फूटबॉल वर्ल्डकप २०१० - द. आफ्रिका

Submitted by हिम्सकूल on 13 May, 2010 - 06:45

ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे


द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स


(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस


(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया


(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना


(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून


इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया


(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)


(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने

उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)

उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)

उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)

तिसर्‍या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)

अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)

ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/

तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<तो शेवटचा फ्रि किक भारी पडला असता.>> अगदी खरंय. नाहीतर डोळ्यावर पाणी मारून तिसर्‍या सत्रासाठी व पेनल्टी शूटाऊटसाठी पुन्हा टीव्हीसमोर बैठक मारणं आलंच होतं !
<<मस्तं झाली मॅच, वेल प्लेड युरुग्वे>> येस, वेल प्लेड जर्मनी ऑलसो !
हल्ले व प्रतिहल्ले पहायला मजा आली. क्लोस बाहेरून सामना बघताना पाहून वाईटही वाटलं. पण कां कुणास ठाऊक, बाद फेरीसारखी तडफ व खुन्नस नाही जाणवली खेळात. एका प्रशिक्षकानं म्हटल्याप्रमाणे "अगदीच रिकाम्या हाताने घरीं जायचं नव्हतं दोन्ही संघाना "; तसंही असेल , म्हणूनच "मोटिव्हेशनही" मर्यादितच असावं ह्या सामन्यात. कीं, मलाच उगीचच तसा भास होत होता !
सामन्यात लक्ष सतत वेधून घेत होते - फोर्लान व श्वानस्टायजर . काय खेळ केलाय दोघानीही ! फोर्लान तर झपाटल्यासारखाच आपली आयाळ उडवत जर्मनीचा पिच्छाच सोडत नव्हता. जर्मनीच्या पहिल्या गोलचं श्रेय तर श्वानस्टायजरलाही जातंच पण पूर्ण सामन्याची सूत्रं तो शिताफीन हाताळत होता व तेही जर्मनीच्या आक्रमण व बचावात महत्वाचा सक्रीय सहभाग घेऊन !.
चला, लागूया आता स्पेन वि. नेदरलँडच्या तयारीला. माझा कयास - स्पेन ६०:४०नेदरलँड !

फ्रान्सचा कल्पक व शैलीदार जुना खेळाडू मिशेल प्लातिनी जोहानसबर्गच्या होटेलमधे चक्कर येऊन पडला. इस्पितळातून "तसं विशेष कांही नसल्याचा" दाखला घेऊन तो आज विश्वचषकाची फायनल पहायला स्टेडीयममध्ये हजर होणार आहे. माझ्या या खूप आवडत्या खेळाडूला फ्रान्सच्या या विश्वचषकातील पराभवाचा धक्का इतक्या उशीरा जाणवला कीं काय !

वामोस इस्पॅनिओल.

मॅच बोअर चाललीय. पेनल्टी शूट आउट मध्ये जाणार काय.
पुयॉल चा हेडर भारी होता. ग्रेट कमिट्मेंट.

पॉलबाबा की जय हो.......मला वाटत होतं की अश्या गोष्टींवर विश्वास फक्त आपणच (भारतीय) ठेवतो की काय, पण हे पॉलबाबाचं ऐकून हसावं की रडावं हेच कळत नाहीये. Uhoh

शेवटी स्पेन जिंकलीच :-). अनेक वर्षे अंडर-अचिवर असल्याचा धब्बा त्यांनी पुसला. इनिएस्टा पुन्हा एकदा देवासारखा धावून आला (स्पेन साठी आणि आमच्यासाठी पण, कुणीतरी गोल केला एकदाचा म्हणून). हॉलंडने काल टोटल फुटबॉल मध्ये रफ टॅकलिंग पण आणले होते. अतिशय धुसमुसळा खेळ करत होते. त्यात आक्रमणाला फक्त पर्सी धावत होता, नंतर नंतर रॉबेन पुढे आला. स्नाइडरला पण विशेष प्रभाव पाडता आला नाही. कॅसिलासचे नशीब पण जोरदार होते, ज्यामुळे रॉबेनचा एक शॉट अडवला गेला.

स्पेन कडून पजेशन जास्त काळ ठेवून चाली रचत गोल करणे हीच योजना अवलंबली गेली. रामोस, प्युओल यांनी हेडर मारून काही चांगल्या संधी निर्माण केल्या. नंतर सब म्हणून आलेल्या 'नेवास' व 'फॅब' ने मस्त थ्रूपास व साइडपास देत हॉलंड बचाव फळीला त्रास दिला. टोरेस याही सामन्यात प्रभावहीन ठरला, जरी थोड्याच वेळेकरता आला असला तरी. इनिएस्टा, शावी, फॅब यांनी मस्त पासिंग करून पजेशन जास्तीतजास्त वेळ स्पेनकडे कसे राहील हे बघितलं.

शेवटी काल यलो कार्ड्स चा पाऊस पडला. ८ नेदरलँड्स खेळाडूंना आणि ४ स्पेनच्या खेळाडूंना यलो-कार्ड्स दाखवली गेली. दाँगला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवलं. शेवटी शेवटी तर यलो कार्ड न मिळालेला कुणी खेळाडू आहे काय हॉलंड मध्ये याची शंका आली होती. इनिएस्टा च्या गोल आधी एका फ्री किक दरम्यान रेफरीने अचानकच हात वर करून यलो कार्ड दाखवला तेव्हा ना खेळाडूंना, ना प्रेक्षकांना ना TV वरील तज्ञांना कळालं की नेमक यलो कार्ड दिलं कुणाला? नुसता गोंधळ सुरू होता.
इनिएस्टाने गोल केल्यावर आनंद साजरा करण्यात जास्त वेळ घालवल्याबद्दल त्याला पण यलो कार्ड दिलं. रॉबेनला प्युओलने ओढलं होतं त्यावेळी फ्रीकिक आणि प्युओलला रेड कार्ड द्यायला हवं होतं.

असो स्पॅनिश - द रेड फ्युरी यंदाचे विश्वविजेते ठरले हेच नक्की. पहिल्यांदा युरोपिअन चँपिअन आणि आत्ता विश्वविजेते. Happy सलाम स्पेन!

उरुग्वेच्या दिएगो फोरलान ला गोल्डन बॉल पुरस्कार मिळाल आणि गोल्डन बूट जर्मनीच्या थॉमस मुलरने जिंकला. मुलरने सर्वोत्तम खेळाडूचा (Best Young Player) चा पुरस्कारपण मिळालाय.

क्लोसिंग सेरेमनी पण मस्त झाला.

स्पेन-१, नेदरलँड-०
अहाहा, फायनलसाठी काय रेफरी निवडला होता फिफाने! कसं कळलं त्याना WWFमधलाच उंचापुरा, उग्र व तगडा रेफेरी लागणार ह्या सामन्याला. काय ती पिवळ्या कार्डांची खैरात ! "फ्री किक"चं अगदी फ्री वाटप !! दोनही संघाना फायनलला आल्याचा आनंद मनमुराद लुटता यावा म्हणून एक्स्ट्रॉ टाईमचीही खास व्यवस्था !!! अरे, पण आमच्यासारख्या रात्री जागून सामने बघणार्‍यांना काय हवंय याचा जरा तरी विचार ? छे: !
असो. जर्मनी वि.स्पेन सामन्यानंतर माझ्या एका जाणकार मित्राचा ई-मेल आला होता. त्याचं म्हणणं - जर्मनी मुद्दाम स्पेनकडून बॉलचा ताबा मिळवण्याचा अट्टाहास करत नव्हती कारण आपली बचावफळी मजबूत ठेऊन शक्यतो स्पेनच्या आघाडीच्या व मधल्या फळीला कांहीसं थकवणं व बचाव फळीला गाफिल करणं . जोरदार प्रतिआक्रमण हे जर्मनीचं प्रभावी अस्त्र असल्याने बर्‍याच वेळा ते हा डावपेच खेळून अचानक गोल करतात. पण स्पेनविरूद्ध हे त्यांच्या आंगलट आलं कारण स्पेनच्या आक्रमणाची लय त्यामुळे इतकी छान जमली कीं स्पॅनियार्ड मग वरचढच होऊन बसले. हे पुराण आता लावण्याचं कारण कीं बहुधा डचानी हे हेरूनच पिवळ्या कार्डांचा धोका स्वीकारुनही स्पेनच्या आघाडीच्या फळीचा समन्वय व लय, झालं तर आडदांडपणा करूनही, सुरवातीपासूनच बिघडवायची हे ठरवलेलंच असावं. त्यांत ते बहुतांशी यशस्वी झाले, हे मान्य करायलाच हवं.
<<फक्त पर्सी धावत होता, नंतर नंतर रॉबेन पुढे आला. स्नाइडरला पण विशेष प्रभाव पाडता आला नाही >>रंगासेठजी, अगदी खरंय. पण डचानी आपल्या गोलपुढे गर्दी करूनच स्पेनला हतबल करायचं ठरवल्यावर आक्रमणाचा भार एकांड्या शिलेदारांवरच पडणार ना ! रॉबेनच्या दोन-तीन मुसंड्या मात्र अफलातून होत्या व त्यावेळीं अख्या स्पेनच्या काळजाचा ठोका चुकला असणार !
<<पुयॉल चा हेडर भारी होता. ग्रेट कमिट्मेंट.>>विक्रमजी, खरंच स्पेनच्या सर्वच खेळाडूनी आदर्शवत कमिटमेन्ट दाखवली. इतक्या वेळा आडदांडपणामुळे व गोलजवळच्या गर्दीच्या बचावामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले तरी वैफल्यग्रस्त न होता त्यानी अविरत हल्ले चालूच ठेवले. त्यानी खर्‍या अर्थाने विश्वचषक जिंकला आहे, हे निर्विवाद !
आता थोडसं इनिएस्टाबद्दल. त्याला सुरवातीलाच तंगडी घालून डचानी आडवा केला तेंव्हा टीव्हीवरचा समालोचक उत्स्फुर्तपणे त्याच्याबद्दल म्हणाला " What an artistic great player !". कालच्या खेळाचा
एकंदर नूर इनिएस्टाचा खेळ बहरावा असा नव्हताच. तरी पण तो प्रयत्नात मात्र कमी पडत नव्हता. काल वाचनात आलं कीं त्याचे वडील बांधकाम मजूर पण त्यांचा एक घरगुती बिअर बार पण आहे. सर्व कुटूंबीयच- लहान-मोठे, पुरूष-स्त्रिया- त्यात काम करतात. पण इनिएस्टाच्या लहानपणीच त्या सर्वानी एकमताने निर्णय घेतला कीं इनिएस्टाला मात्र ह्या कामात गुंतवायचा नाही व त्याला त्याच्या आत्यंतिक आवडीच्या फुटबॉलसाठीच मोकळीक द्यायची. अख्खं स्पेन ह्या कौटुंबिक निर्णयामुळे आज त्याला राज्याभिषेकही करायला तयार होईल !

स्पेन आणि हॉलंड मॅच मस्तच झाली . गोल होत नव्हते तेव्हा मधे मधे कंटाळा येत होता , पण इलाज नव्हता . Happy तरी नशीब पेनल्टी शूट आउट पर्यंत मॅच पोचली नाही ते .

रंगासेठ आणि भाऊ , मस्त विश्लेषण . Happy हॉलंड बद्दलची दोघांची मतं पटली . Happy

<<<< इनिएस्टाने गोल केल्यावर आनंद साजरा करण्यात जास्त वेळ घालवल्याबद्दल त्याला पण यलो कार्ड दिलं. >>>>

त्याला येलो कार्ड मिळालं ते मॅच चालू असताना मैदानात टी शर्ट काढल्याबद्दल ( असं जर्मन समालोचकाने सांगितलं . Happy ) त्याच्या शर्टवर काय लिहिलं होतं , त्याबद्दलची माहिती ह्या खालच्या लिंकवर वाचता येईल .

http://en.wikipedia.org/wiki/Daniel_Jarque

माद्रिदमधल्या अधिकॄत सत्कारसमारंभात इनिएस्टाचं खास कौतुक करण्यात आलं व त्याला बोलण्याचाही आग्रह करण्यत आला. तो इतका लाजत होता कीं आभाराचे दोन शब्द कसेबसे बोलून तो माईक झटकून मोकळा झाला ! पण सांघिक भावनेचं कौतुक असं कीं त्याच्या खास सत्काराचा आनंद मागे उभ्या असलेल्या त्याच्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता !!
स्पेनची आर्थिक स्थिती खूपच खालावलेली आहे व तिथेही अंतस्थ कुरबूरी आहेतच. पण सध्या तरी सगळे स्पॅनियार्ड जगातले सर्वात सुखी लोक असावेत ! फुटबॉल, किंवा कोणताही लोकप्रिय खेळ, सर्व भेदभाव विरघळवून देशाला एका वरच्या पातळीवर कसा नेऊ शकतो, याचंच हे एक उदाहरण.

football_0.JPGइंग्लंडचं जगभरचं साम्राज्य हातून निसटलं त्याची बोंबाबोंब झाली नाही तेव्हढी आमचा बिचारा "जांबुलानी" इंग्लंडच्या त्या ग्रीनच्या हातून निसटला त्याची झाली !

Pages