मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.
मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.
तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.
३ ईडियट्सच्या विषय म्हणून...
३ ईडियट्सच्या विषय म्हणून... माझे काही निरीक्षणं मी माझ्या ब्लॉग वर टाकलेले. पण इंग्लिश मधे आहे...
http://aeajnabi.blogspot.com/2010/01/idiots.html
एक तूनळीचा प्रचंड मोठा घोळ आहे... नक्की वाचा.
नमूसी, चांगली निरिक्षणं आहेत.
नमूसी, चांगली निरिक्षणं आहेत. पण खरं सांगायचं तर मी ह्या सगळ्याचा विचार न करता निव्वळ टाईमपास म्हणून पिक्चर पाहिला.
हो सायो... पण माझं नेमकं लक्ष
हो सायो... पण माझं नेमकं लक्ष माधवनच्या जन्म-वर्षा कडे गेलं आणि झालं... म्हणून कंपॅरिझन सुरु केलं.
याच्याच पुढे अजुन एक मेजर घोळ
याच्याच पुढे अजुन एक मेजर घोळ आहे, पण तो स्क्रिनशॉट मधिल नसून स्र्किप्ट मधिल आहे.
हा जो एक अस्तो, तो त्या दोघान्ना सिक्रेट उघड न करण्याच्या व कलशाच्या बदली अमिरचा पत्ता देईन असे सान्गतो, पण मग शेवटच्या काही शॉट्स मधे अमिर म्हणजेच वान्गडू असे समजल्यावर हे दोघे अतिआश्चर्यदेखिल व्यक्त करतात, ते का? या एकाने अमिरचा पत्ता त्याच्या खर्या नावाशिवाय दिला होता का?
लिंबु मानल बर का तुम्हाला. काल पुन्हा थ्री ईडियट पहाण्याचा योग आला आणी पटल.
अजुन एक छोटासा घोळ आहे. मला नक्की खात्री नाही. टेबल टेनीस च्या टेबलवर मोना सिंग असताना चक्क अमिरखान तिला पुनम न म्हणता " मोना कमऑन पुश " अस म्हणतो. रेकॉर्डिंग बरोबर नसल्याने माझी ही शंका आहे.
दिल अपना और प्रीत पराई या
दिल अपना और प्रीत पराई या सिनेमाच्या शेवटी नादीरा नर्सचा ड्रेस घातलेल्या मीनाकुमारीला कार मध्ये घालून नेते आणि रस्त्यावरून थेट उंच कड्यावरून खालिल नदीत ती कार (स्वत: आणि मीनासकट) झोकून देते. राजकुमारला हे कळतं, तो मीनाकुमारीला पाण्यातून वाचवून वर काढतो तेव्हा तिच्या अंगावर नर्सच्या ड्रेसऐवजी चक्क साडी दाखवली आहे.
परवा "वन्स अपॉन अ...."
परवा "वन्स अपॉन अ...." पाहीला. त्यात कंगणा आणि अजय हॉटेलात बसलेले असताना कंगना तिच्या एका चाहत्याला "हजार"च्या नोटवर ऑटोग्राफ देते. मुळात चित्रपटातला काळ ७०-८० च्या दशकातला आहे. तेव्हा "हजार"च्या नोटा होत्या का???
"वन्स अपॉन अ...." पाहीला यात
"वन्स अपॉन अ...." पाहीला यात असे दाखवलएले कि सुल्तान मिर्झा म्हणजेच अजय देवगण हा लहानपणी मद्रास मधून मुम्बईत येतो तेन्वा त्याचे वय साधारणतः १० असते पण तो अस्लखित हिन्दी बोलतो जे कि थोड खटकते , पुढे जेन्व्हा कन्गणा व अजय देवगन भेटतात तेन्व्हा दोघेहि तरुण असतात आणि ईमरान हाश्मी लहान दाखवलेला पण नन्तर फक्त हाश्मीच मोठा झालेला दाखवला आहे आणि अजय व कन्गणा तसेच तरुण असतात त्यन्च्यात काहीच बदल दाखवलेला नाही..तसेच चित्रपटाची सुरुवात ९० च्या बॉम्ब स्फोटाने होते पण शेवट ७० च्याच दशकाचा दाखवला आहे.
अमित, पुर्वीहि आपल्याकडे १०००
अमित, पुर्वीहि आपल्याकडे १००० रुपयांच्या नोटा होत्या. पण अनेक लोकांनी, त्या रुपयांच्या
स्वरुपात, आपला काळा पैसा साठवल्याने, सरकारने एके दिवशी अचानक त्या रद्द केल्या.
ज्यांच्याकडे त्या नोटा होत्या, त्यांनी बॅंकेत जाऊन, त्या बदलून घ्याव्यात, असे सांगण्यात
आले. त्यावेळी त्या लोकांना आपल्याकडे, ती नोट कशी आली, याचा खुलासा करावा लागला.
माझ्या आठवणीप्रमाणे त्या नोटा निळ्या, हिरव्या रंगाच्या होत्या. हे नेमके कधी झाले, ते
आठवत नाही. बघायला पाहिजे हा सिनेमा, कदाचित आणखी काहि लक्षात येईल.
थ्री इडियटस मधे जर एक्दाच
थ्री इडियटस मधे जर एक्दाच फरहान आणी राजू नी कॉलेज रेकॉर्ड तपासले असते तर १० वर्श आधीच नसते का शिमल्यात पोचले??????
धन्यवाद दिनेशदादा योग्य
धन्यवाद दिनेशदादा
योग्य माहीती पुरवल्याबद्दल....
kalyani.gaurav | 2 August,
kalyani.gaurav | 2 August, 2010 - 05:00 नवीन
थ्री इडियटस मधे जर एक्दाच फरहान आणी राजू नी कॉलेज रेकॉर्ड तपासले असते तर १० वर्श आधीच नसते का शिमल्यात पोचले??????
हे ही बरोबर कारण सोकॉल्ड रॅन्चोच्या वडीलांचे मासि़क उत्पन्नासकट सर्व गोष्टी रेकॉर्ड्ला होत्या. पण सहसा कॉलेज असे रेकॉर्ड कुणालाही देत नाही.
>>>टेबल टेनीस च्या टेबलवर
>>>टेबल टेनीस च्या टेबलवर मोना सिंग असताना चक्क अमिरखान तिला पुनम न म्हणता " मोना कमऑन पुश " अस म्हणतो.>>>> नितिन, पिक्चरमध्ये तिचं नाव मोनाच आहे. जेव्हा ती वायरस ला हाक मारते तेव्हा तो ही वळून तिला 'मोनाच' म्हणतो, पूनम नव्हे.
हे कोणी आधीच पोस्ट केलं असेल
हे कोणी आधीच पोस्ट केलं असेल तर कल्पना नाही. मी ह्या बीबीवरचे सगळे पोस्टस वाचले नाहियेत अजून.
काल "पडोसन" मधलं "कहना है कहना है" पहात होते. त्यात सायराबानूच्या मैत्रिणीचा पदर खांद्याच्या जेमतेम खाली येईल इतका तोकडा आहे. मग ती सायराबानूला खेचत खेचत घेऊन जिन्यावरून खाली उतरते तेव्हा तो कमरेपर्यंतच्या लांबीचा असतो. मग घराबाहेर पडते तेव्हा खांद्याभोवती गुंडाळलेला असतो (बहुतेक तोपर्यंत त्याची लांबी पायापर्यंत पोचली असावी त्यामुळे त्यात अडकून पडू नये म्हणून तिने गुंडाळून घेतला असेल!). शेवटी ते सुनिल दत्तच्या घरात पोचतात तेव्हा पदराची लांबी परत पूर्ववत म्हणजे खांद्याच्या जेमतेम खाली येईल इतकी झालेली असते. मारुतीच्या शेपटीप्रमाणे "वाढता वाढता वाढे" होणारा आणि मग परत छोटा होणारा हा पदर पाहून मजा वाटली.
नितीनचिंचवड.... मान्य......
नितीनचिंचवड.... मान्य...... पण व्हायरसच्या ऑफिस ची ड्युप्लीकेट चावी आणून देणा-या त्याच्या लेकीचं काय??????????????? :))
>>अजुन एक छोटासा घोळ आहे. मला
>>अजुन एक छोटासा घोळ आहे. मला नक्की खात्री नाही. टेबल टेनीस च्या टेबलवर मोना सिंग असताना चक्क अमिरखान तिला पुनम न म्हणता " मोना कमऑन पुश " अस म्हणतो. रेकॉर्डिंग बरोबर नसल्याने माझी ही शंका आह>><<
एका ठिकाणी मीही तिचे नाव पूनम असे ऐकले. पण नंतर तिला सर्वजण मोना म्हणत होते म्हणून मला वाटले की माझा ऐकण्यात घोळ झाला.
थ्री इडियट्स मध्ये माझ्या मते
थ्री इडियट्स मध्ये माझ्या मते जावेद जाफरी जेव्हा आमिर खानचा पत्ता देतो तेव्हा आमिरचं (लहानपणचं) टोपण नाव सांगतो आणि जेव्हा हे सगळे त्या पत्त्यावर पोचतात तेव्हा या तिघांना तो चहावाला मुलगा (सेंटीमीटर का फुटपट्टी :अओ:) तो ओळखतो त्यामुळे त्यांना ते नाव घ्यावं लागत नाही. हे माझ्या निरिक्षणानुसार..
जाणकार अधिक प्रकाश टाकतीलंच..
दक्षिणा, बरोबर आहे. जावेद
दक्षिणा, बरोबर आहे. जावेद जाफरी 'छोटे' म्हणून उल्लेख करतो आमिर खानचा. आणि पत्त्यावर पोचल्यावर 'सेंटीमीटर' ह्यांना बघतो आणि घेऊन जातो.
दक्षिणा, सायो, अगदी बरोबर
दक्षिणा, सायो, अगदी बरोबर बोललात
त्याच्या नावाच्या बाबतीत एक छोटसा जोक पण आहे जेव्हा हे तिघे जण रँचोच्या शाळेत पोहचतात....
त्यातुनच कळ्तेकी त्यांना फक्त आमीरचे छोटे हे नाव ठाऊक आहे.....
दक्षिणा <<<< दिल अपना और
दक्षिणा <<<< दिल अपना और प्रीत पराई या सिनेमाच्या शेवटी नादीरा नर्सचा ड्रेस घातलेल्या मीनाकुमारीला कार मध्ये घालून नेते आणि रस्त्यावरून थेट उंच कड्यावरून खालिल नदीत ती कार (स्वत: आणि मीनासकट) झोकून देते. राजकुमारला हे कळतं, तो मीनाकुमारीला पाण्यातून वाचवून वर काढतो तेव्हा तिच्या अंगावर नर्सच्या ड्रेसऐवजी चक्क साडी दाखवली आहे.>>>>>
<<<<थ्री इडियट्स मध्ये माझ्या मते जावेद जाफरी जेव्हा आमिर खानचा पत्ता देतो तेव्हा आमिरचं (लहानपणचं) टोपण नाव सांगतो आणि जेव्हा हे सगळे त्या पत्त्यावर पोचतात तेव्हा या तिघांना तो चहावाला मुलगा (सेंटीमीटर का फुटपट्टी ) तो ओळखतो त्यामुळे त्यांना ते नाव घ्यावं लागत नाही. हे माझ्या निरिक्षणानुसार..जाणकार अधिक प्रकाश टाकतीलंच.. >>>>
स्वप्ना_राज <<<< काल "पडोसन" मधलं "कहना है कहना है" पहात होते. त्यात सायराबानूच्या मैत्रिणीचा पदर खांद्याच्या जेमतेम खाली येईल इतका तोकडा आहे. मग ती सायराबानूला खेचत खेचत घेऊन जिन्यावरून खाली उतरते तेव्हा तो कमरेपर्यंतच्या लांबीचा असतो. मग घराबाहेर पडते तेव्हा खांद्याभोवती गुंडाळलेला असतो (बहुतेक तोपर्यंत त्याची लांबी पायापर्यंत पोचली असावी त्यामुळे त्यात अडकून पडू नये म्हणून तिने गुंडाळून घेतला असेल!). शेवटी ते सुनिल दत्तच्या घरात पोचतात तेव्हा पदराची लांबी परत पूर्ववत म्हणजे खांद्याच्या जेमतेम खाली येईल इतकी झालेली असते. मारुतीच्या शेपटीप्रमाणे "वाढता वाढता वाढे" होणारा आणि मग परत छोटा होणारा हा पदर पाहून मजा वाटली. >>>>
वाह, वाह! सूक्ष्म आणि योग्य निरिक्षणे!!!
>>> कहना है, कहना है--. आज
>>> कहना है, कहना है--. आज तुमसे पहली बार.... तुमही तो लायी हो जीवन मे मेरे, प्यार प्यार प्यार....
http://www.youtube.com/watch?v=hBbsRCqxYWw
कोण म्हटलेलं ते, ह्यात सायरा बानु च्या मैत्रीणीचा पदर आधी तोकडा, जीना उतरताना लांबलचक आणि मग जीना
बरोब्बर आहे की 
चढल्यावर परत तोकडा?
काल परत एकदा ३ इडियटस पहाताना
काल परत एकदा ३ इडियटस पहाताना लक्षात आलं की पहिल्यांदा जेव्हा आमिर खान करिनाला तिच्या मोथ्या बहिणीच्या लग्नात भेटतो तेव्हा तिचा जो पिंक शरारा आहे त्याचा दुपट्टा कलाकुसर केलेला आहे आणि तोच शरारा तिने जेव्हा 'झुबी, डुबी' त घातलाय तेव्हा तिचा दुपट्टा प्लेन पिंक आहे.
दक्षिणा, दिल अपना च्या
दक्षिणा, दिल अपना च्या शेवटच्या सीनमधे आधी फार धूसर दिसते. म्हणजे राजकुमारच्या हातात नादीरा आने का मीनाकुमारी आहे ते कळत नाही. त्यावेळी मी खूप लहान होतो, आणि आईला विचारल्याचे आठवतेय.
उजेडात बघितल्यावर जर त्याला कळले, कि त्याने उचलून आणलीय ती मीनाकुमारी नसून नादीरा आहे, तर तो तिला परत पाण्यात टाकून देईल का ?
उजेडात बघितल्यावर जर त्याला
उजेडात बघितल्यावर जर त्याला कळले, कि त्याने उचलून आणलीय ती मीनाकुमारी नसून नादीरा आहे, तर तो तिला परत पाण्यात टाकून देईल का ? >>>> दिनेशदा, अशक्य हसले!

अहो ऋयाम >>> कहना है, कहना
अहो ऋयाम
>>> कहना है, कहना है--. आज तुमसे पहली बार.... तुमही तो लायी हो जीवन मे मेरे, प्यार प्यार प्यार....
http://www.youtube.com/watch?v=hBbsRCqxYWw
कोण म्हटलेलं ते, ह्यात सायरा बानु च्या मैत्रीणीचा पदर आधी तोकडा, जीना उतरताना लांबलचक आणि मग जीना
चढल्यावर परत तोकडा? बरोब्बर आहे की ....>>>>>>>
खरंच तर आहे...तिचा पदर आधी तोकडा, जीना उतरताना लांबलचक आणि मग जीना चढल्यावर परत तोकडा होतो.
रचु. मला तेच म्हणायचं आहे. की
रचु.
मला तेच म्हणायचं आहे. की कसं अचुक ओळखलंत. लिहीण्यात चुक झाली.
दिनेश त्याला काय, कोणतीही एक
दिनेश
त्याला काय, कोणतीही एक मिळाल्याशी कारण नै का? 
>>दिनेश फिदीफिदी त्याला काय,
>>दिनेश फिदीफिदी त्याला काय, कोणतीही एक मिळाल्याशी कारण नै का? फिदीफिदी
कैच्याकै दक्षे, कंपलसरी प्रश्न नावाचा काही प्रकार असतो म्हटलं
निंबुडा , त्या साम मराठी
निंबुडा , त्या साम मराठी वरच्या कार्यक्रमात एका arnold schwarzenegger च्या सिनेमातला एक असा सीन दाखवला होता. सिनेमाचे नाव आठवत नाहिये >>>> नाव कमान्डो..
नाव कमान्डो.. >>> धन्स,
नाव कमान्डो.. >>> धन्स, स्मितहास्य
गेल्या विकांताला प्रीडेटर (२०१०) पाहिला. त्यातला जापानी अॅक्टर Louis Ozawa Changchien हा जंगलातून चालताना पायातले बूट काढून टाकतो (मे बी पावलांचा आवाज होऊ नये म्हणून). सिनेमाच्या सुरुवातीलाच्या काही मिनिटांतच हा सीन आहे. नंतर सगळेजण समूहाने जंगलात भटकत असताना प्रत्येकाच्या पायात बूट आहेत. या जपान्याच्या पायात आहेत की नाही हे वारंवार उत्सुकतेने पाहण्याचा प्रयत्न केला, पण काही थांगपत्ता नाही लागला.
पण त्या काटेरी जंगलात हा एकटाच बिना बुटांचा फिरू शकणार नाही हे तर नक्की. पण मग त्याने बूट कधी घातले? कॅमेर्याच्या मागे जाऊन असतील घातले. असे आपले मीच माझे समाधान करून घेतले.
३ इडियटस मधला अजुन एक goof up
३ इडियटस मधला अजुन एक goof up आठवतोय.
माधवन आणि शर्मन यांना न सांगता आमिर कॉलेजमधुन शेवटच्या दिवशी निघुन जातो आणि त्यानंतर ५ वर्षे त्यांना आमिरचा ठावठिकाणा माहीत नसतो.
चतुर आमिर बरोबर पैज लावतो, १० वर्षांनंतर त्या ठराविक ठिकाणी भेटण्याची. पण ५ वर्षांतच येतो पैज पुर्ण करायला!!! असं कसं??
Pages