जीवन - ३

Submitted by Deepali_Mali on 11 August, 2010 - 03:22

विनिताचे संपुर्ण नाव समजल्या पासुन स्वाती खुप तुटक वागत होती. विनिता जावेद अली खान हे नावच त्याचे कारण होते. विनिता हे समजत होती पन जोवर स्वाती स्वतः विचारत नाहि तोवर काही नाही ह्या विचाराने ति वागत होती. कोणतीही चुकी नसताना उगाचच कारणे द्या हा स्वभावच मुळात विनिताचा नव्ह्ता.सकाळी कॉलेज, दुपारी ऑफिस, रात्री घर, विनिताचे दिवस ह्या चोकटीत चालले होते. मुंबईत स्वतःला समावुन घेण्याची धड्पड स्वाती उघड्या डोल्यानी पाह्त होती. पन पुठे केलेला मैत्रीचा हात तसाच पुठे ठेवन्यास काचरत होती.
*****************************************************
नेहमी प्रमाणे विनिताचे काम आजही वेळेआगोदर झाले होते. अजुन ऑफिस सुटायला १ तास बाकी होता. विनिताने सवईप्रमाने फिड केलेला डेटा रिचेक करुन अपलोड करण्यात गुंग झाली.

काय स्पिड आहे हिचा सर्वात हुशार, पहिल्या परिक्षेत सेकंड, कामपण आपल्या आगोदर पुर्ण करुन नेहमी बसलेली असते. नाहितर आपण, जेमतेम निघायच्या पाच मिनिटे आगोदर काम पुर्ण, वरुन नोकरी करुन शिकते ह्याचाच तेंभा मिरवत असते. पास क्लास येताना नाकी नऊ.

स्वातीने मानेबरोबर मनातले विचार बाजुला केले व कामाकडे लक्ष केंद्रीत केले.

'स्वाती मॅड्म, विनिता मॅड्म तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलवलय.' ऑफिस बॉयच्या ह्या वर्दीने दोघीही क्षणभर बावरल्या.

'चल'
'अं....., हो चल.' स्वातीने लगेचच केलेलं काम सेव्ह केलं, पी.सी. लॉक केला. आणि विनिता पाठोपाठ चालु लागली.

मॅनेजरची कॅबिन वरच्या मजल्यावर होती. जिन्यावरुन जाताना स्वातीने अचानक विनिताचा हात पकड्ला.
तिच्या हाताला सुट्लेला घाम विनिताला पन जानवला.

'घाबरायला काय झालं?'
'मी? मी कुठे घाबरते?'
'आता निट सांगतेस का?'
'काही नाही. पन भिती वाट्ते.'
'कसली?'
'अचानक मॅनेजरला काय काम ?'
'अग तेच तर बघायचय.'
'तुला भिती नाही वाट्त?'
'त्यात काय घाबरायचं?'
'म्हणजे, आपलं काही चुकलं वैगरै असलं तर?'
'तर काय सॉरी म्हंणायचं आणि पुठे व्हायचं.'

दोघी पन मजल्यावर पोहचल्या. खाली असलेल्या सेकशन पेक्षा वरचा ऑफिसर सेकशन खुप सुंदर आणि टापटिप होता.

त्यांना बघताच तोच मघाचाच ऑफिसबॉय पुठे येऊन त्यांना कॅबिन समोर उभा करुन निघुन गेला.
विनिताने दरवाजावर नॉक केले.
'कम इन......' आतुन आवाज आला तशा दोघींनी दरवाजा ढ्कलुन आत प्रवेश केला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: