Submitted by कमलाकर देसले on 17 August, 2010 - 12:17
मन नाव घनाचे,कधी बरसते खुप
मन उडता कापूर,दरवळणारा धूप...
मन भणंग साधू,तयास नाही गाव
मन फक्त एकटे,विश्वाचा महाराव...
मन चिरंजीव हे,वनवननारा वारा
मन अश्वत्थामा,जयास नाही थारा...
मन बांधविन,बेडीची असते साक्ष
मन मुक्तीविन,मुक्ताचा असतो मोक्ष...
मन शून्यवरती,संख्येचाच आरोप
मन नसते,असतो दोरीवरचा साप...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ही पण छान आहे माऊली. ण साठी
ही पण छान आहे माऊली.
ण साठी शिफ्ट + एन वापरा
छान आहे "मन" असचं आहे स्वछंदि
छान आहे "मन" असचं आहे स्वछंदि
मन शून्यवरती,संख्येचाच
मन शून्यवरती,संख्येचाच आरोप
मन नसते,असतो दोरीवरचा साप...
मस्त !!
मन शून्यवरती,संख्येचाच
मन शून्यवरती,संख्येचाच आरोप
मन नसते,असतो दोरीवरचा साप...
आवडली
अंजली,पार्थ्,अज्ञात्,अमित
अंजली,पार्थ्,अज्ञात्,अमित शतश: आभारी आहे.-कमलाकर देसले
आवडली
आवडली
अष्टाक्षरीचे नियम पाळल्यास
अष्टाक्षरीचे नियम पाळल्यास अधिक छान वाटावी ही रचना! चित्र उत्तमच!
कविता अधिक अस्पष्ट असल्यास अधिक आवडावी.
आपले धुळे जिल्ह्यात कुणी आहे का?
-'बेफिकीर'!
सुर्रेखच ...
सुर्रेखच ...
मन नाव घनाचे,कधी बरसते खुप मन
मन नाव घनाचे,कधी बरसते खुप
मन उडता कापूर,दरवळणारा धूप...<<<
खुप सुन्दर! अतिशय आवडली.