१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मिल्क पावडर घालून बघा,त्याने
मिल्क पावडर घालून बघा,त्याने पण छान क्रीमी दही लागतं.
मंजुडी सरळ एखाद्या हलवायाकडुन
मंजुडी सरळ एखाद्या हलवायाकडुन विरजण आण. घरातल दुध कोमट करायच त्यात नेहमीपेक्षा जरा जास्तच विरजण [हलवायाकदुन आणलेलं] घालुन सरळ रवीनी घुसळायचं आणि झाकुन ठेवुन द्यायच. . घट्ट दही लागण्याची १००% गॅरेंटी देते.
आज काल प्रोबयोटेक दही मिळते
आज काल प्रोबयोटेक दही मिळते ते आणून दही लावायचे.
मी आज तुरटी फिरवून बघणार
मी आज तुरटी फिरवून बघणार आहे.
वरदा, अमूल/वारणाचं दही खायला छान लागतं पण त्याचं विरजण लावलं तर कडसर चव येते असा आत्तापर्यंतचा अनुभव.
मनिषा, मी तो प्रयोग करून पाहीलाय, पण बाहेर ठेवल्यामुळे त्यांच्याकडचं दही आंबट असतं. त्याचं विरजण लावलं तर मला पहाटे तीन वाजता वगैरे उठून दही फ्रिजात टाकायला लागतं
काल लावलेलं दही अतिशय चिकट
काल लावलेलं दही अतिशय चिकट आणि बेचव लागलं

गरम असतांनाच विरजण लावल्यामुळे कदाचित..फेकुन द्यावं लागलं भांडभर दही
मंजुडी, छोट्या माठात
मंजुडी, छोट्या माठात (गडूल्यात) दही लावून बघ.
मोहरीत खूप दगड मिसळ आलेत. कसे
मोहरीत खूप दगड मिसळ आलेत. कसे साफ करायचे? बारीक मोहरी असल्याने निवडणे शक्य नाहीये:(
प्राची, मोहरी चाळुन बघ.
प्राची, मोहरी चाळुन बघ.
धुवुनही बघु शकते...दगड, कचरा वर तरंगु शकतो..
थोडं कोमट दूध करुन विरजण
थोडं कोमट दूध करुन विरजण लावलं तर छान लागतंय दही. माझ्याकडे गायीचं दूध असतं, त्याचं देखिल घट्ट दही लागतंय, म्हशीच्या दुधासारखी घट्ट कवडी नाही लागली तरी.
थोडि मोहरी सपाट ताटात टाकायची
थोडि मोहरी सपाट ताटात टाकायची आणि ताट किंचीत कलते करायचे. मोहरी गोल असल्याने घरंगळून एका बाजूला जाते आणि कचरा ताटाला चिकटतो. पण हे अगदी थोडी थोडी मोहरी घेऊन करावे लागते. फारच कचरा असेल तर वापरु नये, प्रत्येकवेळी दाताखाली येईल.
दिनेशदा, कचरा म्हणजे अगदी
दिनेशदा, कचरा म्हणजे अगदी मोहरी सारखे दिसणारे दगड आहेत, ते निवडणंही अवघड आहे

तसंच, रव्यातही खूप कचकच आहे. तो तसाच पडून आहे.
रव्यात मॅग्नेट फिरवून बघ. मी
रव्यात मॅग्नेट फिरवून बघ. मी हे करत असे लहानपणी.
मोहरी पाण्यात घालून रोळून कचरा काढता येइल.
धन्स मामी.
धन्स मामी.
मोहरी धुतल्यावर वाळवणार कशी ?
मोहरी धुतल्यावर वाळवणार कशी ? जर वाळवायची सोय असेल, तर पाण्यात घेऊन घोळवायची. दगड जड असल्याबे, भोवर्यात खाली मधे जमतात. (हि पद्धत मी पांढर्या तिळासाठी वापरत असे.)
ते दगड मातीचे असले तर विरघळतात.
रव्यात लोहचुंबक फिरवले तर लोखंडचे कण निघून येतात.
पण फारच कचरा असेल, तर ज्याच्याकडून घेतले त्याला परत करणे योग्य !!
लोणच्याच्या खाराच्या
लोणच्याच्या खाराच्या पदार्थांच्या युक्त्यांबद्दल आभार.
>>खार शिल्लक कसा राहतो ??
खार म्हणण्यापेक्षा तेलच आहे ते. विकतचे लोणचे. त्यामुळे त्यावर एक जाडा तेलाचा थर होता उघडतानाच. तो शेवटपर्यंत कायम राहिला. आता सगळ्या फोडी संपून ते तेल तेव्हढे उरले आहे.
कणकेत वापरून बघते.
बाकी - पातळ पोहे नाहीत. चुरमुरे नाहीत.
डाळ ढोकळी, हांडवा हे पदार्थ अजिबात्च माहित नाहीत.
पिठलं कधी करून बघितलेलं नाही. या निमित्ताने प्रयोग करून बघते. (बालपणी हा सगळ्यात नावडता पदार्थ होता. त्यामुळे स्वयं-पाकाला सुरुवात केल्यावर कधी करायचा प्रयत्न केला नाही.)
पुरीभाजी मध्ये पण लोणचे खार
पुरीभाजी मध्ये पण लोणचे खार लावून भाजीचा प्रकार टाकला आहे.
माझ्याकडे बेसनाऐवजी सोयाबीनचे
माझ्याकडे बेसनाऐवजी सोयाबीनचे पीठ आणले गेले आहे. बरेच आहे. काय काय प्रयोग करता येतील त्यावर?
थोडं सोयाबीनचं पीठ
थोडं सोयाबीनचं पीठ गव्ह्याच्या पीठात टाकुन मग ते पोळ्या/ फुलके करायला वापरता येईल.
हो, मी पण तेच करते. ४ वाट्या
हो, मी पण तेच करते. ४ वाट्या कणकेसाठी १/२ वाटी घालायचे.
सोयाबीनचे पिठ, कणीक व बेसन,
सोयाबीनचे पिठ, कणीक व बेसन, भाजून त्याच्या वड्या करता येतील. भाजल्याने त्या पिठाचा
उग्र वास लपतो. कृति आहे इथे.
Costco मध्ये मिळ्नारा पालक व
Costco मध्ये मिळ्नारा पालक व ब्रोकोली तुम्ही १०-१५ दिवस कसा टीकवता? मी नविनच त्याची सभासद झाले आहे. धन्यवाद
कॉस्कोत भाज्या/पेरिशेबल वस्तु
कॉस्कोत भाज्या/पेरिशेबल वस्तु घेऊ नयेत.
मी कांदा आणला होता, तो आपल्या भारतीय स्वयपाकाला वापरून देखील महिनाभर चालला, व खराब व्हायला लागला म्हणून फेकला.
Costco मधला पालक जेवढा धुवुन
Costco मधला पालक जेवढा धुवुन आपल्याला साधारण एका वेळेला जेवढा लागेल तेवढा झिपलॉक मधे टाकून फ्रीझ करायचा. लागेल तशी एकेक बॅग वापरायची. पातळ भाजी, पराठे यासाठी छान होते. सॅलड म्हणून उपयोगाचे होत नाही.
ब्रोकोलीचे पण तसेच करायचे. सॉटे करायला, सूपसाठी, पास्त्यासाठी उपयोगी पडते अशी फ्रीझ केलेली ब्रोकोली.
आण्ल्या दिवशीच एकदा भाजी.
आण्ल्या दिवशीच एकदा भाजी. पराठाचे भिजवून ठेवणे मग थोड्याची प्युरी बनवणे व फ्रीज करणे. तो सुटा करून पाण्यातून काढून वर्तमान पत्रावर कोरडा करावा. भारतातल्यासारखी जुडी मिळते कि कापलेली पाने?
मामी, पाने मिळतात ती देखील १
मामी, पाने मिळतात ती देखील १ फुट बाय १ फुट पिशवीत गच्च पॅक करुन
अय्या म्हणजे पालकाचा पाउसच
अय्या म्हणजे पालकाचा पाउसच आहे!
बरे मला भडंगाचा मसाला एक असतो त्याचे इन्ग्रेडियंट्स हवे आहेत. काल मी साधीच फोड्णी घातली चुरमुर्यांना व त्या फोड्णीतच तिखट टाकले होते. सांगलीच्या भोरे भडंगापेक्षा मस्त लागत होते. गरम चहा
+ भडंग अगदी ऐश झाली. Now I want to conquer the world market for bhadang.
पालक, धुवुन, चिरुन मग मीठ
पालक, धुवुन, चिरुन मग मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात अगदी थोडावेळ घालुन लग्गेच चाळणीने गाळुन घ्यावा. आणि मग त्याचे पोर्शन्स करुन झीपलॉक बॅग मधे भरुन ठेवावे. रंग ही टिकतो. बर्याच पदार्थांसाठी वापरता येतो.
मामींनी सांगितल्याप्रमाणे प्युरी देखिल करता येइल थोड्या पालकाची.
आणि १-२ दिवसात वापरायचा असेल तर हवी तेव्हढी पाने न धुता क्लिंग रॅप मधे नीट गुंडाळुन फ्रिज मधे भाज्यांच्या ट्रे मधे ठेवावी. वर्तमान पत्रात गुंडाळल्याने त्याचे मॉइश्चर निघुन जाते आणि पाने लुळीपुळी होतात. पदार्थ करायच्या आधी पालक नीट धुवुन घ्यावा.
मामी, भडंग करताना त्यात तिखट
मामी, भडंग करताना त्यात तिखट मिठ फोडणी बरोबर किंचित आमचुर किंवा सिट्रीक अॅसिड (निंबुफुल म्हणतात बहुतेक) घाला. मस्त लागत
कढीपत्ता घातलात की नाही ???
अश्विनी, भडंगासाठी २ चमचे
अश्विनी, भडंगासाठी २ चमचे मेतकूट, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा (वा आवडीप्रमाणे) लाल तिखट, २ लवंगा, १ इंच दालचिनी यांची पुड आणि एक चमचा धणेजिरे पूड वापरायची. हे सगळे कच्च्या तेलात मिसळून कुरमुर्याना चोळायचे, मग फोडणी करुन त्यात कढीलिंब, खोबर्याचे काप, शेंगदाणे परतायचे आणि मग भांडे खाली उतरवून त्यात मसाला लावलेले कुरमुरे घालून परतायचे. मीठ साखर चवीप्रमाणे.
मेतकूट नसेल तर काय वापरावे
मेतकूट नसेल तर काय वापरावे
Pages