मॅक्रो टू मायक्रो ईकॉनॉमी व परत
मुख्य घटनाक्रम व त्यांचे परिनाम.
१ हाऊसिंग मार्केट बबल तयार झाले (केले!)
परिनाम
१. लोकांनी जास्त्तीस जास्त लोन घ्यावे ह्यासाठी ईंटरेस्ट रेट्स खुप कमी केले गेले.
२. घराच्या किमती आणखी वाढल्या. त्यामुळे परत लोक गडबड करुन लगेच घर विकत घेऊ लागले.
वरिल दोन्ही गोष्टी ह्या ऐकमेकांस पुरक असतात. सध्या भारतात हिच स्तिथी आहे. पण त्यावर वेळेवर रोक कसा लावला गेला हे सुध्दा पुढे लिहीन.
३. कर्ज फेडीचे तारण म्हणून कर्जघेनार्याला घर बँकेकडे गहान ठेवावे लागते.
२. बँकाना जास्तीत जास्त कर्ज देता यावे व लगेच ते वितरीत (डिस्बर्स) करता यावे, या साठी ते अनेक नियम अशा काळात शिथील करतात.
परिनाम :
१. ज्या लोकांची परतफेड करन्याची क्षमता नाही अशांना कर्ज दिले जाते.
२. ज्या देशात प्रत्येक व्यक्तीसाठी ईंट्रेस्ट रेट वेगळा असतो ( जसे अमेरिका) तिथे ज्यांची क्रेडीट हिस्ट्री चांगली नाही त्यांना महागाचे लोन मिळते
३. ह्या बँकांकडे अमर्यादित पैसा नसतो. त्यांना देखील कुठून तरी कर्ज काढावे लागते. मग ते मोठ्या वा परकिय वित्तसंस्था कडे कर्ज मागायला जातात. कर्जाचे तारण (सेक्युअर्ड लोन) म्हणून कर्जदात्याची मालमत्ता ह्या बँका गहान ठेवतात.
आता ह्या घटनाक्रमात तसे गैर काहीही नाही. तुम्ही कर्ज घेणार, बँक कर्जे घेणार, तुम्ही परत करणार, बँक दुसर्या बँकेला परत देणार म्हणजे ही सायकल पुर्ण. ह्या सायकलला आणखी एक उपचक्र आहे ते म्हणजे ठेवी. सगळ्याच लोकांना कर्ज नको असते, काही जनांकडे सरप्लस म्हणजे ठेवी असतात त्या ते बँकाना देतात व हे चक्र अव्याहतपणे चालु राहाते.
असेच दोन चार वर्ष जातात व अचानक प्रॉपट्री मार्केट पडु लागते. ( म्हणजे बघा तुम्हाला डेक्कन ला घर घ्यायचे आहे, तुम्ही पहिल्यावर्षी ३० लाख, दुसर्या वर्षी ४० नंतर ५०, ६०, ८० लाखापर्यंत घर घ्यायला तयार होता पण आता घराची किंमत २ करोड झाली तर तुम्ही घेनार का? नाही. म्हणजे डिमांड कमी. असे दोन पाच वर्षे जातात. ईकॉनॉमी थोडी शांत व्हायला लागते. सरकार देखील ईकॉनॉमी कुल डाऊन करन्याकरता व्याजदर वाढविते, परिनामी बँका देखील व्याजदर वाढवतात, तुमचे कर्ज फ्लेक्झी दराने असेल तर महाग होते सर्व बाबतीत तुम्हीही खर्च करायला मागे पुढे पाहाता, असे होत होत हाऊसिंग बबल फुटत जाते.
त्याचे परिनाम व कारण पाहुयात.
४ व्याजदरात वाढ
परिनाम
१. कर्जदार कर्जाची परतफेड वेळेवर करु शकत नाही.
२. घराची डिमांड कमी होते व किंमत हळु हळु कमी व्हायला सुरुवात होते.
३. परिनामी क्रेडीट क्रंच निर्मान होतो. म्हणजे होत काय की तुम्ही बँकेला पैसे देत नाही, तुमची बँक वित्तसंस्थेला (स्वकीय वा परकिय) पैसे वापस देऊ शकत नाही, त्या संस्था आणखी पैसे तुमच्या बॅंकेला देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज खुप महाग होऊन फक्त जे खरच परतफेड करु शकतात त्यांनाच मिळते.
२००७ च्या जूलै महिन्यात बेअर स्टर्ण्स नावाच्या वित्तीय कंपनीचे दिवाळे निघाले कारण त्यांना वर दिलेल्या कारणांमुळे पैसे मिळाले नाहीत, शिवाय ते स्टुंडन्टना देखील लोन देत त्यामुळे त्यांचा कर्ज वापस मिळन्याचा लिड टाईम हा खुप होता. ऐवढी झळ ते सोसु शकले नसावेत म्हणुन त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली.
ह्या सायकल मध्ये आपण स्वत बद्दल व आपल्या बँकेबद्दल पाहीले आता थोडे मोठ्या वित्तीय संस्थे बद्दल पाहुयात.
मोठ्या वित्तीय संस्थेचा कारभार हा खुप मोठा असतो. त्यांचा भात्यात अर्थ कमविन्याचे अनेक मार्ग असतात. त्यातील काही
१. दुसर्या बँकाना दिर्घ लोन देने.
२. लघु लोन देने
३. हेज फंडस
४. रिटाअरमेंट प्लान्स
५. सिड मनी ( कॅपीटल पुरविने)
६. ईन्व्हेस्टमेंट बँकींग.
जुन्या मोठ्या बँकाच ह्या अशा वित्तीय संस्था होतात. जसे गोल्डमन सॅक्स, लिहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन, भारतातील आय सी आय सी आय. अशा सर्व कंपन्याचे शेअर्स हे मार्केट मध्ये ट्रेड करत असतात. त्यांचा स्वतच्या ट्रेड पण रोजचा शेकडो मिलीयन्स चा असतो.
वर पाहीलेल्या सायकल मुळे ह्या संस्था ईतर बँकांना पैसे वापस देन्याविषयी लकडा लावतात, बाजारात हया विषयी कळते. गुंतवनुकदार मग अशा दोन्ही बँकांचे ( म्हणजे पहिली बँक जीने आपल्या कर्ज दिले, व दुसरी जिने पहिलीला कर्ज दिले) शेअर्स विकायला सुरुवात करतात. दुसर्या वित्तीयसंस्था मग त्यांचे शेअर्स हे शॉर्ट सेल करुन बाजारात पॅनीक निर्मान करतात कारण त्यामुळे त्या दुसर्या वित्तीय संस्थेला फायदा होऊ शकतो. (फ्युचर्स व ट्रेडींग मध्ये कोणीही शॉर्ट व लाँग जाऊ शकते). गुंतवनुकदार पटापट त्या संबधित बँकांचे शेअर्स विकतात, व सटोडिये ते कव्हर करुन स्वताचा फायदा करुन घेतात.
वर आपण लिक्वीडीटी क्रंच कसा आला ते पाहीले. पण दुसर्या संस्था ज्यांनी ह्या वित्तीय संस्थेला देखील पैस दिलेले असतात. ( ईथेच फ्रेडी मॅक, व फॅनी मे) येतात ते त्या वित्तीय संस्थाचा पाठीमागे लागुन परत ऐकदा क्रेडीट क्रंच करतात. लोन महाग होते. दुसर्या वित्तीय संस्था हे पहिल्या व दुसर्या बँकेकडुन आपल्या ठेवी, गुंतवनुक काढुन घ्यायला लागतात व गुंतवनुक की लोन मध्ये न करता ट्रेझरी (म्हणजे सरकारी बॉन्डस) व सोने ह्यात केली जाते. परिनामी पहील्या दोन्ही बँकेकडे पैसा न राहुन त्या दिवाळखोर बनतात.
वर मी हे चक्र फक्त ऐक बँक, ऐक वित्तीय संस्था व दुसरी आणखी मोठी संस्था ह्यांना घरुन लिहीलेय. प्रत्यक्ष बाजारा मध्ये कित्येक बँकांचे पाय ऐकेमेकांमध्ये अडकलेले असतात. तुम्ही हे उदा कितीही लाबंबू शकता. व परदेशी बँकांना गुंतवु शकता.
जो पर्यंत सायकल ब्रेक होत नाही ( पण कर्जे वाप्स करने थांबत नाही) तो पर्यंत हे काहीही कळत नाही. फ्रांन्स चा जुन्या बिऐनपी पारीबा बँकेला सबप्राईम रेटस मुळे मागच्या वर्षी २ बिलीयनचा हिशोब लागला नाही. कारण त्यांनी ज्या बँकानां कर्ज दिले, ते त्या बँकानी वापस केले नाही. परिनामी बिऐनपी ला ते २ बिलीयन राईट ऑफ करावे लागले.
फ्रेडी व फॅनी ह्या देखील अशाच वित्तीय संस्था आहेत त्यांनी ५ ट्रीलीयन डॉलर्सचे कर्ज वितरन केले आहे, त्या होम सिक्युरिटीस आधी साध्या बँक्स, नंतर लिहमन, नंतर फ्रेंडी , नंतर आणखी कुठली बँक अशा प्रवास करत आलेल्या आहेत. म्हणजे मुळ कर्जदाराने जर कर्ज वापस केले तर हा प्रश्न ऊठलाच नसता पण कोणाला कर्ज द्यायचे व कसे द्यायचे ह्या घरबंध न पाळल्यामुळे हा प्रॉब्लेम आणखी मोठा झाला.
आता गमंत अशी आहे झाली ही ह्या संस्था अनेक दुसर्या देशात पण गुंतवनुक करतात जसे भारत, ब्राझील, जपान, वैगरे. आणि त्यांना त्यांचा स्वतचा देशात केडीट क्रंच आल्यामुळे अनेक वित्तीयसंस्थांनी त्या दुसर्या देशातील गुंतवनुक अचानक गेल्या महीन्यात काढुन घ्यायला सुरुवात केली कारण त्यांना ईकडे पैसा हवा होता. त्यामुळे ह्या सर्व देशात पण क्रेडीट क्रंच निर्मान झाला. तेथील मार्केट कोसळले. डॉलरचा रेट परत ऐकदा ४७ पर्यंत जाऊन आला.
ह्या सर्व घोळात मोठ्या बँका प्रथम बळी ठरतात कारण त्यांचे व्यवहार हे अनेक छोट्या बॅकासोबत असतात. ह्या सर्व बँकाना व वित्तीय संस्थांना पैसे देता यावे म्हणून ७४० बिलीयन डॉलर्सचा प्लान तयार केल्या जात आहे. पुढील काही महीने / वर्षे ह्याचा परिनाम राहनार आहे. अमेरिकन सरकार अशा सर्व बँकाना पैसे देऊन विकत घेनार आहे.
भारतातही २००३ च्या सुमारास प्रॉपर्टी बबल सुरु झाले आहे. २००४ मध्ये मी घर घेताना ७ टक्के व्याजाने कर्ज घेतले होते, तेव्हा ते अजुन कमी होईल असे बोलले जात होते. २००५ पर्यंत जी घर साधारण २५ लाखाला मिळायची ती ४० च्या पुढे गेली व २००८ मध्ये हीच घर ८० लाखाला मिळतात. (माझ्या घराची आजची किंमत)
पण भारतात सरकारने उपाय योजना आखुन २००५ नंतर लगेच व्याजदर वाढवुन ९ टक्के केला होता. शिवाय कर्ज देताना देखील बँका घेनार्याची परत करन्याची ताकद आहे का नाही हे पाहुन देत होत्या. त्यामुळे आपल्या कडे हा प्रॉब्लेम झाला नाही.
कर्ज देताना सर्व बँका ह्या बॅड डेट्स ( बुडीत खाते) ह्याची तरतुद करतात पण ह्या अमेरिकेत ती प्रोव्हीजन हवी तेवढी केली गेली नाही. शिवाय लिहमन ब्रदर्स, ऐ आय जी सारख्यांनी तारण नसताना देखील दुसर्या बँकांना पैसे पुरविले त्यामुळे जेव्हा खरच क्रंच निर्मान झाला तेव्हा त्यांचाकडे विकायला देखील काही उरले नाही व दिवाळखोरी जाहीर करन्यावाचुन पर्याय उरला नाही. ह्या मोठ्या संस्थानी दिवाळखोरी जाहीर केली की छोट्या गुंतवनुकदारांचा विश्वास कमी होतो व ते बाजारातुन भांडवल काढुन घेउन सोने वा बॉन्डस मध्ये ठेवतो त्यामुळे हा प्रॉब्लेम द्विगुणीत (डबल फोल्ड) होतो व मार्केट आणखी पडते.
हे कोणामुळे झाले, का झाले. तर ह्या वर उत्तर हे सर्वामुळे झाले, कोणा ऐकामूळे हे होऊ शकत नाही. कारण ह्या मॅक्रो लेव्हल पासुन मायक्रो लेव्हल पर्यंत सर्वजन तेवढेच गुंतलेले असतात. अमेरिकेकडे जगातील वित्तीयसंस्थाचे लक्ष, त्यामुळे हा प्रॉब्लेम जागतीक होऊ घातलाय. पण युरोपीयन बँका ह्या सक्षम असल्यामुळे त्यांना तेवढा फरक पडनार नाही, दोन पाच बिलीयन राईट ऑफ करावे लागतील. ईतकेच.
(हा लेख मी निवडनुकीची चर्चा करताना मध्येच ऐका तासाचा अवधीत लिहीला आहे त्यामूळे व्याकरनाचा भरपुर चुका असन्याची शक्यता जास्त आहे. पण ह्यातुन ईकॉनॉमी कशी चालते, बँक रेट का वाढतात, कमी होतात, बँका का बंद पडतात. हे कळु शकेल अशी आशा.)
लालु अग
लालु
अग त्या लिंक मध्ये काहीच दिसत नाहीये.
http://www.nytimes.com/ref/wa
http://www.nytimes.com/ref/washington/ROLLCALL.html?currentChamber=house...
आता? जरा वेळ लागेल.
777 magic number at slot
777 magic number at slot machines. today is great day to visit atlantic city.
August 28, 2006 - Peter Schiff
[video:http://www.youtube.com/watch?v=IU6PamCQ6zw]
Sept, 27, 2008 - Peter Schiff
[video:http://www.youtube.com/watch?v=knJudP7QgyY]
उत्कृष्ट!
उत्कृष्ट! केदार हा लेख म्हणजे रिव्ह्यु पेपर किंवा समरि सारखा वाटला. यातल्याच एकेका विषयावर डिटेल मध्ये लिहणार का प्लिज?
केदार..
केदार.. सोप्या भाषेत मस्तच समजावले आहेस..
हे असे सगळे रामायण होणार याची कल्पना सॅव्ही गुंतवणूककरांना होतीच.. त्या सगळ्यांनी आपली गुंतवणुक कमी रिस्क असलेल्या फंडात्(म्हणजे बाँड किंवा मनी मार्केट फंडात्)केली असावी व झालच तर सोन्यामधे... त्यांना या सर्कसने कमी फटका बसला असावा.. (पण घराच्या पडत असलेल्या किंमतीसाठी कोणीच काही करु शकत नाही..:( )
केदार.. १९३० च्या जागतीक मंदीतुन बाहेर पडण्यासाठी त्यावेळच्या अमेरिकन सरकारने टेनेसी व्हॅलि प्रॉजेक्ट्,हुव्हर व तत्सम मोठमोठे डॅम्स उभारणे, असले उपाय योजले होते.. व नंतर लगेचच दुसरे महायुद्ध सुरु झाले त्यामुळे त्या युद्धाला लागणार्या युद्धसामुग्रीच्या उत्पादनामुळे अमेरिकन इकॉनॉमीला चालना मिळाली... माझा प्रश्न असा आहे की या क्रेडिट क्रायसीस मुळे अमेरिकेत व जगात आर्थिक मंदीची लाट पसरणार्(खर म्हणजे पसरलीच आहे!) ही काळ्या दगडावरची रेघ आहे... तर या वेळेला अमेरिकन सरकार यातुन कशी वाट काढणार याचा तुला काही अंदाज आहे का? हे बेल आउट वगैरे म्हणजे फाटक्या लुगड्याला ठिगळ लावण्यासारखे आहे.. हा काही लाँग टर्म उपाय नाही... असे मला वाटते..
मुकुंद
मुकुंद १९३० च्या मंदीच्या वेळी केलेले रोजगार उपायांची केनेशियन थेअरी आजच्या काळात उपयोगी पडेल की नाही ह्याबद्दल सांशकता आहे.. मुळात ३०च्या मंदीची कारणात घटणारी मागणी हे अत्यंत महत्त्वाचे कारण होते.. आजच्या आर्थिक पेचप्रसंगात मागणी घटत नाहिये, आर्थिक अ-व्यवस्थापनेमुळे निर्माण झालेला हा चलनाचा लोचा आहे.. ह्या क्रायसिस मध्ये माझ्या मते मुळात टोटल वेल्थ (आणि त्यामुळे मार्केट पर्सिव्ड वेल्थ, लिक्विडीटी etc) हीच प्रचंड प्रमाणात फुगली आहे ..
तटी: जॉन केन्स ने म्हटले होते की आर्थिक मंदीच्या/क्रायसिसच्या काळात एकच धंदा तेजीत असतो.. अर्थशास्त्रज्ञाचा तेव्हा आता economics मध्ये उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत जाणे सगळ्यात फायदेशीर ठरेल
-------------------------
उत्तम व्येव्हारे जोडोनिया धन
उदास विचारे 'सेव्ह' करी
केदार
केदार तुम्ही फार छान लिहीले आहे. इतरांचेहि लिखाण अभ्यासपूर्ण वाटते. या theory प्रमाणे झाले हे का झाले हे कळते.
पण खरे कारण असे की मुळात माणसे स्वार्थी, लोभी, नि आधाशी. त्यात भर लाचलुचपत. सरकारी लोकांची आतून फूस (त्यांच्या च्या स्वतःच्या फायद्यासाठी!) या सगळ्या गोष्टी पण असतात.
जसा देश मोठा तसाच भ्रष्टाचारहि मोठा! त्यातून रिपब्लिकन म्हणजे दुसर्या बाजीरावाचे वारसदार! आपल्याच जनतेला लुटून श्रीमंत बनणारे! त्यामुळे सगळी theory माहित असूनही, शहाणपणा गहाण टाकून असले धोकेबाज धंदे केले.
त्यांच्यात नि माझ्या दोन तीन मित्रात फरक एव्हढाच की त्यांनी शेअर बाजारात असेच पैसे घालवले पण त्यांना 'bail out' करायला कुणि आले नाहीत!
कसली भांडवलशाही नि काय? पैसा आला की theory, नीतिमत्ता, कायदा सगळा खड्ड्यात!
केदार, छान
केदार, छान समजावून सांगितलस.. बेल आउट प्लान हे नावच चुकीचं आहे हे पटतय.. मुळात मिडीयाने सामान्य माणसाच्या मनात एक वेगळाच कीडा सोडून दिला की टॅक्स पेअर चा पैसा वॉल स्ट्रीत वाचवण्यासाठी आणि पर्यायाने श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी वापरला जाणार.. पण क्रेडीट मार्केट सांभाळण्यासाठी हे कराव लागणारच हे इतक प्रकर्षाने मांडलं गेलेलं दिसलं नाही..
हे सगळं समजवून घेतल्यावर मला काही प्रश्न पडलेत.. झक्की, केदार, मुकुंद तुम्हाला जमेल तसं तुमचे अभ्यासपूर्ण अंदाज ऐकायला आवडतील कारण हा प्रश्न आता राजकीय आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर लढला जातोय.. त्यामुळे गुंतागुंत वाढणार आहेच..
१. मुकुंद ने वरती म्हटल्याप्रमाणे अमेरीका युद्धाद्वारे रीसेशन वर कुरघोडी करण्याची शक्यता कितपत वाटते.. एकतर लोकांच लक्ष अशावेळी मूळ मुद्द्यावरुन फिरवण राजकारण्यांना सोयीस्कर पडतं आणि शस्त्रास्त्र विकीतून तसेच दुसरा प्रदेश काबीज करून पैसाही.. अमेरीकेने हे पूर्वी केलय..
२. काँग्रेस मेंबर्सवर प्रेशर असल्याने त्यांनी काल विधेयक पाडलं पण पुन्हा गुरुवारी ते संमत होईल असं चित्र दिसतय.. अमेरीकन इकॉनॉमी क्रेडीटवर चालतेय त्यामुळे जर हे बिल पास झालं नाही तर होणारे परिणाम किती खोलवर असतील असं वाटतं?
जे नियमित टॅक्स आणि मॉर्टेगेज भरणारे आहेत त्यांनाही गाडी, शिक्षण, घर ह्यासाठी लोन न मिळणे.. बाजरातला पैसा खेळता न राहिल्याने मंदी, छोटे उद्योग बंद आणि मोठ्या प्रमाणात जॉब लॉस, वाढता दैनंदिन खर्च.. तसेच ज्या लोकांनी घर घेतलेयत पण मॉर्टगेज भरणं शक्य नाही त्यांना घर सोडावे लागतील... आणि मग हे सगळं यायला किती वेळ लागेल? गेल्या आठवड्यात बुश आणि त्यांचे सहकारी आज अत्ता ताबडतोब अशी घाई करत होते पैसा ओतायची म्हणजे दर दिवशी डेमेज होत असेलच.. मग गेल्या आठ दिवसात किती डॅमेज झाला त्याची अकांटीबिलीटी असते काय? कालची वॉलस्ट्रीटवरची पडझड ही भावनिक जास्त होती असं वाटलं...
३. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की ७०० बिलियन भरून जरी तुम्ही टेकू लावलेत तरी अशी परिस्थिती परत येणार नाही ह्यासाठी रुट कॉज एनॅलिसिस, तसच सुधारीत मॉनिटरी सिस्टीम ह्यासाठी काही करायला हवय ह्याची समज आणि आवाका समजण्याची ताकद दोन्ही उमेदवारांमधे दिसत नाहीये.. शिवाय बुशचे मुख्य आर्थिक सल्लागार गोल्डमन सच चे सर्वेसर्वा होते मग त्यांनी हा होणारा प्रकार वेळीच ओळखून बुश तसेच अमेरीकन जनतेला सावध करायला नको होते का? म्हणजे त्यांच्या जबाबदार्या त्यांना सांभाळता न आल्याने हा फटका सामान्य लोकांना बसतो आहेच.. शिवाय तुमचे पेंशन फंड्स, इन्वेस्ट्मेंट्स ह्यात गुंतलेत त्यामुळे लोकहो तुम्हाला ह्या बिलास सपोर्ट करावेच लागेल दुसरा पर्याय नाही असं म्हणणं म्हणजे लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेण्यासारखेच नाही का?
४. अमेरीकेला उत्पादन, मूलभूत सुविधा, शिक्षण ह्यावर लक्ष देणं आवश्यक आहे जर ते १५-२० वर्षांचा विचार करत असतील.. ह्या अशा शॉर्ट टर्म पॅच अप्स आणि शॉर्ट साईटेड करेक्शन्सवर जर वेळ, पैसा जाणार असेल तर काही दशकांनी अमेरीका कोणत्या मार्गाने जाईल हे बघावे लागेल.. शिवाय अमेरीकेन इ़कॉनॉमी फ्लॅट होत जाणार लाँग रन मधे असं वाटतय.. कारण आता इथले आर्थिक सल्लगार सुद्धा ग्लोबल पॉर्टफोलिओ बनवायला सांगताहेत जेणेकरूण भारतासारख्या विकसनशील देशात गुतवणूक करून लॉग रन मधे नक्की फायदा होऊ शकेल निदान रीस्क कमी राहील.. थोड्क्यात अमेरीकेला वॉलस्ट्रीटच्या पलिकडे विचार् करावाच लागेल असं दिसतय..
५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमेरीकेची भांडवलशाही अर्थव्यवस्था ही इमेज पुसून मिश्र अर्थव्यवस्था म्हणून म्हटली जाणं म्हणजे मोठं फेल्युअर नव्हे काय?
बरोबर
बरोबर मुकूंद हे लोक ठिगळ लावत आहेत व ते ही चुकीच्या ठिकानी. हा प्रॉब्मेम तयारच मूळी कर्ज वापस न देनार्या लोकांमुळे. ऐकतर भरमसाठ कर्ज ज्यांची ऐपत नाही त्यांना दिली आणि आता ते देत नाहीत म्हणून ओरडा.
टण्याने लिहील्या सारखे ईतर काही करुन हा प्रॉब्लेम घालवता येनार नाही. सध्या फक्त गरज आहे ती लिक्वीडीटीची आणि त्यासाठी लागनार्या १५० ते २५० बिलीयनची. ऐकदाका त्या बँकाना अशी मदत मिळाली की आपोआपच गणित पहील्या स्टेप वर येईल व ईकॉनॉमी ज्या बँका चांगल्या नाहीत त्यांना गाळाला नेईल वा ता विकल्या जातील.
भारतात नाही शेतकरी कर्ज वापस देऊ शकत नाहीत म्हणून सरकार बँकाना पॅकेज देते. भ्रष्टाचारामुळे ते शेतकर्यांना पोचत नाही ही गोष्ट वेगळी पण त्यासाठी सरकार सगळ्याच बँकाना विकत घेत सुटत नाही. ( ऑफ्कोर्स मोठ्या बँका आधीच सरकारी आहेत पण त्यांना विकायचा ( प्रायव्हेट करन्याचा) प्रयत्नात सरकार राहील.)
क्रेडीट मार्केट सांभाळण्यासाठी हे कराव लागणारच हे इतक प्रकर्षाने मांडलं गेलेलं दिसलं नाही.. >>>> ऐकदम बरोबर उपास. त्यामुळेच बुशचे भाषण मला थर्ड ग्रेड वाटले.
लाँग टर्म उपाय ऐकच आहे. लगेच पैसा उपलब्ध करुन देऊन पडनार्या बँकाना जास्त कर्ज देने. त्यांना टॅक्स पॅकेज देने व लोकांना कर्ज वापस करन्यास, कर्ज कमी करन्यास, मागनी कमी करन्याच व थोडी सेव्हींग करन्यास प्रवृत्त करने. फार तर मोठ्या कंपन्यांशी अशा बँकाचे लग्न लावुन देने हा आणखी ऐक उपाय. ( जसे बेअर स्टर्ण्स चे लागले)
मागच्या
मागच्या आठवड्यात पुन्याच्या एका इस्टेट एजन्टचा फोन आला होता. भुसारी कॉलनीत एका बिल्डरने ६ महिन्यापूर्वी ६५०० रुपयाने बूकिन्ग घेतले होते तो आता ३५०० रु. ने ऑफर करीत आहे. भाव कमी होणार काय? एजन्ट म्हनतोय दिवाळीपर्यन्त थाम्बा...
काय भानगड आहे?
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
भुसारीत
भुसारीत ६५००? ऐजंट नक्कीच खोट बोलत असनार. भाव ऐकदम खुप कमी होनार नाहीत पण स्थिर होतील वा ४-५ टक्क्यांनी कमी होतील असे वाटते.
केदार,
केदार,
सध्याच्या अस्थिर मार्केट्मध्ये कंपनीच्या ४०१K मध्ये पैसे कमी टाकावे, तेवढेच ठेवावे की जास्त टाकावे? अर्थात, कंपनी मॅचींग एवढे नक्कीच टाकावे. पण परवा mad money show प्रमाणे सध्या कंपनी मॅचींग एवढेच टाकावे. बाकी कॅश घ्यावी. कारण मार्केट स्टेबल नसल्यामुळे पुढील गुंतवणूक टाळावी. ही गुंतवणूक जरी म्युच्युअल फंड मध्ये असली तरी. ह्याबाबत तुझ काय मत आहे?
तू प्रेडिक्ट केल्याप्रमाणे मार्केट १०,००० च्या खाली गेल्यामुळे ह्या बाबतीत तुझ मत जाणून घ्यायला आवडेल.
बेल आउट
बेल आउट अगदीच वाईट नसावे. निदान थोडातरी श्वास घेता येइल.
मुकुंद, तुम्ही म्हटल्याप्रमाणे long term मधील जागतिक मंदी कशी टाळता येइल, हा मात्र कळीचा मुद्दा आहे.
केदार, तू म्हटल्याप्रमाणे बँकांना सवलती व लग्न लावून देणे हा सुध्दा तात्पुरता उपाय ठरेल.
दिसेल त्याला शस्त्रास्त्रे विकणार्या अमेरिकेला पाहून तिसर्या महायुध्दाची चिन्हे दिसत आहेत म्हणायला हरकत नाही.
४०१K मध्ये
४०१K मध्ये पैसे कमी टाकावे, तेवढेच ठेवावे की जास्त टाकावे? अर्थात, कंपनी मॅचींग एवढे नक्कीच टाकावे >>
बरोबर. तु ४०१के मध्ये निदान कंपनी मॅचींग ऐवढे टाकच. दुसरा पर्याय रॉथ आय आर ऐ आहे पण तो अफ्टर टॅक्स आहे. व सध्या काही फायद्याचा नाही. नविन म्यूचवल फंड मध्ये आत्ता पैसे टाकू नयेत हे मात्र नक्की. अजुन थोडा वेळ वाट पाहा. डो ९२०० वर येईल येत्या काही आठवड्यात. उद्या डो कदचीत ३५० ते ४०० ने गेन पण करेल.
फक्त तुझ्या बाबतीत लिहायचे असेल तर अजुन रिटायर व्हायला खुप वर्षे असल्यामूळे ४०१ के मुळे अगदीच घाबरुन जायला नको. येत्या ३ वर्षात हे सर्व स्टेबल होईल व ४०१के परत वर येईल. त्यामूळे लाँग टर्म गोल ठेवायला हरकत नाही. मार्केट पडुन पडुन फार तर ८८०० ला जाऊ शकते. (व्हर्स्ट केस) पण नंतर पडनार तरी किती. वर येनारच. बर्याच मेजर कंपन्या फायद्यात आहेत त्यामुळे जाने, फेब मध्ये मार्केट्ला अर्नींग्स गाईडन्स मिळेल. ऐकदाका क्रेडीट क्रंच संपला की परत ऐकदा बुल्स मार्केट कंट्रोल करतील. पण त्या साठी निदान १ ते १ १/२ वर्ष वाट पाहावी लागनार. जर चुकून डो ८८०० ला आलाच तर तेव्हा आनंदी होऊन लाँगटर्म साठी खरेदी करायला हवी. पण येत्या काही दिवसात गुंतवणूक करु नये. सध्या काही दिवस तरी कॅशच ठेव गुंतवनूक करु नको.
Thanks केदार.
Thanks केदार. अगदी prompt reply दिल्याबद्दल.
केदार, आज
केदार,
आज मी लेख परत एकदा वाचला. अतिशय उत्तम माहिती आहे. माझ्या बर्याच प्रश्नाची उत्तरे मिळाली.
(आधीच्या मेल च्या उत्तरा साठी थान्क्स)
आम्ही नांदेड सिटी मधे २७५० ने जागा बुक केली आहे. सध्याचा ट्रेंड पाहता त्यात गुंतवणे योग्य ठरेल का? का आता रद्द करुन मग किमती आणखी कमी झाला की विचार करावा?
धन्यवाद.
मनस्मी, वर
मनस्मी,
वर लिहील्याप्रमाने पुण्यात किंमती कोसळनार नाहीत तर स्थिर होतील. २७५० चा भाव पुढच्या वर्षी ३००० होनार नाही तसेच अगदी १८-१९०० ही होनार नाही असे मला वाटते. त्यामूळे ही जर गुंतवनूक असेल तर लगेच तुम्हाला त्यावर परतावा मिळनार नाही. ह्या दोन -तिन वर्षांनंतर परत ऐकदा भाव वाढेल असे वाटते.
रद्द करायचा विचार करनार असाल तर पुण्यात पहिले साधारण मार्केट कसे झाले आहे ह्याचा आढावा घ्या. मी ही शिकागोत असल्यामूळे फर्स्ट हॅन्ड माहीती नाहीये.
केदार, धन्य
केदार,
धन्यवाद.
पुण्यात वाकड मधे २ बीएच्के ३० लाख आणि ३ बीएच्के ३८ लाख असे भाव झाले आहेत.
(काही महिन्यापुर्वी तिथे आवाच्या सव्वा भाव ऐकले होते).
मीहि न्यु जर्सी मधे आहे त्यामुळे रीअल भाव माहित करुनच पुढील निर्णय घ्यावा लागेल.
परत एकदा धन्यवाद.
केदार, डो
केदार,
डो अजुन खाली येइल असा वाटतेय का? की हीच बॉटमलाईन म्हणुन खरेदी करावी? आधि वाटले शुक्रवार शेवटचा दिवस असेल सोमवारी गेन होइल पण नाही सोमवरी पण नाही अणि आज मंगळवारी पण नाही. तुमचा मत जाणुन घ्यायला आवडेल.
"भुसा"री
"भुसा"री कॉलनी आणि टोणगा वा! काय भारी कॉम्बिनेशन आहे.
टोणगा ह घे रे .
६५०० हा जरा जास्तच फुगवलेला रेट वाटत आहे.
सध्या तरी त्या येरियात ४०००-५००० ह्या दरम्यान भाव होता. मी हा दोन तीन महिन्यापुर्वीचा बोलत आहे.
बाकी केदार बोलला तस भाव स्थिर व्हायला सुरु झाल आहेच.
आधी पिम्परी चिन्चवड मध्ये देखील बिल्डर लोक माज आल्यासारख आठव्ड्याला १००-१५० रु स्केअर फुट असा भाव वाढवत होते.
आता थोडस स्थिर वाटत आहे.
किमान मला तरी एका एजन्ट आणि एका बिल्डरचा तीनदा फोन येवुन गेलाय मागच्या २ महिन्यात. आणि तिनही वेळा त्याने पिम्परी चिन्चवड येरीयत सेमच रेट बोलला आहे. (तो अजुनही माझ्या खिशाला परवडत नाही ही गोष्ट वेगळी. :))
केदार, वर
केदार,
वर aashi ने विचारलेच आहे.... डो अजून खाली येईल का? मी गुंतवणूक क्षेत्रात नवीन आहे आणि मला सुद्धा स्टॉक मध्ये इन्वेस्ट करायला सुरुवात करायची आहे ... त्यासाठी ही वेळ योग्य आहे का? आणि घ्यायचे असतील तर अशावेळी कोणते शेअर्स घ्यावेत?
बाकि हा लेख आणि त्यावरच्या कॉमेंट्स फारच माहितीपूर्ण आहेत.....
http://www.bloomberg.com/apps
http://www.bloomberg.com/apps/news?pid=20601091&sid=aIsc9lBReDZs&refer=i...
आशी, हीच
आशी,
हीच बॉटमलाईन म्हणुन खरेदी करावी? >>> आता मी काल लिहील्याप्रमाने आता ८८०० ची वाट पाहात आहे. पण तु जर १०० रु टाकनार असशील तर २० आत्ता ९००० ला ३०, ८८०० ला ३० अशी खरेदी कर. हा बॉटम नाही ऐवढे मात्र नक्की.
चार पाच दिवसांपुर्वी लिहील्याप्रमाने भारतात व आज अमेरिकेतही ईंट्रेस्ट रेटस कमी झाले आहेत त्यामुळे मार्केट मध्ये आता नविन कॅश ( भारतात २२००० करोड, अमेरिकेत अजुन माहीत नाही) येईल. थोडाफार सपोर्ट त्यामुळे क्रेडीट क्रंचला मिळू शकेल.
डो अजून खाली येईल का>> नक्कीच.
त्यासाठी ही वेळ योग्य आहे का? नाही अजुन नाही. पण ऐक प्रश्न तुला विचारतो, जर तुझे १००० डॉलर अचानक कमी झाले तर तुला काय वाटते, उत्तर लिहीन्याची जरुरी नाही पण जर खालील उत्तर असतील तर त्याप्रमाने तु ठरव.
१. बापरे आता मी काय करु, हे उत्तर असेल तर मार्केट मध्ये नको उतरु. कारण ८० टक्के लोक पैसे गमावत असतात.
२. ठिकय येत्या वर्षात भरुन निघतील - मग ये.
३. थोडी हळहळ वाटतेय - ओके मग जास्त ईन्वेस्ट करु नको.
अशावेळी कोणते शेअर्स घ्यावेत? >> फार अवघड आहे हा प्रश्न कारण सर्वच खाली येत आहेत. पण बॅंकेमध्ये गोल्डमन सॅक्स व चेस चे नक्कीच माझ्या यादीत असतील.
माणसा ने दिलेल्या लिंक नुसार डॉ - प्रति ५० रु पर्यंत जाईल असे दिसतेय. मी म्हणेल की भारतात आत्ता पैसे पाठव. ३९०, ५९० अशा दिवसांसाठी सध्या १० टक्के ऐफ डी ला मिळत आहेत ( आय सी आय सी आय), सरकारी बँकात अजुन जास्त मिळतील. तिकडे गुंतव. १० टक्के सध्याच्या काळात खुप जास्त परतावा आहे.
भारतात गुंतवनुक करनार असशिल तर hdil, rpl, reliance, ntpc, larsen, marketer lines, abg shipyard, हे शेअर्स चांगले आहेत. hdil ची सध्या पार वाट लागलीये पण ती कंपनी सध्या अमेरिकन हाऊसिंग बबल च्या भितीमुळे खाली गेलीय, ती फक्त भारतातच काम करते त्यामुळे येत्या दोन वर्षात कदाचीत २०० टक्के फायदा (आजच्या किमतीला होऊ शकतो १३६ रु, जानेवारी १४०० रु ऐक शेअर होता. त्याची बुक व्हॅल्यू (रिटर्न्स मुळे) निदान ४७० असायला पाहीजे. त्यामुळे बघ ४०० - १३६ ऐवढा फायदा.
धन्यवाद
धन्यवाद केदार. गेले २ दिवस मनाला आवर घातलाय. २-३ लिस्ट वर आहेत बरेच दिवस आणि ईतक टेम्प्टींग होतय आता तु सन्गितल्याप्रमाणे करते २०-३०-३० चांगली कल्पना!
तो क्रेमर बघितला का? पुढे ५ वर्षात पैसे हवे असतील तर अत्ताच काढुन घ्या म्हणतोय. हे लोक टीवी शोज मधुन अस बोलुन बोलुन पॅनिक का वाढवतायत कळत नाहिय
क्रेमर
क्रेमर बर्याच अंशी खरे सांगतोय. खर सांगायचे झाले तर ही पॅनिक त्या डूब्याच्या भाषनाने आणि काँग्रेसच्या बेलआउट पॅकेजच्या घरसोडीने वाढविली आहे. जनरली मार्केट हे सेंटींमेंट वर चालत असल्यामूळे व जनतेची विस्मरन शक्ती जास्त असल्यामूळे मी जरी ३ वर्षात गोष्टी रुळतील असे सांगत असलो तरी त्या तश्या होतीलच असे नाही.
पण त्या पहिल्या २० साठीही काही दिवस नक्की थांब, कॅश ठेव. अनलेस यु आर प्रिप्रेअर्ड. ऑर तु ज्या कंपन्या घेनार आहेस, त्या हाउसिंगशी रिलेटेड नाहीत व सॉलीड आहेत. कारण हा बॉटम नाही.
धन्यवाद
धन्यवाद केदार. माणसाने दिलेली लिंक पाहिली... तू म्हणतोस तसे भारतात पैसे पाठवायला हरकत नाही....
केदार..
केदार.. तुझ्या रंगीबेरंगी मधे मी पुढे देत असलेले स्पिच इंग्लिशमधे जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन टाकत आहे ... त्याबद्दल तुझी व सर्व मायबोलीकरांची आधीच माफी मागतो.. पण हे स्पिच आजही चपखल लागु पडते... त्यावरुन हे कळते की आपण सगळे इतिहासावरुन काहीच बोध घेत नाही.. त्यात सरकारही आले.. बँक्सही आल्या व तुमच्याआमच्यासारखे इन्व्हेस्टरही आले... हे स्पिच जरुर वाचा.. ते वाचल्यावर हे कोणाचे व कधी दिलेले स्पिच आहे ते मी खाली नमुद करणारच आहे....
I am certain that my fellow Americans expect that on my induction into the Presidency I will address them with a candor and a decision which the present situation of our people impel. This is preeminently the time to speak the truth, the whole truth, frankly and boldly. Nor need we shrink from honestly facing conditions in our country today. This great Nation will endure as it has endured, will revive and will prosper. So, first of all, let me assert my firm belief that the only thing we have to fear is fear itself—nameless, unreasoning, unjustified terror which paralyzes needed efforts to convert retreat into advance. In every dark hour of our national life a leadership of frankness and vigor has met with that understanding and support of the people themselves which is essential to victory. I am convinced that you will again give that support to leadership in these critical days.
In such a spirit on my part and on yours we face our common difficulties. They concern, thank God, only material things. Values have shrunken to fantastic levels; taxes have risen; our ability to pay has fallen; government of all kinds is faced by serious curtailment of income; the means of exchange are frozen in the currents of trade; the withered leaves of industrial enterprise lie on every side; farmers find no markets for their produce; the savings of many years in thousands of families are gone.
More important, a host of unemployed citizens face the grim problem of existence, and an equally great number toil with little return. Only a foolish optimist can deny the dark realities of the moment.
Yet our distress comes from no failure of substance. We are stricken by no plague of locusts. Compared with the perils which our forefathers conquered because they believed and were not afraid, we have still much to be thankful for. Nature still offers her bounty and human efforts have multiplied it. Plenty is at our doorstep, but a generous use of it languishes in the very sight of the supply. Primarily this is because the rulers of the exchange of mankind’s goods have failed, through their own stubbornness and their own incompetence, have admitted their failure, and abdicated. Practices of the unscrupulous money changers stand indicted in the court of public opinion, rejected by the hearts and minds of men.
True they have tried, but their efforts have been cast in the pattern of an outworn tradition. Faced by failure of credit they have proposed only the lending of more money. Stripped of the lure of profit by which to induce our people to follow their false leadership, they have resorted to exhortations, pleading tearfully for restored confidence. They know only the rules of a generation of self-seekers. They have no vision, and when there is no vision the people perish.
The money changers have fled from their high seats in the temple of our civilization. We may now restore that temple to the ancient truths. The measure of the restoration lies in the extent to which we apply social values more noble than mere monetary profit.
Happiness lies not in the mere possession of money; it lies in the joy of achievement, in the thrill of creative effort. The joy and moral stimulation of work no longer must be forgotten in the mad chase of evanescent profits. These dark days will be worth all they cost us if they teach us that our true destiny is not to be ministered unto but to minister to ourselves and to our fellow men.
Recognition of the falsity of material wealth as the standard of success goes hand in hand with the abandonment of the false belief that public office and high political position are to be valued only by the standards of pride of place and personal profit; and there must be an end to a conduct in banking and in business which too often has given to a sacred trust the likeness of callous and selfish wrongdoing. Small wonder that confidence languishes, for it thrives only on honesty, on honor, on the sacredness of obligations, on faithful protection, on unselfish performance; without them it cannot live.
Restoration calls, however, not for changes in ethics alone. This Nation asks for action, and action now.
Our greatest primary task is to put people to work. This is no unsolvable problem if we face it wisely and courageously. It can be accomplished in part by direct recruiting by the Government itself, treating the task as we would treat the emergency of a war, but at the same time, through this employment, accomplishing greatly needed projects to stimulate and reorganize the use of our natural resources.
Finally, in our progress toward a resumption of work we require two safeguards against a return of the evils of the old order; there must be a strict supervision of all banking and credits and investments; there must be an end to speculation with other people’s money, and there must be provision for an adequate but sound currency
For the trust reposed in me I will return the courage and the devotion that befit the time. I can do no less.
We face the arduous days that lie before us in the warm courage of the national unity; with the clear consciousness of seeking old and precious moral values; with the clean satisfaction that comes from the stern performance of duty by old and young alike. We aim at the assurance of a rounded and permanent national life.
We do not distrust the future of essential democracy. The people of the United States have not failed. In their need they have registered a mandate that they want direct, vigorous action. They have asked for discipline and direction under leadership. They have made me the present instrument of their wishes. In the spirit of the gift I take it.
In this dedication of a Nation we humbly ask the blessing of God. May He protect each and every one of us. May He guide me in the days to come.
हे स्पिच आहे प्रेसिडेंट फ्रॅन्कलीन डी रुझव्हेल्ट.... यांचे.. १९३२ च्या प्रेसिडेन्शिअल इनॉगरेशनच्या वेळी ...जागतीक मंदीच्या वेळी दिलेले... कुठे हे स्पिच.. आणि कुठे सॅरा पेलीनचे केटि केरिगला दिलेले बेल आउट वरचे गहन उत्तर! आणि कुठे यंदाच्या इलेक्शनमधे चाललेली.. मॅव्हरिकगीरी व लिपस्टिक ऑन अ पिग वरची चर्चा.... गो फिगर!
केदार व शंतनु.... तुम्ही म्हणता की सध्याची परिस्थीती १९३० पेक्षा वेगळी आहे... तेव्हा क्रेडिट क्रायसिस नव्हता.. पण सध्याचा क्रेडिट क्रायसिस.. हा ७०० बिलिअन बेल आउट मुळे सुटणार आहे अशी माझी समजुत होती.. म्हणजे माझी अशी समजुत होती की क्रेडिट मार्केट जे क्लॉग्ड अप झाले आहे ही इन्व्हेस्टरांची भिती(व रिऍलिटी).. हा प्लान पास झाल्यामुळे नाहीशी होणार होती .. पण तसे न होता आपण स्टॉक मार्केट रसातळाला जाताना बघत आहोत.. असे का?मला माहीत आहे की त्या बेल आउट प्लानचे अजुन इंप्लिमेंटेशन झाले नाही.. पण इन्व्हेस्टरांची ही स्टॉक मार्केट रिऍक्शन फक्त भितीवर आधारीत आहे की ट्रेजरी सेक्रेटरी पॉल्सन लोकांना बेल आउट प्लान समजावण्यात अयशस्वी ठरत आहे?(माठ बुश.... बेल आउट प्लान सबंध अमेरिकेला समजावुन सांगु शकेल याची मला काडीमात्र आशा नाही... सर्व जग या आतापर्यंतच्या वर्स्ट फायनँशिअल क्रायसिसमधुन जात असताना हा महाभाग... स्टेट ऑफ द युनिअनसारखे.. काँग्रेसमधे भाषण करुन.. सर्व अमेरिकन जनतेला या बेल आउट प्लानबद्दल निट समजावुन सांगायच्या ऐवजी... गेल्या आठवड्यात...व्हाइट हाउसच्या बॅकयार्डवर. एकटाच उभा राहुन... काहीतरी बरळला!)
तुम्हा दोघांना २ मूलभुत प्रश्न...
१: स्टॉक मार्केटची फेअर मार्केट व्हॅल्यु क्वांटिफाय करता येते का? करता येत असेल तर सध्याच्या मार्केटमधे ती कीती असावी?
२: या ७०० बिलिअन बेल आउट पॅकेट प्रोपोझलप्रमाणे.. सरकार बँक्स व फायनँशिअल कंपनिजच्या मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटीज करदात्यांच्या पैशातुन.. रिव्हर्स ऑक्शनच्या मदतीने विकत घेणार आहे.. पण या मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटिजची किंमत कोण ठरवणार? अश्या बॅड सिक्युरिटीजची फेअर मार्केट व्हॅल्यु रिव्हर्स ऑक्शन मधे ठरवता येते काय? संकटात आलेल्या बँक्स व फायअँशिअल कंपनीजनी.. त्यांच्या अकाउंटिंग बुक्समधे... तश्या बॅड सिक्युरिटिजची किंमत... काहीही मांडुन ठेवली असेल....
म्हणुन मग ट्रेझरीने.. तिच किंमत द्यावी का? आणि सध्या स्टॉक मार्केट मधे कोणालाच तश्या सिक्युरिटिजची खरी किंमत सांगता येत नसल्यामुळे त्या बॅड सिक्युरिटिजना कोणिच बायर नाही(त्या बॅड सिक्युरिटिज बाय करण्यासाठी..म्हणुन हे ७०० बिलिअनचे बेल आउट प्रपोझल... अशी माझी समजुत आहे .. बरोबर ना?)तर तसे असताना.. तश्या सिक्युरिटिजच्या रिव्हर्स ऑक्शनमधे.. ट्रेझरी त्यांची किंमत कशी ठरवणार? कारण तश्या रिव्हर्स ऑक्शनमधे २ प्रकार घडु शकतात.. एक म्हणजे तश्या बॅड मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटिजची किंमत... मार्केट भावापेक्षा जास्त देउन.. ट्रेजरी विकत घेणार.. व त्यामुळे संकटात सापडलेल्या बँक्स व फायनॅनशिअल कंपनिजचा सॉल्व्हन्सीचा व लिक्विडिटीचा प्रॉब्लेम सुटणार.. पण तसे झाले तर टॅक्स पेअर्सचे नुकसान होणार... कारण टॅक्सपेअर्सच्या ७०० बिलिअन डॉलर्समधे.. बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत.. सिक्युरिटिज विकत घेतल्या गेल्या.. दुसरा प्रकार असाही होउ शकतो की ट्रेजरी त्या बॅड मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटिज मार्केट भावापेक्षा कमी किंमतीत विकत घेणार.. पण तसे असते तर आतापर्यंत तश्या कमी किंमतीत त्या बँकानी व फायनॅनशिअल कंपनीजनी.. त्या सिक्युरिटिज केव्हाच विकुन टाकल्या असत्या... पण ते अजुनपर्यंत तश्या सिक्युरिटिज विकु शकले नाहीत त्यातुनच कळुन येते की तश्या बॅड सिक्युरिटिजची फेअर मार्केट व्हॅल्यु... ओपन मार्केटमधे कोणीच ठरवायला तयार नाही .. म्हणुन त्यांना कोणी बायर नाही... तर असे असताना रिव्हर्स ऑक्शनमधे ट्रेजरीला असे का वाटते की ते अश्या बॅड सिक्युरीटिजची फेअर मार्केट ठरवु शकतील?
आणी हेही खरे आहे का की ट्रेझरी मग त्याच बॅड मॉर्गेज बेस्ड सिक्युरिटि़ज.. रिव्हर्स ऑक्शनमधे... त्याच फायनँशिअल कंपनीजना व बँकांना विकणार आहे?म्हणजे ज्या लोकांनी हे सगळे रामायण घडवले... त्याच लोकांच्या हातात परत एकदा हा सगळा कारभार ट्रेझरी सोपवणार आहे का? तसे झाले तर ते माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होणार नाही का?
केदार अगदी
केदार अगदी तू म्हणालास तसाच डाउ घसरतोय.. अत्ता (हे पोस्ट लिहित असताना) तो 8,658.36 आहे
तुका म्हणे उभे रहावे जे जे होईल ते ते पहावे...
मुकुंद, हीच चर्चा चालू होती CNN वर की त्या ट्रबल्ड सिक्युरीटीजचे बाजारमूल्य कसे ठरवणार ट्रेजरी आणि कोणाला किती पैसे द्यायचे आणि काय विकत घ्यायचे ह्या ७०० बिलियन मधे हे ट्रेजरी कसे ठरवणार? खरं म्हणजे ७०० बिलियन मिळवणे हे त्यांच्यापुढे पहिले काम होते जे पार पडले पण ते कुठे कसे वापरायचे हे अजून सुस्पष्ट प्लॅनिंग (कदाचित वेळेअभावी) केलेले नाही असे वाटते.. जिथे जखम आहे तिथे पट्टी बांधणे चालू दिसतेय..
वरचं भाषण वाचून खरच अंतर्मुख व्हायला हवं!
मी ही अगदी
मी ही अगदी हेच लिहायला आले होते, केदार तु म्हटल्याप्रमाणे ८८ तर नाही त्याच्याही खाली गेलाय. आणि मी आत्ता शांतपणे वाट बघतेय बॉटमलाईन ची
केदार, परत
केदार, परत एकदा तू बरोबर.
मी माझा तुला financial advisor बनवायला तयार आहे. तुझ त्यावर काय मत? हे मनापासून लिहिल आहे.
Pages