Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डव्हने केस धुतले की पहिल्या
डव्हने केस धुतले की पहिल्या दिवशी छान वाटतात अगदी सॉफ्ट सॉफ्ट. दुसर्या दिवशी नुसते भुरभुरीत...>>
मला पण हल्लि हाच अनुभव येत आहे. केस धुते त्या दिवशि एकदम सॉफ्ट पण दुसर्या दिवशी चक्क दोरे वाटतात.
कोणता शांपु वापरावा कळतच नाही.
टच वुड मला अजुन लोरियेने हा
टच वुड मला अजुन लोरियेने हा अनुभव दिला नाहीये
मला रोजच न्हायला लागत नाहीतर
मला रोजच न्हायला लागत नाहीतर माझे केस जामच तेलकट होतात :९ आणि तसे ते तेलकट झाले की माझ डोकच दुख्जायला लागत त्यामुळे मी रोज केस धुते
डव्हने केस धुतले की पहिल्या
डव्हने केस धुतले की पहिल्या दिवशी छान वाटतात अगदी सॉफ्ट सॉफ्ट. दुसर्या दिवशी नुसते भुरभुरीत...>>>> मलाही हाच अनुभव येत होता, पण मला वाटले की मी जास्त शाम्पु लावला असेन म्हणुन असे झाले असेल.
मी काल लाझुरे सोप आणला त्याबरोबर चारुता शांपु फ्री मिळाला आहे, आता उद्या त्याने धुऊन बघेन. कोणी वापरला आहे का?
माझे केसही खुप पातळ आणि तेलकट आहेत, मी एक दिवसाआड केस धुते नाहितर ते चप्पु वाटतात.
सध्या मी वैद्य साने यांचा अॅपल ग्रीन शाम्पु आणला आहे, त्याने अजुनतरी केस मस्त मऊ होतात. पुढे काय होतेय ते देव आणि वैद्य सानेच जाणे.
मी तर रेग्युलर इंटर्व्हलने
मी तर रेग्युलर इंटर्व्हलने डॅन्-ओ-पॉज वापरुन मधे प्लमेज वापरतेय. माझे नाही भरभरीत झाले कधी केस उलट त्यात कंडीशनर असल्याने मुळातल्या जाड राठ केसांना माणसाळल्यासारखं होतंय.
कदाचित कुठलेही शँपू कुणाला सुट होतात तर कुणाला नाही तसं असेल. मला क्लिनिक ऑल क्लियर कधीच सुट नाही झाला. माझं सगळंच डोकं क्लियर होईल (टक्लू) असं वाटलं.
कुठल्याही शांपु चा इफेक्ट २-३
कुठल्याही शांपु चा इफेक्ट २-३ दिवसांपेक्शा जास्त दिवस रहात नसावा...डव्ह चा शांपु आणि कंडीशनर ने माझे केस खुप सुळसुळीत झालेत आणि खरंच गळायचे कमी झालेत.
मला केसात कोंडा खूप होतो
मला केसात कोंडा खूप होतो म्हणून डॉक्टरने डँगो नावाचा शांपू लिहून दिला होता. बाकीच्या कुठल्याही शांपूपेक्षा रीझल्ट चांगला आला. आणि शांपू + कंडिशनर असल्याने केसाना पोत पण खूप छान येतो.
ज्याचे केस खूप गळतात अशासाठी एक महत्त्वाची टीप: तुमच्या डॉक्टरला विचारून एखादे मल्टीव्हिटॅमिन गोळ्या चालू करा. शरीराला पोषण कमी मिळत असेल तरीदेखील केस गळतात.
काल चारुता शाम्पु वापरला,
काल चारुता शाम्पु वापरला, माझे केस मऊ झाले आहेत पण लेकीचे रखरखीत झालेत, ओरडत होती सकाळी वेण्या घालताना, काहितरी लावत असतेस मझ्या केसाला म्हणुन. आज तिने वॉर्निंग दिली आहे, तुला काय लावायचे ते लाव पण मला डव शाम्पुच हवा आहे.
अश्विनी आणि वर्षा.. कोणाला
अश्विनी आणि वर्षा.. कोणाला कुठला शांपु सुट होईल ते सांगता येणार नाही. प्लुमेज माझ्या लेकीला सुट झाला, पण माझे केस भरभरीत झाले.. तिला लोरीये जराही चालत नाही, तर मला लोरीयेशिवाय दुसरा कोणी चालत नाही
लोटस वापरलाय का कोणी? मी
लोटस वापरलाय का कोणी?
मी लोटसचा ऑलिव्ह वाला वापरून पाह्यलाय. मला तरी डव पेक्षा चांगला अनुभव आलाय.
केशकांती पण चांगलाय. फक्त तेल लावलेलं असेल तर दोनदा लावावाच लागतो.
बायोटीक नावाच्य कंपनीचे
बायोटीक नावाच्य कंपनीचे शँम्पु, कंडीशनर मी वापरते सध्या. चांगले आहेत. अजिबात केमीकल्स नसावीत असे वटते तरी. अॅपल, मेंदी असे काय कय प्रकार आहेत.
तुम्ही कोणी वापरले आहे का ?
मी वापरले आहे बायोटीक शँम्पु.
मी वापरले आहे बायोटीक शँम्पु. छान रिझल्ट आहे. फक्त त्याची बाटली फारच लहान वाटते.
माझे कुरळे केस आहेत. त्या
माझे कुरळे केस आहेत.
त्या करिता कुठला शँम्पु चागला ?
मी सध्या तरी डव्ह वापरते.
केसांची मुळं दुभंगली आहेत (
केसांची मुळं दुभंगली आहेत ( स्प्लिटंण्ट्स) का काय म्हणतात ते... आणि केसांचा व्हॉल्यूम वाढवायचा असेल आणि केस सिल्की व्हायला हवे असतील तर अजून काय करावे...? रोज तेल लावणं शक्यच नाही...
उर्जिताजैन याम्ची वेबसाईट आहे
उर्जिताजैन याम्ची वेबसाईट आहे का?
जास्वंद जेल तेल लावलेल्या केसांवर लावायचा का आणि मग शॅम्पुने केस धुवायचे का? की तेल न लावल्ता नुसता जेल लावायचा आणि नुअत्या पाण्याने केस धुवायचे?
माझ्या कुरळ्या केसा करिता
माझ्या कुरळ्या केसा करिता चालेल का उर्जिताजैन यांचे जास्वंद जेल तेल?
जास्वंद जेल तेल नव्हे
जास्वंद जेल तेल नव्हे मुलींनो. जास्वंद जेल. यात तेलाचा अंशही नसतो.
मन्शे आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात मिळतात प्रॉडक्टस.
जास्वंद जेल पाण्यात मिक्स करून स्काल्पवर चोळायचं. पूर्ण केसांनाही लावायचं. २० मिनिटं ठेवून नुसत्या पाण्याने किंवा शिकेकाईच्या पाण्याने धुवून टाकायचं. तेल लावायचं नाही.
यामधे मी जनरली आदल्या दिवशी शांपू केलेला असेल तर हे करते. म्हणजे जास्वंद जेलाचा उपयोग जास्त चांगला होतो.
२० मिनिटं ठेवून नुसत्या
२० मिनिटं ठेवून नुसत्या पाण्याने <<<<< हेच उत्तर हवं होतं ग,
आणलाय मी जेल पण अजुन वापरला नाहीये. आता सुरवात करणारे.
आणि मागे एकदा तु ते केवडा जेल बद्दल काहीतरी बोलली घोतीस ते ही जरा डिटेलमधे सविस्तच उचकटुन सांग बर. म्हणजे तो का [कशासाठी]आणि कसा वापरायचा ते.
कोरड्या केसातला कोंडा
कोरड्या केसातला कोंडा जाण्यासाठी काय करावे?
आणखी एक. बर्याच वेळा ऑफिसला लवकर जायचे असते पण केसही धुवायचे असतात. तेव्हा अर्धवट ओलेच केस घेऊन आपण बाहेर पडतो. त्यावर हलकेच स्कार्फ बांधा. फार घट्ट नको नाहीतर केस चप्प होतील. गाडीतून, वरुन जाताना वार्याने वाळतील म्हणून आपण ते ओपन ठेवतो पण धुतल्यामुळे ते अधिकच नाजूक झालेले असतात आणि वार्याच्या जोराने भराभर तुटू, गळू शकतात. तसंच स्काल्पही ओलसर असल्याने वार्याने, धुळीने केसांची मुळं तकलादू होतात. कपाळावरची हेअरलाईन मागे मागे जाण्याचेही हेच कारण आहे. पुण्यात शक्यतो स्कार्फशिवाय कुणी बाहेर पडतच नाही, पण ओले केस असले तर स्कार्फ (भणाणा वारा लागणार नाही पण हलकी हवा आत शिरेल इतपत) हलके बांधणं आवर्जून लक्षात ठेवा मुलींनो.
कोरड्या केसातला कोंडा
कोरड्या केसातला कोंडा जाण्यासाठी काय करावे?<<<<
केसांना तेल लावताना ते थोडे कोमट करून लावायचे. शक्यतो कापसाच्या बोळ्याने लावायचे म्हणजे सगळीकडे नीट लागते. हळूहळू पूर्ण चांगला मसाज करायचा. काहीकाही छोट्या पार्लरांमधून वाफ देण्यासाठी जसे छोट्या आकाराचे, हातात धरण्याजोगे स्टीमर असतात, ते आणले तर उत्तम. त्याने केसांना वाफ द्यावी. याचाही फरक बराच पडेल.
पुण्यात कोथरुड स्टँडाच्या आसपासच्या भागात राहणार्या मैत्रिणींसाठी:
मला जाहिरात करायची आहे असे नव्हे पण तिथे मी नियमित ज्या पार्लरात जाते तिच्याकडे खूप चांगली 'हेअर ट्रीटमेंट' मिळते. सुरुवातीला आठवड्याला एक अशी एकूण १० सेशने असतात. त्यात हाय फ्रिक्वेन्सी यंत्राने डोक्याला मसाज, मग तेलाने व्यवस्थित मसाज, नंतर वाफ, त्यानंतर हेअर पॅक आणि मग शॅम्पू असे साग्रसंगीत प्रकार असतात. पण अक्षरशः २/३ ट्रीटमेंट झाल्यानंतर फरक चांगलाच जाणवतो. मी तिच्याकडून हेअर ट्रीटमेंट नियमित करून घ्यायचे. माझ्या केसांचा पोत अजूनही चांगला राहिलाय. (मी इकडे तिच्याकडे मिळणारा हेअर पॅक घेऊन आले आहे. तो नियमित लावते.)
कुणाला पत्ता हवा असला तर सांगा. मग नंतर टाकेन.
वा. धन्स श्र. स्टीमने कोंडा
वा. धन्स श्र. स्टीमने कोंडा जातो का? तेल लावल्यावर गरम पाण्यात टर्किशचा टॉवेल बुडवून केसांना गुंडाळण्याबद्दल ऐकलं होतं. कुणी केलंय का? त्याचा फायदा होतो का? तेल आपण झोपायच्या आधी लावतो मग हा टॉवेल कधी बांधायचा? किती वेळ?
श्रद्धा , प्लीज पत्ता देशील
श्रद्धा , प्लीज पत्ता देशील का?
आशू, वाफ घेतल्याने तेल
आशू, वाफ घेतल्याने तेल आतपर्यंत नीट मुरतं. कोरडेपणाने जो कोंडा होतो तो कमी होतो. तेलकट केसांमुळे जो चिकट कोंडा होतो त्यासाठी लिंबूरसाचा उपाय आहे.
ते गरम पाण्यात टर्किश टॉवेल बुडवून गुंडाळणे हा वाफ देण्याचाच एक प्रकार आहे. पण (माझ्यामते तरी) अति किचकट... कारण तो टॉवेल गरम पाण्यात बुडवा, मग तो अवजड होणार पाण्याने, तो पिळा, मग डोक्याला गुंडाळून वाफ घ्या, मग तो गार होतो, की पुन्हा गरम पाण्यात बुडवा, पिळा, गुंडाळा आहेच! त्याने मग ते नियमित केले जात नाही. त्यापेक्षा ते छोटे स्टीमर कितीतरी सुटसुटीत.
तसंच, शॅम्पू केल्यावर त्याच ब्रँडचा कंडिशनर लावणे आवश्यक. तुझे केस कोरडे असतील तर, Matrix Biolage hydrating शाम्पू आणि कंडिशनर वापरून बघ. पण हा सॅलोनमध्ये मिळेल, दुकानात मिळणार नाही.
स्वाती,
बेलिझा ब्यूटी सॅलोन,
कोथरुड स्टँडजवळ. कर्वे पुतळ्यावरून कोकण एक्स्प्रेस हॉटेलाच्या दिशेने जाताना जो सिग्नल आहे, तिथे उजवीकडे वळायचे. तिथे दोन गल्ल्या आहेत ('वाय' आकारात). एका गल्लीत 'स्मोकिन' जो'ज'चे पिझ्झ्याचे दुकान आहे. ती गल्ली सोडायची. दुसर्या गल्लीत थोडे पुढे गेले की लगेचच उजव्या हाताच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्याला ते पार्लर दिसते.
कुरळ्या केसांबद्दल कुणालाच
कुरळ्या केसांबद्दल कुणालाच माहीती नाही आहे का?
.
.
रचू, चालेल. दुकानातून जास्वंद
रचू, चालेल. दुकानातून जास्वंद जेल विकत घ्या आणि त्यावर लिहीलेली सगळी माहिती वाचून काढा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील.
धन्यवाद मंजू मला कुठुन ही
धन्यवाद मंजू
मला कुठुन ही ह्या बद्दल माहीती मिळत नव्हती.तुम्ही सांगितल्या प्रमाणे करुन बघेन.
धन्यवाद श्रद्धा.
धन्यवाद श्रद्धा.
रचु, माझे केस कुरळे आहेत. मी
रचु, माझे केस कुरळे आहेत. मी जास्वंद जेल वापरले आहे. अतिशय इफेक्टीव आहे. जरूर वापरा.
मला अजुन एक प्रश्न
मला अजुन एक प्रश्न आहे
<<<<जास्वंद जेल पाण्यात मिक्स करून स्काल्पवर चोळायचं. पूर्ण केसांनाही लावायचं. २० मिनिटं ठेवून नुसत्या पाण्याने किंवा शिकेकाईच्या पाण्याने धुवून टाकायचं. तेल लावायचं नाही.
यामधे मी जनरली आदल्या दिवशी शांपू केलेला असेल तर हे करते. म्हणजे जास्वंद जेलाचा उपयोग जास्त चांगला होतो>>>>>
मी आठवड्यात दोनदा केस धुते.
मग वर नीधप नी जस सांगीतल आहे त्याप्रमाणे मला ४ वेळा केस धुवावे लागतील का?
Pages