मॅक्रो टू मायक्रो ईकॉनॉमी व परत

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मुख्य घटनाक्रम व त्यांचे परिनाम.

१ हाऊसिंग मार्केट बबल तयार झाले (केले!)
परिनाम
१. लोकांनी जास्त्तीस जास्त लोन घ्यावे ह्यासाठी ईंटरेस्ट रेट्स खुप कमी केले गेले.
२. घराच्या किमती आणखी वाढल्या. त्यामुळे परत लोक गडबड करुन लगेच घर विकत घेऊ लागले.
वरिल दोन्ही गोष्टी ह्या ऐकमेकांस पुरक असतात. सध्या भारतात हिच स्तिथी आहे. पण त्यावर वेळेवर रोक कसा लावला गेला हे सुध्दा पुढे लिहीन.
३. कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्‍याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते.

२. बँकाना जास्तीत जास्त कर्ज देता यावे व लगेच ते वितरीत (डिस्बर्स) करता यावे, या साठी ते अनेक नियम अशा काळात शिथील करतात.
परिनाम :
१. ज्या लोकांची परतफेड करन्याची क्षमता नाही अशांना कर्ज दिले जाते.
२. ज्या देशात प्रत्येक व्यक्तीसाठी ईंट्रेस्ट रेट वेगळा असतो ( जसे अमेरिका) तिथे ज्यांची क्रेडीट हिस्ट्री चांगली नाही त्यांना महागाचे लोन मिळते

३. ह्या बँकांकडे अमर्यादित पैसा नसतो. त्यांना देखील कुठून तरी कर्ज काढावे लागते. मग ते मोठ्या वा परकिय वित्तसंस्था कडे कर्ज मागायला जातात. कर्जाचे तारण (सेक्युअर्ड लोन) म्हणून कर्जदात्याची मालमत्ता ह्या बँका गहान ठेवतात.

आता ह्या घटनाक्रमात तसे गैर काहीही नाही. तुम्ही कर्ज घेणार, बँक कर्जे घेणार, तुम्ही परत करणार, बँक दुसर्‍या बँकेला परत देणार म्हणजे ही सायकल पुर्ण. ह्या सायकलला आणखी एक उपचक्र आहे ते म्हणजे ठेवी. सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते.

असेच दोन चार वर्ष जातात व अचानक प्रॉपट्री मार्केट पडु लागते. ( म्हणजे बघा तुम्हाला डेक्कन ला घर घ्यायचे आहे, तुम्ही पहिल्यावर्षी ३० लाख, दुसर्या वर्षी ४० नंतर ५०, ६०, ८० लाखापर्यंत घर घ्यायला तयार होता पण आता घराची किंमत २ करोड झाली तर तुम्ही घेनार का? नाही. म्हणजे डिमांड कमी. असे दोन पाच वर्षे जातात. ईकॉनॉमी थोडी शांत व्हायला लागते. सरकार देखील ईकॉनॉमी कुल डाऊन करन्याकरता व्याजदर वाढविते, परिनामी बँका देखील व्याजदर वाढवतात, तुमचे कर्ज फ्लेक्झी दराने असेल तर महाग होते सर्व बाबतीत तुम्हीही खर्च करायला मागे पुढे पाहाता, असे होत होत हाऊसिंग बबल फुटत जाते.

त्याचे परिनाम व कारण पाहुयात.

४ व्याजदरात वाढ
परिनाम
१. कर्जदार कर्जाची परतफेड वेळेवर करु शकत नाही.
२. घराची डिमांड कमी होते व किंमत हळु हळु कमी व्हायला सुरुवात होते.
३. परिनामी क्रेडीट क्रंच निर्मान होतो. म्हणजे होत काय की तुम्ही बँकेला पैसे देत नाही, तुमची बँक वित्तसंस्थेला (स्वकीय वा परकिय) पैसे वापस देऊ शकत नाही, त्या संस्था आणखी पैसे तुमच्या बॅंकेला देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज खुप महाग होऊन फक्त जे खरच परतफेड करु शकतात त्यांनाच मिळते.

२००७ च्या जूलै महिन्यात बेअर स्टर्ण्स नावाच्या वित्तीय कंपनीचे दिवाळे निघाले कारण त्यांना वर दिलेल्या कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत, शिवाय ते स्टुंडन्टना देखील लोन देत त्यामुळे त्यांचा कर्ज वापस मिळन्याचा लिड टाईम हा खुप होता. ऐवढी झळ ते सोसु शकले नसावेत म्हणुन त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली.
ह्या सायकल मध्ये आपण स्वत बद्दल व आपल्या बँकेबद्दल पाहीले आता थोडे मोठ्या वित्तीय संस्थे बद्दल पाहुयात.

मोठ्या वित्तीय संस्थेचा कारभार हा खुप मोठा असतो. त्यांचा भात्यात अर्थ कमविन्याचे अनेक मार्ग असतात. त्यातील काही
१. दुसर्या बँकाना दिर्घ लोन देने.
२. लघु लोन देने
३. हेज फंडस
४. रिटाअरमेंट प्लान्स
५. सिड मनी ( कॅपीटल पुरविने)
६. ईन्व्हेस्टमेंट बँकींग.

जुन्या मोठ्या बँकाच ह्या अशा वित्तीय संस्था होतात. जसे गोल्डमन सॅक्स, लिहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन, भारतातील आय सी आय सी आय. अशा सर्व कंपन्याचे शेअर्स हे मार्केट मध्ये ट्रेड करत असतात. त्यांचा स्वतच्या ट्रेड पण रोजचा शेकडो मिलीयन्स चा असतो.

वर पाहीलेल्या सायकल मुळे ह्या संस्था ईतर बँकांना पैसे वापस देन्याविषयी लकडा लावतात, बाजारात हया विषयी कळते. गुंतवनुकदार मग अशा दोन्ही बँकांचे ( म्हणजे पहिली बँक जीने आपल्या कर्ज दिले, व दुसरी जिने पहिलीला कर्ज दिले) शेअर्स विकायला सुरुवात करतात. दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्‍या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो. (फ्युचर्स व ट्रेडींग मध्ये कोणीही शॉर्ट व लाँग जाऊ शकते). गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात.

वर आपण लिक्वीडीटी क्रंच कसा आला ते पाहीले. पण दुसर्या संस्था ज्यांनी ह्या वित्तीय संस्थेला देखील पैस दिलेले असतात. ( ईथेच फ्रेडी मॅक, व फॅनी मे) येतात ते त्या वित्तीय संस्थाचा पाठीमागे लागुन परत ऐकदा क्रेडीट क्रंच करतात. लोन महाग होते. दुसर्‍या वित्तीय संस्था हे पहिल्या व दुसर्‍या बँकेकडुन आपल्या ठेवी, गुंतवनुक काढुन घ्यायला लागतात व गुंतवनुक की लोन मध्ये न करता ट्रेझरी (म्हणजे सरकारी बॉन्डस) व सोने ह्यात केली जाते. परिनामी पहील्या दोन्ही बँकेकडे पैसा न राहुन त्या दिवाळखोर बनतात.

वर मी हे चक्र फक्त ऐक बँक, ऐक वित्तीय संस्था व दुसरी आणखी मोठी संस्था ह्यांना घरुन लिहीलेय. प्रत्यक्ष बाजारा मध्ये कित्येक बँकांचे पाय ऐकेमेकांमध्ये अडकलेले असतात. तुम्ही हे उदा कितीही लाबंबू शकता. व परदेशी बँकांना गुंतवु शकता.
जो पर्यंत सायकल ब्रेक होत नाही ( पण कर्जे वाप्स करने थांबत नाही) तो पर्यंत हे काहीही कळत नाही. फ्रांन्स चा जुन्या बिऐनपी पारीबा बँकेला सबप्राईम रेटस मुळे मागच्या वर्षी २ बिलीयनचा हिशोब लागला नाही. कारण त्यांनी ज्या बँकानां कर्ज दिले, ते त्या बँकानी वापस केले नाही. परिनामी बिऐनपी ला ते २ बिलीयन राईट ऑफ करावे लागले.
फ्रेडी व फॅनी ह्या देखील अशाच वित्तीय संस्था आहेत त्यांनी ५ ट्रीलीयन डॉलर्सचे कर्ज वितरन केले आहे, त्या होम सिक्युरिटीस आधी साध्या बँक्स, नंतर लिहमन, नंतर फ्रेंडी , नंतर आणखी कुठली बँक अशा प्रवास करत आलेल्या आहेत. म्हणजे मुळ कर्जदाराने जर कर्ज वापस केले तर हा प्रश्न ऊठलाच नसता पण कोणाला कर्ज द्यायचे व कसे द्यायचे ह्या घरबंध न पाळल्यामुळे हा प्रॉब्लेम आणखी मोठा झाला.

आता गमंत अशी आहे झाली ही ह्या संस्था अनेक दुसर्‍या देशात पण गुंतवनुक करतात जसे भारत, ब्राझील, जपान, वैगरे. आणि त्यांना त्यांचा स्वतचा देशात केडीट क्रंच आल्यामुळे अनेक वित्तीयसंस्थांनी त्या दुसर्या देशातील गुंतवनुक अचानक गेल्या महीन्यात काढुन घ्यायला सुरुवात केली कारण त्यांना ईकडे पैसा हवा होता. त्यामुळे ह्या सर्व देशात पण क्रेडीट क्रंच निर्मान झाला. तेथील मार्केट कोसळले. डॉलरचा रेट परत ऐकदा ४७ पर्यंत जाऊन आला.

ह्या सर्व घोळात मोठ्या बँका प्रथम बळी ठरतात कारण त्यांचे व्यवहार हे अनेक छोट्या बॅकासोबत असतात. ह्या सर्व बँकाना व वित्तीय संस्थांना पैसे देता यावे म्हणून ७४० बिलीयन डॉलर्सचा प्लान तयार केल्या जात आहे. पुढील काही महीने / वर्षे ह्याचा परिनाम राहनार आहे. अमेरिकन सरकार अशा सर्व बँकाना पैसे देऊन विकत घेनार आहे.

भारतातही २००३ च्या सुमारास प्रॉपर्टी बबल सुरु झाले आहे. २००४ मध्ये मी घर घेताना ७ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते, तेव्हा ते अजुन कमी होईल असे बोलले जात होते. २००५ पर्यंत जी घर साधारण २५ लाखाला मिळायची ती ४० च्या पुढे गेली व २००८ मध्ये हीच घर ८० लाखाला मिळतात. (माझ्या घराची आजची किंमत)
पण भारतात सरकारने उपाय योजना आखुन २००५ नंतर लगेच व्याजदर वाढवुन ९ टक्के केला होता. शिवाय कर्ज देताना देखील बँका घेनार्‍याची परत करन्याची ताकद आहे का नाही हे पाहुन देत होत्या. त्यामुळे आपल्या कडे हा प्रॉब्लेम झाला नाही.
कर्ज देताना सर्व बँका ह्या बॅड डेट्स ( बुडीत खाते) ह्याची तरतुद करतात पण ह्या अमेरिकेत ती प्रोव्हीजन हवी तेवढी केली गेली नाही. शिवाय लिहमन ब्रदर्स, ऐ आय जी सारख्यांनी तारण नसताना देखील दुसर्‍या बँकांना पैसे पुरविले त्यामुळे जेव्हा खरच क्रंच निर्मान झाला तेव्हा त्यांचाकडे विकायला देखील काही उरले नाही व दिवाळखोरी जाहीर करन्यावाचुन पर्याय उरला नाही. ह्या मोठ्या संस्थानी दिवाळखोरी जाहीर केली की छोट्या गुंतवनुकदारांचा विश्वास कमी होतो व ते बाजारातुन भांडवल काढुन घेउन सोने वा बॉन्डस मध्ये ठेवतो त्यामुळे हा प्रॉब्लेम द्विगुणीत (डबल फोल्ड) होतो व मार्केट आणखी पडते.

हे कोणामुळे झाले, का झाले. तर ह्या वर उत्तर हे सर्वामुळे झाले, कोणा ऐकामूळे हे होऊ शकत नाही. कारण ह्या मॅक्रो लेव्हल पासुन मायक्रो लेव्हल पर्यंत सर्वजन तेवढेच गुंतलेले असतात. अमेरिकेकडे जगातील वित्तीयसंस्थाचे लक्ष, त्यामुळे हा प्रॉब्लेम जागतीक होऊ घातलाय. पण युरोपीयन बँका ह्या सक्षम असल्यामुळे त्यांना तेवढा फरक पडनार नाही, दोन पाच बिलीयन राईट ऑफ करावे लागतील. ईतकेच.

(हा लेख मी निवडनुकीची चर्चा करताना मध्येच ऐका तासाचा अवधीत लिहीला आहे त्यामूळे व्याकरनाचा भरपुर चुका असन्याची शक्यता जास्त आहे. पण ह्यातुन ईकॉनॉमी कशी चालते, बँक रेट का वाढतात, कमी होतात, बँका का बंद पडतात. हे कळु शकेल अशी आशा.)

प्रकार: 

३० वर्षांपुर्वी जपानमध्ये असेच झाले होते जे त्यांनी मार्केट प्रमाने होउ दिले व भांडवलशाही च्या मुख्य मुल्यांना जपले.

भारतातही असेच झालेले आहे हर्शद मेहताच्या वेळेस. भारताच्या त्या वेळच्या ईकॉनॉमीच्या परसेंटमध्ये तो घोटाळा खरच खुप मोठा होता. ऐसीसीचा ऐक शेअर २०० रु ९९०० रुना गेला होता तेव्हा. जस्ट ईमॅजीन ज्यांनी ऐसीसी घेतला त्यांचे काय झाले असेल. हा फक्त ऐक उदा दाखल शेअर दिला. असे शेकड्यांनी होते. तेव्हा लगेच भारतीय ईकॉनॉमीस्ट नी सर्व बँका ताब्यात घेतल्या नाहीत, काही बँका बुडाल्या, तर काही कायमच्या तोट्यात गेल्या, जनरल पब्लीकची नुकसान भरपाई व्हाव्ही म्हणुन सरकार ने ऐसीसीच्या शेअर्सना परत ९९०० वर नेले नाही, जो पडला तो पडलाच. कारण तेव्हा आपन ऐक मुख्य तत्व फॉलो केले जे म्हणजे बिझनेस मध्ये नफा जसा तसाच तोटा
>>>>
केदार,
माझ्यामते... भारताची तेव्हाची गोष्ट वेगळी होती.. आपण जागतिक फायनान्शियल मार्केट डिक्टेट करत नव्हतो (अजूनही करत नाही). शिवाय भारतात सामान्य जनता शेअर्स मधे खूप इन्वेस्ट नाहि करत.. अमेरिकेत सगळ्यांचे पेन्शन (IRA, 401K) शेअर मार्केट वर अवलंबून आहे.. आताच्या बेअर मार्केट मुळे जे लोक येत्या २ वर्षात रिटायर होणार आहेत त्यांचे काही खरे नाहि.
तसेच अमेरिकेची इकॉनॉमि वॉल स्ट्रीटवर अवलंबून आहे... त्यामुळे सरकारने interfere करणे माझ्यामते खूप गरजेचे आहे..

मला फक्त १ गोष्ट नाही समजली.. रोज शेअर मार्केट एवढे पडत असून पण circuit लावत नाहियेत.. भारतात त्यामुळे सामान्य इन्व्हेस्टर थोडाफार सुरक्षित आहे... at least लोकाना पैसे काढून घ्यायला वेळ तरी मिळतो...

आज सकाळी डाऊ ने ६०० ने पडुन ८००० ला ब्रेक केले, लगेच रिकव्हरी चालु झाली आहे. (लिहीपर्यंत, + मध्ये येऊन परत -१०३ ). माझ्या स्वत:च्या मते, आपण बॉटमच्या जवळ आहोत पुढच्या र्रॅलीवर खरेदी चालु करावी जर चांगल्या कंपन्या असतील, जसे ऍपल, जिई तर आता २५ टक्के खरदी करावीच.

आर्च धन्यवाद. तु कधीही, काहीही विचार, मी व्यवस्तिथ उत्तर देन्याचा प्रयत्न करीन.

आशी बेस्ट लक. Happy गो अहेड विथ २५%

मुकूंद माफी काय मागयची, जे वाचनिय आहे ते वाचनियच. मराठी असो वा ईंग्रजी. छान लेख. आता तुमच्या प्रश्नाकडे

१: स्टॉक मार्केटची फेअर मार्केट व्हॅल्यु क्वांटिफाय करता येते का? करता येत असेल तर सध्याच्या मार्केटमधे ती कीती असावी? >>>
नाही. ती करता येत नाही. ह्याची कारणे प्रश्नातच आहेत कारण फेअर म्हणजे काय हे कोण ठरवनार? रिअर लाईफ उदा पाहू.

HDIL ही भारतातली लिंडीग रिऍलिटी कंपनी आहे. सात महिन्यापुर्वी जेव्हा ऐक समभाग १२०० रु ला होता तेव्हा सर्वजन म्हणत होते की १६०० फेअर व्हॅल्यू आहे. ती कशी ठरवनार तर त्या ईंडस्ट्रीच्या टोटल पी ई वरुन व त्या कंपनीच्या स्वतःच्या उत्पनावरुन (eps). मग जर ईंडस्टी पिई समजा १५ असेल आणि ती कंपनी जर खरच चांगली असेल तर लोक त्या कंपनीच्या उत्पनाच्या (eps) च्या ३० पटीत पण द्यायला तयार होतात कारण भविष्यातील उत्पन नजरेसमोर ठेवले जाते. हा झाला ऐक भाग. दुसरा भाग म्हणजे त्या शेअरला असलेला उठाव. म्हणजे डिमान्ड ऍन्ड सप्लाय. जर डिमांड खुप जास्त असेल तर हा शेअर कदाचीत १८०० पण जाईल व लोकांना ती फेअर व्हॅल्यू वाटेल. ( हा समभाग १४०० पर्यंत गेला होता).
कट टू
काल हाच समभाग तेच अर्नींग असताना फक्त रु ९६ ला मिळत आहे. (ऑफकोर्स मध्ये ऐक बोनस ईश्यु झाला पण तो ऐकास ऐक न्हवता). आजचा पिई हा २.२ आहे. म्हणजे बघा अर्नीग तिथेच आहे पण बाजारात पसरलेल्या भितीमुळे हा समभाग कोसळतोय.
मग त्याची फेअर व्हॅल्यू काय? -- जी त्या क्षणाला मार्केट ठरविते ती.

शेअर मार्केट हे स्वत काही उत्पादन करत नाही त्यामुळे ईथे तिसरा फॅक्टर येतो तो म्हणजे भितीचा. (वा भविष्यातील अर्नीगंचा पण) त्यामुळे ह्या बाजारात फेअर मार्केट व्हॅल्यु क्वांटिफाय करता येत नाही.
उद्या जर थोडी डिमांड वाढली तर लगेच हा शेअर २५० ला जाणार. ( भारतात जर कोणी ईन्वेस्ट करत असेल तर hdil Happy )

२: पण या मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटिजची किंमत कोण ठरवणार?अश्या बॅड सिक्युरिटीजची फेअर मार्केट व्हॅल्यु रिव्हर्स ऑक्शन मधे ठरवता येते काय? संकटात आलेल्या बँक्स व फायअँशिअल कंपनीजनी.. त्यांच्या अकाउंटिंग बुक्समधे... तश्या बॅड सिक्युरिटिजची किंमत... काहीही मांडुन ठेवली असेल.... >>>>>>>>>>

तुम्ही जो ऍनॅलीसीस केला आहे तो खरा आहे. त्याचे उत्तरही तुम्हीच व्यवस्तिथ मांडले आहे. माकडांचा हाती कोलीतच जाणार पण त्याने थोडा फायदा लोकांना पण होनार, त्याची दुसरी बाजु मी मांडतो.

त्यांचा सिक्युरीटीची किंमत काहीही मांडता येत नाही. उदा पाहू
नेपरव्हिल मधील ऐक घर २ वर्षापुर्वी जर ५००,००० डॉलर ला विकले गेले असेल तर कर्ज देताना त्याची व्हॅल्यू ही ५००,००० होती म्हणजे सिक्युरीटीची व्हॅल्यू पण साधारण ५००,०००. म्हणजे त्या बँकेने पॅकेज करताना ती ५००,००० ला केली व विकली. आजची व्हॅल्यू ही कदाचित ४००,०००च आहे म्हणजे १००,०००चा लॉस.

रिव्हर्स ऑक्शन बाजारात (लोअर लेव्हलला, ते तसे होईलच पण फक्त सरकार व ऐन्ड बँकेकडे ) जर केले तर हाउसिंग मार्केटवर परत ऐकदा प्रॉब्लेम येईल म्हणजे वरच्या उदा किंमत ४ लाख ठरवली जर घरमालकाने ५ लाख का द्यावी असा प्रश्न सर्वजन विचारु शकतील. त्यामुळे ५ लाख हीच व्हॅल्यू ठेवावी लागेल. व बँकेला तसे पैसे द्यावे लागतील. ईथे सरकार असा विचार करतेय की निदान ५ वर्षानंतर ती व्हॅल्यु परत ऐकदा ५ लाख होनार व तेव्हा सरकारचा फायदा होईल. म्हणजे टॅक्सपेअर्सना परत पैसे मिळतील.

हा १९३० सारखा प्रॉब्लेम नाही कारण ईथे क्रेडीट क्रंच निर्मान होऊन ग्रिड लॉक झालेय त्यामुळे सर्व बँका सिस्टीमॅटीकली पडत आहेत. ऐकदा का लिक्वीडीटी निर्मान केली की हा प्रॉब्लेम थोडा फार सुटेल. आधी लिहील्याप्रमाने ईंट्रेस्ट रेट कमी केलेच आहेत. सरकारने शॉर्ट टर्म लोन जरी दिली, आता निदान ४०० बिलीयनची तर हा प्रॉब्लेम सुटन्यास मदत होईल, निदान ३ वर्षे तरी हे चालेलच.

गंमत म्हणजे ह्या सरकारला हा निर्णय घेता आला नाही की लोकांचे ३ ट्रिलीयन पेक्षा जास्त पैस (शेअर बाजारातले) वाचवावेत की लगेच ४०० बिलीयन द्यावेत. त्यांनी चर्चा करन्याच्या जो घोळ घातला त्यामुळे सर्व लोकांचे पैसे बाजारातून नाहीसे झाले. ईट वॉज टाईम टू ऍक्ट, बट दे लॉस्ट द बस. ऐवढेच माझे म्हणने असेल. ईंट्रेस्ट रेट कमी करायला पण ईतके दिवस का लावले कळत नाही.

आपण सर्वजन (बहुतांश) कॉम्प शी निगडीत आहोत. जर डेटाबेस डेड लॉक डिक्टेट झाले तर तुम्ही काय करता? नेमके तेच त्या सरकारने करायला हवे होते.
ईराक वॉर पेक्षा जास्त मुर्खपणा गेल्या दोन आठवड्यात अमेरिकी सरकारने दाखवला. कंट्रोलिंग बॉडी म्हणून त्यांनी काहीतरी करणे आवश्यक होते, जे त्यांनी केले नाही.

केदार खूप छान उत्तर.. पण तो प्रश्न अनुत्तरीत राहिला की इथे सर्किट ब्रेकर असतो का आणि नसल्यास तो का लावत नाहीत? वेळ झाला की सांग..

इथे सर्किट ब्रेकर असतो की, पण मला वाट्ट तो १०% एक दिवसत डाउन झालं तर लावतात असा काहीतरी रुल आहे. तेवढा एका दिवसात कुठे गेलाय अजून Proud

केदार, मी इकडे कधीही येत नाही. याचे कारण मला अर्थशास्त्रात इंटरेस्ट नाही असे नाही तर मला यातले काहीच समजत नाही.

सध्या फक्त टी व्ही वर बघतेय सगळा गोंधळ... मला फक्त (विंडोज फॉर डमीज च्या धर्तीवर) इतकेच साध्या सोप्या भाषेत सांगशील का की या सार्‍याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात... हे सगळे worst stage ला गेल्यावर (म्हणजे अजून गेले नसेल तर) काय होईल?

रोज शेअर मार्केट एवढे पडत असून पण circuit लावत नाहियेत >>>

समजा मार्केट बंद केले तर काय होईल, भितीनी परत ऐकदा उघडल्यावर कोसळेल, मग आणखी भितीच. मैत्रेयीने लिहील्याप्रमाने १० टक्क्यावर सर्कीट आहेच. पण आईसलॅन्ड नी त्यांचे मार्केट दोन दिवस बंद ठेवले, उघडल्यावर परत ऐकदा पडले. त्यांनी गेल्या आठवड्यात ऐक नविन बँकच उघडली व तिला सर्व मोठ्या बँकाना त्याब्यत घ्यायला सांगीतले. म्हणून मार्केट बंद ठेवने पर्याय नाही तर मार्केट मध्ये ऐक्स्ट्रा फंड्स त्वरीत आनने हा पर्याय आहे.

कुठल्याही वस्तुचा भाव ठरवायला विक्री करनारा व विकत घेनारा उपलब्ध असावा लागतो. विकत घेनारा सध्या उपलब्धच नाही त्यामुळे मार्केट गडगडत आहे.

सुपरमॉम ह्या गोष्टींमुळे आपल्या सर्वांच्या जिवनावर परिनाम होनार आहे.
१. मार्केट मध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे कंपन्यांना पैसे मिळनार नाहीत. त्यामुळे त्यांची वाढ थांबेल.
२. पैसे कमी असल्यामुळे, खेळते भांडवल (वर्कींग कॅपीटल) कमी, म्हणून दोन परिनाम -
१. लो क्वालीटीच्या कच्चा मालाची खरेदी.
२. अनेकांना रोजगारावरुन काढुन टाकले जानार वा पगार कर्मी होनार.
३. नैराष्य वाढिस लागनार.
३. नोकरदारांकडे पैसे नसल्यामुळे ते वस्तु खरेदी करनार नाहीत परिनामी मालाची उचल होनार नाही व कंपन्यांकडे पैसे येनार नाहीत ( नं १ रिपीट होईल).
४. द्यायल पैसे नसल्यामूळे घरकर्ज वा ईतर कर्ज लोक वापस करु शकनार नाहीत परिनामी बँकाकडे पैसे येनार नाही. व ( नं १ रिपीट होईल ).

नैराष्य वाढीस लागले की आत्महत्येसारखे प्रकार बळावतात.

हे सर्व ऐका चक्रात असल्यामूळे परिनाम भयकंर होतात.

मी कन्स्टलींग कंपनीत काम करतो. गेल्या ३ महिन्यांपासुन अनेक कन्स्टलींग कंपन्यांकडे प्रोजेक्टस नाहीत कारन ज्या कंपन्या प्रोजेक्टस देतात त्यांचा कडे आता सर्व्हीसेस (कॉम्प) ला द्याय्ला पैसा नाही. अनेक लोकांना टर्मीनेट, ले ऑफ केलेले मी पाहीलेय. (माझ्या व ईतर मोठ्या कंपन्यातून) हे अजुन जास्त भयानक होत जाईल. ज्यांना जास्त पगार आहे ते गरज नसताना धोक्यात (नजरेत) येऊन त्यांचे जॉब जानार. माझ्या ७ रोजच्या मिंत्रापैकी सध्या दोघांना प्रोजेक्ट नाही, दोघांना काढले आहे व तिघेच प्रोजेक्टवर आहेत. % बघ किती खराब झालेय.
व्हर्स्ट स्टेज ऑलरेडी सुरु झालेली आहे. पण घाबरुन न जाता काही गोष्टी केल्या तर आपण यातुन व्यक्तीगत पातळीवर बाहेर पडु. जसे
१. सर्व ऐक्स्ट्रा खर्च बंद
२. सेव्हीग करन्यावर जास्त भर. निदान ६ महिने जॉब लेस असताना स्वतला पैसे मिळू शकतील ऐवढी व्यवस्था करने.
३. प्रत्येक खर्च का करायचा हा प्रश्न आपल्या सहचार्‍याने विचारलास पाहीजे. यात कंजुषी नाहीतर पुढील अनियमीत भविष्याला तोंड देन्याची तयारी करने.

केदार, फार सोप्या भाषेत समजावतोस तू.
आता market मध्ये पैसे pump केल्याने थोडा तरी गोंधळ थांबू शकेल काय? They missed the bus हे खरी असले तरी सध्या market मध्ये पैसे circulate व्हायलाच हवेत ना?

हो पैसे पम्प केल्यावर घसरने कमी होईल. मग मार्केट साईडवेज मध्ये जाईल. ( साईडवेज म्हणजे कधी कमी कधी जास्त. रेंजबाउंड मध्ये जसे ८२०० ते ८५०० हे उदा आहे). आज जॉनरावांनी त्याने भाषण केल्याबरोबर मार्केट १०७ पॉईंट्सने पडले. त्याने गप्प बसलेलेच् बरे. Happy

मी जेव्हा circuit बद्दल म्हणालो तेव्हा individual शेअर्स बद्दल बोलत होतो. इथे शेअर पडायला आणि वाढायला काहिच मर्यादा नाहि.

उपास फार छान आणि उपयुक्त लिंक. अमेरिकन ईकॉनॉमी समजावून घेन्यासाठी १ तास वर्थ. मस्ट रिड.

केदार छान माहिती मिळाली.. धन्यवाद.

नमस्कार
केदार अतिशय उपयुक्त लेख.
मी नविनच शेअर बाजारात गुंतवणुक करायला सुरवात केली आहे.
या परिस्थितित भारतात कोणत्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसे टाकावेत.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा फार फायदा होइल असे वाटते.
तु वर एच्डी आय एल सुचवली आहेस, पण हाउसिंग सेक्टर फार वाढेल असे वाटत नाही ना २-३ वर्षात.
मग हिचा भाव कसा वाढेल.

केदार... तुझा लेख वाचून मार्केटबद्दल खूप उपयुक्त माहिती मिळाली. त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद
प्रत्येक पोस्टगणिक छान विश्लेषण.
मुकुंदाची पोस्ट डोळे उघडणारी होती... धन्यवाद

आज BSE ९९७५ला बंद झालाय... (-६०६) आणखी कीती रसातळाला जाणार?

ऐकदाका हा थोडा घोळ निस्तरला की भारतात परत लोक प्रॉपर्टीच्या मागे लागनार. भारत आणि येथील बँकींग मध्ये मुलभूत फरक म्हणजे सब प्राईमचा धोका भारतात बिलकुल नाही.
HDil सध्या ३ वर ट्रेड करत आहे. ते नॉर्मल ८ ते १० पर्यंत गेले तरी भाव २५० होनार. HDil चे अकाऊंटस बघीतले तर तो ऐक ख्पु चांगला शेअर आहे अस दिसेल. तो सध्या खुप खाली गेला कारण जागतीक हाऊसिंग मार्केटची भिती. पण वर लिहील्याप्रमाने भारतात तसे नाही. ह्या भितीमुळे लोक हा शेअर डम्प करत आहेत. ऐकदाका ही भिती थोडी ओसरली की व्हॅल्यू इन्वेस्ट करनारे लोक ह्याला विकत घेनार. हा समभाग येत्या सहा आठ महिन्यात २५० ते ३०० पर्यंत जाईल असे वाटते.

kedar though Indian banks are not affected by sub-prime; dont you think there are high chances of they getting affected if people start loosing their jobs. Especially in IT, job market is very unstable. Sooner or later Indian IT service sector is bound to get affected by US Losses, thats what i feel.

माणसा तुझे बरोबर आहे. पण त्याची दुसरी बाजू, म्हणजे कॉस्ट बेनीफिट भारतीय आय टि कंपन्यांना पण मिळू शकतो. गेल्या काही दिवसात मी अनेक क्लायंटस्ना ऑफशोअर रेट प्रपोझल दिले की ते ऐकदम उत्साही होत आहेत. ईथे १४० देन्यापेक्षा ३५-४० ला लोक तयार होत आहेत. गेल्या तिन महिन्यात असे अनेक प्रोजेक्ट्स ऑफशोअरला गेले. तसेही गेल्या २ वर्षात सेंसेक्स वा शेअर मार्केट हे आय टी मुळे वर गेलेले नाहीये तर ईन्फ्रा व ईतर गोष्टींमुळे. माझ्या मॅकॅनिकल ईंजीनिअर असलेल्या मावस भावाला सुरुवातीचा पगार ४ लाख मिळत आहे, माझ्या सि ऐ कलीग असनार्‍या मित्राला ऐक बॉल बेअरींगच्या कंपनी मध्ये १३ लाख मिळत आहेत. त्यामूळे फक्त आय टी कडे पैसा आहे हे गणित बदलत आहे.
आपल्या ईकॉनॉमीची स्वतची ग्रोथ अजुनही ८ टक्के राहनार आहे. हा पैसा अशा लोकांकडुन आता जास्त येत आहे. पण तू म्हणतोस तसा थोडाफार परिनाम तर होनारच. त्यामूळे मी लाँग टर्म साठी गुंतवा हेच सांगत आहे. शॉर्ट टर्म मध्ये काही खर नाही आता.

हया लेखात बर्‍याच चूका आहेत. Analysis फारच crude आहे.
e.g.
1. Bear Stearns चे दिवाळे July 2007 मधे नीघाले नसून March 2008 मधे नीघाले.
2. "जुन्या मोठ्या बँकाच ह्या अशा वित्तीय संस्था होतात. जसे गोल्डमन सॅक्स, लिहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन, भारतातील आय सी आय सी आय". हे वाक्य चूक आहे. Goldman, Lehman , Bear Stearns ह्या Investment Banks असून , JPMorgan and ICICI ह्या Commercial Banks आहेत.
3. "गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात". हे वाक्य चूक आहे. CDS चा वापर 'कव्हर' करण्यासाथी होतो, CDOs चा नव्हे.
4. "अमेरिकेकडे जगातील वित्तीयसंस्थाचे लक्ष, त्यामुळे हा प्रॉब्लेम जागतीक होऊ घातलाय"हे वाक्य चूक आहे. कारण नूसते "लक्ष " असून प्रॉब्लेम जागतीक कसा होनार ?
5. "पण युरोपीयन बँका ह्या सक्षम असल्यामुळे त्यांना तेवढा फरक पडनार नाही, दोन पाच बिलीयन राईट ऑफ करावे लागतील " हे वाक्य चूक आहे. How about Bank of England's rescue of "Northern Rock" , problems with IKB bank, which was Deutsche bank's SIV and so on...
.....

आणि अश्या बरेच चूका व चूकीचे विशलेशण.

अमित रहाळकर

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद अमित आणि मायबोलीवर स्वागत.

गोल्डमन, जेसी ह्यांना मी बँका ह्या ऐकाच कॅटॅगीरी मध्ये टाकन्याचे घाईघाईत लेख लिहीने हे कारण आहे, त्या काय करतात हे मला माहीत नाही हे नाही, पण तरीही ते लिहीयाला पाहीजे होते. पुढच्या लेखात आपली सुचना पाळेन.

ह्या लेखाचा मूळ उद्देश " पण ह्यातुन ईकॉनॉमी कशी चालते, बँक रेट का वाढतात, कमी होतात, बँका का बंद पडतात. हे कळु शकेल अशी आशा." हा होता. लेखाचा मुळ गाभा मात्र आपणही तसाच सोडलात व ईतर वाक्यांवरच लिहीलेत. मी ते सायकल चुकीचे लिहीले नाही अशी आशा, नाहीतर आपण थोडा प्रकाश पाडाल का? येथील वाचकांना त्याचा फायदा होईल.

"गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात". हे वाक्य चूक आहे. CDS चा वापर 'कव्हर' करण्यासाथी होतो, CDOs चा नव्हे >>>

ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत व दोन वेगवेगळ्या पोस्ट मध्ये लिहीली आहेत त्यांचा ऐकमेंकाशी संबध न्हवता. दुसरे पोस्ट ऐ आय जी ला का घेतले (CDOs) त्यासाठी लिहीले होते. ह्या दोन्हीचा ऐकमेकांशी संबध आपण का लावला हे कळले नाही.

बेअर स्टर्न्स बद्दलचा डेटस लिहीताना चुक झाली पण त्याचे तीच्या बाकीच्या तपशिलात चुक नाही. तसेच युरोप मधील बँकाबाबतीत देखील मत नोंदवता चुक झाली.

ऑन लाईटर नोट चुकीचे विश्लेषन आजकाल सर्वच ऍनॅलिस्ट करत आहेत नाहीतर ही वेळच आली नसती. Happy

मला अजून मराटीत टाईप करणे पटापट जमत नाही...I hope you do not mind if I post my responses in English.
I appreciate your openness to take on critisizm , and I hope you take the below in the right spirit.

(contd. from my previous comments)

6. "लोकांनी जास्त्तीस जास्त लोन घ्यावे ह्यासाठी ईंटरेस्ट रेट्स खुप कमी केले गेले." This is wrong, since it was the other way round. The interest rates were brought down to address recession and an unintended sideeffect was the 'asset bubble'.

7. "बँकाना जास्तीत जास्त कर्ज देता यावे व लगेच ते वितरीत (डिस्बर्स) करता यावे, या साठी ते अनेक नियम अशा काळात शिथील करतात".
This is wrong. Rules were not relaxed to help disburse the loans! Because of securitization , banks were able to offload/'flip' loans from there balancesheet and hence they could provide for even more loans.

8. "कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्‍याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते. "This is wrong. The home is 'always owned' by the bank, up and until the mortgage is fully paid by the mortgage-holder.

9. "सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते". You are indicating that this is applicable for all the banks. That is wrong, since the main culprits in this cycle were Investment banks ( Bear Stearns , Lehman) which are not allowed to take customer deposits. Only commercial banks can do it. How would you explain your sentence in the context of Investment banks?

10. "परिनामी क्रेडीट क्रंच निर्मान होतो. म्हणजे होत काय की तुम्ही बँकेला पैसे देत नाही, तुमची बँक वित्तसंस्थेला (स्वकीय वा परकिय) पैसे वापस देऊ शकत नाही, त्या संस्था आणखी पैसे तुमच्या बॅंकेला देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज खुप महाग होऊन फक्त जे खरच परतफेड करु शकतात त्यांनाच मिळते" . Pls apply this logic to Bear Stearns and Lehman ( remember they are investment banks and they do not lend to the consumer, neither they take deposits from the consumer) and let me know whether your logic holds true !
In Jan2007 the 30 years mortgage rate was 6% , most recently it was 6.8%. Would you call that expensive ? No. Credit crunch is not about 'loans getting dearer'. Credit crunch is more about lack of inter-bank trust.

11. "२००७ च्या जूलै महिन्यात बेअर स्टर्ण्स नावाच्या वित्तीय कंपनीचे दिवाळे निघाले कारण त्यांना वर दिलेल्या कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत, शिवाय ते स्टुंडन्टना देखील लोन देत त्यामुळे त्यांचा कर्ज वापस मिळन्याचा लिड टाईम हा खुप होता" . This is wrong. Remember Bear Stearns is an Investment bank. It doesnot lend to consumer, so it does not lend to students.

12. " फ्रांन्स चा जुन्या बिऐनपी पारीबा बँकेला सबप्राईम रेटस मुळे मागच्या वर्षी २ बिलीयनचा हिशोब लागला नाही. कारण त्यांनी ज्या बँकानां कर्ज दिले, ते त्या बँकानी वापस केले नाही. परिनामी बिऐनपी ला ते २ बिलीयन राईट ऑफ करावे लागले" . Pls see this link. It infact says " BNP Paribas is the only one of France's four largest banks that hasn't carried out or announced a rights offer since the onset of the financial crisis" !! http://www.xak.com/main/newsshow.asp?id=89639

13. "फ्रेडी व फॅनी ह्या देखील अशाच वित्तीय संस्था आहेत ....त्या होम सिक्युरिटीस आधी साध्या बँक्स, नंतर लिहमन, नंतर फ्रेंडी , नंतर आणखी कुठली बँक अशा प्रवास करत आलेल्या आहेत." Please elaborate on this sentence.

14. "अमेरिकन सरकार अशा सर्व बँकाना पैसे देऊन विकत घेनार आहे. " This is wrong. American Govt is just buying a stake in the bank. These are preferred shares and no voting rights. That means the govt is an 'investor', and not an 'owner' of these banks.

15. " शिवाय लिहमन ब्रदर्स, ऐ आय जी सारख्यांनी तारण नसताना देखील दुसर्‍या बँकांना पैसे पुरविले ". This is wrong. They took the collateral, except that collateral was 'toxis MBS', which was marked to market. So when the market went down so did the value of the collateral. Add to that fact that those MBS were highly illiquid. Hence they could not sell those easily.

अमित रहाळकर

Amit, there are no pundits or gurus here and we are not giving any examination or solving real life issues. Kedar in talking in layman terms; which is helping people to understand. agreed they are not perfect, but helping people to get some vague idea about what is happening.

dont discourage someone with negative comments, by negative i meant your every line is beginning with "This is wrong", i guess people like me, will like "The point you are missing here is" or "To complete this point" or "The correct statement should be" or "what actually government is going to doing" or "BS was indirectly giving loans to student by lending money to many to banks who gives loan to students"... blah blah blah.

शब्दाने शब्द वाढतो, so yeah your comments are welcomed, but avoid using "this is wrong"

I appreciate your openness to take on critisizm >>> ओन्ली ईफ ईट ईज कन्स्ट्रक्टीव्ह. पण तुमच्या ह्या पोस्ट वरुन ते वाटत नाही.

यू आर मिसींग द मेन पाँईन्ट. माणूस म्हणतो तसे मी ज्यांना ईकॉनॉमी, बँकीगं असे निट व्यवस्तिथ माहीती नाही अशांसाठी लेख लिहीतोय. ज्यांना बर्‍याच गोष्टी डिटेल मध्ये माहीती आहे त्यांचासाठी नक्कीच नाही. मी टेक लॅन्वेज ईथे वापरली तर आधीच बोअर वाटनारा विषय अजुन् रटाळ होईल. त्यामूळे शक्यतो सर्वांना कळेल अशा भाषेत लिहीन्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या दॄष्टीने सफल झाला नसेल तर त्या बद्दल मी जास्त काही करु शकेन असे वाटत नाही कारण तुम्ही मॅच्यूअर्ड ईन्वेस्टर असाल, ईथे ऑडीयन्सच वेगळा होतोय.

तुमच्या मागच्या पोस्ट मध्ये पण तुम्ही दोन वेगवेगळ्या पोस्ट मधिल वाक्य घेऊन त्यांचा संबध तुम्हाला हवा तसा लावला, त्यावर प्रश्न विचारल्या तुम्ही उत्तरही दिले नाही.
आता तुमच्याच काही वाक्यांबद्दल बोलायचे झाले तर.

"कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्‍याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते. "This is wrong. The home is 'always owned' by the bank, up and until the mortgage is fully paid by the mortgage-holder >>>>>>> हेच तुमचे वाक्य मी फक्त सोप्या भाषेत लिहीले, मला त्यात काही चुक आहे असे वाटत नाही.

That means the govt is an 'investor', and not an 'owner' of these banks >>> मी शेवटी मुकूंदच्या पोस्टला उत्तर देताना गव्हमेंटची दुसरी बाजु देखील सांगीतली त्यात ह्या बँका फायद्यात आल्यावर सरकार पर्यायाने टॅक्सपेअर्स ह्यांनाच फायदा होईल असेही लिहीले. ते पोस्ट वाचले का?

The interest rates were brought down to address recession and an unintended sideeffect was the 'asset bubble'. >>> कॅमॉन, रिसेशन वर्ड कधी वापरला गेला, त्यांनतर किती रेट कमी झाले ह्यावर देखील सर्च मारा. सब प्राईम प्रॉब्लेम लक्षात येऊन २ वर्षे झाली आहेत.

Pls see this link. It infact says " BNP Paribas is the only one of France's four largest banks that hasn't carried out or announced a rights offer since the onset of the financial crisis" !! >>>>
HOW does that proves your point Amit. you are ignoring the fact that they were facing problems worth 2B last year because of Sub prime. i think you dont know what happened in share markets 1 1/2 -2 years ago, Because of this BNP Pariba statement, all the indices came down one day, please search.

This is wrong. Remember Bear Stearns is an Investment bank. It doesnot lend to consumer, so it does not lend to students. >>>

Pls apply this logic to Bear Stearns and Lehman ( remember they are investment banks and they do not lend to the consumer, neither they take deposits from the consumer) and let me know whether your logic holds true !
>>>

ऑफ्कोर्स ईट डज अप्लाय. these are investment banks who give money to other banks as well. Prove me otherwise, The major income of BS also includes student loan. Though its is a investment bank, it routed money in student loan. All the banks work hand in hand many times. please search on BS student loan. Use better sources then google.

"सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते". You are indicating that this is applicable for all the banks. That is wrong, since the main culprits in this cycle were Investment banks ( Bear Stearns , Lehman) which are not allowed to take customer deposits. Only commercial banks can do it. How would you explain your sentence in the context of Investment banks >>>>>>

कमॉन अगेन. मी तुम्हाला आधीही लिहीले की ईव्हेस्टमेंट बँक व कमर्शिअल बँक हे मी ऐकाच कॅटॅगीरीत टाकले (पुढच्या लेखात वेगळे करेन) जनरल बँक ह्या शब्दाला धरुन मी तसे लिहीले. फक्त ईन्वेस्टमेंट वा कमर्शिअल अशी फोड नाही केली. कोणती बँक काय करते हे मला पक्के ठावूक आहे.

वर तुमच्या पोस्ट मधले काही शब्द घेऊन, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो मी खोडला आहे असे वाटते. तुम्हाला मी लिहीलेल्या प्रत्येक ओळीचा किस काढायचा असेल तर तेवढा वेळ ह्यावर दवडन्यापेक्षा तुम्ही ह्या लेखाला इग्नोर करु शकता व ही माहीती देन्यासाठी ऐक स्वतंत्र लेख लिहू शकता. मला चुकीचे ठरविन्यासाठी तुम्ही पण चूकच लिहीत आहात ह्यावर देखील विचार करा. आय डॉन्ट नो व्हाय आय ऍम गिव्हीग ऐक्स्प्लनेश्न्स टू यू कारण उद्देश चर्चा नसुन विंतडवाद दिसतोय. (वरील काही उदा) त्याला ईतरही बर्‍याच जागा आहेत.

मी ज्यांना ईकॉनॉमी, बँकीगं असे निट व्यवस्तिथ माहीती नाही अशांसाठी लेख लिहीतोय.
---- मला हे मान्य आहे. सामान्यांना (ज्यांचे या विषयात ज्ञान अगदी जुजबी आहे) समजेल अशा भाषेत लिहितांना तारेवरची कसरत करावीच लागते. मला वाटते, केदारचे वरिल सर्व लेख वाचल्यावर, वाचकाने ज्ञानाची एक किमान पातळी गाठलेली असेल, त्याच्या जोरावर तो या क्षेत्रात पुढील वाटचाल करण्यास समर्थ ठरेल. तो उद्देश जरुर सार्थ होतो आहे.

प्रत्येक लेखात काही तांत्रिक चुका असु शकतात. माणसाने म्हटल्या प्रमाणे येथे कोणीच गुरु, पंडित नाही; लोकं आपली दैनंदिनी सांभाळुन (चालता- बोलता) थोडाफार हातभार लावतात.

अमित तुमचे मायबोलीवर स्वागत. अनेक वेळा 'this is wrong' आलेले बघितल्यावर, किमान एक वेळा तरी this is right ची मी अपेक्षा केली होती.

The interest rates were brought down to address recession and an unintended sideeffect was the 'asset bubble'. कॅमॉन, रिसेशन वर्ड कधी वापरला गेला, त्यांनतर किती रेट कमी झाले ह्यावर देखील सर्च मारा. सब प्राईम प्रॉब्लेम लक्षात येऊन २ वर्षे झाली आहेत. >>

केदार,
मला वाटतं 'recession' हा शब्द रहाळकरांनी ९/११ नंतरच्या economy slowdown साठी वापरला आहे..... तसे असेल तर अर्थातच त्यांनी 'wrong' शब्द वापरला आहे...

बाकी तुझे आणि माणसाचे सगळे मुद्दे पटले..... बाकी कोणी काहीही म्हणोत, मला या लेखामुळे आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमुळे पुष्कळ गोष्टी समजल्या....

केदार आणि माणूस म्हणतायत ते बरोबरच आहे.. वाचकवर्ग बघून केदार उत्तरे देतोय ह्यात सगळ्यांनाच खूप शिकायला मिळतय की, उदा. जर सुपरमॉमने विचारलेल्या प्रश्नांना केदार ने टेक्निकल जार्गन वापरून उत्तरे दिली असती तर काहीच उपयोग झाला नसता.
शिवाय इथलं लिखाण हे काही प्रमाण म्हणून घेत नाहीच कोणी पण त्यातूनच आपण सगळेच शिकतोय इथून हे मात्र मान्य करायलाच हवं..
माफ करा अमित, पण तुम्हाला वाचक्ववर्ग समजला नाहीये ह्या लेखाचा, त्यामुळे तुमचं लिखाण किंवा त्यातला सूर अस्थायी वाटतोय. केदारच्या लिखाणाचा हेतू स्तुत्यच आहे ह्यात कुणालाच शंका नसावी. दुसरं म्हणजे कुणीही दिलेली माहिती अधिक अचूक असावी अशी तुमचि कळकळ असेल ते बरोबर आहे पण मग तसं लिहिता आलेल दिसत नाही तुम्हाला.. म्हणजे 'हे चूक आहे' असं म्हणण्यापेक्षा 'अधिक बरोबर हे वाटतं' असं म्हटल तरं सौहार्दाचं वातावरण तयार होउन अधिक माहितीची देवाणघेवाण होईल असं नाही का वाटत? उलटपक्षी चिरफाड करत तुम्ही चूकाच दाखवण्याच काम करत राहिलेल दिसताय, नाही का?

केदार तुझं लिखाण तू चालू ठेवच..पण अमितसाहेब तुम्ही नविन लेखच का लिहित नाही, मला नक्की आवडेल वाचायला. मराठीतून सोप्या शब्दात लिहिलात तर फार बरं कारण नेट वर बरेच पंडित आहेत आपल्या लेखण्या सरसावून.. इथे काहीतरी सोप्प आपलेपणानं समजावणार हवय.. संवाद असू दे आणि एखाद्या मुदद्द्यावर मतांतर असेल तर त्याचा वेगळा थ्रेड सुरु करता येईल. एक मेकांचे मुद्दे खोडण्यात दोघांची शक्ती आणि वे़ळ खर्च व्हायला नको इतकच वाटतय.. नाहीतर म्हणतील शेवटी मराठी माणूस.... चिल डाऊन! Happy

केदार तुम्हि खुप छान माहिती सोप्या भाषेत मांडली आहे.मी तंत्रनिकेतन मधे अध्यापन करते तेव्हा तोंडि परिक्षा घेतना पहाते कि चुक काढणे वा प्रश्न विचारणे खुप सोपे असते पण दुसर्याच्या कुवतीनुसार समजेल असे शिकवणे खुप कठीण असते.सामान्य विद्यार्थ्याला समजावताना 'हुषार' विद्यार्थी बरेचदा स्वताला अध्यापकपेक्षा जास्त ज्ञानी समजतात्.खर वर्गात ८०% विद्यार्थी सामान्यच असतात(जसे आम्हि ईथे) तेव्हा तुम्ही आमच्यासाठि हे ज्ञानदान सुरु ठेवा.तुमच्याच मुळे मला या विषयातील अ ब क कळले आता 'कुणाला' शक्य असेल तर त्यांनी आमच्यासारख्या 'ढ' लोकांना क्ष य झ गोडी लागेल असे शिकवुन दाखवावे.
'ज्ञानी' लोक दिवे घेतीलच.

सर्वांना अनुमोदन. केदारने कायमच माहितीपुर्ण लेख सर्वांना समजतील अश्या भाषेत लिहिले आहेत.. या क्षेत्रातले फार न कळणार्‍या मंडळींना त्याचा बराच फायदा झाला आहे..

रहाळकर तुम्ही पण या क्षेत्रातले तज्ञ दिसता. आपलेही स्वतंत्र लि़खाण वाचायला नक्की आवडेल...

काही वाचकानी सूचवले की मी नूसती टीका न करता स्वत्नत्र लेख लिहावा...

http://www.maayboli.com/node/4295

अमित रहाळकर

हा बोर्ड वाचल्यावर माझ्या मनात पु.ल. यांच्या एका निबंधातले वाक्य येते, ते कोणते?

Pages