Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
केदारशी सहमत. योग, धमाल जमलेय
केदारशी सहमत. योग, धमाल जमलेय आजचे वर्णन. वीरूझटका >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी बर्याच महान खेळाडूंच्या अनेक खेळी आधीच्या एका जीवदानाने पूर्ण झाल्या आहेत (ऑस्ट्रेलियाविरूद्ध लारा, स्टीव वॉ आफ्रिकेविरूद्ध, भारताविरूद्ध अनेक) - ही पण त्यातीलच एक ठरावी.
रैनाने अशीच परिपक्वता पुढे
रैनाने अशीच परिपक्वता पुढे दाखवली तर युवराजकडे बघून 'कोण होतास तू काय झालास तू' असे हळहळत रहावे लागणार नाही.
खेळले गडी ऊपाहारापर्यंत.
खेळले गडी ऊपाहारापर्यंत. शेवटच्या काही षटकात साहेब रणदीव ला अनेक वेळा विकेट देवू पहात होते-तेही पायचित होवून. १३५ झाल्यावर सचिन रणदीव ला पॅड का वापरत होता ते कळले नाही. बहुतेक त्याला या अंपायर वर- टकर, अधिक भरवसा असावा. स्टीव बकनर असता तर साहेब कधीच तंबूत परतले असते. एका चेंडूवर सचिन पायचित होता असं माझं मत- पण हॉकाय यष्टीवरून चेंडू जातोय अस दाखवत होता- जे थोडं अतर्क्य वाटलं. असो.
रैना ने निराश नाही केले. पुन्हा एकदा प्रचंड मानसिक संतुलन आणि ऊत्कृष्ट शॉट सिलेक्शन दाखवत पदार्पणात शतक केले. लय भारी. १३५+ केले तर पहिला भारतीय ठरेल.
आता आजची पुढील सत्रे रोचक ठरतील. दिवसभर खेळलो तर लंकेवर ५०+ ची आघाडी घेता येईल. मग ऊद्या सकाळी ती आघाडी २००+ करून लंकेला खेळायला देता येईल.
किंव्वा आपले फलंदाज आज अचानक लवकर बाद झाले तर लंकेकडे १००+आघाडी असेल अन ऊद्या सकाळी ३००+ ची आघाडी घेवून लंका पुन्हा भारताला खेळायला देवू शकते. मग पुन्हा एकदा "विरू-फॅक्टर" करामत करू शकतो.
वैयक्तीक मला वाटतं सचिन रैना ने चाहापानापर्यंत धोका न पत्करता पण थोड अधिक आक्रमक खेळावं. मग कदाचित दिवसखेर आपली १००+ ची आघाडी होईल. ऊद्या पुन्हा धोणी आणि कं २५०+ करून ऊपाहारा आधी ल़ंकेला खेळायला देतील. कींव्वा तोडफोड आत्ताच चालू करावी- धोणी चा विरंगुळा गेला सेल अशी आशा करायला काय हरकत आहे? मला धोणी ने मेंडीस ला धुतलेला बघायचाय.
अर्थात- कुठल्याही केस मध्ये लंकेचे पुन्हा सर्व गडी बाद करणे हे आपल्या गोलंदाजांना स्वप्नातही शक्य नाही. तेव्हा अनिर्णय अटळ आहे.
*****************************************************
ps: भगवान के घर देर है अंधेर नही. शेवटी असा प्रसाद (धम्मिका) सापडलाच जो त्याच्या चेंडू-ईतकाच जोरात पळतो. परिणामी काल तीन षटकं टाकून झाल्यावर त्याची फेफरं टाईट झाली होती तो भाग वेगळा.
अमित मिश्रा ची कसोटीत ५० धावा करायची संधी पुन्हा एकदा हुकली. फार अन्याय होतोय त्याच्यावर!
२०० साहेब
२०० साहेब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता चहापानानंतर धोणी धुलाई
आता चहापानानंतर धोणी धुलाई आणि सचिन शो अपेक्षित आहे. थोडक्यात दिवसाखेर भारताला १०० ची आघाडी? धोणी चे १०० शक्य आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऊद्या लक्षमण अन द्रविड ने आपल्या "गोलंदाजी अॅटॅक" ला सुरुवात करावी. nothing to loose
>>लक्षमण अन द्रविड ने आपल्या
>>लक्षमण अन द्रविड ने आपल्या "गोलंदाजी अॅटॅक" ला सुरुवात करावी<<
काही हरकत नाही, निदान त्यांना मारायला जाऊन आउट तर होतील.
साहेबांनी पुन्हा एकदा टीमला तारलं अर्थात रैनाच्य भक्कम साथीच्या साह्यानेच. --> हे लिहूपर्यंत साहेब आउट झाले. आत्ता फक्त इशांतच वाचवू शकतोय.
हा हा हा.. सचिन बाद तेही
हा हा हा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपला ल़ंके एव्हडा स्कोर होईल का? सामना आता खरा उत्सूकतापूर्ण झालाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सचिन बाद तेही दिलशान च्या चेंडूवर
आता पहा कशी गळती लागेल.
चेंडू अचानक वळू लागलाय. आपण ५०+ ची आघडी घेतली तर अजून उत्सूकता वाढेल.
cricket is funny game..
धोणीने खूप बाहेर ठेवण्याचा
धोणीने खूप बाहेर ठेवण्याचा खूप प्रयत्न करून शेवटी नाइइलाजाने रैनाला घ्यावे लागले व त्याने सुद्धा रूबाबात डेब्यू केला. भावी कर्णधार.
पीच इतकं बंडल आहे का नक्की...
पीच इतकं बंडल आहे का नक्की... तो अभिमन्यू मिथुन पण लंकेच्या बॉलरला नीट खेळून काढतोय..
सामना आता खरा उत्सूकतापूर्ण
सामना आता खरा उत्सूकतापूर्ण झालाय. >>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पाटा खेळपट्टी बनवून काय
पाटा खेळपट्टी बनवून काय मिळवलं श्रीलंकेनं? ४ दिवसात १४०० हून अधिक धावा (त्यात २ द्विशतके, ३ शतके, एकजण ९९ वर बाद आणि ४-५ अर्धशतके) आणि फक्त १३ बळी !
सचिनने कसोटी सरासरी धावांमधे
सचिनने कसोटी सरासरी धावांमधे पाँटिंगला मागे टाकले...आता सचिनची सरासरी ५६.०८ तर पाँटिंग ५४.६६. तसेच पाँटिंगवर १७००+धावांची आघाडी.
२०१० मधे सचिन ९६.५०च्या सरासरीने ७७२ धावा, तर पॉटिंग ४३.२७ च्या सरासरीने ४७६ धावा. २००९च्या अखेरीस पॉटिंग ५५.२६ सचिन ५४.७३ अशी सरासरी होती...
पण या २ सामन्यात संगाक्कारा पुढे गेलाय ५६.६२.
२०१० मधे सगळ्यात जास्त धावा कुणाच्या असाव्यात? तमिम इक्बाल (बांग्ला) ८३७/५९.७८, हाशिम अमला ७९६/४८.५६ मग सचिन.
राहुल द्रविडच्या नावावर कसोटीत सगळ्यात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम लागला, आधीचा स्टीव्ह वॉचा होता, इथे सचिन तिसर्या स्थानी.
>>सामना आता खरा उत्सूकतापूर्ण
>>सामना आता खरा उत्सूकतापूर्ण झालाय.
ऊद्या काही चमत्कार घडल्याशिवाय कुठलाही निकाल लागणे अवघड आहे.
सचिन बाद झाला तेव्हा धोणी वगळता आपले बाकी फलंदाज कोसळतील अन ल़ंकेला १००+ आघाडी मिळेल असं वाटलं होतं. चेंडू अचानक वळू/ऊसळू लागला होता. पण या खेळपट्टीवर ईच्छा व थोड नशिब असेल तर आरामात उभं राहता येतं हे मिथून ने दाखवून दिलं.
पुढील सामन्याची खेळपट्टी एकदम जिवंत आहे म्हणे. चांगले आहे. फक्त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तर संधी आहे अन्यथा रिपीट टेलिकास्ट.
पुढील सामन्यात लक्षमण ला बसवून युवी ला घ्यावे (गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे बोनस). ओझा चे ओझे टाकून मिश्राचे ओझे वाहून बघावे. मिथून ला फलंदाजीच्या बळावर स्थान मिळेल अन्यथा मुनाफ ला संधी द्यायला हरकत नाही, विशेषतः गोलंदाजी ला अनुकूल खेळपट्टी असेल तर. खरतर भज्जी इज बिग फ्लॉप पण त्याला बसवण्याचा निर्णय ईतक्यात घेतील असे दिसत नाही. बसवला तरी त्याची जागा घ्यायला गोलंदाज कोण?
माझा संघः विरू, विजय, द्रविड, सचिन, युवी, रैना, धोणी, मुनाफ, ईशांत, मिश्रा, भज्जी.
ऊद्या लक्षमण अन द्रविड ने
ऊद्या लक्षमण अन द्रविड ने आपल्या "गोलंदाजी अॅटॅक" ला सुरुवात करावी. nothing to loose >>
माझ्यामते धोणीपण चांगली गोलंदाजी करतो. द्रविडला किपर करावे. अझर सारखे एक दोन विकेट तो ही घेईन. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साहेबांची धावांचा डोंगर
साहेबांची धावांचा डोंगर रचायची संवय अजून कायम आहे, रैनाची संघातील जागा वादातीत झाली आहे, या दोन बाबी सोडल्या तर या सामन्यातून विशेष कांही निष्पन्न झालं असं वाटत नाही. सामना म्हणून शेवटची कसोटी तरी रंगतदार होईल अशी आशा करुया. [अंतिम सामन्यावर पावसाचं सावट असेल ही शक्यता आहेच]
युवराजचे क्षेत्ररक्षण बोनस?
युवराजचे क्षेत्ररक्षण बोनस? गेले ते दिन गेले. आता तो पॉइंटला उभा रहात नाही, डीप मिडॉनला लपवावा लागतो.
क्रिकइन्फोवरचे काही कॉमेंट्स
क्रिकइन्फोवरचे काही कॉमेंट्स (वेंकटेश प्रसादबद्दल)
Dammika Prasad is nearing a century here. This guy is quite pacy. Kind of unsettling to come across a bowler called Prasad who can bowl upwards of 140 kph.
"Speaking of venky Prasad and pace, didn't someone write that a lot of batsmen are still waiting in different grounds of the world for Venkatesh Prasad's slower ball to arrive?"
![laughing.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u438/laughing.gif)
प्रसाद बद्दल हा कमेंट
प्रसाद बद्दल हा कमेंट होता.
In his heydays, he used to bowl in 125+ with slower leg cutter as his surprise ball. After few years slow leg cutter became his stock ball and even slower legcutter became his stock ball. Towards retirement, even slower legcutter became his stock ball and slower than even slower ball became his surprise ball![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण प्रसाद एक हुशार बॉलर होता. श्रिनाथमधे त्याच्या दशांश जरी अक्कल असती तर ...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
श्रिनाथमधे त्याच्या दशांश जरी
श्रिनाथमधे त्याच्या दशांश जरी अक्कल असती तर ...
>>
अगदी...
मॅचच्या पहिल्या चेंडूपासून थकलेला...
चेहेर्यावर कायम पाट्या टाकणारे मजूर भाव...
(योग, आजचा रिपोर्ट
(योग, आजचा रिपोर्ट कोठेय?)
काल धोनी कडून जरा आक्रमक क्रिकेट ची अपेक्षा होती. टी नंतर जरा वेग वाढवतील असे वाटले होते, पण धोनी आणि सचिन दोघेही शटर बंद करून बसले होते. सचिन मारताना आउट झाला असता तर जरा बघायला मजा आली असती. कालच्या टी टाईम च्या सुमारास अशी अवस्था होती की भारत हरण्याचे चान्सेस खूप कमी होते (कारण अजून एकदा बॅटिंग बाकी आहे), पण आणखी २००-२५० रन्स पुढे मारले तर शेवटच्या दिवशी लंकेला टेन्शन देता आले असते.
शेवटच्या दिवशी लंकेला टेन्शन
शेवटच्या दिवशी लंकेला टेन्शन देता आले असते. >> अमोल लेका शक्य आहे का ते आपल्या दिव्यशक्तीच्या बॉलर्स बरोबर? ह्यावेळी फलंदाजीने तग धरला म्हणून टेस्ट वाचली अन्यथा ती ही गेली असती.
आपल्याला वट दाखवायची तर टॉस जिंकने व त्यानंतर बॅटिंग घेणे महत्वाचे आहे. रैनाला संधी द्यावी असे गेल्या वर्षापासून मला वाटत होते. तो जरी दोन चार मॅच फेल गेला तरी बेहत्तर, पण त्याला ठेवावेच कारण त्याच्याकडे टेंपरामेंट आहे. तो एक उच्च टेस्ट खेळाडू होऊ शकतो. ४ नंबरवर फिट होण्यास योग्य. धोणी मात्र वेळ वाया घालवत आहे. त्याला बॉलिंग झेपतेय का हेच कळेनासे झाले. डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेल्यावर शेल मध्ये पण जातो माणूस. ऑफकोर्स त्याने फिफ्टी मारली, पण ती धोणी ५० अजिबात वाटली नाही.
नाही जमले असते तरी त्या
नाही जमले असते तरी त्या सिच्युएशन पासून आपण हरत तर नव्हतो, मग प्रयत्न करायला काय हरकत होती असे मला काल दुपारी वाटत होते.
रैना बाबत सहमत. सध्यातरी युवराज आणि त्याच्यातच स्पर्धा राहूदे. द्रविड आणि लक्ष्मण अजून चांगले खेळत आहेत (मागच्या दहा मॅचेस वरून). किमान द्रविड च्या बाबतीत तो ठरवेल तेव्हा त्याला जाउदे. न्यूज चॅनेल चे भंपक "कॉमेंटेटर" नाहीतर २००५ मधे दादा आणि २००६ मधे "एण्डुलकर" सचिन ला हाकलायला निघाले होते तसे आता चालू करतील.
न्यूज चॅनेल चे भंपक
न्यूज चॅनेल चे भंपक "कॉमेंटेटर"
>>
बांडगुळं...
द्रविड च्या जेवढ्या सेंच्युरीज आहेत तेवढ्याही टेस्ट्स न खेळलेली लोकं स्वतःला एक्सपर्ट वगैरे म्हणूनच कसं घेतात...
एन्डुलकर LOL. टाईम्स वाट्टेल
एन्डुलकर LOL. टाईम्स वाट्टेल ते लिहत होत तेंव्हा.
मिरर मिरर ऑन द वॉल आठवतं का? साले (हो योग्य शब्द आहे) स्वतःला ग्रेट समजतात अन इतरांना ठोकायला बघतात.
If Cricket Is a Religiion, Sachin Is God हे पुस्तक घेऊन ये येताना. फार अफाट लिहलयं.
<<(योग, आजचा रिपोर्ट
<<(योग, आजचा रिपोर्ट कोठेय?)>> असल्या कसोटीवर रिपोर्ट लिहायला घ्यायचं धार्ष्ट्य दाखवलं, याचंच खर तर योगजींचं कौतुक करायला हवं !
<<"Speaking of venky Prasad and pace, didn't someone write that a lot of batsmen are still waiting in different grounds of the world for Venkatesh Prasad's slower ball to arrive?">> विनोद म्हणून हे ठीक असलं तरी त्यातला उपरोध मात्र खास औचित्यपूर्ण नाही. आहे त्या वेगाचा गोलंदाज किती हुषारीने उपयोग करतो, ही खरी कसोटी आहे.[तसा श्रीनाथला वेग खूप होताच ना !]. पूर्वी करसन घावरी हा डावरा मध्यमगती गोलंदाज [बहुधा प्रसादपेक्षाही मंदगती] गावस्करच्या संघात असे. "ओव्हर द विकेट" गोलंदाजी करताना त्याचा इन्स्विंगर टप्पा पडल्यावर सरळ होवून विकेटवर यायचा [जसा चामुंडा वासचा यायचा तसा]. गावस्करने त्याचा सुंदर उपयोग करून घेऊन भल्या भल्या फलंदाजाना पेंचात पाडलं होतं.
यावर जर कुणी म्हणेल कीं मग त्याना वेगवान गोलंदाजच कां म्हणायचं, तर कुंबळेला आपण लेग स्पिनर म्हणतो म्हणून !
आणि एक. प्रसादने गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून आदर्शवत कामगिरी केली, हेही नाही विसरता येत !
भाऊ आवडलं. मला प्रसाद
भाऊ आवडलं. मला प्रसाद आवडायचा. तो काही तरी वेगळं करायचा म्हणून. स्पिड बद्दल सोडा पण स्विंग मस्त असायचा. नाहीतर राजू कुलकर्णी, बिचारा बॉल सोबत स्वतःही पडायचा. फास्ट बोलर म्हणे!
आमिर सोहेलच्या एका विकेटसाठी त्याला दशलक्ष स्लो बॉ बक्षिस!! पहिला अन शेवटचा सीन पाहा. तसे बाकीचे ही मस्तच पण हे लै भारी !!
http://www.youtube.com/watch?v=LLHUB8ciPrc
ती मॅच खत्री झाली होती राव.
ती मॅच खत्री झाली होती राव. त्या पॉइंटपासून सामना फिरला. काय शिव्या घातल्या होत्या सोहेलला बॅट दाखवल्यावर !
आमिर सोहेलच्या एका विकेटसाठी
आमिर सोहेलच्या एका विकेटसाठी त्याला दशलक्ष स्लो बॉ बक्षिस!! >>> बॉलमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रसादचा वनडे ईकॉनॉमीक रेट हा नेहमी ५.५च्या वर होता... पहिल्या स्पेल मधे ५ ओव्हर मधे ३५ रन्स आणि सॉग्ल ओव्हर मधे ५ ओव्हर मधे २० रन्स असायचे...
केदारजी, अप्रतिम लिंकबद्दल
केदारजी, अप्रतिम लिंकबद्दल धन्यवाद.
दांडी उडवल्यावर प्रसादने सोहेलकडे पाहिलं पण नाही ! "स्लेजींग"ला हे सगळ्यात परिणामकारक प्रत्युत्तर असावं !
प्रसाद जेथे स्विंग असेल तेथे
प्रसाद जेथे स्विंग असेल तेथे सर्वात भेदक होता. १९९९ च्या वर्ल्ड कप मधे पाक वि. मस्त काढले होते. एरव्ही देशात, लंकेत उगाचच त्याला न्यायचे जयसूर्याला "शॉर्ट अॅन्ड वाईड" ची खिरापत द्यायला.
Pages