मॅक्रो टू मायक्रो ईकॉनॉमी व परत
मुख्य घटनाक्रम व त्यांचे परिनाम.
१ हाऊसिंग मार्केट बबल तयार झाले (केले!)
परिनाम
१. लोकांनी जास्त्तीस जास्त लोन घ्यावे ह्यासाठी ईंटरेस्ट रेट्स खुप कमी केले गेले.
२. घराच्या किमती आणखी वाढल्या. त्यामुळे परत लोक गडबड करुन लगेच घर विकत घेऊ लागले.
वरिल दोन्ही गोष्टी ह्या ऐकमेकांस पुरक असतात. सध्या भारतात हिच स्तिथी आहे. पण त्यावर वेळेवर रोक कसा लावला गेला हे सुध्दा पुढे लिहीन.
३. कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते.
२. बँकाना जास्तीत जास्त कर्ज देता यावे व लगेच ते वितरीत (डिस्बर्स) करता यावे, या साठी ते अनेक नियम अशा काळात शिथील करतात.
परिनाम :
१. ज्या लोकांची परतफेड करन्याची क्षमता नाही अशांना कर्ज दिले जाते.
२. ज्या देशात प्रत्येक व्यक्तीसाठी ईंट्रेस्ट रेट वेगळा असतो ( जसे अमेरिका) तिथे ज्यांची क्रेडीट हिस्ट्री चांगली नाही त्यांना महागाचे लोन मिळते
३. ह्या बँकांकडे अमर्यादित पैसा नसतो. त्यांना देखील कुठून तरी कर्ज काढावे लागते. मग ते मोठ्या वा परकिय वित्तसंस्था कडे कर्ज मागायला जातात. कर्जाचे तारण (सेक्युअर्ड लोन) म्हणून कर्जदात्याची मालमत्ता ह्या बँका गहान ठेवतात.
आता ह्या घटनाक्रमात तसे गैर काहीही नाही. तुम्ही कर्ज घेणार, बँक कर्जे घेणार, तुम्ही परत करणार, बँक दुसर्या बँकेला परत देणार म्हणजे ही सायकल पुर्ण. ह्या सायकलला आणखी एक उपचक्र आहे ते म्हणजे ठेवी. सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते.
असेच दोन चार वर्ष जातात व अचानक प्रॉपट्री मार्केट पडु लागते. ( म्हणजे बघा तुम्हाला डेक्कन ला घर घ्यायचे आहे, तुम्ही पहिल्यावर्षी ३० लाख, दुसर्या वर्षी ४० नंतर ५०, ६०, ८० लाखापर्यंत घर घ्यायला तयार होता पण आता घराची किंमत २ करोड झाली तर तुम्ही घेनार का? नाही. म्हणजे डिमांड कमी. असे दोन पाच वर्षे जातात. ईकॉनॉमी थोडी शांत व्हायला लागते. सरकार देखील ईकॉनॉमी कुल डाऊन करन्याकरता व्याजदर वाढविते, परिनामी बँका देखील व्याजदर वाढवतात, तुमचे कर्ज फ्लेक्झी दराने असेल तर महाग होते सर्व बाबतीत तुम्हीही खर्च करायला मागे पुढे पाहाता, असे होत होत हाऊसिंग बबल फुटत जाते.
त्याचे परिनाम व कारण पाहुयात.
४ व्याजदरात वाढ
परिनाम
१. कर्जदार कर्जाची परतफेड वेळेवर करु शकत नाही.
२. घराची डिमांड कमी होते व किंमत हळु हळु कमी व्हायला सुरुवात होते.
३. परिनामी क्रेडीट क्रंच निर्मान होतो. म्हणजे होत काय की तुम्ही बँकेला पैसे देत नाही, तुमची बँक वित्तसंस्थेला (स्वकीय वा परकिय) पैसे वापस देऊ शकत नाही, त्या संस्था आणखी पैसे तुमच्या बॅंकेला देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज खुप महाग होऊन फक्त जे खरच परतफेड करु शकतात त्यांनाच मिळते.
२००७ च्या जूलै महिन्यात बेअर स्टर्ण्स नावाच्या वित्तीय कंपनीचे दिवाळे निघाले कारण त्यांना वर दिलेल्या कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत, शिवाय ते स्टुंडन्टना देखील लोन देत त्यामुळे त्यांचा कर्ज वापस मिळन्याचा लिड टाईम हा खुप होता. ऐवढी झळ ते सोसु शकले नसावेत म्हणुन त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली.
ह्या सायकल मध्ये आपण स्वत बद्दल व आपल्या बँकेबद्दल पाहीले आता थोडे मोठ्या वित्तीय संस्थे बद्दल पाहुयात.
मोठ्या वित्तीय संस्थेचा कारभार हा खुप मोठा असतो. त्यांचा भात्यात अर्थ कमविन्याचे अनेक मार्ग असतात. त्यातील काही
१. दुसर्या बँकाना दिर्घ लोन देने.
२. लघु लोन देने
३. हेज फंडस
४. रिटाअरमेंट प्लान्स
५. सिड मनी ( कॅपीटल पुरविने)
६. ईन्व्हेस्टमेंट बँकींग.
जुन्या मोठ्या बँकाच ह्या अशा वित्तीय संस्था होतात. जसे गोल्डमन सॅक्स, लिहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन, भारतातील आय सी आय सी आय. अशा सर्व कंपन्याचे शेअर्स हे मार्केट मध्ये ट्रेड करत असतात. त्यांचा स्वतच्या ट्रेड पण रोजचा शेकडो मिलीयन्स चा असतो.
वर पाहीलेल्या सायकल मुळे ह्या संस्था ईतर बँकांना पैसे वापस देन्याविषयी लकडा लावतात, बाजारात हया विषयी कळते. गुंतवनुकदार मग अशा दोन्ही बँकांचे ( म्हणजे पहिली बँक जीने आपल्या कर्ज दिले, व दुसरी जिने पहिलीला कर्ज दिले) शेअर्स विकायला सुरुवात करतात. दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो. (फ्युचर्स व ट्रेडींग मध्ये कोणीही शॉर्ट व लाँग जाऊ शकते). गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात.
वर आपण लिक्वीडीटी क्रंच कसा आला ते पाहीले. पण दुसर्या संस्था ज्यांनी ह्या वित्तीय संस्थेला देखील पैस दिलेले असतात. ( ईथेच फ्रेडी मॅक, व फॅनी मे) येतात ते त्या वित्तीय संस्थाचा पाठीमागे लागुन परत ऐकदा क्रेडीट क्रंच करतात. लोन महाग होते. दुसर्या वित्तीय संस्था हे पहिल्या व दुसर्या बँकेकडुन आपल्या ठेवी, गुंतवनुक काढुन घ्यायला लागतात व गुंतवनुक की लोन मध्ये न करता ट्रेझरी (म्हणजे सरकारी बॉन्डस) व सोने ह्यात केली जाते. परिनामी पहील्या दोन्ही बँकेकडे पैसा न राहुन त्या दिवाळखोर बनतात.
वर मी हे चक्र फक्त ऐक बँक, ऐक वित्तीय संस्था व दुसरी आणखी मोठी संस्था ह्यांना घरुन लिहीलेय. प्रत्यक्ष बाजारा मध्ये कित्येक बँकांचे पाय ऐकेमेकांमध्ये अडकलेले असतात. तुम्ही हे उदा कितीही लाबंबू शकता. व परदेशी बँकांना गुंतवु शकता.
जो पर्यंत सायकल ब्रेक होत नाही ( पण कर्जे वाप्स करने थांबत नाही) तो पर्यंत हे काहीही कळत नाही. फ्रांन्स चा जुन्या बिऐनपी पारीबा बँकेला सबप्राईम रेटस मुळे मागच्या वर्षी २ बिलीयनचा हिशोब लागला नाही. कारण त्यांनी ज्या बँकानां कर्ज दिले, ते त्या बँकानी वापस केले नाही. परिनामी बिऐनपी ला ते २ बिलीयन राईट ऑफ करावे लागले.
फ्रेडी व फॅनी ह्या देखील अशाच वित्तीय संस्था आहेत त्यांनी ५ ट्रीलीयन डॉलर्सचे कर्ज वितरन केले आहे, त्या होम सिक्युरिटीस आधी साध्या बँक्स, नंतर लिहमन, नंतर फ्रेंडी , नंतर आणखी कुठली बँक अशा प्रवास करत आलेल्या आहेत. म्हणजे मुळ कर्जदाराने जर कर्ज वापस केले तर हा प्रश्न ऊठलाच नसता पण कोणाला कर्ज द्यायचे व कसे द्यायचे ह्या घरबंध न पाळल्यामुळे हा प्रॉब्लेम आणखी मोठा झाला.
आता गमंत अशी आहे झाली ही ह्या संस्था अनेक दुसर्या देशात पण गुंतवनुक करतात जसे भारत, ब्राझील, जपान, वैगरे. आणि त्यांना त्यांचा स्वतचा देशात केडीट क्रंच आल्यामुळे अनेक वित्तीयसंस्थांनी त्या दुसर्या देशातील गुंतवनुक अचानक गेल्या महीन्यात काढुन घ्यायला सुरुवात केली कारण त्यांना ईकडे पैसा हवा होता. त्यामुळे ह्या सर्व देशात पण क्रेडीट क्रंच निर्मान झाला. तेथील मार्केट कोसळले. डॉलरचा रेट परत ऐकदा ४७ पर्यंत जाऊन आला.
ह्या सर्व घोळात मोठ्या बँका प्रथम बळी ठरतात कारण त्यांचे व्यवहार हे अनेक छोट्या बॅकासोबत असतात. ह्या सर्व बँकाना व वित्तीय संस्थांना पैसे देता यावे म्हणून ७४० बिलीयन डॉलर्सचा प्लान तयार केल्या जात आहे. पुढील काही महीने / वर्षे ह्याचा परिनाम राहनार आहे. अमेरिकन सरकार अशा सर्व बँकाना पैसे देऊन विकत घेनार आहे.
भारतातही २००३ च्या सुमारास प्रॉपर्टी बबल सुरु झाले आहे. २००४ मध्ये मी घर घेताना ७ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते, तेव्हा ते अजुन कमी होईल असे बोलले जात होते. २००५ पर्यंत जी घर साधारण २५ लाखाला मिळायची ती ४० च्या पुढे गेली व २००८ मध्ये हीच घर ८० लाखाला मिळतात. (माझ्या घराची आजची किंमत)
पण भारतात सरकारने उपाय योजना आखुन २००५ नंतर लगेच व्याजदर वाढवुन ९ टक्के केला होता. शिवाय कर्ज देताना देखील बँका घेनार्याची परत करन्याची ताकद आहे का नाही हे पाहुन देत होत्या. त्यामुळे आपल्या कडे हा प्रॉब्लेम झाला नाही.
कर्ज देताना सर्व बँका ह्या बॅड डेट्स ( बुडीत खाते) ह्याची तरतुद करतात पण ह्या अमेरिकेत ती प्रोव्हीजन हवी तेवढी केली गेली नाही. शिवाय लिहमन ब्रदर्स, ऐ आय जी सारख्यांनी तारण नसताना देखील दुसर्या बँकांना पैसे पुरविले त्यामुळे जेव्हा खरच क्रंच निर्मान झाला तेव्हा त्यांचाकडे विकायला देखील काही उरले नाही व दिवाळखोरी जाहीर करन्यावाचुन पर्याय उरला नाही. ह्या मोठ्या संस्थानी दिवाळखोरी जाहीर केली की छोट्या गुंतवनुकदारांचा विश्वास कमी होतो व ते बाजारातुन भांडवल काढुन घेउन सोने वा बॉन्डस मध्ये ठेवतो त्यामुळे हा प्रॉब्लेम द्विगुणीत (डबल फोल्ड) होतो व मार्केट आणखी पडते.
हे कोणामुळे झाले, का झाले. तर ह्या वर उत्तर हे सर्वामुळे झाले, कोणा ऐकामूळे हे होऊ शकत नाही. कारण ह्या मॅक्रो लेव्हल पासुन मायक्रो लेव्हल पर्यंत सर्वजन तेवढेच गुंतलेले असतात. अमेरिकेकडे जगातील वित्तीयसंस्थाचे लक्ष, त्यामुळे हा प्रॉब्लेम जागतीक होऊ घातलाय. पण युरोपीयन बँका ह्या सक्षम असल्यामुळे त्यांना तेवढा फरक पडनार नाही, दोन पाच बिलीयन राईट ऑफ करावे लागतील. ईतकेच.
(हा लेख मी निवडनुकीची चर्चा करताना मध्येच ऐका तासाचा अवधीत लिहीला आहे त्यामूळे व्याकरनाचा भरपुर चुका असन्याची शक्यता जास्त आहे. पण ह्यातुन ईकॉनॉमी कशी चालते, बँक रेट का वाढतात, कमी होतात, बँका का बंद पडतात. हे कळु शकेल अशी आशा.)
आजच्या
आजच्या सुंदर मार्केट कंडीशन बद्दल काही कमेंट्स...
मला २००२ मधिल fwd email आठवतायत, java programmers returning from US
माणसा तू
माणसा तू जावा वाला आहेस का? बाफ चे नाव भारतातून अमेरिकेकडे व परत असे ठेवायला पाहीजे होते.
हो हा
हो
हा बोर्ड वाचल्यावर माझ्या मनात पु.ल. यांच्या एका निबंधातले वाक्य येते, ते कोणते? >>>>
आपण पूणे महानगर पालीकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात कामला आहे हे विसरुन, अमेरिकेची आर्थीक घडी कशी बसवता येईल ह्यावर चर्चा करणे.
आज डाउ
आज डाउ ७५०० ला टेकला! बराच काळ ८००० वर सपोर्ट होता, आता नेक्स्ट स्टॉप कितीला?
केदार भौ, अमित, चेन्गट कुणाचे काय मत?
मैत्रेयी
मैत्रेयी दोनच मत येतील. नाना पोस्टून गायब झालेत ते परत दुसर्या बाफवरच कवितेलाच पोस्टायला आले.
मागे ह्याच बाफ वर मी ७५०० वर डाउ जाइल हे लिहीले होते कारण लेग स्प्रेड तिथे थांबत होता. ते मी चार्ट वर नोंदवले होते. दुपार पासुन तिकडेच बघतोय. नेक्स रेंज मला ७९५० ते ७२०० वाटतेय. ते ही जर लवकर त्या ऍटो डिल वर काही झाल तरच. नाहीतर कसले लेग अन कसल काय.
उद्या १५० ते २०० ने वर जाण्याची शक्याता वाटतीय. कारण सध्या परत ह्या लेवलला मार्केट ओव्हरसोल्ड आहे त्यामूळे इंडीकेटर्स शॉर्ट टर्मसाठी विकत घ्या हे दाखवत आहेत. आत्ततरी डिप डाउन मला दिसत नाहीये. (कदाचीत मी चुकीचा असु शकतो). घरी जाउन प्रिंट आउट काढून मार्क केल्यावर कदाचित प्रकाश पडू शकेल.
आज कळालेले
आज कळालेले नवीन सेल्फ हेल्प, म्यानेजमेंट टाईप ज्ञानकणः जर तुम्ही बिग-३ (फोर्ड, जीएम, ख्राय्स्लर) कार कंपन्यांचे मुख्य आहात, कंपनी डबघाईला आलेल्या असताना सरकार कडे २५ अब्ज डॉ मागायला चालला आहातः तर किमान स्वतःच्या प्रायव्हेट जेट मधून जाउ नये आणि त्या पैशाचे काय करणार याचे उत्तर तयार ठेवावे यांना कोणी सांगितले नाही का की २५ अब्ज मागताना सहज कोणीतरी विचारले की त्याचे काय करणार तर आपली तयारी असावी?
फारेंड
फारेंड
२५ अब्ज
२५ अब्ज मागताना सहज कोणीतरी विचारले की त्याचे काय करणार तर आपली तयारी असावी?
---- त्यांच्या कडे या बाबतीतला (?) अनुभव नाही आहे. त्यांना वाटले विमानाने आलो तर चांगली छाप (impression) पडेल, आणि पटकन काम होईल. आता २ डिसेंबरला (२५ अब्ज मिळाल्यावर त्याचे काय करणार हे सांगायला) पायी चालतच जाणार...
Pages