H1 extension stamping

Submitted by sneha1 on 19 July, 2010 - 17:19

नवर्‍याचा व्हिसा या फेब्रूवारीमधे extend झाला.त्याच्यानंतर पहिल्यांदाच भारतात जायचे आहे.त्यामुळे स्टॅम्पिन्ग बद्दल माहिती हवी आहे.
- overall process बद्दल माहिती हवी आहे.
-hdfc मधे जे पैसे भरायचे असतात, ते अमेरिकेतून भरता येतात का?
आणि अजून काही कोणाला जास्तीची माहिती आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाट बघतोय पोस्ट ची.. मला पण रिस्टँम्पींग ला जावे लागनार आहे..

बादवे - किती दिवसामधे व्हिसा एक्सटेंशन होऊन आले?

मूर्ती.कॉमच्या फोरम्सवर इत्थंभूत माहिती असते. ती नीट वाचून घ्या.
अमेरिकेतून पैसे भरता येत नसावेत.(म्हणजे आम्ही भरले नव्हते, बाबांनी जाऊन भरले.)
माझा नवरा केवळ २ आठवडे होता भारतात, तेव्हढ्या वेळात सर्व प्रोसेस झाली, पासपोर्ट घरपोच मिळाला.

बाकी डिटेल्स आत्ता आठवत नाहीयेत. नंतर लिहीन.

>>hdfc मधे जे पैसे भरायचे असतात, ते अमेरिकेतून भरता येतात का?
नाही.. पैसे भरल्याची पावती लागते.
पैसे भरल्याची पावतीचे details दिल्यानन्तरच online date घेता येते. interview dates सहज मिळत नाहीत, वेळ लागतो आहे. तसेच, मुम्बई चे consulate खुप बिझी होते मागच्या महिन्यापर्यन्त ..

>>माझा नवरा केवळ २ आठवडे होता भारतात, तेव्हढ्या वेळात सर्व प्रोसेस झाली, पासपोर्ट घरपोच मिळाला.
बस्के, स्टॅम्पिन्ग recently झाले का?

धन्यवाद सगळ्यांना..किशोर, नक्की आठवत नाही, पण बराच वेळ लागला होता.२-३ महिने असेल कदाचित.
अजून एक, माझ्या पासपोर्टवर जुना पत्ता आहे,तिथे आता कोणी राहत नाही.म्हणून मला पासपोर्ट घरपोच नको आहे.अजूनही त्याच दिवशी संध्याकाळी कॉन्सुलेटमधे पासपोर्ट मिळतो का?

>>अजूनही त्याच दिवशी संध्याकाळी कॉन्सुलेटमधे पासपोर्ट मिळतो का?
मुम्बई = नाही Sad
दिल्ली = हो.. दुसर्‍या दिवशी.

सिद्धार्थ. ही मागच्या मे महिन्यातील गोष्ट. आता काही बदल झाले असल्यास ठाऊक नाही.
घरपोच नाही मिळत आता पासपोर्ट?? Uhoh

व्हिसासाठी जो फॉर्म ( बहुदा I-160 नावाचा फॉर्म) आपण भरून देतो त्यावर घराचा पत्ता (permanent address) विचारलेला असतो तिथे जो पत्ता तुम्ही देता त्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जातो. पासपोर्ट वर कुठला पत्ता आहे याचा काही संबंध नाही. मी भारतात व्हिसा स्टँप केला त्याच्या काही दिवस आधीच अमेरीकेत पासपोर्ट रीन्यु केला त्यामुळे माझ्या पासपोर्टवर इथल्या घराचा पत्ता होता.

बस्के घरपोच मिळतो पासपोर्ट. स्नेहा१ ह्यांना कॉन्सुलेटमधे मिळतो कि नाही ते विचारायचं आहे.
३-४ वर्षांपूर्वी माझ्या काही कलिग्जना मिळाता होता मुंबईमध्ये कॉन्सुलेटमधे पासपोर्ट. आता नियम बदलले असतील तर माहित नाही.
शिवाय विसा अ‍ॅप्लिकेशन फॉर्ममध्ये पत्ता देता येत असेल ना पासपोर्ट शिप कुठे करायचा त्याचा. मला नाही वाटतं कि पासपोर्टवरच्या पत्त्यावर ते पाठवतात.
माझ्या नवर्‍याच्या पासपोर्टवर वेगळा पत्ता आहे आणि सध्याचा पत्ता वेगळा आहे. त्याला नविन पत्त्यावर पासपोर्ट दुसर्‍यादिवशी घरपोच मिळाला होता.

sneha1,
तुमच्या आहोन्ची कम्पनी भारतीय आहे का? असेल तर, दिल्ली मधे डेट घेता येते.
मी एप्रिल मधे दिल्ली येथे स्टॅम्पिन्ग केले , आम्हाला पासपोर्ट दुसर्‍या दिवशी मिळाले.

मुंबईत पण विसा पेपर्स जमा केलेल्या ऑफीस मध्ये ( बहुधा वरळीला दुसर्‍या दिवशी ) पासपोर्ट मिळतो. किंवा पुण्यात पेपर्स जमा केलेल्या ऑफिसमध्ये ( नाव विसरलो त्या ऑफीसचं) मिळतो.

sneha1,
२ आठवड्यापुर्वी माझ्या एका मित्राने मुम्बई मधे स्टॅम्पिन्ग केले, पासपोर्ट मुम्बई कॉन्सुलेटमधे दुसर्‍या दिवशी मिळाला. पण, तो म्हणाला कॉन्सुलेटच्या नियमाप्रमाणे पासपोर्ट मेल केले जातात.

>>शिवाय विसा अ‍ॅप्लिकेशन फॉर्ममध्ये पत्ता देता येत असेल ना पासपोर्ट शिप कुठे करायचा त्याचा. मला नाही वाटतं कि पासपोर्टवरच्या पत्त्यावर ते पाठवतात
बरोबर!..

मी मे महिन्यात व्हिसा स्टँप केला.पासपोर्ट आता लगेच त्यादिवशी मिळत नाही.दुसर्‍या दिवशी व्ही.एफ.एस च्या (महालक्ष्मी) ऑफिसमध्ये किंवा तिसर्‍या दिवशी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळतो.माझा,नवर्‍याचा आणि मुलाचा पासपोर्टवरचा पत्ता वेगळा आहे.पण आम्ही दिलेल्या पत्त्यावर ३ ते ४ दिवसात पासपोर्ट मिळाला.पासपोर्ट ऑनलाईन ट्रॅक करता येतो.
नविन ऑनलाईन फॉर्मवर(DS 160)फोटो अपलोड करायला आम्हाला थोडा त्रास झाला.
HDFC मध्ये पैसे भारतातूनच भरावे लागतात.त्यासाठी पासपोर्टची कॉपी लागते.त्यानंतर ज्या बारकोडच्या पावत्या मिळतात त्यावरचा नंबर डेट घेताना लागतो.डेट मिळायला थोडा अवधी लागतो.मोज़के दिवस घेऊन जाणार असाल तर सुट्टीला गेल्यावर लगेचची डेट घ्या कारण जर काही कारणाने डेट चेंज करावी लागली तर मार्जीन असू द्यात.

सगळ्यांना पुन्हा धन्यवाद्.एक पत्त्याचे टेन्शन दूर झाले.पूर्वा, फोटो अपलोड मधे काय प्रॉब्लेम आला?काही वेगळा साईझ होता का?
आणि श्री, तुम्ही पुण्याच्या ऑफिसचे काय म्हणालात?मी पुण्यालाच राहणार आहे म्हणून विचारले.

स्कॅन केलेला फोटो त्यांच्या साईज रिक्वायरमेंटमध्ये फिट करताना जरा खटपट करावी लागली. >> हो हा प्रॉब्लेम मला पण बहिणीचा विसा करतानां आला.

फोटो ग्राफर कडुन वीसा साठीच्या फोटोची softcopy मिळते, ती upload केल्यास प्रॉब्लेम येत नाही.

स्नेहा VFS च्या पुणे ऑफिस मध्ये पण तुम्ही पासपोर्ट कलेक्ट करु शकता.
Pune 106, Sohrab Hall
1st Floor, Sassoon Road
Behind Pune Station Junction
Pune - 411001

स्नेहा, मी माझ्यासाठी ही माहिती जमा केली होती -

१. प्रोसेससाठी ही वेबसाईट बघा - यावर बरीच माहिती मिळेल

http://www.immihelp.com/visas/h1b/h1-visa-documents.html

२. तुम्ही DS 160 वर जो पत्ता द्याल त्यावर पासपोर्ट मिळेल. तसच इंटरव्ह्युच्या दिवशी संध्याकाळी कॉन्सुलेट्लाच जाउन मिळवता येतो. ही मला मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे.

३. >>hdfc मधे जे पैसे भरायचे असतात, ते अमेरिकेतून भरता येतात का?
हो भरता येतात. पण जर कोणी भारतात पैसे भरुन पावती मिळउ शकत असेल तर उत्तम. पुण्यात पन २ hdfc बँक्समध्ये मिळतो .. त्यासाठी पासपोर्टची कॉपी लागते. इथे राहुनच मिळवायची असेल तर, ही वेबसाईट बघा. ते करतात.

http://www.visa-fee.com/

अजुन काही माहिती हवी असेल तर विचारा Happy

वि एफ एस च्या पुणे ऑफीस मधे पासपोर्ट कले़क्ट करता येत नाही...फक्त मुंबई वि एफ एस ऑफीस मधे करता येतो...तेही दुसर्या दिवशी...माझा सुद्धा से़कंड रीन्युव्हल नंतर विसा जुन मधे स्टँप झाला त्यामुळे लेटेस्ट माहीती देउ शकतो...कुठ्ला स्पेसीफीक प्रश्न असल्यास आणखी व्यवस्थीत उत्तर देता येईल...

वि एफ एस च्या पुणे ऑफीस मधे पासपोर्ट कले़क्ट करता येत नाही.. >>>विनायक हल्ली चेंज झालं असेल तर माहीती नाही पण २००८ ला तो पर्याय उपलब्ध होता .

VFS ला इमेल केलं तर ते तत्परतेने उत्तर देतात असा माझा दोन-तीन वेळचा अनुभव आहे. त्यांना इमेल करुन विचारा. जर विनंती केली तर कॉन्सुलेटमध्येच पासपोर्ट देतील. जरी पोस्टाने मागवला तर पुण्यात तिसर्‍या दिवशी हातात मिळतो.

एप्रिल मधे मझा नवरा पहिल्यनदा H1 स्टम्पिंग करून आला त्याचा स्टूडेंट व्हिसा एक्सपायर झाला होता

HDFC चे पैसे पुण्यात किंवा मुंबई मधे भरावे लागतील ..घरच्या कोणाला तरी सांगावे लागेल
बारकोड आक्टीवेट झला की इथे US मधून डेट घेता येईल..त्या वेळी डेट चा काही प्रॉब्लेम नाही आला
पण मे जून पासून डेट्स मिळायला वेळ लागतो आहे
जून मधे माझ्या आई बाबान् करता खूप त्रास झाला..पेज कंटिन्यूवस्ली रिफ्रेश करावा लागत होता..सो तेव्हा कुठे तसा भरणे एक दाते मिळाली आता चा माहीत नाही
बाकी ऑनलाइन फोटो उपलॉआड करायला आम्हाला त्रास नाही झला..तिथल्या इन्स्ट्रक्षन नुसार सगळा केला की ठीक होता...फोटो तर मीच घरी काढला होता त्याचा. आणि आज काल जवळ जवळ सगळे फॉर्मस पण ऑनलाइन भरावे लागतात..सो काही कटकट नसते.
आणि फॉर्मस भरताना पासपोर्ट डेलिवरी चा पत्ता द्यावा लागतो ..त्याच्या वर पासपोर्ट घरी येतो २ दिवसात
माzह्या नवरच्या पासपोर्ट वर तर कॉलेज च्या हॉस्टेल चा पत्ता होता..पण काही प्रॉब्लेम नाही आला पासपोर्ट कोल्हापूर ला तिसर्या दिवशी व्यवस्थित आला

बाकी माहिती नंतर टाकते

1. मी एप्रिल मधे stamping केलं.
2. date पटकन मिळाली (contrary to what Siddharth said above).
3. फोटो घरीच काढला बायकोने. upload करायला size चा प्रोब्लेम झाला आधी, resolution खूप जास्त होते. मग GIMP ह्या free software चा वापर करून size reduce केली. मी आधी कधीही GIMP वापरलेले नव्हते, google वर शोधल्यावर चटकन help मिळाली, size reduce करण्याबद्दल.
४. बाबांनी HDFC मध्ये जाऊन पावती आणली, मला फोनवर बारकोड सांगितला. मग मी internet वर सगळे forms भरले. मी अगदी interview च्या २-3 दिवस आधी पोचलो.
५. आजकाल त्याच दिवशी passport मिळत नाही म्हणे. दुसर्या दिवशी संध्याकाळी मिळतो. interview दुपारून (जेवणाच्या वेळेनंतर) असेल तर नक्कीच दुसर्या दिवशी (माझा १ वाजता होता). जर सकाळी ९ ला वगैरे असेल तर सांगता येत नाही, VFS च्या कार्यलयात विचारून बघा. मी interview नंतर तिसर्या दिवशीच विमान पकडणार होतो परतायला, त्यामुळे दुसर्या दिवशी लायनीत उभं राहून passport collect केला. passport collect करायला गुलाबी(color नक्की आठवत नाहीये, confirm करा) पावती लागते आणि इंडिया तले ओळखपत्र (pan कार्ड वगैरे.)
oops.. boss चा call , important meeting ahe, baki kahi athavale tar nantar lihito. tension gheu naka, sagale vyavasthit hoil. best luck!

धन्यवाद्..सगळेच छान माहिती देतायत्..झालं काय, नुकताच पासपोर्ट रिन्यु करायला पाठवला आहे.तो पाठवेपर्यंतच इतका त्रास झाला की ह्याची पण नीट माहिती काढून घ्यावी म्हटलं.

Pages