पुरुषमंडळींना कधी कळणार????
छान
हे वाट बघणच फार जीवघेण, अगदी नको होउन जात. छान थोडक्यात पण मस्त लिहिलय.
हो ना!
कधी कळणार मनातली घालमेल या पुरुषांना!
मोना छान आहे कथा. लिहीत जा.
मस्त जमलंय
आमच्या कडे हा किस्सा बरेचदा झालाय आधी... तू खुपच सेंटी आहेस असा शेरा ऐकावा लागतो मला.. हळु हळु सवय होतेय वाट न बघायची..
जमलंय गं जमलय ! मस्त जमलय !
अगदि चित्र उभ केलस डोळ्यापूढे. शेवट मात्र आत उलथापालथ करून गेला.
माणिक !
धन्यवाद
सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. खूप विचार करत होते ही गोष्ट लिहायच्या अगोदर. लिहू की नको, लिहू की नको, खरं सांगायचं म्हणजे हा मला आलेला अनुभव आहे गेल्याच आठवड्यात. तो तुमच्याशी शेअर करावासा वाटला, म्हणून उगाच चार ओळी खरडल्या. कथेपरमाणे विचार करावयाचा झाल्यास खूपच त्रुटी आहेत ह्यात. पण मला काय म्हणायचे आहेत हे तुमच्यापर्यंत पोचले हेच या कथेचे यश आहे असे मला वाटते.
पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचून अजून लिहिण्याची इच्छा मनात जागृत झालीये.
मन!!!!!!!!!
असेच असते मन..............
किती समजावल तरी समजुन घेत नाही
एक गोष्ट मात्र खरी मनाला वाट्त की मना सारख घडाव ............................ आणी घडतही!!!!!!!
छान लिहले आहे..
शुभेच्छा..
प्रिया पोरे
सही मोना
मोना छान लीहिलेयस.
आणखी लीहीत रहा.
खरच छान जमलीये
मोनाक्षी, खरच छान जमलीये.
छोटिशी, नीटस. तुला नक्की काय सांगायचय ते पोचतय की. आता मोठी लिहायाची, तब्येतीत. माझ्या खूप शुभेच्छा!! लिहीच तू.
धन्स
थँक्स दाद. specially तुला आवडली हे वाचून खूपच confidence आलाय आता. तुम्ही म्हणजे मास्टर ह्यातले. really thanx.
कथा खुपच छान आहे
अशाच लेखनाची पुढेही अपेक्षा!
हेच उलटं
हेच उलटं झालं असतं तर्.....रश्मी बाहेर आणि राहुल घरी.......राहुल दिवा न लावता क्रिकेट बघत बसला असता...नाहीतर मित्रांबरोबर चीअर्स ची सोय केली असती.......
छान प्रयत्न
सुन्दर लिहीले आहेस.
घरोघरी हेच असते. वरच्या प्रतिक्रीये प्रमाणे जर अदला बदल झाली असती तर....?.
त्यांच्या मनात काय आले असेल?
पुढ्च्या अशाच छानशा गोष्टीची वाट पाहात आहे.
स्वाती
अगदी
अगदी बरोबर!!
मोनकशी...मस्त लिहिलय. एकदम आवडलं.
छान आहे
छान आहे कथा....
ते दोन तास
खरच राहुल ऐवजी रश्मी बाहेर राहिलि अस्ती तर ?
एक नविन गोश्त लिहाय्ला हर्कत नाहि बघुया पुरुशान्च्य वगन्यात काहि फरक पद्तो का.
कथा फारच छान जमलि आहे.
"हे दोन तास आनि ते दोन तास "
पुधिल कथेचि वात बघत आहे.
जमलय की :)
अग खरच छान मस्तच जमलय की .. रश्मीला सांग आता थालीपिठ करायला हरकत नाही
मस्तच
मस्तच जमलीये ग. नवर्याला आवर्जुन वाचायला लावली नंतर पल्लीची प्रतिक्रिया वाचुन तो एवढा खो खो हसला ना...
अशीच लिहित राहा. खुप आवडली.
-प्रिन्सेस...
शॉर्ट आणि स्वीट!!
मोना खुप छान कथा आहे.
मोना!!!!! झका
मोना!!!!!
झकास, अगदी माझी बायकोच उभी राहीली डोळ्यासमोर!!!!!
ती पण अशीच वाट बघते माझी जर उशीर झाला तर!!!!!
मस्तच
मस्तच कथा...हे वाट बघण्याचे अनुभव खरंच कंटाळवाणे आणी कधी कधी असे वाईटही असतात. छोट्याश्या मांडणीत छान मांडली आहे
सुमेधा पुनकर
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************
मोना छानच
मोना छानच जमलिये..
पल्लीने लिहिलेले एकदम पट्ले...त्यात भर म्हनजे रश्मीने आवर्जुन फोन करून घरी सान्गितले असते कि तिला का आणी किति ऊशीर होणार ते!!