खरतर इथे आधीच मज्जापान आहे भाषेमधल्या गंमती सांगायला.
पण अजून काही विशिष्ठ गंमती आहेत या आणि मराठी भाषेमध्ये.
जस मराठीमध्ये दोन सारखे शब्द जोडून शब्द बनतात तस जपानीमध्येहि बनतात. महेशने सांगितल्या प्रमाणे त्याला गीसेईगो किंवा गीताईगो म्हणतात.
म्हणजे मटामटा, घटाघटा इ. असे अनेक शब्द आहेत. तर इथे अशा मजेदार पुनरुच्चार होणारे शब्द टाकूयात.
इंग्रजी मध्ये बहुधा याला onomatope अस म्हणतात.
मराठीमध्ये "पुनरुच्चारित शब्द" म्हणता येईल का? कि अजून काही शब्द आहे?
हे मला माहीत असलेले शब्द
काहि आवाज
गोकुगोकु - घटघट आवाज (पाणी पिणे)
मोगुमोगु - मटामटा / तोबरा भरुन खाणे, किंवा दात नसताना खाणे
बिरिबिरि - टराटरा (फाडण्याचा आवाज. कागद टरटर फाडणे)
पारापारा - टपटप पावसाचा आवाज
पोत्सुपोत्सु - थेंबथेंब पाउस
झा झा - धोधो पाउस
गातान् गातान् - धडाम् धडाम् (ट्रेन चा आवाज )
तोन तोन - थप थप, ढम ढम
साकु साकु - कुरकुरीत
च्योकी च्योकी - कचाकचा (कापणे)
इतर
प्योन प्योन - टूणटूण
फुराफुरा - गरगरणे
बाराबारा - इकडेतिकडे. वेगवेगळं होणं (माणसं) किंवा विस्कळीत होणं (पुस्तकाची पानं)
बेताबेता - सगळीभर थापणे किंवा चिकट होणे
गुचागुचा - अस्त्याव्यस्त. विस्कटलेले.
फुसाफुसा - हलके फुलके (केसांबद्द्ल बोलताना वापरतात. म्हणजे फुललेले, हलके, चालताना rhythmic हलणारे केस.)
हिराहिरा - भिरभिरत (पान वार्याने भिरभिरतात)
बुsबुs - कटकट / कटकट वाटणारे बोलणे
इराइरा - चीडचीड (इरिटेट)
पिका पिका - चकमक / झगमगीत (स्वच्छ या अर्थी पण वापरतात)
किराकीरा - चमचम (चांदणी, खडा, सोन इ.)
गिरा गिरा - झगमगाट
फुवाफुवा - हलकेफुलके (केक ब्रेड, स्पंज इ सारखे )
गोरो गोरो - गडाबडा
कासा कासा - खडखडीत (कोरडे)
कुरु कुरु / गुरु गुरु - गोलगोल
युरा युरा - झुलणे / हलणे
सुबे सुबे - गुळगुळीत
पोरो पोरो - घळा घळा (अश्रू)
पेरा पेरा - अस्खलित (भाषा)
गुऊ गुऊ - ढाराढूर
दोकी दोकी - धडधडणे
प्राणी / पक्षाचे आवाज
गाs गाs - क्वाकक्वाक (बदकाचा आवाज)
काsकाs - कावकाव
च्युनच्युन - चिवचिव
वान वान - भोभो
न्याs न्याs - म्यावम्याव
मेsमेs - बेंबें (बकरीचा आवाज)
मो मो - हम्माs हम्माs (गायीचा आवाज)
केरो केरो/ गेरो गेरो - डराव डराव (बेडकाचा आवाज)
बु बु - डुकराचा आवाज
हो हो - घुं घुं ( घुबडाचा घुत्कार)
च्यु च्यु - ची ची (उंदराचा आवाज)
जी जी - कीरकीर (रातकिड्याचा आवाज)
कोन कोन - कुईकुई (कोल्ह्याचा आवाज)
(No subject)
सेन्सेई __/\__
सेन्सेई __/\__
मस्त लिस्ट सावली. पेरापेरा
मस्त लिस्ट सावली.
पेरापेरा आणि गिरीगिरी हे (नेहमीचे) माझ्याकडुन.
वा सावली, मस्त लिस्ट आता
वा सावली, मस्त लिस्ट
आता देशातुन परत आल्यावर माझ्याकडुन अपडेट मारीन.
पेको पेको -- हा माझ्याकडुन.
पेको पेको -- हा माझ्याकडुन.
इतकं उकडतय आज की मुशीमुशी ह
इतकं उकडतय आज की मुशीमुशी ह शब्द अॅड केल्याशिवाय रहवत नहिये
शिनच्यान पाहताना असे आवाज ऐकू
शिनच्यान पाहताना असे आवाज ऐकू येतात.
मांजर न्या न्या म्हणते म्हणजे
मांजर न्या न्या म्हणते म्हणजे घेऊन जा.
घुबड म्हणते हो हो
कोल्हा विचारतो कोन कोन
बदक कावळ्याला गा गा म्हणते
कावळा विचारतो का का ?
सावली, चांगली लिस्ट. बरेच
सावली, चांगली लिस्ट. बरेच शब्द माझ्या विस्मरणात गेलेत. गाडी हाकताना बर्याचदा 'इराइरा'ची आठवण होते.
कसले नादमय आहेत हे शब्द!
कसले नादमय आहेत हे शब्द!
हे असे नाही पण जरा वेगळे शब्द
हे असे नाही पण जरा वेगळे शब्द माहिती आहेत का कोणाला ?
उदा. पोरोन तो कोरोगारीमाशिता. म्हणजे गडगडत गेला.
यामधे पोरोन हा बहुतेक गडगडण्याचा आवाजदर्शक शब्द आहे.
धन्यवाद नविन शब्दाबद्दल। शब्द
धन्यवाद नविन शब्दाबद्दल। शब्द देताना अर्थपण टाकाल का? आत्ता मी टाकलेत
पेरापेरा - वर आहे
गिरीगिरी - शेवटच्या क्षणी
पेको पेको - पोटात कावळे कावकाव करणे. खुप भुक लागणे.
मुशीमुशी - चिकचिकाट घामाचा , गरमीचा.
हो हे शब्द खुप नादमय आहेतच, पण मराठिशि खुप जवळिकहि दाखवतात. मजा येते शब्दाला मराठी प्रतिशब्द आठवायला.
महेश ते वेगळे शब्द मज्जापान कीवा दुसरिकडे टाकुयात का? इथे गीसेईगो ठेवुयात.
तसे काहि आठवले की टाकिन मी.
मस्त गायीचा आवाज मो मो कसा
मस्त

गायीचा आवाज मो मो कसा
भराभरा, हळूहळू, मटामटा, असे
भराभरा, हळूहळू, मटामटा, असे बरेच मराठी शब्दहि आहेत.
शंभर रुपये दिले पण एक एक रुपयाची नाणी देऊन, पाच पाच पैसे लावून काय खेळतोस, दहा दहा रुपये लाव.
अश्या पुनरुच्चारित शब्दांची मग शब्दशः भाषांतरे करतात इंग्रजीतून की अमेरिकन लोक एकदम dumbfounded!"
ए मिरीमिरी पण ! मिरीमिरी
ए मिरीमिरी पण !

मिरीमिरी मिरु: नीट लक्ष देऊन, एखादी गोष्ट खोलात जाऊन बघणे/अभ्यासणे
* इतर अर्थ असल्यास सांगा. दिवा घेतलाय
* रच्याक, टुकुटुकु असा अर्थ नाहीये हो
सावली, मस्त
सावली, मस्त लिस्ट्..माझ्यासारख्या गाक्सेईंना खुप उपयोगाची आहे..धन्यवाद!
मस्त. मराठी पेरापेरा
मस्त.

मराठी पेरापेरा उच्चारांपुढे यांचे उच्चार अगदी सुबेसुबे वाट्टायट.
सोरो सोरो: by now दान दान:
सोरो सोरो: by now
दान दान: gradually
दोन दोनः fast, rapid
मस्त लिस्ट.
एका गोष्टीमधे होते, ओकाने गा
एका गोष्टीमधे होते, ओकाने गा दोन दोन तामारीमाशिता.
मी ते मराठीमधले दोन दोन रूपये करून पैसे जमवले,
असे लक्षात ठेवले होते
महेश
महेश
छान छान!!
छान छान!!
महेश तुझ्या शाब्दिक कोट्या
महेश तुझ्या शाब्दिक कोट्या
<गायीचा आवाज मो मो कसा> हा इंग्रजितुन घेतलेला उच्चार आहे अस वाटतय.
आणी हे बरेचसे उच्चार अनुनासिक कीवा खास जपानी टोनने केले जातात, त्यामुळे लिहिताना आणी ऐकताना फरक पडतो. जस लिहिल आहे तस मराठि उच्चारात म्हटलत तर बरेचसे श्ब्द कळणारच नाहित.
आजच ट्रेनमधे जाहिरातिमधे वाचलेला नविन शब्द
जिरिजिरि - भगभगणारा (सुर्य) / Running out of patience
आणखी एक शब्द आठवला. गारान
आणखी एक शब्द आठवला. गारान गारान.
घंटा वाजवल्यावर जो आवाज येतो त्यासाठी आहे.
मागे एका कंपनी मधे असताना एक जपानी मनुष्य
आम्हाला सांगत होता की जर काही प्रोब्लेम असेल तर तुम्ही
गारान गारान (हात वर करून घंटा वाजविल्यासारखे करून) केले पाहिजे.
किरिन किरिन असा शब्द आहे का ? एक भा. नि. प्रश्न.
नोर्यो नोर्यो चा अर्थ
नोर्यो नोर्यो चा अर्थ माहिति आहे का कुणाला.
काल लेक म्हणत होती. दोरि घेउन सापासारख हलवुन "हेबिसान नोर्यो नोर्यो" म्हणत होती!
मला शोधुन सापडला नाहि. पण सळसळ असावा का?
नोर्यो नोर्यो चा अर्थ
नोर्यो नोर्यो चा अर्थ माहिति आहे का कुणाला.
सावली ते नोर्यो नोर्यो नाहिये,..न्योरो न्योरो असे आहे.
म्हणजे इंग्रजीमधे wiggle..
साधारण सेम लायनीतला अजून १ शब्द म्हणजे कुनेकुने
हे माझे
हे माझे काही
कारीकारी----कुरकुरीत(क्रंची)
चिकुचिकु----prickling pain मे गा चिकुचिकु इतामु
बोरोबोरो----लक्तरे(कधीकधे ही इमोशन्स ची पण होतात
काचीकाची---टिकटिक/ठकठक
नाकानाका....बरेच नाकानाका बासु गा कोनाई ने!! नाकानाका उमाई ने..
बारीबारी काइहात्सु सुरु पण
बारीबारी काइहात्सु सुरु पण असतं...
बारीबारी काइहात्सु...........
बारीबारी काइहात्सु........... एकदम उत्साहाने धडाधड काम करणे असा अर्थ!!
गारीगारी कुन म्हणुन एक
गारीगारी कुन म्हणुन एक आईसक्रिम आहे!
कोरोकोरो: - कपड्यांवर कधीकधी तंतु येऊन बसतात. ते काढणं अवघड होतं. हे तंतु काढण्यासाठी एक रोल वापरतात.
सो-सु गा बोरोबोरो: -
कॉम्प्युटर प्रॉग्रॅम एकदम कसातरीच आहे. हार्डकोडींग वगैरे....
दारादारा: हे काहीतरी चिकचिकीत टाईप असतं का? वाईट अर्थानं वापरतात.
शाकाशाका: एखादी गोष्ट शाकाशाका हलवणे. प्रिंटरचं कार्ट्रिज बदलताना ते शाकाशाका हलवुन बदलायचं
अरे हो, नाका नाका कस नाही
अरे हो, नाका नाका कस नाही आठवल आधी ?
शिपो शिपो असा काही शब्द आहे का ?
Pages