युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे कान्दा लसुण मसाला (घाटी मसाला) आहे. त्याचा वापर कोणकोणत्या भाज्या, उसळिन्मधे करता येइल??

क्युट्प्राजू,पाकृ मधे मिनोतीने चवळीच्या शेंगेच्या भाजीची रेसिपी दिलेय बघ.त्यात तिने कांदा लसुण मसाला घालायला सांगितलाय.
बाकी मटकी, डाळिंब्या, हरभरे वगैरे उसळीमधे तू खोबर्‍याच्या वाटणा बरोबर कांदा लसुण मसाला, सोबत हवा तर गरम मसाला वापरुन करुन बघ

धन्स्...कविता.... आज मी मिश्र धान्याच्या उसळिमधे वापरला तो चान्गल लागला...आता तु सान्गितल्याप्रमाणे पन करुन बघेन...

तो मसाला वापरुन डाळीची आमटी, मिसळीचा कट, अंड्याची आमटी, भरली वांगी,
चिकन, भरली दोडकी असे बरेच प्रकार करता येतात. तिकडचा जनरल वापराचा
मसाला आहे तो. तो वापरल्यास बाकि कुठले मसाले, वापरायची गरज नसते.
(अस्सल मसाल्यात कोथिंबीरही असते.)

माझ्या कडे sanjeev kapoor chi chilli garlic chutney खुप आहे त्याचे काय करता येइल??

मी पण हल्लि कणकेत सोयाबिन पीठ मिसळते (एका वाटिला एक चमचा ह्या प्रमाणात), पण पोळ्या फार कडक होतात. सोयाबीनःकणकेच नक्कि प्रमाण कोणि सांगु शकेल का?

रमा, अग सोयाबीनच्या पिठापेक्षा टोफु घालून पहा. सिल्कन सॉफ्ट टोफु १/४ स्लॅब साधाराण १५ एक चपात्यांसाठी या प्रमाणात वापरून पहा.

मला हा प्रश्न कुठे लिहू कळले नाही म्हणुन इथे लिहित आहे.

मला जे लवकर अगदि १० मि. होतिल पण पोष्टीक असतील असे पदार्थ सुचवा ना प्लिज .
मि ३ महिन्यांची प्रेग्नंट आहे.पण मला खुप त्रास होत असल्यामुळे खुप वेळ उभी राहु शकत नाही. त्यामुळे सकाळ सन्ध्यांकाळ करायला असे सोपे पण पोष्टीक पदार्थ सांगा प्लिज.....

http://www.maayboli.com/node/14647
निर्मयी हे घे- ह्या लिंकवर वन डिश मील आहेत.

तसेच, वर 'आहारशास्त्र आणि पाककृती' ह्यावर क्लिक कर. ह्या ग्रूपमध्ये असलेल्या सर्व पदार्थांची सूची येईल. बरीच पानं आणि चिकार पदार्थ आहेत- ब्रेकफास्टचेही ऑप्शन्स आहेत. ऑल द बेस्ट!

स्वरा१२३, ती चटणी रस्सा, उसळीत वापरता येईल का बघ. कणकेत मिसळून पराठे वगैरेही करता येतील बहुधा.

निर्मयी:

उपमा - भाज्या घालून. तूप घालून.
शिरा मस्त खरपूस भाजून व तूप घालून बरोबर आम्ब्याचे लोणचे. भरड रव्याचा करायचा लै भारी. तुला खायला काहीच हरकत नाही. आमचे लगेच वजन वाढेल.

मिश्र पिठाची धिरडी.
चिकन सँडविच
चिकन सलाड
पास्ता विथ वेजीज.
आलू - पालक - मेथी - मूली - गोभी पराठे.
फारच बोर झाले तर अमूल बटर/ सब्जी घालून मॅगी.
खिमा पाव.
पाव भाजी.

मी प्रेगनंट नाहीये पण मला ही किचन मध्ये उभंच राहवत नाही.
अगं इथे एक महिला विभाग आहे व त्यात तू जॉइन झालीस तर तुला सपोर्ट ग्रूप तिथे आहे.

निर्मयी,

भाज्या घालून पराठे
उसळी (कडधान्य शिजवून फोडणीत मसाला, गूळ, चिंच/ आमसूल घालून)
वरणभात/ मूगडाळ खिचडी/ खिमट/ मेतकूटभात/ बिशीबेळी भात/ चित्रान्न
दहीपोहे/ फोडणीचे पोहे/ दडपे पोहे
दलिया/उपमा/उकड/सांजा/ चकोल्या(दालढोकळी)/ उकडपेंडी/ शेवयांचा उपमा भाज्या घालून.

ह्या पदार्थांनाही करताना खूप वेळ लागत नाही आणि करायला सोपे आहेत.

पौष्टिक पदार्थ :

सातूचे पीठ + गूळ/ साखर + तूप/ दूध
सर्व प्रकारच्या खिरी (रवा, शेवई, तांदूळ, मुग, गाजर, दुधी, गव्हले इ.इ.)
गुळपापडीचे लाडू
नाचणीचे सत्त्व (दुधात घालून) किंवा नाचणीचे लाडू, अळीवाचे लाडू.
५-६ तास भिजवलेले बदाम, मनुका, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू, कच्चे शेंगदाणे.

थोडं दूध किंवा पाणी लाऊन होत नाही का?
बरं, मी ही माझा मोदकांचा प्रश्न विचारूनच घेते. मी नेहमी ऊकडीचे मोदक करते, हातानेच. चविष्ट होतात, पण फार काही सुबक होत आहीत, म्हनून या वेळेस, भारतातून प्लास्टीक चा साचा घेऊन आलिये, त्याने करणारे. पण त्या साच्याला खाली बुडाशी काहीच ( चकती वैगरे) नाहिये. छोट्या नाण्याएवधं भोक आहे. ते कसं बुजवायचं ?
तसचं दाबून उकड भरायची का? पण त्याने बेस unstable नाही का होणार? साच्याने वेळ जास्त लागतो की हाताने? उगिच त्या साच्यानी खेळत बसावे लागेल नाहितर.

संपदाने फोटोंसगट दाखवलंय मोदकांचा साचा वापरण्याचं तंत्र. तिच्या पाऊलखुणांमधे दिस्तंय का बघावं लागेल. मायबोलीत शोधलं पण तो लेख मिळाला नाही.

माझ्या एका नवीन लाल रंगाच्या ड्रेसचे हाल झालेत. पहिल्यांदाच धुतला. (ड्रायक्लिनला का नाही टाकला? Uhoh Sad ) आणि पाठीच्या बाजूला चक्क पांढुरके धब्बे पडलेत. पुढच्या बाजूने डिझाईनसकट सही आहे पण मागे असं. तिथला रंग गेला का काय? चार वेळाही घातला नसेल.. काय करु? Sad

त्याच लाल रंगाचे नविन कापड आणून फक्त मागचा भाग नविन लावून घ्यायचा. ते कापड पण शक्यतो स्पन वगैरे टाईपचे आणायचे. किंवा ड्रेस उसवून मागचा पार्ट फक्त डाय करायचा. किंवा मग जसे पुढे डिझाईन आहे तसे मागे करुन घेता येते का पहायचे.

रंग कच्चा होता आशू.. लॉन्ड्रीत विचारून बघ. त्यांच्याकडे एकेक भन्नाट आयडीया असतात. त्या रंगाचा डाय असेल तर रंगवून मिळू शकेल.

धन्स मिनोती, मंजू. डायचाच विचार आला होता आधी डोक्यात पण म्हटलं अजून काही करता येईल का पाहावं. बघते आता.
दुसरा प्रश्न म्हणजे वरच्या प्रॉब्लेमच्या १८०डिग्रीत आहे. Proud एका कॉटन कुर्त्याचा रंग डार्क (विंडोजची डिफॉल्ट ब्ल्यू थीम असल्यावर जो निळा दिसतो तो. ) निळा आहे. घातल्यावर मला फारच बटबटीत वाटतो. तो फिका होण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवला बट नो लक. काही करता येईल?

त्या कुर्त्यावर सलवार/लेग्-इन जे काही घालतेस ते कॉन्ट्रास्ट घालतेस का?

त्याच कलरस्किममध्ये सलवार्/लेग्-इन घालून पहा, कदाचित बटबटीत वाटणार नाही.

त्या टॉपवर कसले डिझाईन आहे की प्लेन आहे? कोणी कशिदा, कच्छी किंवा लखनऊ चिकन काम करुन देत असेल तर एक शेड गडद किंवा एक शेड लाईट रंगाने त्यावर काम करून चांगले दिसेल. किंवा अजुन सोपा उपाय, शक्यतो असे कपडे संध्याकाळी/रात्री घालायचे त्याने डोळ्यात खुपत नाहीत.

Pages