१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
पण तुमचा खार शिल्लक कसा
पण तुमचा खार शिल्लक कसा राहतो?
आमच्याकडे फोडी उरतात फक्त..
लोण्च्याचा खार चिकन खात असाल
लोण्च्याचा खार चिकन खात असाल तर आचारी चिकन मध्ये वापरता येइल. परवा कुठल्यातरी कार्यक्रमात ते मश्ररुम्स चे कबाब करताना लोणच्याचा खार वापरला होता. त्याचे नाव आचारी मश्ररुम कबाब.
हा खार घालुन पुलाव लाजवाब
हा खार घालुन पुलाव लाजवाब होतो
मला वाट्ते तो खार आपण रेड
मला वाट्ते तो खार आपण रेड घालून पळवावा.
पातळ पोहे+लोणच्याचा खार्+थोडा
पातळ पोहे+लोणच्याचा खार्+थोडा कांदा+कच्चं शेंगदाणा तेल + कच्चे शेंगदाणे+ मीठ +साखर+ दाण्याचं कूट+टोमॅटो सॉस +..........काय वाट्टेल ते.................लहानपणी दुसरी तिसरीत असताना आई दुपारी झोपली की,
करायचा आमचा हा खास पदार्थ.....जरा चिवट लागतात असे पोहे...पण एकदम टेस्टी!
३-४ दिवस बाहेर गेलो आणि आता
३-४ दिवस बाहेर गेलो आणि आता दुध संपता संपत नाही .. खूप दुध उरला आहे डेट संपते आहे .. काय करू..खवा वगैरे सारखा काही होईल का जे खराब होणार नाही आणि वापरता येईल लगेच.. खीर करूनझाली.
पनीर करायचे. दूध उकळवावे,
पनीर करायचे. दूध उकळवावे, उकळी आल्यावर एक लिटरला १ लिंबू पिळून ५ मिनिटे मंद आचेवर ठेवून नंतर फडक्याने गाळावे. पनीरचे पाणी चपात्यांचे पीठ भिजवायला वापरता येते.
पनीर करायचा मी २-३ दा प्रयत्न
पनीर करायचा मी २-३ दा प्रयत्न केला आहे .. पण नाही झाले..खरच खूप लिंबू टाकून बघितला.. पण तुम्ही १ पूर्ण म्हणताय बघते थोड्या याचा करून .. व्हिनेगर टाकून पण करून बघितला. मी ३-४वर्षान आधी केलं होतं . पण इतक्यात खरच कळत नाही का फाटत नाही ते..
दही लावता येईल... नंतर
दही लावता येईल... नंतर श्रीखंड
प्रित, दूध जर यू एच टी असेल,
प्रित, दूध जर यू एच टी असेल, तर ते लवकर फाटत नाही. ते आटवून बासुंदी, खीर, रबडी, आईसक्रीम करता येईल.
प्रीत बासुंदी कर. नाहितर
प्रीत बासुंदी कर. नाहितर मसाला दुध करुन संपवुन टाक.
पपई उरलीये, काय करता येईल?
पपई उरलीये, काय करता येईल? फार गोड नाहीये, त्यामुळे नुसती खाववत नाही.
जॅम.
जॅम.
चेहेर्याला लाव (पॅपेन चांगलं
चेहेर्याला लाव (पॅपेन चांगलं स्किन साठी)
.
.
भोपळ्यासारखी खीर करता येईल
भोपळ्यासारखी खीर करता येईल किसून.
धपाटे (तोंडानं खाण्याचे) करता
धपाटे (तोंडानं खाण्याचे) करता येतील.
सगळ्यांना धन्यवाद .. दुध
सगळ्यांना धन्यवाद .. दुध आटवून कुल्फी केली एव्हापोरातेद मिल्क न वापरता. फरक लक्षात आला नाही कोणाला.. बासुंदी चा प्रयत्न आधी केला आहे त्यामुळे यावेळेस नाहीकेला
असा उरलेला लोणच्याचा खार माझी
असा उरलेला लोणच्याचा खार माझी आजी वर्षभर जपून ठेवायची. जनावरांच्या जिभेला जेव्हा काटे येतात तेव्ह्या त्यांना चारा खाता येत नाही, त्यावेळी हा खार त्यांच्या जीभेवर घासायला वापरात येतो. जनावरं तासाभरात चारा खायला सुरवात करतात.
हा उपयोग ईथे अगदीच अस्थानी आहे पण तरी लिहावासा वाटला.
दही घट्ट लागण्यासाठी काय
दही घट्ट लागण्यासाठी काय युक्ती आहे? आम्ही घेतो त्या दुधाचं दही लावल्यावर त्याला खूप पाणी सुटतंय हल्ली... विरजण बदलून पाहिलं तरी काही फरक नाही. दह्याची चव छान असते पण घट्टपणा कमीच येतोय.
धन्यवाद सिंडरेला, स्वाती,
धन्यवाद सिंडरेला, स्वाती, प्रॅडी, अंजली!
दही लावायचे तेवढेच दुध जरावेळ
दही लावायचे तेवढेच दुध जरावेळ उकळून थंड करून दही लावून पहायला हवे. मुळात दुधातच पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने ते दह्यात तसेच रहात असावे.
घट्ट दूध वापरुन बघ, पातळ
घट्ट दूध वापरुन बघ, पातळ दुधाचे घट्ट दही कसे लागेल
just kidding खरे उत्तर मला माहित नाही
घट्ट दह्यासाठी विरजण
घट्ट दह्यासाठी विरजण लावल्यावर तुरटी फिरवायचं मी कुठेतरी वाचलं आहे. अगदी वड्या पडतात म्हणे दह्याच्वा. मंजूडे, करुन पहा आणि आम्हाला सांग.
रुनी, बरोबर आहे तुझं. दूध
रुनी,
बरोबर आहे तुझं. दूध पांचटच आहे ते. अश्या दुधात विरजण लावायच्या आधी तुरटी फिरवायची हे ऐकलंय पण करून बघायची हिंमत नाही.
हाईला आशू
हो, तुरटीचं मीही ऐकलं होतं.
हो, तुरटीचं मीही ऐकलं होतं. बाकी बरीच चर्चा इथे आहे.
गार दुधाला विरजण न लावता कोमट
गार दुधाला विरजण न लावता कोमट दुधाला लावावे. विरजण लावताना , ज्यात दही लावायचे त्या भांड्याला चमच्याने सर्वत्र (तळ + बाजू) विरजण सारवावे. कोमट दूध ओतून चांगले ढवळावे.
स्वाती, धन्यवाद. पण जुन्या
स्वाती, धन्यवाद.
पण जुन्या मायबोलीतले फाँटस् मोबाईलवर काला अक्षर भैंस बराबर...
मंजूडी, तिथे हेच उपाय (कोमट
मंजूडी, तिथे हेच उपाय (कोमट दूध, भांड्याला दही सारवून घेणे, तुरटी) दिसतायत.
दही चांगलं लागणं हे दुधावर, विरजणाच्या क्वालिटीवर आणि तापमानावर अवलंबून आहे. म्हणजे तू तेच विरजण वापरत राहिलीस तर बहुधा असंच दही लागेल. (चांगलं दही लागणार्या शेजार्यांकडून विरजण आण. :P)
(एक विरजणाशिवाय दही लावायचाही उपाय आहे तिथे. कोमट दुधात मिरची उभी चिरून किंवा सुक्या मिरचीच्या बिया घालून दही लावता येतं असं लिहिलंय.)
अमूल वगैरे चं घट्टं दही आणून
अमूल वगैरे चं घट्टं दही आणून विरजणाला वापरलं तर कदाचित फायदा होईल का?
Pages