ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
मॅच काय पाहता आली नाही
मॅच काय पाहता आली नाही इंटरनेटवर अपडेट्स वाचत होतो.
असो आज रात्रीची तरी नक्की पाहता येईल.
अंदाज चुकला की राव माझा. गारेगारा, यजमान आहेत खरे ताकदवान. मजा आहे.
फ्रान्स कडून रिबेरी, अनेल्का यांचा धडाका पाहण्यास मिळो.
हाइलाइट्स केव्हा असतील?
हाइलाइट्स केव्हा असतील?
माझं निरीक्षण - पूर्वार्धात
माझं निरीक्षण - पूर्वार्धात मेक्सिकोने लक्ष बॉलचा ताबा ठेवण्याकडेच अधिक दिलं [जवळ जवळ ७०%वेळ बॉल त्यांच्या ताब्यात होता] पण द. आफ्रिका बॉल ताब्यात आल्याबरोबर पुढे जाण्याच्या चाली रचत होते व त्याचा त्याना उत्तरार्धात लगेचच फायदा झाला.
द. आफ्रिकेचा गोली खूपच विश्वासार्ह वाटला; सँटोसचे दोन फटके -विशेषतः गोलच्या डाव्या कोपर्यात मारलेला- त्याने अफलातून अडवला. सँटोस वेगवान व शैलीदार आहे व या स्पर्धेत तो चमकणार असंच दिसतंय. द. आफ्रिकेचे कांही "थ्रू" पास व त्यांचं "शॉर्ट पसिंग" खूपच चांगलं होतं तर मेक्सिकोच्या खेळाडूंच स्वतःच्या सहकार्याच्या "पोसिशन्स"चं भान नेहमी अच्चूक असतं हे जाणवलं.
१-१ हा स्कोअर अत्यंत न्याय्य वाटला.
<<असाच फॉर्म, घरच्याच हवामानाची संवय व प्रेक्षकांचा प्रचंड पाठींबा याच्या जोरावर मेक्सिको ऐवजी द.आफ्रिकाच फ्रान्सबरोबर "अ"गटातून वरच्या फेरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.>> हा माझा अंदाज अगदीच पोरकट नव्हता, याचंही जरा पोरकट समाधान मिळालं !:हहगलो:
भाऊ निरिक्षण मस्तच.. पण
भाऊ निरिक्षण मस्तच.. पण कदाचित द.आफ्रिका १-० जिंकू शकले असते.. जो गोल झाला तेव्हा सगळे बचावपटू बॉलच्या जवळपास पण नव्हते.. अर्थात हे जर तर झालं.. पण एकूण सामना मस्त झाला...
आणि उरूग्वेला पण कमी लेखू नका.. त्यांनी पूर्वी दोनदा वर्ल्डकप जिंकलेला आहे.. फ्रान्सची सध्याची परिस्थिती फारशी चांगली नाहीये.. सगळे जण वैयक्तिक झकास आहेत पण एकत्रित खेळ कसा करतील हे बघणे महत्त्वाचे राहिल.. व्हिएराला कप्तान केल्यामुळे गॅलास थोडासा नाराज आहे तसेच हेन्रीला खेळवू नये असे म्हणणारे पण खेळाडू टीम मध्ये आहेत.. तेव्हा काहीच सांगता येत नाही.
दक्षिण अफ्रिका दुर्दैवी ठरली.
दक्षिण अफ्रिका दुर्दैवी ठरली. शेवटच्या मिनिटांमध्ये माफलाने मारलेली किक साईडबारला लागली. अन्यथा २-१ अशा फरकाने आरामात जिंकत होते.
भाऊ... विश्लेषण सुंदर...असेच बाकिच्या मॅचेसचेपण येऊद्या....
फ्रान्स वि.उरुग्वे अनिर्णित
फ्रान्स वि.उरुग्वे अनिर्णित ०-०. रिबेरीचे सुरवातीचे कांही आशादायक हल्ले वगळता हा सामना विश्वचषकाच्या दादा संघांकडून अपेक्षित अशा दर्जाचा होता असं म्हणता येणार नाही .
<<तसेच हेन्रीला खेळवू नये असे म्हणणारे पण खेळाडू टीम मध्ये आहेत.. तेव्हा काहीच सांगता येत नाही.>> कालच्या सामन्यातही त्याला ७० मिनीटानंतर आंत आणलं ! आयर्लंडविरुद्ध "क्वालिफाईंग" सामन्यात "हँडबॉल"चा गोल मिळवल्याने [ केवळ ज्या गोलमुळेच फ्रान्स क्वालीफाय झाला] शरमिंदा झालेल्या फ्रान्सच्या हेन्र्रीला विश्वचषकात चमकदार कामगिरी करून तो डाग धुवून टाकण्याचं अतिरीक्त "मोटीव्हेशन" आहे, असंही एक मत आहेच !
आज माझी फेवरिट टीम नम्बर २
आज माझी फेवरिट टीम नम्बर २ खेळणार. बघू मॅराडोना आणि मेसीची जादू चालते का. मेसी ब्रा॑झिलियन असायला हवा होता असे पेले म्हणाले यातच सगळ आले.
फेवरीट टीम टीम नम्बर १ च्या मॅचेस १५ ता. पासून. काका आणि कम्पनी.
दुर्दैवाने पोर्तूगाल बरोबर हे दोघेही एकाच॑ क्वार्टर फायनल ग्रुप मधे.
2010 FIFA World Cup's
2010 FIFA World Cup's OFFICIAL theme song
http://www.youtube.com/watch?v=pRpeEdMmmQ0
(Indian music composers Salim and Sulaiman Merchant collaborated
with South African singers Loyiso Bala and Eric Wainaina to record the
anthem for FIFA World Cup 2010)
(इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व)
कालची मॅच मस्त झाली. साऊथ
कालची मॅच मस्त झाली. साऊथ आफ्रिका खूप आत्मविश्वासाने खेळतोय असं वाटलं. फ्रान्स उर्रोग्वे बघायला मिळाली नाही.
अर्जेंटिना मस्त खेळतेय,
अर्जेंटिना मस्त खेळतेय, नायजेरियाच्य्हा बचाव फळीला काय झालय?
इथे नुसतं "मेश्शी मेश्शी
इथे नुसतं "मेश्शी मेश्शी मेश्शी" चा जयघोष चाल्लाय, जपान टी व्ही वर.
अर्जेंटीना वि. नायजेरीआ
अर्जेंटीना वि. नायजेरीआ १-०.
माझं निरीक्षण- मेस्सीला बहुधा नायजेरीआच्या गोलीने "मेस्मराईझ" [ किंवा व्हू-डू सारखं कांही] केलं असावं ! मेस्सीचे दोनतरी निश्चित गोल त्या गोलीने सहज अडवले ! मेस्सी व तो गोली [व्हिन्सेंट एन्यमा]दोघेही अप्रतिम !!
अर्जेंटीनाचा गोल म्हणजे "हेडींग"ने केलेल्या गोलचा अत्युत्तम नमुना होता. पहिला गोल केल्यामुळे अर्जेंटीनाने पहिल्या सत्रात तरी संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवलं. "टेम्पो"कमी करावासा वाटला कीं अरामात चेंडू आपल्याच खेळाडूंकडे पास करत रहायचा ! बिचार्या नायजेरीयाच्या वाट्याला मात्र ९०मिनीटं जीव तोडून खेळणं आलं. कदाचित, त्यामुळेच त्यांच्या कांही चांगल्या संधी थोडक्यात हुकल्या असाव्यात. [पेले, काका सारखी सोपी नाव नायजेरीअन कां नाही घेत ? त्यांच्या कांही खरोखर चांगल्या खेळाडूंचही नाव त्यामुळे लोकांच्या तोंडी नाही बसत]. मॅचचं दुसरं सत्र छानच रंगलं.
मॅरॅदोना फ्रेन्च दाढी व सूटात छान दिसत होता. व्हाट अ ग्रेट प्लेयर अँड अ ग्रेट शोमन !
USA! USA!! USA!!!
USA! USA!! USA!!! USA!!!
ड्रॉ केला तरी चालेल.
आत्ताची ताजी खबर - Game on
आत्ताची ताजी खबर - Game on and bet on—it’s England against the U.S. in the World Cup, with lager and beer on the line in a bet between President Barack Obama and British Prime Minister David Cameron.....The two leaders made the wager during a telephone call Saturday just few hours before the teams’ opening game in soccer tournament in South Africa. ...The bet was the best lager versus the best beer. The White House didn’t say what brands that meant [याहू स्पोर्टस न्यूज]
चौथ्या मिनीटाच्या आत
चौथ्या मिनीटाच्या आत इंग्लंडनी यु.एस.ए. वर गोल केला!
Green बाबा काय करुन बसला हे
Green बाबा काय करुन बसला हे
WC level ला अशी mistake... अरेरे !!!
गो हॉवर्ड!! गो ग्रीन!
गो हॉवर्ड!!
गो ग्रीन!
इंग्लंड वि. अमेरिका १-१. "Too
इंग्लंड वि. अमेरिका १-१.
"Too many cooks spoil the broth" असं कांहीसं वाटलं मला इंग्लंडचे रूनी, लँपर्ड कंपनी वारंवार अमेरिकेच्या गोलसमोर गर्दी करूनही १-० चा स्कोअर वाढवू शकत नव्हते तेव्हा. गोलमधल्या हॉवर्डला
नि:संशय श्रेय जातच . पण रूनी आणि कंपनी कोणताही प्लान ठरवून गोलबॉक्सकडे जात होते असं वाटलं नाही." चलो, घुसेंगे तो पहेले. अपनेसे कोई ना कोई तो गोल करेगाच ना !"असाच नूर दिसला इंग्लंडच्या आघाडीच्या फळीचा. कीं, हा माझाच कल्पनाविलास आहे ?
ग्रीनच्या "कोंबडी पकड" बद्दल काय बोलायचं ? बॉलचा दोष ? अदिदासचा "जाबुलानी" उगीचच बदनाम होतोय अस कालच नायजेरीयाच्या गोलकीपरने सिद्ध केलय ! कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, ग्रीनची ही अक्षम्य चूक आयुष्यभर त्याला भेडसावत तर रहाणारच, हे नक्की.
सामना आणखी कांही वेळ चालला असता तर आपल्याला काविळ झाल्याचीच भावना झाली असती; रेफरीला उठल्या-सुटल्या पिवळं कार्ड दाखवावं लागतच होतं !
कां कुणास ठाऊक, हा सामना मला "विस्कळीत"सा वाटला; मध्यरात्रीचाही यात दोष असावा !
त्या हेस्कीला एक चांगली संधी
त्या हेस्कीला एक चांगली संधी मिळाली होती गोल करायची, पण त्याने सरळ गोलकीपरकडेच मारुन ती अक्षरशः वाया घालवली.
जर्मनीची मॅच पाहिली की नाही
जर्मनीची मॅच पाहिली की नाही कोणी ? जोरदार आक्रमणं केली.. ऑसिजची वाट लागली पार..
क्लोस (?) आणि काकाऊ (?) ने चांगले गोल मारले..
क्रिकेट आणि हॉकीतल्या ऑसिजच्या यशामुळे फुटबॉल मधे त्यांची वाट लागलेली बघताना समहाऊ मजा आली..
पाहिली पाहिली , अर्थातच .
पाहिली पाहिली , अर्थातच . मस्तच गोल्स केले पोडोल्स्की , क्लोज , म्यूलर आणि काकाऊ यांनी . ऑस्ट्रेलियाची टीम खरं तर मॅच खेळलीच नाही असं वाटत होतं . अगदीच आळसावलेले आणि टीम स्पीरिटचा अभाव असलेले खेळाडू होते . त्यामानाने सर्वात तरुण कॅप्टन आणि बर्यापैकी नवीन खेळाडू असूनही जर्मनीने अतिशय उत्तम टीम स्पीरिट आणि ऑर्गनाईज्ड खेळ दाखवला . आता अपेक्षा नक्कीच उंचावल्यात .
योगी ल्योव ची कोच म्हणून ही विश्वचषकातली पहिलीच मॅच . चौथ्या गोलनंतर इतका रीलॅक्स्ड आणि मॅचनंतर इतका खूश दिसत होता तो .
संपदा अनुमोदन. पराग
संपदा अनुमोदन. पराग
आत्तापर्यंत बघितलेल्यापैकी सर्बिया - घाना सगळ्यांत आवडली. दोन्ही टीम्स चांगल्या खेळत होत्या. शुक्रवारच्या सोडल्यास बाकी सगळ्या पाहिल्या.
इंग्लंड अमेरिका मॅच फार भारी
इंग्लंड अमेरिका मॅच फार भारी झाली. एकदम हाय टेंशन. अमेरिका काय दमवत होती इंग्लंडला.
काल जर्मनीने धडाकेबाज सुरूवात केलीय, पोडोलोस्कीचा फॉर्म कायम राहिला तर मजा आहे, ऑस्ट्रेलियाकडून जरातरी प्रतिकाराची अपेक्षा होती.
भाऊ, मस्त निरिक्षण लगे रहो.
जादूगार मेसी जर्मन
जादूगार मेसी
जर्मन मशिन
इ.न्ग्लिश गो.न्धळ
आता नजरा डु.न्गा, कका, लुसियो.
जर्मन्स काय पासेस देत होते
जर्मन्स काय पासेस देत होते काल... सहीच मजा आली... कांगारूंना काही झेपतच नव्हते... आत्तापर्यंतच्या मॅचेस मध्ये जर्मनीचाच खेळ सगळ्यात चांगला झाला असे माझे मत
आत्तापर्यंतच्या मॅचेस मध्ये
आत्तापर्यंतच्या मॅचेस मध्ये जर्मनीचाच खेळ सगळ्यात चांगला झाला असे माझे मत >> अनुमोदन .
सर्वात महत्वाचे म्हणजे ते Well Oiled Machine सारखे खेळतायत. ज्या खेळाडूसाठी पास intended आहे तो त्याच जागी जातोय . आता याला intuttion म्हणा किन्वा skill किन्वा practice .....
रच्याकने .. असेच "डायविन्ग " करत राहिले तर ते EPL मधे फुल्ल चालतील
गो जर्मनी गो .....
<<सर्वात महत्वाचे म्हणजे ते
<<सर्वात महत्वाचे म्हणजे ते Well Oiled Machine सारखे खेळतायत. ज्या खेळाडूसाठी पास intended आहे तो त्याच जागी जातोय . आता याला intuttion म्हणा किन्वा skill किन्वा practice .....>> जर्मनीच्या बाबतीत " intuttion "वर काट मारून त्याऐवजी " शिस्तबद्धता" वापरण औचित्यपूर्ण होईल. जर्मन खेळाडू कितीही शैलीदार असले, तरीही सामना खेळताना संघाने अंगिकारलेलं तंत्र व आखलेली व्यूहरचना यापलीकडे तसूभरही जायचं नाही , हा जर्मन संघांचा जणूं स्थायीभावच असावा. म्हणूनच, जर्मनीच्या कोणत्याही खेळातल्या संघाबद्दल आदरयुक्त दराराच वाटतो. व म्हणूनच ते Well Oiled "Machine " सारखे वाटत असावेत !
काल इटलीला पॅराग्वेने रोखले
काल इटलीला पॅराग्वेने रोखले (का इटलीने पराभव टाळला??). इटलीची सुरूवात ही जोरदार कधीच नसते पण नंतर पकड घेतात, बघू यावेळी काय करतात. जर इटलीचा संघ विश्वचषक जिंकला तर इटलीचे सरकार फुटबॉल संघाला काही मिलीअन डॉलर्स बक्षीस म्हणून देणार होते, पण इटलीत सध्या सुरू असलेली आर्थिक मंदी पाहता सरकारने ही रक्कम न देण्याचे ठरवले. त्यावर इटलीचे खेळाडू नाराज झाले होते, पण इटालीअन जनतेचापण असाच कौल असल्याचे कळाल्यावर त्यांनी मान्य केले. वर जो बोनस मिळेल तो ही आपण इटलीला बहाल करू अशी भूमिका घेतलीय.
आज ब्राझीलची मॅच आहे.
ब्राझिलने २ गोल मारले !!!!
ब्राझिलने २ गोल मारले !!!!
एलॅनोचा गोल सही होता एकदम..
ब्राझील वि. उ. कोरिया -
ब्राझील वि. उ. कोरिया - २-१.
दोनही संघांचे प्रशिक्षक संघांच्या खेळाबाबत व सामन्याच्या निकालाबाबत समाधानी !
ब्राझीलच्या खेळाची झलक तर पहायला मिळाली. "काका" काल जरा नरम वाटले व रॉबिन्हो खूपच छान
खेळत होता पण काल त्याचा दिवसच नसावा.
उ. कोरिया नेहमीच इतकी बचावात्मक आखणी करतो कीं काल ब्राझीलसाठीचीच ती खास योजना होती, ते पुढच्य्या सामन्यातच कळेल. याँग टे सेचा वेग व बॉलवरचं नियंत्रण कौतुकास्पद.त्याची दोन-तीन धडाकेबाज साईड-लाईनवरूनची आक्रमणं तर आशियाई खेळाडूना व प्रेक्षकाना कॉलर ताठ करायला लावणारी ! पण, आपल्या गोलचं रक्षण करायला सगळं सैन्य मागे ठेवून असली एकांडी शिलेदारी ब्राझीलसारख्या बलाढ्य संघासमोर कुचकामी न ठरली तरच नवल. म्हणूनच, उ. कोरियाने केलेला एक गोलसुद्धां सलामाला पात्र !
पोर्तुगाल वि. आयव्हरी कोस्ट ०-०.
शेवटच्या अर्ध्या तासापुरता खेळायला आलेल्या ड्रोग्बाच्या स्वागतासाठी स्टेडियममध्ये झालेला जल्लोष वगळता प्रेक्षकाना नाचायला लावणारा खास खेळ काही झाला नाही. रोनाल्डोकडे बॉल गेला कीं जरा धडकन वाटायची पण काल त्याचाही दिवस नसावा.
मॅन ऑफ द मॅच झाल्यावर रोनाल्डोने म्हणे रेफरीजनी चागल्या खेळाडूना बचावफळीतील दांडग्यांपासून अधिक संरक्षण द्यावं असं सूचित केलं. [पेलेने यावर आपल्या पायाच्या नळीवरून हात फिरवून नक्कीच जोरात टाळ्या वाजवल्या असाव्यात !]. ब्राझीलच्या विजयामुळे पोर्तुगालचं टेंन्शन वाढणं स्वाभाविक !
गेल्या दोन विश्वचषकात इंग्लंडचा प्रशिक्षक असलेला एरिकसन आता आयव्हरी कोस्टचा प्रशिक्षक आहे. मला त्याची हंसत हंसत दिलेली ही प्रतिक्रिया खूपच भावली -" इंग्लंडच्या संघापेक्षा माझा हा संघ [आयव्हरी कोस्ट] कितीतरी आनंदी व सुखी आहे !" शेवटी , जगभरच्या क्रीडारसिकाना आनंद द्यायचा तर मुळात तुम्ही आनंदी असायलाच हवं ना !!
Pages