हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे चित्रपट कसा वाटला मधे वेळोवेळी अनेकजणांनी लिहिले होते.
काहि आठवणी परत, जेन फोंडाच्या नाईन टू फाइव्ह मधे, फ्रेमच्या वर माईक दिसतो.
राजनीती मधे कतरीनाच्या गळ्यात एकदम चेन येते.
तिसरी मंझिल मधल्या ओ हसीना गाण्यात, रिकाम्या खुर्च्या जागच्या जागी नाचतात.
जोधा अकबर मधे, तिच्या मेनूत नसणार्‍या भाज्या (उदा. कॉलीफ्लॉवर) दिसतो. त्या जमान्यात, आपल्याकडे तो नव्हता बहुतेक.

एका संजय दत्तच्या पिच्चरमध्ये त्याचा मोठा भाऊ (दीपक पराशर का किरण कुमार) विमान अपघातात मरतो, ते विमानही एका सीन मध्ये पुर्ण जळालेला दाखवलेल आहे...
१ दिवसनी त्याच्या भावाची डेड बॉडी घरी आणतात, नीट शेव्ह केलेला, केसं विंचारलेला तो भाऊ तिरडीवर झोपलेला दाखवलाय.

च्यामारी, विमान सगळ जळाल तरी डेड बॉडी कशी आली परत???

कालच उतरन चा भाग पाहिला.
त्यात शेवटी, त्या कोणा नटीला तो कोण नवरानट गच्चीवरुन ढकलुन देतो
आता वरुन पडल्यावर ती पालथी पडली आहे दाखवलेले ते बरोबर, पण तिचे डोके घराकडे कसे काय होते? घराच्या भिन्तीकडे पाय हवेत ना? की माझ्या बघण्यातच काही तरी चूक होते?

आता वरुन पडल्यावर ती पालथी पडली आहे दाखवलेले ते बरोबर, पण तिचे डोके घराकडे कसे काय होते? घराच्या भिन्तीकडे पाय हवेत ना? की माझ्या बघण्यातच काही तरी चूक होते?<<< लिंबुकाका, ती नक्की स्विमिंग डायव्हिंग चँपियन असणार, तिने हवेत हाफटर्न डाईव्ह मारली असेल Lol

लाजो.... शक्य आहे, तसही शक्य आहे! Lol Lol Lol
(पण एक सूचना स्वानुभवावरुनः हे अस्ल दिस्ल ना की ते इथे येऊन लिहाव, बघण्यात रन्गलेल्या लिम्बीला सान्गितल तर खेकसाखेकसी ऐकायला लागते! Proud बाकीच्यान्नी यावरुन काय तो बोध घ्यावा ही विनन्ती)
>>> मी रोज बघते ...'उतरन' <<<<< LOL मग शिसान च
मन्दार, आर्या, मला बघावे लागते, पर्याय नसतो दुसरा! बघायचे नस्ले तर स्वयम्पाकघरात जाऊन झोपावे लागेल Proud

हम आपके है कौन मधे रेणुकाचा throughout शोल्डर कट आहे ( काही वेळा शोल्डरच्या थोडे खाली !) (शोल्डर कटच ना ? की आणखी काही नाव आहे त्याला ? दिपांजली ? Happy ) पण " धिक ताना... " गाण्यात एका शॉटमधे पिवळी साडी नेसलेली असतांना तिची चांगली गुढग्याएवढी लांब वेणी घातलिये.

दुसरं म्हणजे रामानंद सागरांच्या " रामायणा " च्या युद्धात एका वानराला चष्मा होता.

" धिक ताना... " गाण्यात एका शॉटमधे पिवळी साडी नेसलेली असतांना तिची चांगली गुढग्याएवढी लांब वेणी घातलिये. >>> खरंच की.... कधी लक्षात नाही आलं :-०

दुसरं म्हणजे रामानंद सागरांच्या " रामायणा " च्या युद्धात एका वानराला चष्मा होता.>>>>>>>>> Biggrin

>>दुसरं म्हणजे रामानंद सागरांच्या " रामायणा " च्या युद्धात एका वानराला चष्मा होता. smiley_laughing_01.gifhahagalomany.gif Rofl

मी पण कधीतरी हा प्रोग्राम पाहीला होता. यात एक गम्मत होती. सिनेमा आठवत नाही देमार घोड दौड असा धरमवीर सारखा सिनेमा होता.

सिनेमात असा सिन होता की हिरो घोडदौड करत असताना घोड्यावरुन झाडावर सरळ वर उडी घेतो आणि फांदी पकडतो. प्रत्यक्षात हा शॉट कोणालाच देता येणार नव्हता कारण घोडा आणि झाड यात किमान पाच - दहा फुटांच अंतर होत. मग हा सिन हिरो पाठमोरा असताना चित्रीत केला गेला कारण तो डमीने केलेला असणार. तो शुट करताना ट्रीक वापरली. घोडा झाडाखली उभा केला आणि डमीने झाडावरुन घोड्यावर उडी मारली.
संकलन करताना घोडदौड मग झाडाच्या इथला सिन फिल्म उलटी पळवुन जोडला म्हणजे माणसाने उडी वर मारताना दिसले पुढे घोडा रिकामाच पळताना दिसला.

हे करताना एक तांत्रीक चुक तशीच राहिली. तो डमी घोड्यावर उडी मारताना नेमकी घोड्यान लिद टाकली. फिल्म जेव्हा उलटी पळवली तेव्हा डमी घोड्यावरुन झाडावर उडी घेतो तेव्हा लिद ही उलटी आत जाते.

>>>दुसरं म्हणजे रामानंद सागरांच्या " रामायणा " च्या युद्धात एका वानराला चष्मा होता.>>> Rofl खरं की काय!! बघायला पाहिजे पुन्हा

हे करताना एक तांत्रीक चुक तशीच राहिली. तो डमी घोड्यावर उडी मारताना नेमकी घोड्यान लिद टाकली. फिल्म जेव्हा उलटी पळवली तेव्हा डमी घोड्यावरुन झाडावर उडी घेतो तेव्हा लिद ही उलटी आत जाते. >> आयला, हे कैच्याकै आहे Happy

वीरझारा सिनेमात जुन्या काळातले सीन दाखविताना शाहरुखचे केस चक्क रंगवलेले आहेत. त्या काळात केस रंगवत होते का? Uhoh मेंदी लावली आहे असे तरी दाखवायचे ना Biggrin
शिवाय त्यात शाहरुख जीन्स वगैरे पण घातलेला दाखवलाय. त्या काळात जीन्स हा प्रकार इतका काही बोकाळलेला नसावा. तरी पण? Uhoh

चित्रपटात कोणत्या काळातली कथा दाखवायची आहे याचे काहीतरी भान ठेवावे ना Angry

नितिन, मला पण तो प्रसन्ग आठवतोय, जाम हसलो होतो!
कालच सोनी कृपेने, थ्री इडीयट्स पुन्हा बघावा लागला (तसा चान्गलाहे तो पिक्चर - थीम म्हणतोहे मी)
तर या मधे,
दोघे इडीयट अन चतुर अमिरला शोधत त्या एकाच्या घरी जातात, तिथे त्या एकाच्या बापाच्या अस्थीन्चा कलश, टॉयलेट मधे झाकण पाडणे वगैरे सीन आहे.
थोड्या फ्लॅशब्याक नन्तर तो एक मध्यात बसलेला, बाजुने हे दोघे, तो विनन्ती करतो सिक्रेट सान्गु नका, हे विचारतात कोणते सिक्रेट/ ते करताना तो जो कलश सरकवतात त्यास झाकण नस्ते - ते तर कमोड मधे टाकलेले अस्ते
पुढच्याच सीन मधे अन्गणात निरोप घेताना ते दोघे याच्या हातात कलश देतात तेव्हा त्यास झाकण अस्ते!
ते काढून तो आत बघतो, रिकामा अस्तो, नोकर दुसरा कलश घेऊन येतो वगैरे सीन.....
माझा प्रश्न असा कि कलशाचे झाकण कोणत्या इडियटने कमोडच्या पाण्यात हात घालुन काढुन धुऊन पुसुन कलशास लावले असावे? Proud

याच्याच पुढे अजुन एक मेजर घोळ आहे, पण तो स्क्रिनशॉट मधिल नसून स्र्किप्ट मधिल आहे.
हा जो एक अस्तो, तो त्या दोघान्ना सिक्रेट उघड न करण्याच्या व कलशाच्या बदली अमिरचा पत्ता देईन असे सान्गतो, पण मग शेवटच्या काही शॉट्स मधे अमिर म्हणजेच वान्गडू असे समजल्यावर हे दोघे अतिआश्चर्यदेखिल व्यक्त करतात, ते का? या एकाने अमिरचा पत्ता त्याच्या खर्‍या नावाशिवाय दिला होता का? Happy

माझ्या वर दिलेल्या एकदोनच उदाहरणान्वरुन कुणाचीही खात्री पटेल की मला फिल्लम लायनीत (अ‍ॅक्टर्/डायरेक्टर्/क्यामेरामन वगैरे बनुन) जायला न मिळाल्यामुळे आता मी सूड म्हणून कोणताही सिनेमा/सेरिअल त्यातिल घोळ शोधण्यासाठीच बघत अस्तो Proud

थ्री इडीयट्स मधील अजून एक प्रसंग, बोमन इराणी शर्मन जोशी ला पत्र लिहायला सांगतो त्यावेळी laptop च्या स्क्रीन वर एकही प्रोग्राम दिसत नाही कि ज्यात पत्र लिहिले आहे.

>>>>> त्यावेळी laptop च्या स्क्रीन वर एकही प्रोग्राम दिसत नाही कि ज्यात पत्र लिहिले आहे.
अहो कदाचित ल्यापटॉप फिरवुन देईस्तोवर स्क्रीन सेव्हर सुरू झाला असेल अशा सन्शयाचा फायदा द्यावा का आपण? Proud

'थ्री इडियट्स' कालचाच ताजा ताजा सिनेमा असल्याने:

१. माधवन सांगतो की तो ७८ साली जन्माला आला. त्यानंतर १७-१८ वर्षांनी तो इंजिनीयरिंगला प्रवेश घेणार साधारणतः. म्हणजे ९५ - ९६ सालचा काळ. या काळात मोबाईल फोन भारतात कॉलेजविद्यार्थ्यांनी वापरण्याइतके बोकाळले होते? Happy

आमिर खान मे़कॅनिकल इंजीनीरिंगची पदवी घेतो, त्या पदवीच्या नावावर जावेद जाफरी सिव्हिल इंजीनीरिंग ची कंत्राटं घेतो. Proud

लिंबुटिंबु तुम्ही शोधलेला घोळ एकदम सुक्ष्म आहे. त्या टप्प्यात सिनेमा इतका रंगात आलेला असतो की हा घोळ लक्षात येत नाही. तुमच्या सुक्ष्म अवलोकनाला १०० गुण अर्थातच १०० पैकी. श्रध्दाला सुध्दा १००/१००.

माझ्या कथा वाचा म्हणजे असे घोळ सापडतील. निंबुडा, सुमेधा पुनकर, ड्रीमगर्ल यांना कायमच सापडतात.

आमिर खान मे़कॅनिकल इंजीनीरिंगची पदवी घेतो, त्या पदवीच्या नावावर जावेद जाफरी सिव्हिल इंजीनीरिंग ची कंत्राटं घेतो.>>>>>>>>>>>>> माझ्यामते जावेद जाफरी खूप श्रीमंत घरातला असतो.पण त्यांच्या घरात कोणीच शिकलेलं नसतं.आणि हुशारहि नसतं.म्हणुन जावेदचे वडिल आमिरचा शिक्षणातला इंटरेस्ट पाहुन त्याला जावेद्च्या जागी पाठवतात्.जावेदला फक्त डिग्री पाहिजे असते.

'बदमाश कंपनी' बघितला.. लोकं बँकॉकला जाताना ७४७ मधून निघतात. प्रवास करताना गप्पा वगैरे मारतात, आणि शेवटी उतरताना वेगळ्याच २ इंजिन असलेल्या विमानातून उतरतात.

रामायणातल्या वानराला चष्मा होता म्हणून येवढे हसायला नको असे वाटते. एखाद्याच्या वैगुण्यावर हसणे बरे नव्हे.

किंबहुना रा.सां.नी पूर्ण संशोधनानंतरच अशी महामालिका निर्माण केली असल्यामुळे त्यामागे काहि विशिष्ट हेतू असणार! भारतातील संशोधकांकडून या विषयावर अधिक सखोल संशोधन अपेक्षीत असावे. माझ्या मते पुढील मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत:

१. रामायणाच्या काळीहि चष्मा होता. म्हणजे डोळ्यांचे विकार या विषयावर फार पुरातन काळापासून आपल्या देशात संशोधन झाले होते.

२. वानर कुळातील काहि जणांना व्हिटामीन ए ची कमतरता होती.

३. मनुष्यांपैकी कोणीहि चष्मा लावुन नव्हते. म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरात होत्या.

४. मुद्दे क्रमांक ३ वरून असे म्हणता येईल की मनुष्यांची सांपत्तीक स्थिती वानरांपेक्षा चांगली होती.

रामायणातल्या वानराला चष्मा होता म्हणून येवढे हसायला नको असे वाटते. एखाद्याच्या वैगुण्यावर हसणे बरे नव्हे.>>>>>

Rofl
अशक्य होता हा!! Lol

Pages