Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
>>निदान आज तरी मला धोनी खास
>>निदान आज तरी मला धोनी खास प्रेरणादायी वाटला नाही.
अगदी. मला तर तो पहिल्याच कसोटीपासून थोडा बुजल्यागत वाटतोय. मी एक निश्चीत म्हणेन की धोणी चा फलंदाजीतील क्रम चुकतोय/चुकलाय. तो एक निश्चीतच कणखर फलंदाज आहे. प्रतिहल्ला चढवून परिस्थिती स्वताला पुरक बनवण्याची विलक्षण क्षमता त्याच्याकडे आहे. सेहवाग प्रमाणेच जर तो थोडा वेळ खेळून सेट झाला तर भल्या भल्यांची पिसं ऊडवायची ताकत अन मानसिकता त्याच्या बॅट मध्ये आहे. पण होतय की काय की बरेच वेळा तो सातव्या क्र. येतो तेव्हा एकतर आधीचा साथिदार लवकर बाद होतो/झालेला असतो किंवा निव्वळ शेपूट घेवून त्याला दबावाखाली खेळावे लागते. पुन्हा सेहवाग पासून रैना पर्यंत सर्व जागा तशा सेट असल्याने धोणी वर कुठल्या क्र. वर येवू शकेल हे मलाही समजत नाही पण तो पाचव्या क्र. वर खेळला तर मला वाटतं वैयक्तीक त्याला अन संघाला बराच फायदा होईल. द्र्वैड, लक्षमण कसोटी खेळत आहेत तोपर्यंत आणि आता रैनाचे नव्याने कसोटी संघात मधल्या फळीत स्थान निश्चीत झाल्याने हा पेच लवकर सुटेल असे वाटत नाही. पण भविष्याचा विचार करता लक्षमण्/द्रविड पैकी एकाला बसवला तर हा पेच सुटेल. एकाला तरी बसवायलाच हवाय कारण दोघेही निव्वळ फलंदाज म्हणून आहेत, खेळले तरच वसूल. द्रविड च तंत्र, क्षेत्ररक्षण थोडं अधिक उजवं आहे, तेव्हा लक्षमण ला vrs द्यावी.
त्या बदल्यात अजून एखादा गोलंदाज घ्यावा- भज्जी आहेच. सेहवाग, रैना हे नक्कीच वेळ पडली तर गोलंदाजी करू शकतात, विकेटही घेवू शकतात. असो.
>>>योगजी, हे स्वाभाविक आहे कारण क्रिकेट हा फक्त शारिरीक नव्हे तर मानसिक खेळ पण आहे व त्यात डावपेचाना प्रचंड वाव आहे.
अगदी मनातलं बोललात भाऊ. मला वैयक्तीक म्हणूनच सन्नी भाय सर्वात श्रेष्ठ समालोचक वाटतो. कारण फलंदाज का बाद झाला किंव्वा चेंडू कसा खेळायला हवा होता हे मागाहून सांगणारे अनेक महाभाग भेटतील पण पुढील डावपेच नेमके काय असावेत- म्हणजे अगदी कुठल्या फलंदाजासाठी कुठली क्षेत्ररचना, एखादा अवघड चेंडू नेमका कसा खेळावा, एखाद्या धोकादायक खेळपट्टीवर नेमके कसे ऊभे रहावे, पुढे काय घडू शकते हे सन्नीभाय ईतके अचूक सांगतो की तसे न केल्यास त्याचे दुष्परिणाम लगेच त्याच सामन्यात पहायला मिळतात.
अजूनही तीनही सामन्यात विजयासाठी हपापलेले भारतीय खेळाडू दिसलेच नाहीत. ऊद्या दिसतील अशी आशा आहे.
*****************************************************
टेन स्पोर्ट्स च्या मेहेरबानीने चारू शर्मा चं क्रिकेट चं ज्ञान रोज कानी पडलं. महान विनोदी म्हणावा तर सिध्धूच्या नखाची सर नाही, थेट निर्बुध्ध म्हणावा तर लक्षमण शिवरामक्रिश्णन सारखा स्थितप्रज्ञही वाटत नाही. तेव्हा या प्राण्याची पुन्हा भेट होणार नाही अशी आशा करतो. मंदीरा बेदी बरी होती का? मी तीला ऐकलं नाहीये. पण चारू शर्मा पेक्षा टीव्ही च्या पडद्यावर बर्याच जणांना ती सुस्वरूप निश्चीत वाटली असेल असा अंदाज आहे.
*****************************************************
लंकेच्या फिरकीपुढे आपली एकंदर फलंदाजी पाहून मला एका गोष्टिचं फार आश्चर्य वाटतय की पूर्वी जसे रवी शास्त्री, प्रविण आमरे, अझरूद्दीन हे खेळाडू फूटवर्क चा ऊत्कृष्ट वापर करत, बरेच वेळा क्रीज च्या बाहेर येवून चेंडू खेळत असत, तसे आपल्यातील कुठलेच फलंदाज मुद्दांमून करताना पाहिले नाही.
पहिल्या एका तासात ३ विकेट्स.
पहिल्या एका तासात ३ विकेट्स. सन्गा आणि महेला दोघे ही आउट.. सन्गा खुपच अनलकी..
काय चाललय>> बर चाललय. योग ,
काय चाललय>> बर चाललय.
योग , तुम्ही छान लिहिता.
स्पिन खेळण्यात रवी शास्त्री व प्रविण आम्रे च्या पुढे कितीतरी नावे आहेत. सगळ्यात पुढे अर्थातच तुमचा आवडता कॉमेंट्रेटर सन्नीभाय. अगदी कंन्ट्री वाइड क्लास रूम असायची.
अजुन २ गेले विक्रम३११
अजुन २ गेले
विक्रम३११
हे सिद्धार्थ वेट्टिमुनी मराठी
हे सिद्धार्थ वेट्टिमुनी मराठी शिकले का?
वैद्यकीय सल्ला धुडकावून सचिन मैदानावर.
http://cricketnext.in.com/news/tendulkar-ignored-medical-advice/33932-13...
गांगुली हा फिरकी खेळणारा अलीकडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असे गावसकर म्हणायचे ना?
<<पूर्वी जसे रवी शास्त्री,
<<पूर्वी जसे रवी शास्त्री, प्रविण आमरे, अझरूद्दीन हे खेळाडू फूटवर्क चा ऊत्कृष्ट वापर करत, बरेच वेळा क्रीज च्या बाहेर येवून चेंडू खेळत असत,>> मयेकरजीनी म्हटल्याप्रमाणे गांगुली... व सिद्धू पण ! योगजी, पुढे येऊन खेळायला दर्जेदार फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या सरावाने आलेला आत्मविश्वास लागतो [ नाहीतर ती नुसतीच हाराकिरी होते ]; भारतात असा सराव मिळावा असे सध्या किती दर्जेदार फिरकीबहाद्दर आहेत ?
फिरकीची आज भारताला साथ मिळतेय तेव्हां उगीचच आपण आज तरी फिरकीबद्दल जास्त नको बोलुया !
क्रिकेट सामन्याचे स्क्रिप्ट
क्रिकेट सामन्याचे स्क्रिप्ट लिहिता येत नाही हेच खरे.
धोनीच्या यशात नशिबाचा वाटा किती; संघातील ज्येष्ठ खेळाडूंच्या चांगल्या खेळाचा वाटा किती आणि कप्तानगिरीचा किती? यशाने तो हुरळून जात नाही तसाच पराभवाने खचूनही जात नाही हे नक्की. पाय जमिनीवर घट्ट.
गेली आठवी विकेट पण गेली...
गेली आठवी विकेट पण गेली... चला अता समरवीराने नांगर टाकायला नको.. नाहीतर मग होईल परत राडा...
आणि दुसरा पाऊस.. त्याची शक्यत वाढायला लागली आहे...
विकेट खराब असेल तर आपल्याला
विकेट खराब असेल तर आपल्याला २०० अवघड जातील. इथे चौथ्या इनिंग चा विनिंग स्कोअर १७१ का काहितरी आहे.
अर्थात विरू हे असल काही वाचत नाही. नाहीतर साहेब, द्रविड, लक्ष्मण, सगळ्यांचा कस लागेल.
सामना अजूनही संपलेला
सामना अजूनही संपलेला नाही..
लंकेने १५०+ ची आघाडी घेतली तरी ती पार करणे या खेळपट्टीवर सोपे नाहीये. पुन्हा एकदा विरू ची विकेट्/खेळी महत्वाची ठरेल असे वाटते.
पुन्हा एकदा ९७/७ वरून लंकेचे १५०+ झाले तर शेपूट गुंडाळता न येण्याचा रोग आपल्याला महागात पडू शकतो.
मी कालच्या पोस्ट मध्ये लिहीले तसे आता ऊपहारानंतर नेमकी खेळपट्टी कोरडी होत होईल. तेव्हाच जुन्या चेंडूवर लंकेला गुंडाळले तर आपल्या फलंदाजांना फायदा होईल अन्यथा लंकेचे शेपूट पुन्हा तग धरू शकते. जसे सापळे अन दबाव वरच्या फलंदाजांकरता रचला गेला तेच शेपटासाठीही करायला हवे- पण धोणी ने चक्क डीफेंसीव क्षेत्ररक्षण लावले आहे? अनाकलनीय!
****************************************************
विरू ने दुसर्या डावात ५०+ केले तर त्याला फियाट लिनिवा मिळू शकेल?
>>स्पिन खेळण्यात रवी शास्त्री
>>स्पिन खेळण्यात रवी शास्त्री व प्रविण आम्रे च्या पुढे कितीतरी नावे आहेत. सगळ्यात पुढे अर्थातच तुमचा आवडता कॉमेंट्रेटर सन्नीभाय. अगदी कंन्ट्री वाइड क्लास रूम असायची.>>
नाही. स्पिन ला खेळणारा बादशाह माझ्या मते विशी (गुंडप्पा विश्वनाथ) आहे. सन्नीभाय हा वेगवान तोफखान्याला खेळणारा शहेंशहा होता.
गांगुली फिरकी ला उत्क्रूष्ट खेळायचा त्यात बरेच वेळा तो बाहेर येवून चेंडू मारत असे हे मुख्ख्य कारण आहे. त्याच दृष्टीकोनातून मी शास्त्री अन आमरे चे नाव घेतले. अर्थातच ईतरही नावे आहेत.
ऊपाहारानंतर चाम्गली ठणठणीत
ऊपाहारानंतर चाम्गली ठणठणीत कोरडी वाटतीये खेळपट्टी. बाउंस देखिल व्यवस्थित आहे.
धोणी ने ईतके बचावात्मक क्षेत्ररक्षण का लावले आहे? परनवितानाला ५० करू द्यायचे आहेत बहुतेक. लेग साईड ला फलंदाजाजवळ एकही क्षेत्ररक्षक नाही. काय गेम प्लॅन आहे? अनाकलनीय!!!!!
लंकेचे खेळाडू आतातायीपणा न करता आत्मघाती फटके न मारता खेळले तर आरामात २०० करू शकतील असे मला वाटते- खेळपट्टी आता अगदी सहज सुलभ खेळत आहे. धोणी ने आक्रमक क्षेत्ररचनाच करायला हवी. चहापानापर्यंत या खेळपट्टीवर आरामात १००+ धावा निघू शकतात...
सामन हातून निसटत चाललाय...
२०० हून अधिक धावांचा पाठलाग
२०० हून अधिक धावांचा पाठलाग सुद्धा शक्य आहे. आपल्याला आता दिवस संपेपर्यंत कोरडी खेळपट्टी मिळेल. काही कळायच्या आतच सेहवाग बदाबदा धावा काढेल. एक बाजू लावून धरायला सचिन, द्रविड, लक्ष्मण, मुरली विजय व धोनी आहेतच. रैनासुद्धा भरात आहे.
योग >> नाही. स्पिन सर्वात
योग >> नाही. स्पिन सर्वात उत्क्रुष्ठ खेळणारा सुनिलच होता. त्याची शेवटची पाकिस्तान विरूद्धची इनिंग (बंगलोरला टर्निंग विकेट वर चौथ्या डावात ९६) हे त्याचे उत्तम उदाहरण. पाटा विकेटवर शास्त्रीच काय युवराज सुद्धा पुढे येऊन मारतो. (५० ओव्हर मधे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असताना)
पदलालित्य दाखवून पुढे येउन मारणार्या भारतीय फलंदाजात मी सिद्धू, कांबळी यांची नावे घेइन. गांगुली होताच.
हो आणि एक राहिलाच. कर्नल दिलिप . ७५ च्या इराणी ट्रॉफीच्या एकाच सामन्याने या डेब्यू करणार्या जवानाचे आयुष्य बदलले. त्यावेळेस टॉप फॉर्म मधे असणार्या बेदी, प्रसन्ना ला पुढे येऊन फोडुन काढ्लेन व घणाघाती ११० रन्स काढल्या. डायरेक्ट भारतीय टीम मधे. मला कॉमेंट्री ऐकल्याचे आठवतेय.
तशी आठ्वण आलिच आहे तर कपिल, संदीप, ब्रिजेश ची ही नावे आवश्यकच.
विश्वनाथ चे कट्स आणि स्क्वेयर ड्राइव जास्ती करून फास्ट बॉलर विरूद्ध प्रसिद्ध होते.
यासगळ्यांची पुण्याइ आता या शेवटच्या डावात लागणारच आपल्याला. २०० चे लीड
>>आपल्याला आता दिवस
>>आपल्याला आता दिवस संपेपर्यंत कोरडी खेळपट्टी मिळेल
अहो, तसं नसतं भाऊ.
खेळपट्टी खराब होत जाईल... चहापानानंतर नेहेमीच बर्याच विकेट्स पडल्या आहेत यातच काय ते आलं.
सकाळची १५-२० षटकं, चहापानानंतरची १५ षटके सर्वात धोकादायक असतात. ती खेळून काढली की सर्व चित्र पालटतं.
धोणीचा मेंदू पण बहुतेक हनिमून मोड मध्ये आहे..
९७/७ असताना किंवा १२०/८ लंकेचे असताना, फलंदाजाभोवती अन जवळ ६-७ क्षेत्ररक्षक लावून दबाव आणणे, किमान धावा रोखणे ईतके केले असते तरी लंकेचा डाव लवकर संपला असता. ८ गडी बाद झाल्यावर लावलेली क्षेत्ररचना अनाकलनीयच नव्हे तर निव्वळ over complacency दर्शवते.
माझ्या मते- चहापानानंतर अजूनही एक तास लंका खेळेल, कदाचित त्या वेळात त्यांचा डाव संपेल पण मग २५० पर्यंत आघाडी झालेली असेल.
आणि त्यानंतर भारताच्या १-२ विकेट्स जाण्याची शक्यता जास्त आहे.
लक्षात घ्या "आजच्या दिवसात" लंकेचे फक्त ३ फलंदाज (माहेला, रणदीव, प्रसन्न) हे चांगल्या गोलंदाजीवर (फिरकीला पोषक खेळपट्टी) बाद झालेत.. ईतर एकतर सापळ्यात फसले किंव्वा सकारात्मक खेळताना बाद झालेत. कालही ऊपाहारानंतर परणविताना, दिलशान हे चांगल्या चेंडूवर (पुन्हा एकदा फिरकीला पोषक खेळपट्टी) बाद झाले होते.
२५०+ ची आघाडी असेल तर भारतावर प्रचंड दडपण येणार हे निश्चीत. सेहवाग दर वेळी खेळेलच असे नाही. द्रविड, साहेब यांवर दुसर्या डावात आपली मदार असेल!!!
*****************************************************
लंकेच्या बाजूने कुणी बेट लावताय काय?
लंकेच्या बाजूने बेट लावायला
लंकेच्या बाजूने बेट लावायला खरे तर हरकत नाहीये.. जर २५० चा लीड झाला तर नक्कीच लावता येईल.. मलिंगा आणि मेंडींस तयारच आहेत अशक्य पद्धतीत बॉलिंग करायला..
गडबड झाल की वो. आता द्येव,
गडबड झाल की वो. आता द्येव, ह्यो नायत त्यो.
पर आमी खर फ्यान बगा, आपच पैस इन्ड्यावरच..
उद्या हरायची तयारी ठेवून
उद्या हरायची तयारी ठेवून बघा....कदाचित इशांत शर्मा आणि मिथुन जिंकून देतील.
वर संगाला(बॅटिंग) अनलकी का म्हटलेय? च्या विकेटसाठी समालोचक तर छान सापळा लावला, चांगले फील्ड प्लेसिंग असे कौतुक करताहेत.
धोनीचा आपल्या गोलंदाजांवर जराही विश्वास नाही का? नसेल तर निदान तसे दाखवू तरी नये त्याने. ४ नवख्या गोलंदाजांनी २० बळी घेतले सामन्यात.
भारत दिवसाखेर ५३/३... माझ्या
भारत दिवसाखेर ५३/३...
माझ्या मते ५३/२ चाललं असतं. अपेक्षित होतं.
पुन्हा एकदा थोडी कल्पकता वेगळेपण दाखवता आलं असतं. फक्त आज सेहवाग च्या जागी सचिन ला ओपन करायला पाठवायला हवं होत. याचं कारण सेहवाग प्रचंड दमलेला होता (गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) अन सचिन ला ओपन करणे हे काही नविन नाही. आजच्या आपल्या डावाची गरज सेहवागची फटकेबाजी नाही तर एकही गडी बाद न करता ऊभे रहाणे ही होती. या खेळपट्टीवर ऊभे राहिलात तर आरामात धावा होतात हे मेंडीस ने चार तास दाखवून दिलं. सेहवाग बाद झालेला चेंडू छान होताच पण तोएका दमलेल्या फलंदाजाचा पुश वाटला.
द्रविड ची कसोटी कारकीर्द संपली असा वाद आता चालू होईल. कारण आहे तीन सामने/सहा डाव निव्वळ १०० पेक्षा कमी धावा, त्यातही पहिल्या दोन्ही सामन्यात खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल होती. द्रविड च्या तंत्राबद्दल काहिच शंका नाही. पण एक गोष्ट दुर्दैवाने नमूड कराविशी वाटते की सुराज रणदीव सारख्या फिरकी गोलंदाजला विशेषतः या खेळपट्टीवर मागे खेळणे आणि फ्रंट फूटवर न खेळाने हे निव्वळ आत्मघाती आहे हे द्रविड सरख्या महान अन अनुभवी फलंदाजाला कळू नये? तेही आधीच्या सामन्यात रण्दीव ला बॅकफूट वर पायचित झालेले असताना???? i am lost for words... मला गोची द्रविड च्या मानसिकतेमध्ये वाटते आहे, तंत्रात नव्हे.
विजय बाद झाला तरी तो झेल महेला ने क्लिन पकडला आहे का नाही हे रिप्ले वरून नीट कळत नव्हते. तरिही पुन्हा एकदा, विजय ने तीच चूक केली जी द्रविड ने- सुराज ला मागे खेळणे. सूराज अन कुंबळे मध्ये याअर्थी साम्य आहे की दोघांचे चेंडू ऊंचावरून येतात, वेगात येतात, फक्त सूराज ऑफ स्पिन करतो. तेव्हा जसे कुंबळेला बॅक फूट वर खेळणारे फलंदाज बहुतांशी पायचीत कींव्वा झेलबाद झाले तसेच सूराज च्या बाबतीत होते. तात्पर्य- सूराज ला फ्रंट्फूट वर खेळणे.
आज सचिन सुराज ला चक्क चार पावले बाहेर येवून खेळत होता हे कुणाच्या लक्षात आले का? सचिन हा म्हणूनच महान फलंदाज आहे कारण सन्नीभाय सारखा तो खेळपट्टी अन गोलंदाजानुसार आपला खेळ बदलतो/सुधारतो. म्हणूनच आपल्या विजयाचा (?) शिल्पकार ऊद्या तोच ठरू शकतो. ऊद्या सचिन चे शतक अन भारताचा विजय- यासारखा दुग्धशर्करा योग नाही. साहेब वाचताय का?
पुन्हा एकदा स्टेटींग द ऑबव्हियसः ऊद्या पहिले १०-१५ षटके महत्वाची. साहेब टिकले आणि हा एक तास खेळून काढला (ईशांत ची विकेट जावू शकते) तर सचिन शतक करेल यात मला तीळमात्र शंका नाही. कारण खेळपट्टी अजूनही अतीशय चांगली आहे. फक्त ही खेळपट्टी दुहेरी स्वभावाची आहे- नविन चेंडू पहिली १५ षटके (शिवाय दर दिवशी सकाळी पहिला तास) खेळपट्टी जलद आणि फिरकी गोलंदाजीला पोषक ठरते- मग साधारण २५-८०+ षटके ती फलंदाजीला अनुकूल असते. चेंडू ८०+ जुना झाल्यावर पुन्हा खेळपट्टीवरून चेंडू वळू लागतो, ऊसळू लागतो. त्यामूळे ऊद्या पहिली १५ षटके खेळून काढली तर गड आपला आहे.
अजंथा मेंडीस च्या फलंदाजीचे कौतूक करावे तितके कमी आहे. he proved that if you have the positive attitude, ready to spend time in the middle, and willing to play to the merit of the ball you can score runs at will on this pitch.. something our batsmen can take lessons from for tomorrows batting.
*****************************************************
आय्सीसी चा नियम तपासून पाहिला पाहीजे. विजय चा महेला ने घेतलेला झेल रिप्ले मधे निर्णायक वाटत
नव्हता. अशा वेळी एकदा मैदानावरील पंचाने इसर्या पंचाला विडीयो रिप्ले पाहून निर्णय द्याय्ची विनंती केली आणि तीसर्या पंचाला निर्णय देता येत नसेल तर मैदानावरील पंच निर्णय देवू शकतो का? का संशयाचा फायदा फलंदाजला दिला जावा , जो धावचीत, यष्टिचीत, यावेळी देण्यात येतो? कारण विजय ला शेवटी मैदानावरील पंचाने बाद ठरवले असे सांगण्यात आले. विजय ला पुन्हा फलंदाजी द्या असा आग्रह नाही पण नक्की नियम काय आहे?
*****************************************************
ऊद्या साहेब, लक्षमण, रैना यांवर आपले भवितव्य अवलंबून असेल. धोणीकडून फारशा अपेक्षा नाहीत.
माझी बेट साहेब अन रैना वर आहे, अर्थातच सामना भारत जिंकणार हे वेगळे लिहायला नको.
<<स्पिन सर्वात उत्क्रुष्ठ
<<स्पिन सर्वात उत्क्रुष्ठ खेळणारा सुनिलच होता>> पूर्ण सहमत. खतरनाक विकेटवर क्षेत्ररक्षकांच भोवती कडं लावलं असताना कशाही वळणार्या व उसळणार्या बॉलला वठणीवर आणताना सुनिलला पहाणं ही डोळ्याना मेजवानी होती.
<< हो आणि एक राहिलाच. कर्नल दिलिप >> अगदी खरंय. चंद्रशेखर आपल्या "मिडीयम फास्ट लेगब्रेक"ने जगभर फलंदाजाना हैराण करत होता तेंव्हा मुंबईत दिलीपने रणजी ट्रॉफी सामन्यात त्याला अक्षरश: झोडलेला लहानपणी मी पाहिलाय. [नंतर गावस्करचा आदर्श ठेवून तो आपला स्वाभाविक खेळ सोडून कांही वर्षं बचावात्मक खेळायचा; नशिबाने लवकरच त्याच्याही हे ध्यानात आलं असावं व आक्रमक, शैलीदार खेळाचं तो मग एक "मॉडेल"च झाला !]
<<विश्वनाथचे कट्स आणि स्क्वेयर ड्राइव जास्ती करून फास्ट बॉलर विरूद्ध प्रसिद्ध होते.>> व ते अफलातून, अविस्मरणीय होते. पण फिरकी गोलंदाजीही तो तितक्याच कलात्मकतेने खेळायचा, हेही खरंय.
आता थोडं वर्तमानात. उद्या मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आजच्या अनुभवावरून विकेट
दिवसभरात रंग कसा बदलेल, याचा अचूक अंदाज घेणं; धावसंखेचा वेग व खेळाचा पवित्रा त्यानुसार बदलत रहाणं हाच एक यशाकडे जाण्याचा उद्याचा मार्ग दिसतोय. साहेबांच विकेटवर असणं विनाअपघात हा कठीण रस्ता पार करण्यासाठी महत्वाचं आहे !
>आजच्या अनुभवावरून विकेट
>आजच्या अनुभवावरून विकेट दिवसभरात रंग कसा बदलेल, याचा अचूक अंदाज घेणं; धावसंखेचा वेग व खेळाचा पवित्रा त्यानुसार बदलत रहाणं हाच एक यशाकडे जाण्याचा उद्याचा मार्ग दिसतोय.
भाऊ,
अगदी अचूक बोललात. मी वर तेच लिहीलय- खेळपट्टी च्या स्वभावानुसार थोडी अॅडजेस्ट्मेंट केली तर सर्व शक्य आहे. सूराज हा काही फार भेदक्/महान फिरकी गोलंदाज नाही. मेंडीस हा फलंदाज म्हणून अधिक चांगला आहे. समोर मुरली सारखे गोलंदाज नाहीत तेव्हा चिंता करायचे विशेष कारण नाही.
*****************************************************
ईशांत चा श्रिनाथ होवू घातलाय का?
'क्रिकेट शास्त्र' यावर काही
'क्रिकेट शास्त्र' यावर काही पुस्तक आहे का? म्हणजे कुठल्या प्रकारची खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असते, कुठली फलंदाजांना. गवत उगवलेली खेळपट्टी चांगली की गवत नसलेली कोरडी ठणठणित? ओली नि कोरडी खेळपट्टी मधे काय फरक पडतो? हवामानाचा काय परिणाम होतो, आर्द्रता जास्त, तपमान जास्त, तपमान थंड, कोरडी हवा इ.
मंदगति गोलंदाजी खेळताना काय महत्वाचे, जलदगति गोलंदाजी खेळताना. आक्रमक कसे खेळावे, बचावात्मक कसे खेळावे? एकाच प्रकारचा टाकलेला चेंडू बचावात्मक किंवा आक्रमक खेळल्या जाऊ शकतो का?
कुठल्या प्रकारच्या गोलंदाजी साठी कुठल्या प्रकारची क्षेत्ररचना करावी, गोलंदाजी कधी बदलावी, मंदगति केंव्हा, जलदगति केंव्हा, वगैरे माहिती सांगणारे.
क्रिकेट हे शास्त्र कमी कला
क्रिकेट हे शास्त्र कमी कला जास्त आहे. तसे नसते तर संजय मांजरेकर जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला असता .अरे देवा!!
अरे देवा!! >>> क्रिकेट हे
अरे देवा!! >>>
क्रिकेट हे शास्त्र कमी कला जास्त आहे.>>> थोडं बेसबॉलच्या कलेनं पण बोला की राव...
एका वाक्यात लिहायचे तर ८०
एका वाक्यात लिहायचे तर ८० च्या दशकात सुनिल गावसकर चे स्ट्रेट ड्राईव्ह चे फ्लॅम बुक (शब्द बरोबर आहे ना? तेच ते जे वेगात पाने ऊलटली की गावसकर ची स्ट्रेट ड्राईव्ह पुस्तकात बघायला मिळत असे) सोडले तर असे कुठलेही पुस्तक ऊपल्ब्ध नाही.
माझ्या माहितीत तरी एव्हडी सगळी माहिती देणारे पुस्तक ऊपलब्ध नाही. पण काही गोष्टी अनेक वर्षांच्या अनुभवांती सिध्द झाल्या आहेत ज्याला तोड नाही. खेळपट्टीला अनुसरून काही अनुमाने प्रमाण सिध्ध झालेली आहेत जसे-
१. सर्वसाधारणपणे गवत असलेली खेळपट्टी वेगवान गोलंदाज अन फलंदाजांनाही अनुकूल ठरते. पण सामना कुठे खेळला जात आहे- आशिया खंड (भारत, लंका, पाक), वेस्ट ईंडीज, ऑसी, लंडन, न्यू झिलंड यानुसार यात थोडाफार फरक पडतो. कारण तापमान, हवा, आर्द्रता, वारे, ई. सर्व त्या त्या ठिकाणानुसार बदलते अन त्याचा परिणाम खेळपट्टीवर होत असतो.
२. कोरडी ठणठणीत खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजीसाठी जास्त अनुकूल असते- २०/२०, एकदीवसीय मध्ये अशी खेळपट्टी जास्त करून वापरतात.
३. चेंडू अन गोलंदाजी- पुन्हा एकदा आशिया खंडाबाहेर विशेषतः ईंग्लंड, ऑसी, मध्ये चेंडू चांगलाच स्विंग होतो. मग आपल्याकडे निष्प्रभ वाटणारे शर्मा, ईरफान पठाण तिथे भेदक होतात.
४. आर्द्रता जास्त असेल तर जुना चेंडू रिवर्स स्विंग व्हायला मदत होते. आशीया खंडात, त्यातही पाक मध्ये हे जास्त दिसून येते. रिवर्स स्विंग चा जनक वसिम अक्रम्(?) वकार युनूस पैकी आहेत.
अर्थात खेळपट्टी कशी बनवावी, तंत्रशुध्ध फटके कसे मारावे याचे द्यान देणारी पुस्तके अन व्हिडीयो प्रात्यक्षिके ऊपलब्ध आहेत. पण त्यालाही अपवाद आहेतच- किशोर कुमार संगीत शिकला नव्हता तसेच सेहवाग ने देखिल ही पुस्तके अन व्हिडीयो पाहिले नसतील
बाकी
>>मंदगति गोलंदाजी खेळताना काय महत्वाचे, जलदगति गोलंदाजी खेळताना. आक्रमक कसे खेळावे, बचावात्मक कसे खेळावे? एकाच प्रकारचा टाकलेला चेंडू बचावात्मक किंवा आक्रमक खेळल्या जाऊ शकतो का?
हे सर्व पुस्तकात ऊपब्ध नाही. क्रिकेट चे तंत्र शिकवले जाते, त्याचा सराव करावा लागतो अन त्याही पुढे त्या तंत्रात परिस्थीतीनुसार सुधारणा करावीच लागते.
>>कुठल्या प्रकारच्या गोलंदाजी साठी कुठल्या प्रकारची क्षेत्ररचना करावी, गोलंदाजी कधी बदलावी, मंदगति केंव्हा, जलदगति केंव्हा, वगैरे माहिती सांगणारे.
पुन्हा एकदा यासाठी कुठलेही software code ऊपलब्ध नाही. यात फक्त अनुभव, निरीक्षण, प्रयोग या अंती सिध्द झालेले अन आत्मसात केलेले ज्ञान वापरता येते.
एकंदरीत २५% भागही पुस्तकात ऊपलब्ध नाही म्हणूनच खेळात रंगत आहे, चुरस आहे, गूढ आहे. म्हणूनच या खेळात काही भगवान आहेत, काही धृव तारे आहेत तर काही निव्वळ तारे आहेत.
जे काही ऊपल्ब्ध आहेत ते नियम फक्त खेळाच्या अनुशासन, फेयर प्ले, अन एकंदर रचनेसाठी ऊपलब्ध आहेत जसे-
१. चेंडूचे वजन, मेक , ९० षटकांनंतर नविन चेंडू घेण्याचा पर्याय वगैरे
२. बॅट ची रुंदी, मेक (लाकूड असावे- स्टील नाही)
३. नो बॉल, वाईड बॉल वगैरे चे नियम
***************************************************
झक्की, या निमित्ताने आम्चे क्रिकेट कोचिंग, खेळलेले सामने, भारतात टाईम्स शिल्ड, परदेशातील लिग सामने खेळले त्याची आठवण करून दिलीत...
रिवर्स स्विंग चा जनक वसिम
रिवर्स स्विंग चा जनक वसिम अक्रम्(?) वकार युनूस पैकी आहेत.>>सर्फराझ नवाझ रे.
क्रिकेट हे शास्त्र कमी कला जास्त आहे. तसे नसते तर संजय मांजरेकर जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला असता: >>
मला वाटतं आपण हरु. आजची रात्र
मला वाटतं आपण हरु. आजची रात्र महागात आहे, जिंकणार ह्या आशेने पूर्ण वेळ जागावे लागेल पण इतके रन्स, ५ वा दिवस, त्यांचा बॉलर्सची कमाल अन धोणी वगैरेंची शेल मधली मनस्थिती पाहिल्यावर "हार" होईल असे वाटते.
हां IPL मधला (म्हणजे आक्रमक) धोणी, रैना परत एका दिवसासाठी बघायला मिळाले तर जिंकू. सचिनच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो आता दोन्ही पाय ठेवून, ऑफच्या बॉलला बॅट कधिच लावणार नाही. त्याचाबाबतीत चुका एकदाच होतात ! ( अपवाद फनी डिव्हिलर्स ह्या बॉलरचा, तो त्याला बरेचदा तसाच आउट करायचा). देवा रे प्लिज प्लिज सचिन पहिल्या १० ओव्हर टिकू दे. मगच सिरिज लेवल होईल.
या टेस्टचा ४ दिवसाचा एतिहास
या टेस्टचा ४ दिवसाचा एतिहास पहाता, दिवसाचा पहिला सेशन भलेभले बॅटसमन खेळु शकले नाहीत, २ व ३ सेशन मात्र बोलरपण चांगली बॅटींग करत आहेत (मिथुन्,मिश्रा, मेंडीस, तिघेही 'म' पासुन सुरु होणारे, मयेकर तुम्हीपण उतरा मैदानात :दिवा:).
थोडक्यात म्हणण असय कि, जर पहिला सेशन हाराकिरी न करता काढला तर मॅच ईंटरेस्टींग होईल.
<<'क्रिकेट शास्त्र' यावर काही
<<'क्रिकेट शास्त्र' यावर काही पुस्तक आहे का?>> क्रिकेटच्या सर्वांगाचं अभ्यासपूर्वक विवेचन अत्यंत सोपेपणाने व अधिकारवाणीने केलेलं मला वाटतं बहुधा एकमेव पुस्तक म्हणजे डॉन ब्रॅडमन यांचं १९५८ साली प्रकाशित झालेलं -" The Art of Cricket ". त्या पुस्तकाची मांडणी व विवेचनपद्धति ब्रॅडमन यांच्या व्यक्तीमत्वाचा आरसाच आहे; सरळ, स्पष्ट, निर्भिड, शिस्तबद्ध व तपशीलाबाबत कमालीचा कांटेकोरपणा !
उद्या सकाळी मजा येइल
उद्या सकाळी मजा येइल बघायला.सचिन खेळायला पाहिजे.
आज इशान शर्मा इतरांपेक्शा चांगला खेळत होता
जसा व्रीरु आपला मेन स्पिनर तस आजपासुन इशांत शर्मा आपला specialist batsman...
His confidence in batting was better than his bowling...
ढोणीला सगळे माफ़ आहे. त्याला खरतर मंडळातर्फ़े हनिमूनची सुट्टी द्यायला पाहीजे होती. नाहितर Non Playing Captain म्हणून घ्यायला पाहीजे होता.
Pages